लघुसिंचन विभागाचे कामकाज चालते कार्यकारी अभियंत्याच्या घरातून

0
जळगाव । शासकीय कार्यालयात वारंवार चकरा मारुन देखील फाईलींना मंजुरी मिळत नाही. अशी परिस्थिती असताना जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातील जलयुक्त शिवार कामांच्या फाईलला आपल्या घरुन मंजुरी दिली असल्याचा धक्कादायक कबुलीजबाब खुद्द कार्यकारी अभियंता आर.के. नाईक यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत दिला. याप्रकारामुळे संतप्त सदस्यांनी नाईक यांना चांगलेच धारेवर धरले.

जि.प. जलव्यवस्थापन समितीची सभा अध्यक्षा ना.उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी सभापती प्रभाकर सोनवणे, समिती सदस्य लालचंद पाटील, पल्लवी सावकारे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के. नाईक आदि उपस्थित होते. जि.प. सदस्या वनिता गवळे यांनी कुर्‍हा वढोदा जि.प. गटात जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची चौकशीबाबत लघुसिंचन विभागास पत्र दिले होते.

यात प्रचंड अनियमितता आढळून आल्याने कामाची चौकशी करुनच देयके अदा करण्याची तक्रार दिली होती. असे असतानाही कार्यकारी अभियंता आर.के. नाईक यांनी परस्पर संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले. याबाबत जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी नाईक यांना परखड शब्दात जाब विचारला असता. संबंधित ठेकेदार हा जि.प. सदस्य निलेश पाटील यांच्यासोबत फाईल घेऊन आपल्या घरी आल्याने दि.12 रोजी त्यांचे बिल देण्यात आले असल्याचा खुलासा नाईक यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे नाईक यांनी याच दिवशी पदभार घेतला, तक्रार करण्यात आलेल्या कामाचे बिल लागलीच पदभार घेण्याच्या दिवशीच अदा करण्यात आले. कार्यालयीन दप्तर घरी नेऊन त्यांना ठेकेदाराच्या उपस्थितीत मंजुरी दिली जाते. तसेच तक्रारदार जि.प. सदस्यास याबाबत साधी विचारणा देखील करण्यात आली नसल्याने नाईक यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

निवीदा मंजुरीनंतर दर वाढविण्यास विरोध
जिल्हा परिषदेअंतर्गत लघुसिंचन विभागातर्फे सिंचनाची कामे केली जातात. यासाठी ठरलेल्या दरानुसार निवीदा काढण्यात येतात. यात काही ठेकेदार हे 20 ते 25 टक्के कमी दराने घेतात. निकषानुसार त्यांना प्रशासनातर्फे मंजुरी देखील दिली जाते. मात्र कालांतराने अधिकारी व ठेकेदारांच्या मिलीभगतमुळे कामात तांत्रिक अडचणी दाखवून दर वाढविले जातात. पर्यायाने योग्य ठेकेदारास याचे काम मिळू शकत नाही. त्यामुळे कामाची गुणवत्तेवर परिणाम होत असून निकृष्ठ काम होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. याबाबत जि.प. सदस्य लालचंद पाटील यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत या विषय उपस्थित करुन कार्यकारी अभियंता आर.के. नाईक यांना धारेवर धरले. त्यामुळे कामाच्या दरात वाढ करण्यात येऊ नये, अंत्यत आवश्यकता भासल्यास समितीच्या निर्णयानुसारच दर वाढ करण्याचा ठराव करण्यात आला.

रस्त्यांसाठी 25 कोटी मंजूर!

0

धुळे । धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मतदारसंघातील फागणे, सोनेवाडी, बोधगाव अशा तीन मंजूरी मिळाली असून त्यासाठी एकूण 25 कोटी 79 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या तीन रस्त्यांची एकत्रित लांबी 50 कि.मी.आहे त्यामुळे रस्त्यांची फार मोठी समस्या दूर होणार आहे.

गावाच्या विकासासाठी त्यांना शहराशी जोडून सहज संपर्क साधता यावा म्हणून आ.कुणाल पाटील यांनी रस्त्याच्या कामांकडे विशेष लक्ष देत तालुक्यातील रस्त्याची कामे करुन घेण्यावर भर दिला आहे. त्याअनुषंगाने खराब झालेल्या रस्त्यांचा सर्व्हे करुन त्यांचा तातडीने आराखडा सादर करण्याच्या सूचना संबधित विभागाला दिल्या आणि त्याचा मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करुन सदर रस्त्याच्या कामांना मंजूर मिळवून देत त्यासाठी निधीची उपलब्धता करुन देण्यासाठी प्रयत्न केले.

