माजी नगरसेवक हल्ला प्रकरणी तिघांना अटक

0

नाशिक । दि. 19 प्रतिनिधी
माजी नगरसेवक दलोड व त्यांच्या पुत्रावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी 24 तासात तिघांना अटक केली आहे. हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे दरम्यान न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विक्रम तसबंड, पिंटू तसबंड, सोनू उर्फ संदेश साळवे (तिघे रा. महालक्ष्मी चाळीच्या बाजुला, मातंगवाड्याशेजारी, जुने नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी द्वारका चौकातील वडाळानाका येथे शनिवारी (ता.17) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक सुरेश दलोड, त्यांचा मुलगा सिद्धार्थ दलोड यांच्यावर धारदार चॉपरने वार केल्याची घटना घडली होती. दलोड पितापूत्रांच्या मदतीला धावलेल्या सौरभ बागडीला संशयितांनी मारहाण केली होती. घटनेनंतर संशयित हल्लेखोर पसार झाले होते. तर गंभीररित्या जखमी पितापूत्रांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सदरच्या घटनेप्रकरणी मुंबई नाका पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संशयितांना अटक करण्यासाठी पथक नेमून त्यांच्या मागावर रवानाही केले होते. सदरच्या घटनेमुळे जुने नाशिक परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर संशयित पोलिसांच्या हाती लागत नसल्याने ही परिस्थिती अधिक तणावग्रस्त होण्याची शक्यता होती. परंतु मुंबई नाका पोलिसांनी तीनही संशयितांना रविवारी (ता.18) रात्री अटक केली. त्यांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता येत्या 21 तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित तसबंह आणि दलोड यांच्यात जुना वाद आहे. त्यासंदर्भात भद्रकाली पोलीसात गुन्हाही दाखल आहे. त्याच वादातून सदरचा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश वराळ अधिक तपास करीत आहेत.

संत नामदेव महाराज यांची ७४८ वी जयंती उत्साहात संपन्न

0

नाशिक : संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७४८ वी जयंती काल कार्तिकी एकादशीच्या सायंकाळी ६ रामकुंड येथे दीपोत्सवाने जयंतीउत्सव साजरा केला . तसेच सकाळी मेनराेड येथील संत गाडगे महाराज पुतळा येथे माजी महापौर विनायक पांडे व अरुण नेवासकर यांच्या हस्ते संत नामदेव महाराज प्रतिमा पूजन करण्यात आले.

सिडको, सातपूर, म्हसरूळ, त्रंबकेश्वर, भगू,र मेरी, पंचवटी, इगतपुरी, लासलगाव, जुने नासिक आदी ठिकाणच्या भाविकांनी या सोहळ्यास हजेरी लावली. अरुण नेवासकर यांच्या हस्ते पूजन व महाआरती करण्यात आली. सायंकाळी रामकुंडावर वर्षाप्रमाणे संत नामदेव महाराजांची प्रतिकृती दीपोत्सवाने सजविण्यात आली होती.

यानिमित्त नामदेवांच्या अभंगांचे सामूहिक गायन भाविकांनी सादर केले. या सोहळ्यास नामदेव भक्त परिवार, वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.

जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी नाशिक प्रांतिक ,नामदेव शिंपी समाज उन्नती संस्था, नामदेव भक्त परिषद, नामदेव ब्रिगेड,नामदेव प्रतिष्ठान व समस्त शिंपी समाज संस्था प्रणित, संत नाम लीला ग्रुप नाशिक सह परिक्षेत्रातील विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह नंदन रहाणे, प्रशांत निरगुडे, त्र्यंबक काळे, ज्ञानेश्वर आैसरकर, प्रदीप जगताप, हेमंत सोनवणे, सतीश भांबारे, सोमनाथ गायकवाड, रमेश चांडोले ,नंदू गगावणे ,रमेश बकरे, सुधाकर वारे, योगेश वारे ,सुर्यकांत धटिंगण ,रवींद्र रहाणे, सुभाष लचके, दत्ता वावधाने, वासंती रहाणे, मीनाक्षी धटिंगण, अमर सोनवणे, सुधाकर टिभे, रंजना टिभे, अनिल नेवासकर, रत्नाकर भावसार आदींसह समाज बांधव आदि उपस्थित होते.

