दिल्लीत सुरु आहे ‘चौकीदार ही चोर’ हा क्राइम थ्रिलर : राहुल गांधी

0
New Delhi: Congress Vice President Rahul Gandhi addresses the large gathering during the farmers rally at Ramlila Maidan in New Delhi on Sunday. PTI Photo by Shahbaz Khan(PTI4_19_2015_000048B)

दिल्ली: ‘चौकीदार ही चोर है’ नावाचा क्राइम थ्रिलर सध्या देशात सुरू आहे. अधिकारी थकले आहेत. परस्परांवरचा विश्वास उडाला आहे. लोकशाही रडते आहे,’ अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. सीबीआयमधील वादाच्या प्रकरणात मोदी सरकारमधील मंत्र्यांवर काल भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं आहे.

राकेश अस्थाना यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करणारे उपमहासंचालक मनीषकुमार सिन्हा यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी अस्थाना यांची चौकशी करण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी आडकाठी आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी ट्विट केले.

राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात, दिल्लीत सध्या चौकीदार ही चोर हा क्राइम थ्रिलर सुरु आहे. नवीन भागात सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने एक मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि केंद्रीय सचिवांवर गंभीर केले आहेत. दुसरीकडे त्याने गुजरातवरुन आणलेला साथीदार कोट्यवधी रुपयांची वसूली करत आहे. अधिकारी थकले आहेत, विश्वासाला तडा गेला आहे आणि लोकशाही रडत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

अडचणींवर मात करून खेळात उल्लेखनिय कामगिरी करा – सुप्रिया गाढवे

0

 जळगाव ।  प्रतिनिधी :  क्रीडा क्षेत्रात असंख्य अडचणींना महिलांना सामोरे जावे लागते.मात्र या अडचणींना तोंड देत सातत्याने सराव करुन आपला ठसा खेळामध्ये उमटवित उल्लेखनिय कामगिरी करावी असे आवाहन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खो-खो खेळाडू सुप्रिया गाढवे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो (महिला) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई, सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट आणि देवी अहिल्याबाई विद्यापीठ, इंदोर यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत आपला पहिला विजय नोंदविला. सायंकाळी उशिरापर्यंत स्पर्धा सुरु होत्या. गोंडवना विद्यापीठ व राष्टसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाने बाद फेरीत प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला.

विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो महिला स्पर्धांना मोठया उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश या पाच राज्यांमधील 62 विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रिया गाढवे यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर होते. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य व स्पर्धेचे कार्याध्यक्ष दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.नितीन बारी, दिपक पाटील, डॉ.जितेंद्र नाईक, कुलसचिव भ.भा.पाटील, सिनेट सदस्य नितीन ठाकूर, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.ए.बी.चौधरी, प्रा.प्रतिभा ढाके, डॉ.के.एफ.पवार यांची उपस्थिती होती.

सुप्रिया गाढवे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना आपण सकाळ व संध्याकाळी नित्यनियमाने सराव केला त्यातून यश प्राप्त झाले असे सांगितले. दिलीप पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे खेळाडूंच्या पाठीशी सातत्याने उभे असते असे सांगून स्पर्धांच्या काळात विद्यापीठाच्या परीक्षा आल्या तर खेळाडूंना परीक्षेची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा तसेच खेळाडूंचा विमा उतरविण्याचा विद्यापीठाचा विचार असल्याचे यावेळी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी ऑलम्पिकमध्ये खो-खो या खेळाचा समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन या खेळात चपळता आणि बौध्दिक क्षमता महत्वाची असल्याचे नमूद केले.यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचे मैदानावर पथसंचलन करण्यात आले. सायली चित्ते या विद्यार्थिनीने खेळाडूंना शपथ दिली. प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केले. सहायक क्रीडा संचालक आर.ए.पाटील यांनी आभार मानले.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई विरुध्द इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टिचर्स एज्युकेशन गांधीनगर, गुजरात यांच्यात पहिला सामना झाला. यामध्ये मुंबईच्या महिला खेळाडूंनी गांधीनगरचा 24-11 असा पराभव केला. 13 गुणांनी विजय प्राप्त केलेल्या एस.एन.डी.टी.विद्यापीठाच्या श्वेता पाटील या खेळाडूने दोन मिनिटे संरक्षण केले तसेच 8 गडी देखील बाद केले.

