पंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान

0

नवी दिल्ली – अमृतसर येथे रविवारी (18 नोव्हेंबर) सकाळी निरंकारी पंथाच्या ‘संत समागम’ या धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या भाविकांवर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्यामागे लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा हात असल्याचा संशय आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे नेते आमदार एच.एस.फुल्का यांनी केला आहे. फुल्का यांच्या या वादग्रस्त विधानाने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या या विधानामुळे वाद उपस्थित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

अमृतसर ग्रेनेड हल्ल्यावरुन पंजाबच्या राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. दरम्यान आपचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते एच.एस. फुल्का यांनी हल्ल्यानंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांना लक्ष्य केलं आहे. लष्करप्रमुख बिपिन रावत पंजाबमध्ये आले होते.

त्यावेळी राज्यावर दहशतवादी कारवायाचं सावट असल्याचं त्यांनी म्हटले होते. त्यामुळे कदाचित त्यांनीच आपल्या माणसांचा वापर करुन हा हल्ला घडवला असेल, असे ते म्हणाले. फुल्का यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे. माझे वक्तव्य हे काँग्रेसच्या विरोधात होते, लष्करप्रमुखांच्या विरोधात नाही, तरीही मी माफी मागतो, असे रावत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य

0
नाशिक : नुकत्याच आसामच्या तेजपूर येथे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वल सोनवणेने तेरा वर्षाखालील गटात एकेरी प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.
या स्पर्धेत त्याला प्रथम मानांकन मिळाले. प्रज्वलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकाची कमाई केली.  प्रज्वलला उपउपांत्यपूर्व फेरीत आसामच्या अनिमेश गोगईने चांगली टक्कर दिली.
प्रज्वलने या सामन्यातील पहिला सेट २७-२५ असा जिंकला,  तर दुसऱ्या सेटमध्ये प्रज्वलला ११-२५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये प्रज्वलने संयमाने उत्कृष्ट खेळ करत तिसरा सेट २५- १५ असा जिंकून उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत प्रज्वलने उत्तराखंडच्या अंश नेगीचा २१-०७ आणि २१ – १५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रज्वलचा अंतिम सामना महाराष्ट्राच्या ठाण्याच्या ओम गोवंडी सोबत झाला. या सामन्यात पहिला सेट ओम गोवंडीने २१- १५ अश्या फरकाने  जिंकून आघाडी घेतली.
मात्र दुसऱ्या सेटमध्ये प्रज्वलने जोमाने खेळ करून हा सेट २१-१६ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या  निर्णायक सेटमध्ये ओम गोवंडीने प्रथमपासून सावध खेळ करून हा सेट २१- १४  असा जिंकून विजेतेपद पटकावले.
तर प्रज्वलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ओम गोवंडी आणि प्रज्वल सोनावणे हे दोघेही दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून एकत्र खेळतात.
प्रज्वलने याआधी गेल्या महिन्यात गुंटूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. प्रज्वल नाशिकच्या फ्रावशी  अकॅडमीमध्ये शिकत असून तो गेल्या सात वर्षांपासून नाशिकच्या शिवसत्य मंडळात मकरंद देव यांच्याकडे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे.
प्रज्वलच्या  या यशाबद्दल नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव अनंत जोशी,  उपाध्यक्ष एस. राजन, डॉ. शिर्मिला कुलकर्णी  तसेच फ्रावशी अकॅडमीचे संचालक रतन लथ आदिंनी अभिनंदन केले.
प्रज्वल सोनवणे लगेचच २२ नोव्हेंबरपासून कडप्पा, आंध्र प्रदेश येथे  आयोजित राष्ट्रीय  बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. तो या स्पर्धेमध्येही चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्याचे प्रशिक्षक मकरंद देव यांनी व्यक्त केला आहे.

समांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा

0

जळगाव ।  प्रतिनिधी :  समांतर रस्ता कृती समितीततर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस असून सुद्धा जळगाव फर्स्ट, सारस्वत समाज व ब्राह्मण समाज यांनी आज साखळी उपोषणात प्रत्यक्ष सहभाग घेऊन समितीला पाठिंबा दर्शविला.

