आळेफाटा : गैरव्यवहार प्रकणी जुन्नरच्या माजी सभापतींवर गुन्हा दाखल 

0

आळेफाटा : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जमिनीच्या मुरूम उत्खननात गैरव्यवहार केल्याप्रकणी बाजार समीतीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे आणि दिनकर कुतळ यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काॅग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

31ऑगष्ट 2027 रोजी चौकशी समितीने आहवाल सादर करून लेंडे यांनी कुतळ यांच्या मदतीने पदाचा गैरवापर करून 38 लाख 74 हजार 80 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला यावरून खेड येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांनी बुधवारी ( दि.11) रात्री सभापती रघुनाथ लेंडे व दिनकर कुतळ यांच्या   विरोधात गैरव्यवहार प्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरुन नारायणगाव पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

राष्ट्रवादी काॅग्रेसला बसलेला पहिला धक्का होता त्यानंतर त्यांच्यावर गैरव्यवहार झाला असल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे जुन्नर तालुका राष्ट्रवादीला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे

LEAVE A REPLY

*