ए. टी. पवार नाशिक जिल्ह्यातील ‘पाणी’दार नेतृत्व

0
कळवण – कळवण  तालुक्याचे पाणीदार नेतुत्व, पुनंद प्रकल्पाचे शिल्पकार, कळवण विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते, मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे, माजी मंत्री आपल्या  अथक प्रयत्नांनी मतदारसंघाचा कायापालट करणारे जननायक, जनसामान्यविषयी तळमळ असलेला, नेता, आदिवासीं बांधवाना विकासाची गंगोत्री दारी आणून देणारा सच्चा नेता, दूरदृष्ठीचा नेता, ए . टी  . पवार  हे स्वर्गवासी झाले त्यांच्या समूर्तींना उजाळा देणारा हा लेख.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दळवट या छोट्याश्या गावी १ डिसेंबर १९३८ मध्ये त्यांचा जन्म झाला. शिक्षण , सहकार , विकास , व राजकीय क्षेत्रात त्यांचे कार्यांमुळे सर्व महाराष्ट्रात ए . टी  . पवार हे नाव जाऊन पोहोचले निगर्वी व संयमी अर्जुन म्हणून कळवण  तालुक्याचे विकासाचे दैवत  म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली होती.

पवारांचे शिक्षण दळवट, कळवण, नाशिक , औरंगाबाद , व मुंबई , येथे झाले असून त्यांनी कायद्याचाही  अभ्यास प्राप्त केलेला आहे. सुरवातीपासूनच अत्यंत मेहनती , आणि बुद्धिमान असलेले ए . टी  . पवार यांची घरची परिस्थती खूपच जिकिरीची असल्याने शिक्षण संपल्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी काही दिवस केली नंतर राजकारणात आले.

दळवट  ग्रामपंचायत सरपंच ते तेथील सोसायटीचे chairman , कळवण तालुका पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष १९७२ – १९७७ , कळवणचे आमदार, १९७७ – १९७८ , राज्य बांधकाममंत्री १९८२ – १९८४ , १९८३ ला आदिवासी बांधकाममंत्री, अशी विविध पदे त्यांनी भूषविली महाराष्ट्रातील आदिवासी विकास खात्याचे आयुक्तालय त्यांनी पुण्याहून नाशिकला आणले.

स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते . दादांचे ए . टी  . पवारांवर फार प्रेम होते . दादांच्या विश्वासाला ए . टी  पवार पूर्ण उतरले १९८५ साली ए . टी  . पवारांच्या पराभवामुळे कळवण  तालुक्याची मोठी विपरीत हानी होऊन ५ वर्षात विकास खुंटून मोठ्या विकासात्मक हानीला तालुक्यातील जनतेला सामोरे जावे लागले होते .

दळण – वळण सुविधा , ओद्योगीक प्रशिक्षण , व इतर  शिक्षण , छोटे – मोठे दळणवळण बंधारे , आश्रमशाळा , पाणीपुरवठा , वनीकरण विभाग , लघुपाटबंधारे , एस . टी  , डेपो , सार्वजनिक ,आरोग्य , सार्वजनिक आरोग्य , पिण्याच्या पाण्याच्या सुविधा , सप्तशृंग गडाचा रास्ता , अनेक विभागीय कार्यालये कळवण  येते आणण्यात ए . टी  पवारांचा सिंहाचा वाटा आहे . आजपर्यंतच्या कालावधीतील संपूर्ण मतदार संघात पूल व रस्ते , झाले , रस्त्यांचे डांबरीकरण झाले, शेकडो पाझर तलाव, पीकपवेल्स, छोटी – मोठी धरणे, विकासाच्या हजारो योजना मतदार संघात पूर्णत्वास नेऊन मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचे सर्व श्रेय ए . टी  , पवार यांनाच दयावे लागेल.

महाराष्ट्रात बारामती मतदार संघानंतर कळवण  मतदार संघाचे नाव आदराने घेतले जाते याचे खरे शिल्पकार ए . टी  . पवारच आहेत . सर्वच पक्षाचे कार्यकर्ते पवारांच्या माघे काम करणारा नेता व आमदार म्हणून सदैव पवारांच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळेच कळवण मतदार संघाचा विकास व कायापालट घडवून  आणण्यात ए . टी. पवारांना यश मिळाले हे  त्रिकाल  सत्य आहे.

बोलण्यापेक्षा कृती  केलेली बरी  हि विचारधारा सदैव जोपासून ए . टी  . पवारांनी कळवण  मतदार संघाचा कॅलिफोर्निया करून महाराष्ट्राच्या नकाशावर कळवण  मतदार संघाचे नाव पोहचविले आहे.

पवार हे लोकशाहीचे खन्दे  पुरस्कर्ते व प्रसंगी विरोधकांचे वेळोवेळी कामे करणारे , आश्वासन न देता हाती घेतलेली सर्व कामे पूर्णत्वास नेणारे कळवण  तालुक्यातील या अर्जुनानॆ सलग ९ वेळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करून ए . टी पवारांनी मतदारसंघातील जनमानसात नितांत आदरभाव त्यांनी मिळविला होता.

कालवण तालुक्यातील प्रत्येक खेडे गावाला जोडणारा रास्ता डांबरीकरन करून तालुक्यातील वाहतूक व्यवस्था भक्कम करणारे ए . टी  . पवार हे महाराष्ट्रातील एकमेव आदिवासी भागातील लोकनायक नेते असावेत. नांदुरी – अभोणा रस्त्यावरील चिंचबारीच्या  घाटकामामुळे आदिवासी भागातील जनतेबरोबरच सप्तशृंग गडावर येणारे गुजरात राज्यातील प्रवासीही ए . टी  . पवारांना धन्यवाद देतात. आदिवासी बांधवांचा विकास करून प्रगत तंत्रज्ञान वापरून खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात आणणारे नेते म्हणून ए . टी  . पवार यांचे नाव आदराने मतदार संघात कायम घेतले जाते.

