Thursday, April 25, 2024
Homeधुळेबाम्हणेत दुचाकी अपघातात वृध्द ठार

बाम्हणेत दुचाकी अपघातात वृध्द ठार

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

शिंदखेडा- दोंडाईचा रस्त्यावरील बाम्हणे गावालगत असलेल्या माध्यमिक शाळेजवळ भरधाव दुचाकीस्वाराने बैलगाडीला जोरदार धडक दिली.

- Advertisement -

त्यात दुचाकीस्वार वृध्द जागीच ठार झाले. हा अपघात आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

राजाराम महारु भिल (वय 61 रा. भरवाडे ता. शिरपूर) असे मयताचे नाव आहे. ते आज सकाळी दुचाकीने शिंदखेड्याकडून दोंडाईचाकडे जात होते.

त्या दरम्यान बाम्हणे गावालगत असलेल्या माध्यमिक हायस्कूल जवळ त्याचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी पुढे चालत असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीस्वार राजाराम भिल यांना जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बाम्हणे-धमाणे येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोंडाईचा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या