सभामंडपात माजी आमदार चिमणराव पाटील, ज्येष्ठ विधीतज्ञ अ‍ॅड. सुशील अत्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मीकांत पाटील, नरेंद्र राजपूत, राजेंद्र महाजन, विशाल पाटील, ब्राह्मण सभेचे वैद्य, संभाजी ब्रिगेडचे सुरेंद्र पाटील, प्रमोद पाटील, जिल्हा पेठ मित्र मंडळाचे अभय सोमानी जळगाव असोसिएशनचे तथा समर्थ शैक्षणिक संस्थेचे पाटील आदींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला.

काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जमील शेख, व नदीम काझी यांनी आपली पाठिंबा पत्र कृती समितीचे फारुक शेख, अनंत जोशी गजानन मालपुरे, सरिता माळी, विनोद देशमुख यांना सुपूर्द केली. माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सदर लाक्षणिक उपोषण संयुक्तरित्या स्वरूपात करणे भाग असल्याचे स्पष्टीकरण केले तर अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी कोणत्याही सरकारला राजकीय पक्षाला अथवा नेत्याला दोष न देता ही जळगावकरांची सहनशीलता आहे ते अद्याप आपल्या हक्क मागू शकत नाही.

घनश्याम अग्रवाल यांनी आंदोलन झाल्यास सारस्वत समाज आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे जमील शेख यांनी हे आंदोलन आता थांबता कामा नये यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

आय.एम.आय.चे उपाध्यक्ष डॉ.अनिल पाटील व सहसचिव स्नेहल फेगडे, डॉ.विलास भोळे, जिल्हा बँक संचालक संजय पवार, जयदीप राजपूत यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. उद्या जेसीई फाऊंडेशन व जनसंग्राम संघटनेचा सहभाग
सोमवारी या उपोषणाचा पाचवा दिवस असून जे.सी.ई फाउंडेशन व जनसंग्राम या संघटना उपोषणात सहभागी होतील.  रविवार असताना सुद्धा 1752 नागरिकांनी या ठिकाणी स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शवला.

यावेळी गिरीश कुलकर्णी, राष्ट्रीय खेळाडू शीतल तिवारी, मयुर वाघ, पंचायत समिती सदस्य राजेंद्र महाजन, आनंद पाटील, नदीम काझी, मिलिंद पितळे, विजय पाटील, नरेंद्र राजपूत, कैलास माळी, अतुल गुजराती, मनोहर कोळी यांचा सहभाग होता.

आ.खडसेंचा भ्रमणध्वनीद्वारे पाठिंबा

आ.एकनाथराव खडसे यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपोषणास पाठिंबा दर्शवून आपण सर्वांनी एकत्रित रित्या येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी मी सुद्धा आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.

बॉटनिकल गार्डनमधील लेजर शो सुरु करा अन्यथा आंदोलन

0
नाशिक | दिवाळीच्या सुट्टीत राज्यातील पर्यटक तसेच नाशिककरांनी खास आकर्षण ठरलेल्या बॉटनिकल गार्डनला भेटी दिल्या. परंतु येथील अनोखा लेजर शो बंद असल्यामूळे पर्यटकांचा हिरमोड झाला. पर्यटकांना या गार्डनचा आनंद घेता यावा यासाठी येथील लेजर शो ताबडतोब सुरु करावा या मागणीसाठी वन अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले.

दिवाळीदरम्यान आलेल्या अनेक पर्यटकांचा लेजर शो बंद असल्याने हिरमोड झाला. मनसेनेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या या गार्डनमधील असुविधांनी नाराज झालेल्या पर्यटकांनी मनसेन पदाधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या होत्या.

या गार्डनपासून मनपाला महसूल मिळत आहे. त्यामुळे येथे सोयीसुविधा उपलब्ध करून चांगल्या प्रकारे देखभाल करावी अशी मागणी केली जात आहे. आज मनसेनेचे पदाधिकारी मनपा व  वनविभागाने समन्वय इथे सोयी उपलब्ध कराव्यात. तसेच अनेक दिवसांपासून बंद असलेला लेजर शो त्वरित कायमस्वरूपी सुरु ठेवण्यात यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.

