Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमेरी ख्रिसमस म्हणत ‘हेल्मेट जनजागृती’ अभियान!

मेरी ख्रिसमस म्हणत ‘हेल्मेट जनजागृती’ अभियान!

नाशिक | प्रतिनिधी

शहरात काल विविध ठिकाणी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा कऱण्यात आला. या वेळी सिडकोतील सीटी सेंटर मॉलमध्येही नाताळ उत्साहात साजरा करीत असताना निकिता रतिलाल सुमराव या मुलीने सांता बनुन हेल्मेटबाबत जनजागृती केली.

- Advertisement -

नाताळ निमित्त सिटी सेंटर मॉल मध्येही उत्साहाचे वातावरण होते. सांताच्या वेशात डोक्यात टोपी ऐवजीं हेल्मेट घालून उपस्थितांना हेल्मेटसक्ती व वाहतूक नियमांचा संदेश देत होती. ‘चारचाकी चालवतांना सिट बेल्ट  व दुचाकी चालवतांना हेल्मेट जरूर परिधान करा’ अशा आशयाचा फलक तिच्या हातात होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या