आधारसाठी जादा शुल्क आकारल्यास कारवाई

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – आधारनोंदणी ही पूर्णता नि:शुल्क असून मात्र, आधार बाबत काही दुरुस्ती असल्यास निर्धारीत केलेल्या शुल्क आकारावे.अधिक आकारल्यास तकआर प्राप्त होताच संबधितावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

सध्या जिल्हा प्रशासनामार्फत चालणारी आधार नोंदणी केंद्र बंद आहेत.त्यामूळे आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी खासगी केंद्राकडून गोरगरीब व गरजुवंताची आर्थिक लुट केली जात आहे.एखाद्या व्यक्तीला आधारकार्डची गरज असल्यास अव्वाच्या सव्वा दर आकारला जातो.

मात्र, अनेक जण आपले काम महत्वाचे असल्याने तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने दुकानदारांची ङ्गावलत असल्याचे दिसून येत प्रशासनाने बाबनिहाय शुल्क ठरवून दिले असून अधिक शुल्क घेणार्‍यावर कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*