त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत धुळे तालुक्यातील फागणे ते काळखेडा-आमदड-चिंचखेडा-सावळी-सावळी तांडा रस्ता एकूण रक्कम 9 कोटी 25 लाख रुपये, फागणे ते बाभुळवाडी हडसूणे-वेल्हाणे-कुंडाणे-बोधगाव रस्ता एकूण रक्कम 7 कोटी 24 लक्ष रुपये,रामा-6 खेडे ते उडाणे-बल्हाणे-सडगाव-हेंकळवाडी-सोनेवाडी रस्ता एकूण रक्कम 9 कोटी 28 लाख रुपये एवढा निधी आ.कुणाल पाटील यांनी मंजुर आहे. या रस्त्यांमुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरीक आणि शेतकर्‍यांचा महत्वाचा प्रश्न सुटणार आहे.

पाण्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू

0

नंदुरबार । अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा येथे आंघोळीसाठी तलावात गेलेल्या 12 वर्षीय व आठ वर्षी मुलींचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 8 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता वालंबा ता. अक्कलकुवा येथील वाटयादेवी तलावात करीना वाहर्‍या वसावे (वय 12) व मोहिता अमरसिंग वसावे (वय 8) रा.वालंबा ( चपलाईपाडा ता.अक्कलकुवा) या आंघोळीसाठी तलावात उतरले असता.

त्यांना पोहता येत नसल्यामुळे पायात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठायात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.कॉ. शशिकांत नाईक करीत आहेत.

पिंपळनेर येथे अग्नीतांडव

0
पिंपळनेर । वार्ताहर- शहरातील सटाणा रोडवरील इंडिया टिंबरमार्ट अ‍ॅण्ड स्टील फर्निचर या दुकानाला आज पहाटे भिषण आग लागली. या आगीत दुकानातील संपुर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. यात 50 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दुकान मालकाच्या घरालाही आगीचा फटका बसला. परंतु सुदैवाने जीवीत हानी टळली. तर जीवाची परवा न करता पोकॉ भुषण वाघ, दीपक माळी, वेंदे यांनी आगग्रस्तांना मदत केली. म्हणून त्यांची सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी की, पिंपळनेर, ता. साक्री येथील सटाणा रोडवर हाजी युसूफ सैय्यद जावेद यांच्या मालकीचे फर्निचरचे भव्य शोरुम आहे. काल रात्री नेहमी प्रमाणे त्यांनी दुकान बंद केले. परंतु पहाटे 5 वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले. आगीच्या ज्वाला 20 ते 25 फूट उंच जात होत्या. त्वरीत आफिस सैय्यद यांना आगीची माहिती देण्यात आली. ते घटनास्थळी पोहचले त्यानंतर पोलिसांना आग लागल्याबाबत माहिती देण्यात आली.

घटनास्थळी विभागीय अधिकारी घुमरे, पोलिस निरीक्षक डी.के.ढुमणे, एपीआय पंजाबराव राठोड हे फौजफाट्यासह दाखल झाले. पिंपळनेर येथे यात्रोत्सवानिमित्त साक्री येथून अग्निशमन बंब मागविण्यात आला होता. परंतु प्रशिक्षीत कर्मचारी नसल्याने बंब सूरु करण्यात अर्धातास गेला त्या दरम्यान आग वाढत गेली. गावातील खाजगी टँकरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोकॉ भूषण वाघ, दीपक माळी, वेेंदे यांनी जिवाची परवा न करता आगीच्या धुराळ्याजवळील गॅस सिलिंडरसह इतर स्फोटक वस्तू बाहेर फेकल्या. या वस्तू फेकल्या नसत्या तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. धुळ्याहून अग्निशमन दलाचा बंब बोलविण्यात आला. त्यानंतर आग आटोक्यात आणली.