याप्रसंगी मनसेना प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे प्रदेशउपाध्यक्ष अॅड .राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अनिल मटाले, मनसे गटनेते सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे विभागीय व्यवस्थापक एस.एच.वाजे व वनपरीक्षेत अधिकारी पी. एस. डमाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हॅप्पी बर्थडे जान!, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा

0

मुंबई : वयाच्या अठराव्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणाऱ्या मॉडेल अभिनेत्री सुष्मिताचा आज ४३ वा वाढदिवस. तिचा यंदाचा वाढदिवस खूप खास ठरावा यासाठी तिचा कथित प्रियकर रोहमन शॉल प्रयत्न करत आहे. सुष्मितापेक्षा वयानं १५ वर्षांनी लहान असणाऱ्या रोहमन शॉलनं सुष्मिताला वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. हॅप्पी बर्थडे जान! येणारं वर्षे तुझ्यासाठी सुख-समाधानाचं, समुद्धीचं जावं असं म्हणत रोहमननं तिच्यासोबतचा खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच या फोटोतून त्यानं पुन्हा एकदा सुष्मितासमोर आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे.

हैदराबादमध्ये १९ नोव्हेंबर १९७५ ला तिचा जन्म झाला. तिच्या आजही बऱ्याच चर्चा होतात. तिने १५ वर्षांची असताना मॉडेलिंग क्षेत्रात आपले करिअर सुरू केले. अजुनही सुष्मिता सिंगल आहे, पण २ मुलींना तिने दत्तक घेतले आहे. तिने २००० मध्ये पहिली मुलगी दत्तक घेतली, तिचे नाव रिनी आहे. रिनीनंतर जानेवारी २०१० मध्ये तिने अजून एक मुलगी दत्तक घेतली. तिचे नाव अलीशा ठेवले आहे. अलीशा दत्तक घेताना ३ महिन्यांची होती.

आता सुष्मिता ४२ वर्षांची झाली आहे तर तिचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. काही दिवसांपासून सुष्मिता आणि रोहमनच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या चर्चा खोट्या असून आता माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. मी आयुष्याशी ‘रोहमान्स’ (रोमान्स) करत आहे असं ती म्हणाली.

 

Video : जय श्रीरामाच्या घोषात जळगावच्या श्रीराम रथोत्सवास सुरवात

0

पंकज पाटील । डिजीटल देशदूत। जळगाव :   ब्राह्मणवृंदाच्या मंत्रोच्चारात, देवादिकांच्या पूजेने जळगाव नगरीचे ग्रामदैवत व 146 वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री रामांच्या रथोत्सवास आज दुपारी एक वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात व जय श्री रामाच्या जयघोषात सुरवात झाली.

वारकरी संप्रदायाची थोर परंपर लाभलेले श्रीराम मंदिर संस्थांनतर्फे प्रभू श्रीराम रथोत्सव कार्तिक प्रबोधिनी एकादशीला साजरा होत आहे. रथाच्या स्वागतासाठी रथ मार्गावर रांगोळ्या पताका, केळीची तोरणे लावून शहर सज्ज झाले आहे.
श्रीराम रथोत्सवाला गेल्या 146 वर्षांची थोर पंरपरा लाभलेली आहे. दरम्यान रथोत्सवाच्या दिवशी पहाटे 4 वाजता काकड आरती, प्रभु श्रीरामांच्या उत्सवमूर्तीचा महाअभिषेक करण्यात आला.

मंदिराचे गादीपती हभप मंगेश महाराज यांच्या हस्ते रथाचे विधिवत पुजन करून ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र जयघोषात व प्रभु श्रीरामांच्या निनादात श्रीराम रथोत्सवाला दुपारी 1 वाजेच्या सुमारास प्रारंभ झाला. रात्री 12 वाजता रथोत्सवाची सांगता श्रीराम मंदिराजवळ होईल.

याप्रसंगी आ.राजूमामा भोळे, महापौर सिमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते रथाची व श्रीरामाच्या उत्सवमुर्तीची आरती करण्यात आली.

मुस्लीम बांधवांतर्फे होणार रथाचे स्वागत

ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या प्रभु श्रीरामचंद्राचा रथोत्सवात रथोत्सव समितीकडून भिलपुरा चौकातील लालशाहबाबा यांच्या समाधी स्थळावर चादर चढविण्यात येते. तर त्या ठिकाणाच्या मुस्लिम समाजबांधवातर्फे रथाचे स्वागत करण्यात येत असल्याने जळगावाच्या रथोत्सवाला हिंदु-मुस्लिम समाजबांधवाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.