संत नामदेव महाराजांचा जन्मोत्सव २०२० साली ७५० वी जयंती राष्ट्रीय पातळीवर भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी काही संकल्प सोडले जाणार आहेत. संत नामदेव महाराज हे वैष्णव भक्ती चळवळीचे प्रवर्तक व आद्य संत आहेत. त्यांनीच अठरापगड बहुजनामधून अनेक संत उदयाला आले. अद्य अभंग , कीर्तन, आद्य संघटककार म्हणून त्यांचा लौकिक गेली ७०० वर्षे टिकून आहे. ते महाराष्ट्र पूरते मर्यादित नसून काश्मीरपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत पूर्ण भारतभर त्यांचे अनुयायी पसरलेले आहेत. घुमान पंजाब येथे साहित्य संमेलनांमुळे त्यांचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. ७५० व्या जयंतीच्या संकल्पासाठी सर्व नामदेव भक्तांनी कार्तिकी एकादशीच्या निमित्त्याने मोठ्या प्रमाणात संघटित होत आहे.                                                                                          – अरुण नेवासकर, समस्त शिंपी समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

कोल्हापूर येथील अर्ध आयर्नमॅन स्पर्धेत नाशिककरांची बाजी

0

नाशिक । दि. 19 प्रतिनिधी
रांगंड्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात नाशिकच्या 11 खेळाडूंनी बाजी मारत अर्ध आयर्नमॅनचा किताब पटकावला. कोल्हापूर स्पोर्टस् क्लब आयोजित ट्रायथलॉन व ड्युएथलॉन या अवघड स्पर्धेत या खेळाडूंनी विशेष ऊल्लेखनिय कामगिरी केली. वेळेपूर्वीच ही स्पर्धा पूर्ण करून स्पर्धेत नाशिकची शान वाढविली.

कोल्हापूर येथे 18 नोव्हेंबर रोजी या स्पर्धा पार पडल्या. सकाळी 6:30 वाजता राजाराम तलाव येथून या स्पर्धेस सुरुवात झाली. स्पर्धेत विविध ठिकाणाहून आलेल्या एकूण 900 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता.
यामध्ये नाशिकच्या दीपक भोसले, दुष्यंत चोरडीया, अरुण पालवे, विलास सानप आणि महेंद्र छािेरया यांनी हाफ आयर्न मॅन ही स्पर्धा यशस्वी रित्या पूर्ण केली. अत्यंत कठीण अशा या हाफ आयर्न मॅन स्पर्धेत खेळाडूस सलग 1.9 कि.मी. पोहणे, 90 कि.मी. सायकलिंग करणे आणि 21 कि.मी. धावणे आवश्यक असते.

प्रशांत डबरी, मयूर पुरोहित, विदित चोरडीया, स्वप्ना मेारे, यांनी या स्पर्धेत ऑलिम्पिक डिस्टन्स या प्रकाराची म्हणजेच सलग 1.5 कि.मी. पोहणे, 40 कि.मी. सायकलिंग करणे आणि 10 कि.मी. धावणे अशी स्पर्धा पूर्ण केली. सुमित्रा पालवे, नंदा गायकवाड या दोघींनीही ड्युएथलॉन ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. अतिशय अवघड अशी हाफ आयर्न मॅन ही स्पर्धा नाशिकच्या टिमने वेळेत पूर्ण करून किताब पटकावला. आयोजकाच्या हस्ते स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा पदके देऊन स्नमान करण्यात आला.

पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शन
नुकतीच फ्रान्स येथे आयर्न मॅन ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारे आपल्या नाशिकचेच आयर्न मॅन पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांचे आम्हाला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशी स्पर्धा नाशिकमध्येही होऊ घातली आहे त्याकरिता आमचा चांगला सराव झाला. शहरातील स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवून नाशिकमध्येही स्पर्धा यशस्वी करावी.
– महेंद्र छोरिया, स्पर्धक, नाशिक  

नाशिकचा रायझिंग स्टार ठरला अभिजित तायडे

0

इंदिरानगर : एम अचिव्हर्स नाशिक यांच्यावतीने आयोजित केलेल्या दोन वयोगटातील गाण्याच्या स्पर्धेत नाशिक रायझिंग स्टार्स अभिजीत तायडे हा विजेता ठरला.