आगीची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे अभियंता माळी हे त्यांच्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तपासणी केली असता दुकानाला शार्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

फर्निचरचे संपुर्ण दुकान जळून खाक झाले असून महसूल विभागाचे दिलीप चव्हाण यांनी घटनास्थळाला पंचनामा केला. आगीत 50 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बँकेतून 12 लाखाचे कर्ज घेवून सैय्यद यांनी दुकानात माल भरला होता. परंतु आगीत संपुर्ण दुकान खाक झाले.

त्यांना घराबाहेर काढले!
शोरुमला लागूनच सैय्यद यांचे निवासस्थान आहे. अल्ताफ सैय्यद हे नाशिकला रुग्णालयात दाखल असल्यामुळे त्यांचे जावाई सहेबाज बकुर शेख, अनम शेख, अनशरा, अशर हे घरात झोपलेले होते. दुकानाला आग लागल्यानंतर आगीच्या ज्वाला घरापर्यंत पोहचल्या परंतु ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर या सर्वांना घराबाहेर सुखरुप काढण्यात आले. शोरुमचे मालक आसिफ सैय्यद यांचा आगीमुळे संपुर्ण संसार रस्त्यावर आला आहे.

आपुलकीच्या संबंधामुळेच सण, उत्सव आनंदात – पो.नि.कुराडे

0

जळगाव । पोलिस दलात कार्यरत असतांना नागरिकांशी आपलुकीचे संबंध निर्माण केल्याने सण, उत्सव आनंदात साजरे झाले असल्याचे मत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांनी व्यक्त केले.

औद्योगिक वसाहतीतील दै.देशदूतच्या मुख्य कार्यालयातील गणरायाच्या आरतीनंतर पोलिस निरीक्षक कुराडे यांनी दै.देशदूत परिवाराशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी पुढे बोलतांना श्री. कुराडे म्हणाले की, सन 2012 मध्ये येवला येथे गणेशोत्सवाच्या काळात शेवटच्या दिवशी दोन गटात जोरदार वाद झाला. यावेळी हा वाद मिटविण्यासाठी आपुलकीचे संबंध कामी आले. व त्यामुळे गणेश विसर्जन शांततेत पार पाडले.

संवेदनशील मानल्या जाणार्‍या एमआयडीसी पोलिसात कार्यरत असतांना हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या आरतीला सहभागी होवून सामाजिक बांधिलकी जपली. रावेरला असतांना तरुणांना जोडले. त्यांच्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या. तसेच अगोदर त्यांच्या मनात आदर निर्माण केला. त्यानंतर त्याच्यात भिती निर्माण केल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस म्हणून समाजात वावरतांना अनेक अडचणी येतात. परंतू बाप्पा सर्व विघ्न दुर करतो.

जिथे नोकरी करतो, त्याच लोकांना नातेवाईक मानतो
अनेकदा कुटुंबाला वेळ देत येत नाही. नातेवाईक देेखील दुरावतात अशी खंत पोलिस निरीक्षक कुराडे यांनी व्यक्त केली. परंतू जेव्हा वेळ मिळतो, त्यावेळी ठरल्यापेक्षा जास्त वेळ कुटुंबाला देतो. जिथे नोकरी करतो, त्याच लोकांना नातेवाईक मानून त्याच्याशी आपुलकीचे संबंध निर्माण करीत असल्याचे श्री. कुराडे यांनी सांगितले.

Smart Road project lacks smart planning!

0

Nashik: The much-touted smart road apparently lacks smart planning, as the construction work has plunged the motorists and pedestrians into severe inconvenience.

The officials, of Smart City company and Nashik Municipal Corporation (NMC), did not plan to provide an alternate route to the schools, district court, collectorate, hospitals, residential complexes and business establishments on the 1.1 km stretch.  Consequently, the residents, school students and commuters are at the receiving end.

Nashik has been selected in the second round of Prime Minister Narendra Modi’s ambitious Smart Cities Mission. Soon after the selection in 2016, the NMC prepared a Rs 2,194 crore plan through CRISIL for the Smart City Mission.

Interestingly, most of the projects proposed under the mission are still in the pipeline. Yet the ruling Bharatiya Janata Party (BJP) in the NMC has been boasting of transforming Nashik into a Smart City by 2019.

has undertaken this stretch from Ashok stambh to Trimbak naka for smart road development. The Nashik Municipal Smart City Development Corporation Limited (NMSCDCL) CEO Prakash Thavil had announced before undertaking the work that a perfect plan has been chalked down by the company and the NMC.

