TWEET: ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा पहिला लोगो प्रदर्शित

0

अभिनेता आमिर खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा पहिला लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे.

आदित्य चोप्राच्या ‘यशराज फिल्म्स’ या बॅनरअंतर्गत साकारणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करणार आहेत.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ प्रदर्शनापूर्वीच इतका चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या चित्रपटाची स्टारकास्ट. परफेक्शनिस्ट आमिर खान, बिग बी अमिताभ बच्चन हे दोन तगडे कलाकार या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरत आहेतच. पण, त्यासोबतच ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख आणि कतरिना कैफसुद्धा ‘ठग्स…’मधून झळकणार आहेत. २०१८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .

हा चित्रपट फिलीप मिडॉज टेलर यांच्या ‘कन्फेशन ऑफ अ ठग’ या पुस्तकावर आधारित असून त्यातून एका वेगळ्या जगताची सफर घडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

*