भाभानगर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे एम अचिव्हर्स वतीने वयाे गट ५ ते १५ व १६ ते २५ या दोन गटात एकूण ३०० स्पर्धकांनी सहभाग घेवून त्यांनी वैयक्तिक मराठी, हिंदी, जुने व नवे गीते अनोख्या शैलीत सादर करून रसिकांना मंत्रमुगध केले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत ३० स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यातून अनुक्रमे राधिका पवार, भाग्यश्री क्षीरसागर, हर्षद पवार, विविधा जाडा, पुरावा क्षीरसागर, सोनाली वर्मा, अश्विनी सूर्यवंशी आदि विजेत्यांना प्रमुख अतिथी मुंबईचे डायरेक्टर किशोर याशोद व मिलिंद यशोद व मिस इंडिया शिल्पी अवस्थी, मिसेस महाराष्ट्र रुपाली पवार व मिस ग्लोबल प्लॅनेट टॅलेंट क्वीन नुतन मिस्त्री -निकम , गायिका रेखा महाजन, मीना परुळेकर, विजयालक्ष्मी मणेरीकर, अविनाश गांगुर्डे, नाशिक म्यूझिक क्लबचे नंदिनी हितेश कारिया, नंदकिशोर शेवाळे, हरिष ठक्कर, प्रकाश गोसावी आदीच्या हस्ते सन्मानचिन्ह देउन गौरवण्यात आले.

तसेच सहभागी स्पर्धकांनाही सन्मानित करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत स्पर्धा आयोजक एम अचिव्हर्सचे संचालक आनंद जगताप यांची केले. स्पर्धेचे निवेदन आर जे परि ने केले. परीक्षण विवेक केळकर , मृणाल मालपाठक, मिलिंद गांधी यानी केले.

फिल्म सिटी या चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपनीने विजेत्या गायकांना संधी देण्याचे जाहीर केले. वयाेगट ५ ते१५ मधिल राधिका पवार या विजेतीस मुंबईचे रेनबो फिल्मचे डायरेक्टर किशोर- मिलिंद यशोद यांनी पुढील आल्बममध्ये गाण्याची संधी देणार तसेच एम अचिव्हर्स च्या प्रतिभावान कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून सिने क्षेत्रात प्रवेश देणार असल्याचे जाहीर केले.
आनंद जगताप, एम अचिवर्स संचालक

नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या

0

Video : नाशिक जिल्ह्यात बेमोसमी पाऊस; बळीराजा संकटात

0
देशदूत डिजिटल टीम

नाशिक जिल्ह्यातील मनमाड, आंबेदिंडोरी, मोहाडी, जानोरी परिसरात तुरळक पावसाने तर पालखेड बंधारा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने ऐन फुलोऱ्यावर आलेल्या द्रक्षबागांना फटका बसला असून पालखेड परिसरातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

आज किमान तापमानाचा पारा आज सकाळी अचानक चार अंशांनी घसरला. तर कमाल तापमानातही मोठी वाढ झाली. आकाशात ढग जमले होते. अखेर जिल्ह्यातील मनमाड, आंबेदिंडोरी, मोहाडी, जानोरी परिसरात बेमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या.

या परिसरात द्राक्ष शेतीचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे वाढलेल्या थंडीत अचानक ऊन आणि पावसाच्या कहरमुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पिंपळगाव बसवंतलाही तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे. शिंदवड, खेडगाव, तळेगाव, सोनजांब परिसरात पावसाने अचानक हजेरी लावली यामुळे फुलोऱ्यातील द्राक्षबागां संकटात सापडल्या आहेत.

ञ्यंबकेश्वर येथे देवदिवाळीसाठी देवस्थान ट्रस्ट सज्ज

0

ञ्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी : ञ्यंबकेश्वर येथे पुर्वपार चालत आलेल्या परंपरेनुसार देवदिवाळी साजरी करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले आहे. यावर्षी रथोत्सवास 160 वर्ष पुर्ण होत आहेत. दिवाळी पासूनच मंदिरास आकर्षक विद्युत रोषनाई करण्यात आली आहे.

वैकुंठ चतुर्दशी व कार्तिक पौणिर्मानिमीत्त शतकोत्तरी रथोत्सव आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 21 नोव्हेंबर 2018 बुधवार रोजी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सरदार विंचुरकरांच्या वतीने देवस्थानतर्फे महापूजा दुपारी 1.30 ते 4.00 वाजे पर्यंत राहील. त्याच दिवशी रात्री 10.00 तप उत्तररात्री 1.00 वाजेपर्यंत वैकुंठीची विशेष महापूजा, पालखी सोहळा व हरिहर भेट असेल. त्याच प्रमाणे दि.22 नोव्हे.2018 गुरूवार रोजी दुपारी 3.30 वाजता रथोत्सवास सुरूवात होणार आहे. श्री ञ्यंबकराजांची रथातुन सवाद्य मिरवणूक कुशावर्त तिर्थावर महापूजा व साधरणत: 6 वाजोपासून मंदिरात परतीचा प्रवास असा कार्यक्रम आहे. रात्री 8 वाजता रथ पालखी मंदिरात परत आले नंतर दिपमाळ पूजन होणार आहे.