The construction work of the road will be carried out within the 1.1 km stretch between Ashokstambh to Modak Signal (Trimbak Naka) in a single phase. The construction work of the smart road is expected to be completed within six months.

Administration and MSCDCL had not made any planning about providing alternate access to the students of three schools which fall on the route passing through this stretch.
Out of the three schools which have been affected, Bal Vidya Prasarak Mandal’s (BVPM’s) Adarsh School and DD Bytco Boys and Girls School and Junior College, are the worst hit, while the Government Girls High School has a small access through its north gate, which is located few metres away from Meher Signal.

However, the collectorate, State Bank of India’s main branch, NDCC Bank, Bank of India, Vinchurkar Diagnostics, hospitals, government and business establishments are located on either side of the road and thus are the worst affected by the smart road construction work.

The 1.1 km stretch is one of the busiest roads in the heart of the city. Besides, three main traffic junctions including Ashokstambh, Meher Signal and CBS fall on the same route. In case of closure of these junctions, the citizens will have to face a huge inconvenience.

A couple of days ago, the NMC drafted a letter to the police commissionerate and had sought traffic diversion on the road and demanded that the road should be closed for traffic.
But the traffic police suggested the NMC undertake the work in phases and the road would be closed for traffic accordingly.

As soon as the work began the access to the schools located on the road has been blocked. The stretch of road between Ashokstambh to Meher Signal is likely to be closed soon. If this stretch is closed then Parnekarwadi, located opposite Circle Cinema, which houses roughly about 3,000 citizens would be literally marooned as the entire pocket has no other alternate access.

It is learnt that the NMC was informed by the police about the adverse consequences resulting from the simultaneous closure of the entire stretch of the road, however, the NMSCDCL authorities insisted on going ahead with the project work.

Meanwhile, when asked whether the civic administration has made any planning about providing an alternate access route for the citizens, the explanation given by the civic officials was not very clear.

We had informed the NMC
Around a month ago we received a letter from the NMSCDCL and the NMC for closing the 1.1 km stretch between Ashokstambh to Trimbak Naka for traffic as the civic administration had to start the smart road work. But we informed the NMC that the route houses various important government buildings, residential complexes, schools, hospitals and business establishments. As a result, it would not be feasible to simultaneously shut down the entire road for such a long time period. The civic administration replied that, if needed, they will chalk out some alternate route for the school students. However, our job is traffic management, as a result, we decided to close the road in patches and asked the NMC to conduct the work accordingly.
                                                                          — Dr Ajay Deore, ACP (Traffic), Nashik

भक्तीमय वातावरणात सात दिवसाच्या गणरायाचे विसर्जन

0
जळगाव । सात दिवसांपूर्वी घरोघरी लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यात आली होती. सात दिवस गणरायाची मोठ्या भक्तीभावाने पुजा करुन आज भक्तीमय वातावरणात गणरायाल आज निरोप देण्यात आला. सातव्या दिवसाच्या विसर्जनासाठी मेहरुण तलावावरील गणेशघाटावर भाविकांनी गर्दी केली होती.

सात दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेकडून मेहरुण तलावावर कर्मचार्‍यांनी नियुक्ती करण्यात आली होती. आज सकाळपासून सात दिवसांच्या गणरायाला निरोप देत त्याचे विसर्जन करण्यासाठी गणेशघाटावर मोठ्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यावेळी मेहरुण तलावाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गणरायाला ढोल ताश्याच्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी पोलिस कर्मचार्‍यांनी मनसोक्त गुलालाची उधळण केली. त्यानंतर मेहरुण तलावावर गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

Rains lash Nashik for second consecutive day

0

Nashik: The returning monsoon lashed Nashik on the second consecutive day on Wednesday, September 19, 2018. The afternoon saw clouds gathering suddenly in the sky and winds blowing strongly the rains lashed with a force.

Mild to heavy rain showers drenched the city bringing in respite in the warm weather that spread through the day. While the returning monsoon made a surprise entry in the city on Tuesday evening, it was expected that the city will witness rain showers on Wednesday but with a clear sky and warm temperatures, there was no sign of the rain.

Work got disrupted as people ran for shelter when rain showers poured for about an hour. The meteorological department noted a rainfall if 15.7 mm till 5.30 pm on Wednesday.
Though the rainfall was lesser as compared to Tuesday, the river saw water flowing into it from the overflow of the drains along its sides.