दुसरा सामना गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद विरुध्द सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट यांच्यात झाला. यामध्ये सौराष्ट्र विद्यापीठाने एक डाव आणि 13 गुणांनी गुजरातवर विजय प्राप्त केला. 18-5 अशा फरकाने विजय प्राप्त करताना सौराष्ट्रच्या काजलबेन चावडा हिने पहिल्या डावात 1 मिनिटे 20 सेकंद आणि दुसज्या डावात 2 मिनिटे 30 सेकंदाचे संरक्षण केले तसेच सहा गडी बाद केले.

तिसरा सामना देवी अहिल्याबाई विद्यापीठ, इंदोर विरुध्द श्री.गोविंद गुरु विद्यापीठ, गोध्रा यांच्यात झाला. यामध्ये इंदोरने 16-13 असा तीन गुणांनी विजय प्राप्त केला. मुस्कान जहारिया हिने 1 मिनिटे 20 सेकंदाचा संरक्षणात्मक खेळ केला तसेच पाच गडी बाद केले.

रात्री प्रकाशझोतात सामने सुरू होते. ब गटात बरकतउल्ला विद्यापीठ भोपाळने बनस्थळी विद्यापीठ बनस्थळीचा एक डाव दोन गुणांनी ( 10- 8 )पराभव केला.रितिका सिलोरियाने 6 मिनिटे संरक्षण आणि दोन गडी बाद करीत उत्तम खेळ केला.याच गटात गोंडवना विद्यापीठ गडचिरोलीने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडला 14-12 असे अवघ्या दोन गुणांनी पराभूत केले.रोहिनी जावरेने चांगला खेळ केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एल.एन.आय.पी.ई.ग्वाल्हेरला एक डाव चार गुणांनी (9-5) अशी धूळ चारली.नागपूरच्या रूचिता नासरेने पहिल्या डावात पाच मिनिटे दहा सेकंद व दुसर्‍या डावात एक मिनिटे वीस सेकंद खेळ केला व चार गडी बाद केले. वीर नर्मद दक्षिण गुजराथ विद्यापीठ सुरतला मात्र भक्तकवी नरसिंह मेहता विद्यापीठ जुनागढने एक डाव बारा गुणांनी पराभूत केले.

जुनागढच्या शिवांगी चौधरीने साडेसहा मिनिटांचा खेळ तर केला परंतु 9 गडीदेखील बाद केले. क गटात राज रूषी भरीतहरी विद्यापीठ,अलवरने सुखाडिया विद्यापीठ उदयपूरला एक डाव चार गुणांनी (12-8 )पराभूत केले अलवरची ममता चौधरी पहिल्या डावात पाच मिनिटे वीस सेकंद दुसर्‍या डावात एक मिनिटे चाळीस सेकंद खेळली व 3 गडी बाद केले. अन्य एका सामन्यात डा.हरीसिंग गौर विद्यापीठ सागरला जय नारायण व्यास विद्यापीठ जोधपूर कडून एक डाव तेरा गुणांनी पराभव पत्करावा लागला.

SBI बँकेची ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर, 5 लिटर पेट्रोल फ्री…

0

नवी दिल्ली – एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी फुल्ल टू धमाल ऑफर सुरू केली आहे. त्यानुसार ग्राहकांना 5 लिटर मोफत पेट्रोल मिळणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कुठल्याही रिटेल पेट्रोल पंपावर भीम अॅपद्वारे एसबीआय बँकेतून आर्थिक व्यवहार केल्यास ग्राहकाला 5 लिटर पेट्रोल मोफत मिळवता येणार आहे. 23 नोव्हेंबर 2018 पर्यंत ही योजना सुरू असणार आहे.

एसबीआयच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरल्यास आणि भीम अॅपद्वारे एसबीआय बँकेतून आर्थिक व्यवहार केल्यास 5 लिटर पेट्रोल मोफत मिळू शकतं. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 100 रुपयांचं पेट्रोल भरावं लागेल. त्यानंतर भीम अॅपद्वारे केलेल्या या 100 रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा नंबर लिहून 9222222084 या नंबरवर एसएमएस करावा लागणार आहे.

(भीम अ‍ॅपद्वारे पेमेंट केल्यानंतर पेमेंट नंबर <UPI Reference No. (12-Digit)> <DDMM> टाईप करून 9222222084 या फोन नंबरवर SMS पाठवा. या SMSसाठी नॉर्मल चार्जेस लागतील.) त्यानंतर जर तुमचा नंबर निवडण्यात आला तर तुमच्या मोबाइक क्रमांकावर मेसेजद्वारे कळवलं जाईल आणि तुम्ही 400 रुपये कॅशबॅक म्हणजेच जवळपास 5 लिटर पेट्रोल मोफत मिळवू शकणार आहात. 23 नोव्हेंबर 2018 पर्यंत ही ऑफर सुरू असणार आहे.

