येवला तालुक्यातील राजापूर परिसरात हरिणाची शिकार

0

राजापूर ( वार्ताहर) ता. ४ :

रात्रीच्या वेळी बंदुकीच्या साह्याने हरिणाची शिकार करू आणि एक हरीण घटनास्थळी टाकून शिकार केलेले काही हरिण बरोबर घेऊन गेल्याची चर्चा ममदापुर भारम चौफुली येथे सुरू आहे.

वन विभागाच्या कर्मचारी यांनी मृत हरणाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी येवला येथे पाठवला आहे.

राजापूर,  ममदापूर , खरवंडी , देवदारी , भारम या परिसरात हजारो हरीण वावरतांना दिसतात या हरिणाची शिकार ही या भागात नेहमीच झाली आहे.

गेल्या जून महिन्यात मालेगाव येथील हरिणाची शिकार करतानी राजापूर येथील संतोष चव्हाण यांनी जीव धोक्यात घालून एका आरोपीला पकडून दिले त्या पैकी तीन आरोपी ना अटक करण्यात आली व सादर आरोपीना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यातील एक आरोपी फरार आहेत.

जामीन झालेल्या आरोपीची हजेरी वन विभागाच्या येवला कार्यालयात सुरू आहे. शिकार करणाऱ्या आरोपींना कोणी तरी हरिणाची व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची गुप्त माहिती देत असल्याने या भागात हरिणाची शिकार होत आहेत.

काल रात्री सफेद रंगाची गाडी येऊन बंदुकीच्या साह्याने शिकार करून काही हरिण बरोबर घेऊन गेल्याची चर्चा आहे . शनिवारी दी ४ / ११ /२0१7 सकाळी भाऊसाहेब मोरे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ममदापुर भारम रस्त्याच्या कडेला हरीनाची शिकार झाल्याची माहिती दिली ही माहिती मिळताच वनपाल अशोक कळे कर्मचारी घेऊन हजर झाले.

बंदुकीचा आवाज ऐकू आला त्यामुळे शेजारील लोक जागे होऊन बॅटरी घेऊन बाहेर आले असता शिकारी येवल्याच्या दिशेने गाडी जाताना दिसली, नंतर घटनास्थळी लोकांनी जाऊन बघितले असता एक हरीण मृत अवस्थेत आढळून आले.

दिवसा ढवळ्या या चौफुली वर हरिणाची शिकार केली जाते. आरोपीना रोखण्यासाठी शेतकऱ्यांची इच्छा असताना बंदुकीच्या धाकाने कुणी पुढे येत नाही. वन विभागाकडे कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे शेकडो हरिणांना जीव गमवावा लागला आहे .

राखीव वन संवर्धना साठी कोटी रुपयांचा निधी येत आहेत त्यात तो निधी खर्च देखील होत आहेत परंतु दर महिन्याला चार ते पाच हरिनाना आपला जीव गमवावा लागत आहे.

वन विभाग राखीव वन संवर्धन या मध्ये काय काम करत आहेत हा या भागातील लोकांना पडलेला प्रश्न आहे . या परिसरात हरिणाची शिकार नेहमीच होत असते त्यामुळे या परिसरात येणाऱ्या गाड्यांची चौकशी होणं गरजेचं आहे वन विभागाने गावोगावी समितीचे  नेमणूक केली असून या समितीचे लोक फक्त नावापुरते असून केवल वन विभागाच्या कार्यक्रमला हजर राहण्यापलिकडे काही करत नाहीत.

राजापूर वन विभागात दोन कर्मचारी साडेपाच हजार हेक्टर विभागाचे कामकाज पाहत आहे रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग साठी एका वाहनाची गरज आहे.  सदर पंचनामा करते वेळी  वनपाल अशोक काळे , वन रक्षक ज्ञानेश्वर वाघ , राजेंद्र दौड , वन सेवक पोपट वाघ , कचरू आहेर , राजेंद्र आवारे , भाऊसाहेब वाघ इत्यादी हजर होते.

घटनास्थळी हजर असलेल्या लोकांचे जबाब घेतले असता प्रत्येक जबाबात विसंगती आढळून आली आहे. त्यामुळे सदर हरणाची शिकार कुत्र्यांनी केली असावी असा अंदाज आहे

संजय भंडारी,वन क्षेत्रपाल येवला

LEAVE A REPLY

*