The drain water overflow was seen mixing with the river water at Chopda lawns and up stream Gadavari. The Saraswati nala was also flooded once again brining to fore the failure of the storm water system in the city.

Dengue raising its head in city

0

452 people infected in nine months: Epidemics on Rising

Nashik: The number of patients affected by dengue is increasing in the city. From January to September a total of 452 patients have been found infected with dengue. Notably, 74 patients have been found in the month of September so far.

These numbers are as per the Nashik Municipal Corporation (NMC) records, while the number of patients under treatment at private hospitals is much more. Meanwhile, municipal commissioner, Tukaram Mundhe has initiated a drive to eradicate mosquito breeding grounds. Surprisingly, Mundhe has issued orders to initiate action against the local residents where the dengue larvae are found.

The number of patients infected by dengue does not seem to decrease in Nashik. The number of such patients getting admitted at municipal as well as government and private hospitals is rising with each passing day.

From January to September as many as 452 suspected patients of dengue were registered by Nashik Municipal Corporation’s (NMC’s) health department. Moreover, last month, 18 dengue suspected patients were found within the civic limits, while this month, that is from September 1 to 19, a total of 84 patients are found infected with the vector borne disease.

Though the NMC has records of 84 patients in the month of September so far, the actual numbers could be more than that. Meanwhile, the health officials of NMC have admitted that the number of dengue-affected patients is increasing all over the city.

The spread of the disease has created panic among citizens. In the meantime, as a precautionary measure the civic administration has already carried out spraying of pesticides, fogging, survey of suspected patients, blood tests for dengue, awareness programmes and issuing notices to the residents within the civic limits, informed health department officials.

Meanwhile, the worst affected areas are in Satpur, Ambad, Jail Road, Indiranagar, Pathardi Phata, CIDCO and Prabhag number 2, where the most number of patients have been found. As a result, the municipal commissioner has expressed strong disappointment.

Swine flu claims two
Nashik: Two more persons showing swine flu as symptoms died on Wednesday. Health department made it clear that 23 patients succumbed to the disease so far. Medical reports of those patients who died in last three days have not received yet.

The names of the patients who died on Wednesday are Bhivraj Kedu Thakare (40, resident of Sonisagvi, tal. Chandwad, dist. Nashik) and Ravindra Dharmaji Garud (59, resident of Ramache Pimpals, tal. Niphad, dist. Nashik).

Bhivraj Thakre was admitted to the district civil hospital for treatment last Monday. His swab sample was sent to virological laboratory at Pune, while Ravindra Garud wad admitted to the district hospital from a private hospital on Tuesday.

जळगावात निर्माल्य संकलनासाठी सामाजिक संस्थांनी घेतला पुढाकार

0
जळगाव । गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलनासाठी महापालिकेसह शहरातील विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. शहरातून गोळा करण्यात आलेले निर्माल्य शिवाजी उद्यानात एका ठिकाणी गोळा करुन त्यापासून कंपोस्ट खताची निमिर्ती करणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी निर्माल्य संकलनाच्या आढावा बैठकीत दिली.

महानगरपालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात निर्माल्य संकलनाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, आरोग्यधिकारी उदय पाटील उपस्थित होते. बैठकीत गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी कोणत्या उपाय योजना कराव्यात. तसेच सामाजिक संघटनांकडून कोणत्या प्रकारची मदत मिळणार असून ते कोणत्याप्रकारचे कार्य करणार आहे. तसेच निर्माल्य संकनालासाठी कोणत्या संघटनांचे किती कर्मचारी कोणत्या भागात निर्माल्य संकलन करून त्याची कशा पद्धतीने विल्हेवाट लावणार आहे. याबाबतचा आढावा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी बैठकीत घेत. त्याच्या समस्याव मागण्या देखील त्यांनी यावेळी जाणून घेत त्यांची पुर्तता करण्याचे आश्वान आयुक्त डांगे यांनी दिले. याप्रसंगी विविध सामाजिक संस्था व शाळा महाविद्यालयांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

शहरात ठिकठिकाणी केले जाणार निर्माल्याचे संकलन
गणेश विसर्जनाच्या दिवशी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, युवाशक्ती फाऊंडेशन, रोटरी क्लब, वन्यजीव संरक्षण संस्था, मु. जे. महाविद्यालय, धनाजी नाना चौधरी महाविद्याल, सामाजिक वनीकरण, आयएमआर महाविद्यालय यांच्यासह विविध सामाजिक संस्थांकडून मेहरुण तालावाजवळ तसेच शहरात ठिकठिकाणी जावून व स्टॉल लावून निर्माल्याचे संकलन केले जाणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित संस्थांच्या प्रतिनीधींनी दिली.

