करार संपल्याने आधार केंद्र बंद; नविन कराराची प्रतिक्षा, नागरीकांचे हाल

0
नाशिक । आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज व पुरावा ग्राह्य धरला जात आहे़ प्रत्येक ठिकाणी याची मागणी केली जात असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत़ मात्र नाशिकमध्ये आधार साठी शासनाने करार केलेल्या बेसिक्स कंपनीसोबत करार संपल्याने आधार केंद्र बंद करण्यात आली आहे. त्यामूळे नागरीकांना आधार केंद्रांचा शोध घ्यावा लागत आहे.

आधारकार्ड हा बँक, मोबाईल सीमकार्ड, रहिवासी आदी ठिकाणी पुरावा म्हणून मागितले जात आहे़ यामुळे अनेकांनी आधारकार्डला प्राधान्य दिले होते़ अनेकांचे आधार कार्ड काढणे बाकी आहे. नाशिक जिल्हयात आधार कार्ड काढण्यासाठी बेसिक्स या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे.

या कंपनीव्दारे जिल्हयात 100 केंद्र सुरू होती. मात्र आता कंत्राट दिलेल्या कंपन्यांची करारची मुदत संपल्यामुळे 15 दिवसांपासून ही केंद्रच बंद झाली आहे. त्यामुळे नवीन नाव नोंदणीसह आधारवरील माहीतीत दुरुस्ती करण्यासाठी नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.

एकीकडे शासनाकडून नोंदणी सक्तीची केली जात असताना आणि शासकीय लाभ आधारवरच दिले जात असतानाही नोंदणी केंद्र मात्र बंद ठेवली जात आहे. शासकीय योजनांचा लाभ त्याआधारावरच दिला जात असतानाही हे कंत्राट संपण्यापुर्वीच शासनाने नव्याने प्रक्रीया राबविणे आवश्यक होते.

परंतु तसे न करता करार संपूनही कुठलिही प्रक्रीया अद्याप सुरु झाली नाही. त्यामुळे 125 किट सध्याच्या स्थितीत जिल्हा प्रशासनाकडून वापराविना पडून आहेत. तर कारवीसह दोन कंपन्यांचे करार संपले नसल्याने अवघे 47 ते 50 किटद्वारेच सध्या आधारची नोंदणी केली जात आहे.

त्यातही शहरात सातच किट सुरु असल्याचे सांगितले जात असल्यानेच नोंदणीची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान आता शासकीय सेवांची जबाबदारी महा-ऑलाईन या कंपनीवर दिली असल्याने आधार नोंदणीचीही जबाबदारी ही महा-ऑनलाईनकडे देण्याचे शासकीय स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

LEAVE A REPLY

*