चांदवड टोलनाक्यावर ट्रक पेटला; टोलनाक्यालाही लागली आग

0

नाशिक : चांदवड टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी थांबलेल्या एका मालवाहतूक ट्रकने अचानक पेट घेतला. या घटनेत टोलनाक्यालाही आग लागल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

सदर ट्रक नाशिककडून मालेगावच्या दिशेने जात होता. मंगरूळ टोलवरील पाच नंबरच्या लेनमध्ये येताच ट्रकचे टायर फुटले व आग लागली.

यावेळी सोमा टोलच्या आग प्रतिबंधक पथकाने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, ट्रक मध्ये प्लास्टिक निर्मिती साठी लागणारा कच्चा माल असल्याने त्याने पेट घेतला व आगीने रौद्ररूप धारण केले.

आगीची तीव्रता बघता मालेगाव, मनमाड, पिंपळगाव येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. आग आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी दीड तास कालावधी लागला.

यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. आगीत ट्रक सम्पूर्ण पणे जळून खाक झाल्याने लाखोंच नुकसान झालं आहे.

चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन बंम्ब आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत. एका बाजूची वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.

 

LEAVE A REPLY

*