Type to search

Featured सार्वमत

फेक अकाऊंटवर 50 हजार एक्सचेंज

Share

श्रीगोंद्यात पोस्टमारस्तची चलाखी । गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- नोटबंदीच्या काळात फेक अकाऊंट ओपन करून त्यावर 50 हजार रुपये एक्सचेंज करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील पोस्ट मास्तराने ही चलाखी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे.

अजय अमृत नाठे असे आरोपीा असलेल्या पोस्टमास्तरचे नाव आहे. ते सध्या नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात कार्यरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संदीप सोपान घोडके यांच्या नावाने त्यांनी नोटबंदीच्या काळात पोस्टात नाठे यांनी फेक अकाऊंट ओपन केले. पोस्टमास्तरचा पदाचा दुरूपयोग करून ते उघडले गेले. त्यावर 50 हजार रुपये भरले. नंतर त्याचे बनावट कागदपत्र तयार करून खात्यात बदलून आलेले 50 हजार रुपये काढून घेतले. भारत सरकारची फसवणूक केल्याची तक्रार संदीप घोडके यांनी पोलिसांत दिल्यानंतर पोस्टमास्तर नाठे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!