बापरे! मतदानकेंद्रावर साप निघाला; यंत्रणेची पुरती धांदल

0

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

आज सकाळी सात वाजेपासून देशभरात सात टप्प्यांतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. देशभरातील 117 मतदारसंघात सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे.

उन्हाचा तडाखा कमी असल्यामूळे सकाळच्या सत्रात मतदारांनी मोठी गर्दी केली होती. केरळच्या कन्नूर लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मतदान सुरु असताना साप निघाला आणि एकच धांदल उडाली.

कन्नूर मतदारसंघातील मय्यील कंडाक्काई मतदान केंद्रावरील एका व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सापाचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर, मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता.

निवडणूक अधिकारी अन् मतदारांमध्ये भिती पसरली होती. दरम्यान, सापाला बाहेर काढत मतदान पूर्ववत करण्यात आले.

LEAVE A REPLY

*