सामाजिक संस्थांकडून केली जाणारे कामे
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे विजर्सनाच्या दिवशी 700 स्वयंसेवकांकडून तीन शिप्टमध्ये 24 तास निर्माल्याचे संकलन केले जाणार आहे. त्यानंतर सर्व रोटरी क्लबकडून विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांना पाण्याची व्यवस्था करुन दिली जाणार आहे. युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे 500 स्वयंसेवकांकडून गणेश घाटावरील निर्माल्याचे संकलन करुन ते कंपोस्ट खत तयार करण्याच्या ठिकाणी पोहचविणार आहे. तसेच बांभोरी महाविद्यालयाचे 30, वन्यजीव संरक्षण संस्थेचे 60, मु.जे. महाविद्यालयातील एनएसएसचे 50, आयएमआर महाविद्यालयाचे 150 अशा प्रकारे स्वयंसेवक डे्रसकोड करुन निर्माल्याचे संकलन करणार आहे. तसेच रोटरी क्लबतर्फे निर्माल्य संकलन करणार्‍या हजार स्वयंसेवकांना हॅन्ड ग्लोजचे वाटप करणार आहे.

कंपोस्टखताचे करणार वाटप
शहरातून गोळा करण्यात आलेले कोरडे व ओला असे दोन प्रकारे त्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. त्यानंतर त्यामधून प्लास्टीक वेगळे करुन त्याचे शिवाजी उद्यानात एका ठिकाणी गोळा करुन त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. त्यानंतर तयार करण्यात आलेले कंपोस्ट खत शहरात वाटप करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मिरवणुकीचे मार्गाची करणार स्वच्छता
सर्व गणेश मंडळांकडून गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर दि. 24 रोजी केशव स्मृती प्रतिष्ठान व विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते घाणेकर चौकापर्यंत 1 हजार 500 विद्यार्थ्यांसह प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांकडून विसर्जन मार्गाची स्वच्छा करण्यात येणार असल्याची माहिती दीपक जोशी यांनी दिली.

विसर्जन मिरवणूकीत 56 मंडळांकडून एकाच वेळी होणार गणरायाची आरती
लाडक्या गणरायाला अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर दि.23 रोजी निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे रांगेत लागणार्‍या मंडळांमध्ये समन्वयाच्या दृष्टीने विसर्जन मिरवणुकीत रात्री 8 वाजता सर्व 56 मंडळांतर्फे एकाच वेळी गणरायाची निरोप आरती करण्याचा निर्णय आज झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची विसर्जन मिरवणुक संदर्भात बैठक विसनजीनगरातील गायत्री माता मंदिरात पार पाडली़ या प्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, दीपक जोशी, किशोर भोसले,

कैलास सोनवणे, राकेश तिवारी, सुरज दायमा, राकेश लोहार, ललित चौधरी यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्ते उपस्थित होते़ उपस्थितांना सचिन नारळे यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी त्यांनी गणेश मंडळांनी डीजेचा वापर करू नये, विसर्जन मिरवणुकीत फक्त पारंपारिक वाद्यांचा वापर करून बाप्पाला निरोप द्यावा़ प्रत्येक मंडळाकडून लेझीम-ढोल पथकांचे सादरीकरण केले जाते़ त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना व भाविकांना त्रास होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनी चौफर दोरीचा वापर करावा अशा सुचना यावेळी त्यांनी केल्या़ तसेच स्वच्छता राखावी असेही आवाहन त्यांनी केले़ तसेच लहान मुलांना विसर्जन स्थळापर्यंत आणू नये, अशा सुचना त्यांनी केल्या़ काही वाद उद्भवल्यास त्याबाबत महामंडळाला कळवावे, असेही त्यांनी सांगितले़

Social Media

26,076FansLike
5,154FollowersFollow
1,127SubscribersSubscribe
error: Content is protected !!