रथोत्सवाचे देशदूत फेसबुकवरून थेट प्रसारण

दरम्यान रथोत्सवाचे देशदूतच्या फेसबुक पेजवरून तीन टप्प्यात थेट प्रसारण करण्यात आले आहे. हे प्रसारण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून श्रीराम रथोत्सवाचा आनंद घ्यावा.

गडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

0

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. ही चकमक आज (सोमवार) सकाळी साडेआठच्या सुमारास धानोरा तालुक्यातील निहालकाय जंगलात झाली. पोलिसांच्या अल्ट्रा आणि सी-६० पथकातील कमांडोजनी ही कामगिरी केल्याचे गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

 

‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी

0

मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठरत असलेला ‘भारत’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा रंगली आहे. नुकताच या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या पुढील टप्प्याचं शुटींग सुरु असताना सलमान खान जखमी झाल्याचं समोर आलं आहे.

सलमान खानचा चित्रपट म्हटलं की त्यामध्ये फाईट असणारच. अशाच काही अक्शन या सिनेमासाठी शूट करण्यात येत आहे. याची तयारी करत असताना सलमान खान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.

सलमान जीममध्ये वर्कआऊट करत होता. यावेळी त्याला दुखापत झाली असून फॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दुखापतीनंतर डॉक्टरांनी त्याला सक्तीचा आराम करण्यास सांगितला आहे. त्यामुळे ‘भारत’चं चित्रीकरण अर्ध्यावर सोडून त्याला मुंबईमध्ये परतावं लागलं आहे.

२००८ मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला दिलासा नाही; सुनावणी रोखण्यास नकार

0

नवी दिल्ली – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. मुंबई हायकोर्टात हे प्रकरण प्रलंबित असल्याने कोर्टानं सुनावणी रोखण्यास नकार दिला आहे. 21 नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार असल्यामुळे यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष कोर्टाने 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअन्वये (यूएपीए) खटला चालवण्याच्या निर्णयाला पुरोहित यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे.

दरम्यान, मालेगाव बॉम्ब स्फोटातील संशयित लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी विशेष न्यायालयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. २९ सप्टेंबर २००८ मध्ये एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात सहा व्यक्तींचा मृत्यू तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

‘झिरो’ सिनेमासाठी ‘अ‍ॅक्वॉमॅन’ने रिलीज डेट बदलली

0

मुंबई : बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान याचा ‘झिरो’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहे. शाहरुखचा ‘झिरो’ हा आगामी चित्रपट येत्या २१ डिसेंबरला रिलीज होतोय. ‘अ‍ॅक्वॉमॅन’ ही याच दिवशी रिलीज होणार होता. परंतु ‘झिरो’साठी जेसन मोमोआ आणि एम्बर हर्ड स्टारर ‘अ‍ॅक्वॉमॅन’ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. होय, ‘झिरो’सोबतचा बॉक्सआॅफिस संघर्ष टाळण्यासाठी डीसी एक्सटेंडेड युनिव्हर्सने हा निर्णय घेतला.

शाहरुखचा ‘झिरो’ हा आगामी चित्रपट येत्या २१ डिसेंबरला रिलीज होतोय. ‘अ‍ॅक्वॉमॅन’ भारतात २१ डिसेंबरऐवजी येत्या १४ डिसेंबरला रिलीज होईल.  ‘अ‍ॅक्वॉमॅन’च्या भूमिकेतील ‘झिरो’ हा पहिला सोलो रोल चित्रपट आहे. यापूर्वी तो ‘बॅटमॅन वुई सुपरमॅन डॉन आॅफ जस्टिस’ आणि ‘जस्टिस लीग’ यासारख्या चित्रपटात दिसला आहे. ‘अ‍ॅक्वॉमॅन’ भारतात इंग्रजी, हिंदी व तामिळ अशा तीन भाषांत रिलीज होणार आहे.

Social Media

26,915FansLike
5,154FollowersFollow
1,361SubscribersSubscribe
error: Content is protected !!