कळवण  येथे प्रांत कार्यालय, उपविभागीय कृषी कार्यलय, आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालय , उपजिल्हा रुग्णालय , पोलीस उपविभागीय कार्यलय , आदी महत्वाची शासकीय कार्यालय ए . टी  . पवारांच्या अथक प्रयत्नाने कळवण येथे   आलेली आहेत.

नाशिक जिल्ह्यतील काही मतदार संघामध्ये रस्त्यावर खडे कि खड्यात रास्ता हेच काळात नाही परन्यू कळवण  मतदार संघात मात्र ए . टी  . पवारांच्या अथक प्रयत्नाने गाव तेथे रास्ता , गाव तेथे विद्युत पुरवठा, गाव तेथे पिण्याचे पाणी, गाव तेथे शेतीला पाणी, गाव तेथे एस . टी  , गाव तेथे आरोग्य सेवा , याचे सर्व श्रेय ए . टी  . पवार यांनाच द्यावे लागेल.

ए. टी  . पवारांचे एक खास वैशिष्ट्य  म्हणजे पत्रकार बांधवानी विकासकामांच्या बाबतीत पवारांना विचारले कि ईतकी विकास कामे आपण केली याबाबत आपले मत काय त्यावेळेला ए . टी. पवार. नेहमी सांगत कि मी मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास हे व्रत हाती घेतले असून मतदार संघाच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटत  राहीन असे ते मोट्या अभिमानाने व निष्ठेने सांगत असत.

आदिवासी समाजाबरोबरच इतर  समाजाचे कल्याण साधणारा सर्वाना फलदायी ठरतील अशा विविध योजना राबवून त्यांनी कळवण  मतदार संघात केलेली विकासकामे आयुष्यभर मतदार संघातील जनतेच्या लक्षात राहणारे आहे.

ए . टी  . पवारांच्या सर्व विकासकामात सामाजिक बांधिलकीचे व्रत हाती घेऊन त्यांच्या पत्नी शकुंतलाताई पवार यांनी दिलेले योगदान नेहमी मतदार संघात चिरंतन समरणात राहणारे आहे. राजकारणात त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन त्यांचे पुत्र नितीन पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा  जयश्रीताई पवार, जिल्हा परिषद सदस्या भारती पवार, पुत्र प्रवीण पवार, यांनीही तालुक्यात विकासकामांना गती देऊन कोट्यवधी रुपयांची विकासकामे केलेली आहेत.

कळवण सारख्या अतिदुर्गम भागात ए. टी  . पवार यांनी विकासाची गंगा आणून मतदार संघाचा चेहरा – मोहरा बदलून टाकला आहे . महाराष्ट्रात कोणत्याच तालुक्यात नसतील एवढी धरणे कळवण  तालुक्यात ए . टी  . पवारांनी बांधून तालुका व मतदार संघ जलमय करून टाकला आहे.

कळवण, बागलाण , सुरगाणा या तालुक्यांमध्ये प्रचंड विकास कामे करून ए . टी  . पवार यांनी जनतेच्या मनात मादराचे स्थान मिळविले आहे. आपल्या समाजाची उन्नती साधण्यासाठी समाजातील युवकांना शिक्षणाची आवड निर्माण करून शिक्षक , प्राध्यापक , डॉक्टर , एइंजिनिअर , कृषी अधिकारी , अशा विविध पदांवर आज समाजातील विविध युवक मोठ्या संख्येने दिसत आहेत. हा सर्व बदल घडवून आणण्यात ए. टी . पवार यांची प्रेरणा आहे.

कळवण  मतदार संघाचा ईतिहास व भूगोल तोंडपाठ असणारे ए . टी  . पवार याना नेहमी भाषणे करण्यापेक्षा कामे करणे हेच महत्वाचे वाटायचे म्हणून त्यांचा नावलौकिक मतदार संघात नेहमी असायचा .

ए . टी  . पवार . हे नाव नाशिक जिल्ह्याच्या व कळवण  तालुक्याच्या राजकारणात ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थानावर जाऊन बसले आहे . काळ बदलत जातो लोक बदलत जातात आणि त्यामुळे राजकीय नेत्यांचा प्रभावही कमी होत जातो याचा सर्वत्र अनुभव आहे मात्र ए . ती . पवारांना हा नियम लागू होत नाही या नावाचा प्रभाव प्रत्येक निवडणुकीनंतर वाढलेलाच दिसून येतो . जिल्ह्याच्या राजकारणात कमी बोलणारे व प्रचन्ड विकास कामे करणारा नेता म्हणून सर्व महाराष्ट्रात ए .टी  , पवार यांची ख्याती आहे. प्रत्येक मुख्यमंत्री महोदयांनी ए . टी  . पवार यांच्या कळवण विधानसभा   मतदार संघातील विकासकामांचे भरभरून कौतुकच केलेले आहे.

आमदार व माजी मंत्री ए . टी  . पवार . यांच्या स्वर्गवासी होण्याने कळवण  तालुक्याची फार मोठी हानी झालेली असून कळवण  मतदार संघाचे रुपडे बदलविणारे नेतृत्व म्हणजे अर्जुन तुळशीराम पवार म्हणजेच ए . टी  , पवार होय यांच्या स्मुर्तीना कोटी – कोटी प्रणाम.

– किशोर पगार

LEAVE A REPLY

*