Video : सीएसएमटीजवळ पादचारी पूल कोसळला; अनेकजण दाबले गेल्याची भीती

0

मुंबई । प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज संध्याकाळी पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण भागच खाली कोसळल्याने यात अनेकजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या दुर्घटनेमुळे मुंबईच्याबाहेर जाणारे मार्ग बंद करण्यात आले असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असल्याचे समजते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे.

दम्यान आत्तापर्यंतच्या माहिती नुसार २८ जण जखमी व चार जण दगावले आहेत . जखमींंना सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*