दोन लाखांचा मद्यसाठा जप्त

0
नाशिक | प्रतिनिधी  हरसूल-गिरणारे मार्गावर दमणनिर्मित राज्यात विक्रीस बंदी असलेल्या मद्याची कारमधून चोरटी वाहतूक करणार्‍या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभाग सेवकांनी जेरबंद केले. संशयितांकडून २ लाखांचा मद्यसाठा व स्विफ्ट कार असा पावणेसहा लाखांचा मद्देमाल जप्त करण्यात आला.
अब्दुल कादर अब्दुल हमीद शेख व रिझवान खान मेहबूब खान पठाण (रा. दोघे सुरत, गुजरात) अशी मद्य वाहतूक करताना अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
हरसूल-गिरणारेमार्गे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात दमणनिर्मित मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक एम. बी. चव्हाण, एस. डी. चोपडेकर, दुय्यम निरीक्षक डी.एन.पोटे, एस.एस.रावते, आर. आर. धनवटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, श्याम पानसरे आदींच्या पथकाने बुधवारी गिरणारे शिवारात सापळा लावला असता संशयित राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाच्या जाळ्यात अडकले.
हरसूलकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणार्‍या स्विफ्ट कारला (जीजे ०५ सीएम ८३१४) भरारी पथकाने थांबवून तपासणी केली असता कारमध्ये दादरा नगरहवेली येथे विक्रीस परवानगी असलेली रॉयल स्पेशल ओल्ड डिलक्स, ऑफिस चॉईस, ब्ल्यू ग्रीन व्हिस्की, ग्रीन ओडका, किंगफिशर बिअर असा सुमारे १ लाख ८५ हजार २८० रुपयांचा मद्यसाठा मिळून आला.
पथकाने दोघा संशयितांंना बेड्या ठोकत चार लाखांच्या कारसह मद्यसाठा असा सुमारे ५ लाख ८५ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी

0
मतिष्क बाधा म्हणजेच ब्रेन डॅमेज नंतर शारीरिक प्रक्रिया या स्वत:च सूरू होते. यात मेंदूचा फारसा वापर होत नाही. त्यामुळे शरिराला मिळणार्‍या चुकिच्या संदेशांद्वारे शरीराच्या चुकीच्या हालचाली केल्या जातात. त्यातून बाहेर काढण्यासाठी ‘वासा कन्सेप्ट’ रुग्णाच्या मेंदूला योग्य कार्यकरण्याचा मार्ग दाखवते. त्यातून पून्हापून्हा प्रक्रिया करण्याने मेंदूची दिशा बदलण्यास मदत होऊन रुग्ण आजारातून बाहेर येतो.
सातपूर | प्रतिनिधी  मेंदूच्या विकारामुळे विकलांग झालेल्या शरिरावर कोणतेच औषध परिणामकारक काम करीत नसताना औषधांविना केवळ व्यायामाच्या माध्यमातून स्व:ताच्या आजारातून बाहेर येण्याचा मार्ग शोधण्याचे तंत्र विकसित करुन त्यासाठी पाहीजे असलेले ज्ञान देण्याचे काम वासा कन्सेप्टच्या माध्यमातून डॉ. राजूला वासा हे करत आहेत. राज्यात मुंबई पूण्यापोठोपाठ सातपूर (नाशिक) येते केंद्र उभारण्यात आले आहे.
सातपूर येथील नगरसेवक सलिम शेख यांच्या पूढाकाराने संत शिरोमणी शिंपी समाज सभागृहात शिबीराद्वारे रुग्णांना त्या संबोधित करतअसतात.डॉ. राजूल वासा यांनी रुग्णांना विविध आजारांवर करावयाच्या व्यायाम प्रक्रियेबद्दल माहीती देऊन त्यांच्याकडून योग्य पध्दतीने व्यायाम करवून घेण्याची कला माता पित्यांना समजावून देतात.
नाशिक साठी वासा कन्सेप्ट सेंटर सूरू होणे ही महत्वाची संधी असल्याचे सलिम शेख यांनी सांगितले. विनामुल्य असलेल्या या उपचार पध्दतीमुळे अनेक रुग्ण सूधारलेले असून यांचा लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहनही केले.
नाशिक सेंटर मध्ये आतापर्यंत ३५० जणांनी या उपचार पध्दतीचा लाभ घेतला आहे. त्यांना त्यातून खुप फायदाही मिळालेला आहे. नुकत्याच आणखी ४० जणांच्या फाईल्स तयार करण्यात आलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या रुग्णांच्या सोबत दिवस काढणार्‍या कुटूंबाच्या वेदनाच वेगळ्या आहेत. त्यांच्या सूखासाठी वासा उपचार पध्दत लाभदायी आहे.शहर परिसरातून खासगी सव्हेक्षणातून शहर परिसरात ७० हजाराहुन जास्त मुले या आजाराचे शिकार आहे. काम मोठेे करायचे आहे. नागरीकांनी या विनामुल्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सलिम शेख यांनी यावेळी केले.

पेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन

0
सातपूर | प्रतिनिधी  नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या निर्देशांनुसार १२ ते २१ नोव्हेंबर दरम्यान ठिकठिकाणी आंदोलनाची मालिका आयोजित करण्यात आली असून, १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या विषयी माहीती देण्यासाठी काल सातपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सातपूर कॉलनीतील देवी मंदीराच्या प्रांगणात या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सघटनेचे सरचिटणिस डी.बी.जोशी, कार्याध्यक्ष चेतन पणेर, संघटक सूभाष पाटील, सप्तश्रृंगी ज्येष्ठ नागरीक संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत शिंदे हे होते.
यावेळी श्री पणेर यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. १२ नोव्हेंबरला मनमाड, १३ ला निफाड, १४ ला दिंडोरी, १५ ला मालेगाव तर १६ ला नाशिक येथे जिल्हास्थरीय मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जेलभरो आंदोलनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १९ ला सटाणा व २१ ला सिन्नर येथे आंदोलन केले जाणार आहे.
शेवटी २१ डिसेंबरला दिल्ली येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार असून, या माध्यमातुन मागिल ५ वर्षांपासून दिलेले अश्‍वासन पूर्ण केले जात नसल्याने आंदोलन करण्यात येणार आहे. देशातील विविध १८६ उद्योगांतून निवृत्त झालेल्या लाखो कामगारांद्वारे हे आंदोलन उभे करण्यात येत असून, प्रत्येकाने यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले. तर आभार डी.बी. जोशी यांनी मानले.
यावेळी रामभाऊ भागवत, भिमराव चौधरी, शशिकांत पाटील, साहेबराव म्हसे, एस.बी.जमधाडे, रामचंद्र एखंडे, नारायण गायकवाड, सुकामल पितांबर, उत्तम निकम, दत्तात्रय पाटील, जगन्नाथ भंगाळे, सूरेश वडनेरे आदींसह पेन्शनर्स मोठ्या संख्यने उपस्थित होते.

मोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा

0
नाशिक | प्रतिनिधी  किसान सभेच्या वतीने मार्च महिन्यात मुंबईत काढलेल्या मोर्चाला घाबरून मुख्यमंत्र्यांनी घाईघाईत आश्‍वासने दिली. परंतु ही आश्‍वासने सरकारने पाळली नाहीत. त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही केली नाही. आतातरी शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्या मान्य करा, नाशिक जिल्ह्यात संपूर्ण दुष्काळ जाहीर करा, वनाधिकार कायद्याचे सर्व दावे पात्र करा, दुष्काळात होरपळणार्‍यांना तातडीने दिलासा द्या, या मागण्यांसाठी मुंबईत पुन्हा एकदा लॉंग मार्च काढायला लावू नका, असा इशारा आज किसान सभेने शहरात भव्य मोर्चा काढत राज्य शासनाला दिला.
जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकरी, शेतमजूर यांचा भव्य मोर्चा आज शहरात काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे ज्येष्ठ नेते आ. जे. पी. गावित यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केले. आज शहरातील गोल्फ क्लब मैदानातून काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. गोल्फ क्लब मैदानावरून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला.
यात सहभागी महिला-पुरुष व युवकांनी हातात लाल झेंडे घेत आणि आपल्या मागण्यांच्या आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. शालिमार चौकात मोर्चा थांबवण्यात येऊन या ठिकाणी किसान सभेच्या पदाधिकार्‍यांनी शेतकरी, शेतमजुरांना मार्गदर्शन केले.
यात राज्य शासनाने दुष्काळाचे निकष बदलावेत, नाशिक जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात तीव्र दुष्काळ आहे. तेथे दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तातडीने दिलासा द्यावा, जिल्ह्यात दुष्काळी कामे सुरू करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, वनाधिकारी कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी व दुष्काळग्रस्तांचे सर्व कर्ज माफ करावे आदींसह मागण्या किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे यांनी यावेळी केल्या.
मोर्चानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांनाही मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात सर्व वृद्धांना वृद्धापकाळ पेन्शन योजना लागू करा, दरमहा पाच हजार रुपये द्या, वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस दिरंगाई करणार्‍या शिबबाला आणि श्रीमती टिब्युला या वन अधिकार्‍यांची त्वरित नाशिक शहरातून बदली करा यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मोर्चात किसान सभा पदाधिकारी सुनील मालुसरे, किसन गुजर, रमेश चौधरी, देवीदास आडोळे, इरफान शेख, इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, मोहन जाधव, सावळीराम पवार, हनुमंत गुंजाळ, नामदेव मोहंडकर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.
मंजूर मागण्यांवर कार्यवाही नाही
गेल्या ६ ते १२ मार्चदरम्यान नाशिक ते मुंबई असा किसान सभेच्या वतीने आदिवासी, शेतकर्‍यांनी लॉंग मार्च काढला होता. आमच्या मागण्यांची दखल घेताना आमच्या लोकांना मुंबईबाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मंजूर केल्या. मात्र अद्याप त्यावर शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने आजचा इशारा मोर्चा काढण्यात आला. आमच्या मागण्यांबाबत त्वरित निर्णय घ्या. पुन्हा आम्हाला लॉंग मार्च काढायला लावू नका, असा इशारा किसान सभेचे नेते आ. जे. पी. गावित यांनी दिला.

15 November 2018

0

Raising support for the orphans

0

Gaurav Pardeshi

NASHIK: While many shared pictures of their childhood on Children’s Day on Wednesday, there still are some who were not able to do that as their childhood was spent without their parents, as orphans in some orphanage. The issues of such children who have had to leave the orphanage on completing the age limit face many issues from survival to self-identity. One of them Sulakshana Aher stands out though and is not only working for her identity but for that of many like her.
 Sulkshana Nanaji Aher, a law student and a social worker, is working for orphan children’s and for their rehabilitation through an NGO – Anathancha Adhar (support for the orphans) that she runs. While explaining her story Sulkshana says, when she was 13 days old, unknown persons kept her and three-and-half-year old sister on the steps of an orphanage. A chit mentioning their birthdates and family’s last name was also kept with them.

Their entire childhood had passed in the orphanage. They were sent to another orphanage after they passed SSC examination. According to the government rules, the orphans have to leave orphanage after they attain 18 years of age. After starving for two days at a bus stand in Nashik. she did household works. She overcame all difficulties after realising that there are many people like her who need support. Their rights? What are the laws?. With this objective the NGO – Anathancha Adhar has been started, she added.

The orphans have many issues. Many orphan girls are married after attaining 18 years of age. As husbands of many girls have a strange mentality, they abuse them verbally and beat them up many times. Many times, employees working at orphanage sell the girls.

Some girls escape from the orphanage. In actual, this is not true, Sulkashana informed.
Sulkashana is fighting for orphans, their rights and celebrates Diwali with orphans. All the orphans should get home and identity proofs like aadhar card. They should lead a normal life and society should change its way to them. she expects.

Girls and boys who have completed their stay at the orphanage and are making efforts to earn a livelihood will come together for a post-Diwali celebration and share the experiences of their lives over this weekend.

ई पेपर- गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

0

Social Media

26,841FansLike
5,154FollowersFollow
1,347SubscribersSubscribe
error: Content is protected !!