Photo Gallery : आठवणीतले ए. टी. पवार ; अशी होती त्यांची राजकीय कारकीर्द

0
ए. टी. पवार यांनी पहिली निवडणूक झेडपी ची लढली आणि त्यात त्यांचा 73 मतांनी विजय झाला. त्यांनी लगेच कनाशी ते दळवट हा पहिला रस्ता करण्याचे काम हाती घेतले ते यशस्वीपणे पार पाडले.

कुणाचे शिक्षणासाठी काम होत नाही, नोकरी मिळत नाही त्यांचेदेखील कामं ए.टींनी अगदी चोखपणे पार पाडली. झेडपीत पद मिळाले. यामूळे ए.टी. पवार येथील परिसरातील देव माणूसच होते. आपल्या समस्या सोडविण्याचे काम फक्त ए.टी.च करु शकतात हे त्यांनी जनू गृहीतच धरले होते. आदिवासी भागाची पाहणी करुन त्यांनी आदिवासी भागात त्यांनी ठिकठिकाणी पाझर तलाव बांधण्याचे काम केले.

1972 सालच्या विधानसभेच्या निवडणूकीत त्यांचा 12 हजार मतांनी विजय झाला होता. वयाच्या 34 व्या वर्षी ए.टी. पवार आमदार झाले. आमदार झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी लक्ष विकास कामाकडे वळवले. शिक्षण आरोग्य रस्ते पाझर तलाव, आश्रमशाळा, पाणीपुरवठा योजना, याचा अभ्यास केला.

आदिवासी भागात रस्ते नाहीत शिक्षण नाही. आरोग्य सेवा नाहीत. एखादा अपवाद सोडला तर धरण नाहीत. पाणी अडवण्याच्या योजना नाहीत एवढचं कशाला साधा पाझर तलाव आणि गावतळी नाहीत. हे काम कुणीतरी करायला हवं मग त्यांनी स्वतःच विडा उचलला.

ए.टी.नी अजून जोरात कामे चालू केली. त्यांनी आदिवासीसाठी वीजपंप व तेलपंप योजना सुरु केले. 1976 ला राज्यातील सर्व आदिवासींना कर्जमुक्ती देण्यात आली. ए.टी ही सर्व काम नीट होत आहे की नाही, याकडे स्वतः लक्ष देत असे. नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गडावर सप्तश्रृंगीचे मंदिर आहे. तिचे साधा रस्ता होता. ए.टी. ने स्वतः तिथे रस्ता बनवला. यामुळे लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळाला.

नंतर थोड्याच दिवसांत ए.टी. पवार समाजकल्याण व आदिवासी विकास खात्याचे राज्यमंत्री झाले. ज्या समाजघटकांसाठी ए.टी.पवार ना काम करण्याची इच्छा होती तेच खाते त्यांना मिळाले मग ए.टीच्या कामांनी अधिक गती घेतली त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात आश्रम शाळेचे जाळे विणायला सुरुवात केली आणि त्याच श्रेय जात ते ए.टी. पवार अशी छोटी मोठी खूप खूप कामे. ए.टी. नी केली.

आदिवासींची पाण्यासाठीची वणवण संपावी यासाठी या माणसाने तब्बल चार दशक शासनाकडे पाठपुरावा करुन आपल्या भागासाठी एक मोठ धरण बांधले.

27 लघुपाटबंधारे आणि 150 पाझर तलाव बांधून पाणी अडवण्याचा भगीरथ प्रयत्न केला. आदिवासी मध्ये शिक्षणक्रांती घडावी म्हणून शेकडो आश्रमशाळा काढून दिल्या.

महाराष्ट्रातील निम्म्या आश्रमशाळेंना मंजुरी देण्याचे काम त्यांच्याकडे जाते. आदिवासींच्या चौफेर विकासाठी स्वतः आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करणे, आयुक्तालय नाशिकला हलविले.

आदिवासींच्या हस्तांतरीत जमिनी त्यांना परत मिळवून देणं. अशा कितीतरी गोष्टी घडवून आणल्या व आदिवासींपर्यंत विकासाची गंगा पोहचवावी यासाठी पाणी आणि शिक्षणाप्रमाणेच रस्ते बांधणी आणि आरोग्यसेवेची कामे धडाक्याने केली. ए.टी. पवार 1972 पासून आठ वेळा प्रचंड मतांनी विधानसभेवर निवडून आले.

चार वेळा त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्रीपद भुषवले. राजकीय साठेबाजीत न अडकता सर्व सामान्यासाठी अविरतपणे काम करत आलेल्या अजातशत्रूचे आज वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या आठवणी नेहमीच स्मरणात राहतील.

-(कल्पना देवरे, राष्ट्रसंत आनंद ऋषीजी विद्यालय, नाशिकरोड)

फोटो : किशोर पगार

LEAVE A REPLY

*