चोसाका संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांविरुध्द तक्रार : धनादेश अनादर प्रकरण

0

चोपडा ।  प्रतिनिधी :  चोसाका कडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना थकीत पेमेंटचे दि.10 नोव्हेंबरच्या मुदतीचे धनादेश देण्यात आले होते परंतु चोसाकाच्या बँक खात्यात शिल्लक नसल्याने धनादेशाचा अनादर झाल्यामुळे शेतकर्‍यांना पैसे मिळाले नाहीत. निराशा होऊन देखील शेतकर्‍यांनी संयम दाखवत सोमवार पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. परंतु चोसाका संचालक मंडळा कडून आज दुपार पर्यंत पेमेंट बाबत कुठलीच हालचाल न झाल्याने अखेर सोमवारी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी एस. बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस स्टेशन गाठून चोसाकाचे चेअरमन,व्हॉईस चेअरमनसह संचालक मंडळ ,प्रभारी कार्यकारी संचालक, चीफ अकाऊंटन या सर्वांच्या विरोधात पोलीसात लेखी तक्रार दाखल केली.

चोसाका संचालक मंडळाने 2017/18 च्या गाळप हंगामासाठी काट्याखाली पैसे देऊ असे ठोस आश्वासन ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिले होते.त्यावर विश्वास ठेवून तालुक्यातील शेतकर्‍यांनी कारखान्यास ऊस दिला होता.परंतु शेतकर्‍यांना काट्याखाली पैसे मिळालेच नाहीत.या संदर्भात शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांच्यासह ऊस उत्पादकांनी रास्तारोको आमरण उपोषण,मोर्चा तसेच स्वातंत्र्यदिनी आयोजित आत्मदहन आंदोलन केले परंतु सर्वपक्षीय नेते व चोसाका संचालक मंडळा कडून आश्वासना पलीकडे काहीच शेतकर्‍यांच्या पदरी काहीच मिळाले नाही. शेवटी साखर आयुक्तांनी पुन्हा आरआरसीची कार्यवाही केली.

त्यानंतर चोसाका प्रशासनाने गेल्या महिन्यात ऊस उत्पादकांना 2 कोटी 44 लाख 32 हजार रकमेचे दि.10 नोव्हेंबर मुदतीचे बंधन बँकेचे धनादेश दिले. शेतकर्‍यांनी धनादेश क्लिअरिंगसाठी बँकेत जमा केला परंतु चोसाकाच्या बँक खात्यात शिल्लकच नसल्याने शेतकर्‍यांचे धनादेश बाऊन्स झाले म्हणजे वटले नाहीत तरी देखील संचालक मंडळास ऊस उत्पादकांनी दि.19 नोव्हेंबर सोमवार पर्यंतचा अल्टीमेटम दिला आठ दिवसाची मुदत देऊन सुद्धा आज पर्यंत चोसाका संचालक मंडळाने पेमेंट देणे संदर्भात कुठलीच हालचाल केली नाही म्हणून हताश झालेल्या शेतकर्‍यांनी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय गाठून तहसील दीपक गिरासे,पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची भेट घेऊन थकीत पेमेंट बाबत चर्चा केली

यावेळी तहसीलदार दीपक गिरासे यांनी चोसाका प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला परंतु त्यांना शेतकर्‍यांना पेमेंट करणे बाबत ठोस उत्तर मिळाले नाही.यावेळी संचालक मंडळाने शेतकर्‍यांची शुद्ध फसवणूक करून धूळफेक केली असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी तहसीलदार दीपक गिरासे व पोलीस निरीक्षक नजन पाटील यांच्यासमवेत तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत करण्यात आला.त्यानंतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी लेखी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

आमचा कोणत्याच संचालकाविषयी द्वेष नाही परंतु पैशाचे सोंग आम्ही करु शकत नाही तेंव्हा नाईलाजाने आम्हाला तक्रार दाखल करावी लागत आहे असे उपस्थित शेतकर्‍यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले याप्रसंगी शेतकरी कृती समितीचे एस.बी. पाटील,शिवाजी पाटील,प्रदीप पाटील,दिलीप पाटील,विजय पाटील,दिलीपसिंग सिसोदिया, भरत पाटील,दिलीप धनगर,प्रवीण पाटील, मुकुंद पाटील,प्रशांत पाटील,प्रकाश पाटील, चंद्रकांत पाटील यांचेसह आदी शेतकर्‍यांनी पोलीस निरीक्षक नजनपाटील यांना चोसाका संचालक मंडळा विरोधात लेखी तक्रार वजा फिर्याद बाबतचे लेखी निवेदन दिले.

