मालेगाव-शिर्डी रस्त्यावर खासगी बसला अपघात; १०ते १५ प्रवाशी जखमी

0
मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड पासून जवळ चोंडी घाटात मालेगांव शिर्डी रोड आज सकाळी खाजगी बस पलटी होऊन 10 ते 15 प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

जखमी प्रवाशांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.ही खासगी बस पुणे येथून भोपाळला जात असताना ओवरटेक करण्याच्या नादात ड्रायव्हरचा बस वरून ताबा सुटला आणि ती पलटी झाली.

सुदैवाने या अपघातात कोणती ही जीवित हानी झाली नसली तरी बसचे मात्र मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच मनमाड व चांदवडच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना हॉस्पिटल मध्ये दाखल केले

LEAVE A REPLY

*