ञ्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने याबाबतची सर्व तयारी पुर्ण केली आहे. या कालावधीत दर्शनार्थी भाविकांची गर्दी होईल म्हणून पुर्वदरवाजा दर्शनबारी मंडप देण्यात आला आहे. या दर्शनबारीतील भाविकांना गर्भगृहातील पुजा दर्शन व्हावे म्हणून डिस्ल्पे स्कीन वॉल सुरू करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला सरदार विंचुरकर यांनी दिलेला 31 फुट उंच असलेला शिसवी लाकडाचा रथ सज्ज करण्यात आला आहे. या रथाची किरकोळ डागडुजी करण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष न्या.बोधनकर, सचिव डॉ चेतना केरूरे, विश्वस्त सौ तृप्ती धारणे, ऍड द्वारकाधिश दिघे, ऍड पंकज भुतडा, संतोष कदम, प्रशांत गायधनी, दिलीप तुंगार, मुख्यकार्यकारी अधिकारी राधाकृष्ण जोशी, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य आदिंसह अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन पुर्ण केले आहे. अधिकाधीक भाविकांनी या शेकडो वर्षांच्या परंपरेच्या उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.

चिमूकलीने वाचविले जखमी बगळ्याचे प्राण

0

पारनेर (तालुका प्रतिनिधी)-  नगर- पुणे महामार्गावरिल पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथिल मठ वस्तीवर एक बगळा हा पक्षी पाण्याच्या शोधात घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ आला होता. यावेळी मांजरीने बंगल्यावर हल्ला करत बंगल्यास जखमी केले.

यावेळी चौथी मध्ये शिक्षण घेणाऱ्या समृद्धी तरटे या चिमुकलीने गंभीर जखमी झालेल्या बगळ्याला पाहिले. तिने तात्काळ वडिलांच्या मदतीने वनविभागाचे कर्मचारी बाळासाहेब पाचारणे यांना बोलावून बगळ्याला त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर डॉक्टारांनी प्राथमिक उपचार करून बगळ्याला वनविभागाकडे सुपूर्त केला. चिमूकली समृध्दी तरटे हिने आपले धाडस दाखवून बगळ्याचे प्राण वाचविल्याबद्दल तिचे वन्यप्रेमी व ग्रामस्थांनी कौतूक केले आहे.

नगर टाइम्स ई-पेपर : सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

0

विद्युत रोहित्राच्या स्फोटाने द्राक्षबागेचे नुकसान

0

वडनेर भैरव : येथील सनराईज शाळेच्या मागे पाचोरकर वस्तीजवळील विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन येथील दत्तात्रेय धोंडीराम पाचोरकर यांचे द्राक्षबागेचे सुमारे सव्वासे झाडे जळून सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. रोहित्राच्या बाजूला लागुनच चिंचेचे झाड आहे. आगीचे लोट झाडावर पडल्यामुळे झाड जळाले. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

रविवार रोजी रोहित्र क्र.२७ चा मोठा स्फोट झाला, स्फोटाचा आवाज इतका मोठा होता कि ३ किलोमीटर पर्यंत नागरिकांमध्ये घाबरट निर्माण झाली होती. स्फोटामुळे शेजारील द्राक्षबागेचे सुमारे सव्वासे झाड, ३ आंब्याचे झाड, १ सीताफळीचे झाड, चिंचेचे एक झाड जळाले आहे. यातून पाचोरकर यांचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सहा महिन्यांपूर्वी काल स्फोट झालेला ट्रान्सफार्मर लावण्यात आला होता. तेव्हापासून त्यात मोठा आवाज व्हायचा अनेकदा निदर्शनास आणून देवून देखील रोहित्र बदलले नाही. घटनेची दखल घेवून तात्काळ रोहित्र देवून शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी अशी मागणी पंचायत समिती उपसभापती अमोल भालेराव यांनी केली आहे.

Social Media

26,918FansLike
5,154FollowersFollow
1,362SubscribersSubscribe
error: Content is protected !!