भाऊ होता म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलो

0
विंचुरी दळवी (वार्ताहर) | येथील रामदास किसन दळवी शेताला पाणी देत असताना पहाटे चारच्या सुमारास बिबटयाने अचानक हल्ला केला. या घटनेत दळवी जखमी झाले.

विंचुरी दळवी परिसरात रामदास दळवी यांची मेढे मळ्यात त्याचे शेती आहे. ते व त्याचा भाऊ विजय दोघे शेतात पिकाला पाणी भरत होते. अचानक बिबट्याने त्यांच्या हातावर हल्ला केला. बिबट्या बघून ते प्रचंड घाबरले त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर भाऊ विजय याठिकाणी धावत आले. त्यांनी आरडाओरड करत बिबट्याच्या तावडीत रामदास दळवी यांना सोडवले.

दरम्यान, रामदास दळवी यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विजय होता म्हणून बिबटयाचा हल्यात माझे प्राण वाचले अशी प्रतिक्रिया रामदास दळवी यांनी देशदूत डिजिटलशी बोलताना दिली.

छत्तीसगडमध्ये मतदानाला सुरुवात

0

रायपूर – छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. येथे 72 जागांसाठी 1 कोटी 53 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर एकूण 1079 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणातून आपलं नशिब आजमावत आहेत. भाजपाकडून 9 मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या 3 नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात 18 जागांसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यावेळी 76.28 टक्के मतदान झाले होते. आज दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान होत असून 11 डिसेंबर रोजी याचा निकाल लागणार आहे.

छत्तीसगडमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून भाजपची सत्ता आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसकडून मात्तबर नेत्यांची फौज मैदानात उतरली होती. राष्ट्रीय व स्थानिक मुद्यावरून दोन्ही बाजूंकडून आरोप- प्रत्यारोप झाले. छत्तीसगडमध्ये सत्ता टिकवण्यासाठी भाजपचे प्रयत्न असून सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने कडवी झुंज दिली आहे.

लष्कराच्या पुलगावमध्ये जुनी स्फोटकं निकामी करताना भीषण स्फोट : सहा जणांचा मृत्यू, १० जण जखमी

0
वर्धा :  येथील पुलगावमध्ये असणाऱ्या लष्कराच्या शस्त्र भांडाराजवळ जुनी स्फोटकं निकामी करताना आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या स्फोटामुळे परिसरात हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भारतीय लष्करासाठी पुरवठा होणाऱ्या दारुगोळ्याचे भांडार पुलगावमध्ये आहे. या शस्त्र भांडाराजवळ ऑर्डिन्स फॅक्टरीची रेंज आहे. या ठिकाणी जुने झालेले बॉम्ब निकामी करण्यात येतात. जबलपूर ऑर्डिन्स फॅक्टरीतून काही कर्मचारी जुनी स्फोटकं निकामी करण्यासाठी पूलगावमध्ये आले होते. त्यातील एक बॉम्ब निकामी करताना स्फोट झाला.

याआधी देखील जून २०१६ मध्येदेखील पुलगावच्या शस्त्र भांडाराला आग लागली होती. आगीनंतर परिसरात मोठे हादरे बसले होते. त्यावेळी स्फोटाचे हादरे १५ किलोमीटरपर्यंत जाणवले होते. आग लागलेल्या ठिकाणाहून दारुगोळा अन्यत्र हलवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.

स्फोटातील मृतांची नावे: प्रभाकर वानखेडे , राजकुमार भोवते, विलास पधारे, नारायन पचारे, प्रवीण मुंजेवार

स्फोटातील जखमींची नावे: विकास बेलसरे, संदीप पचारे, अमित भोवते, रूपराव नेताम, दिलीप निमगडे, मनोज मोरे

 

मराठा आरक्षण मुद्दा आज अधिवेशनात गाजणार

0

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनास सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. ओबीसी संघटनांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे आज मराठा आरक्षण मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आरक्षणाच्या मु्द्यावरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. अधिवेशन सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री शोकप्रस्तावावर ठाम राहिले आणि त्यांनी भाषण सुरू केले.

दरम्यान विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारे बॅनर परिधान करून सर्वांचं लक्ष वेधून घेतले. तर एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्याची घोषणा केली. परंतु, ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी याला तीव्र विरोध केला आहे.

मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून आरक्षण देण्याची घोषणा रविवारी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याला विरोध करताना ओबीसी संघटनांनी मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरही शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

Social Media

26,926FansLike
5,154FollowersFollow
1,363SubscribersSubscribe
error: Content is protected !!