देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार : सोमवंशी आणि कुशारे ठरले आठवड्याचे भाग्यवंत

0
लकी ड्रॉ काढताना रवी पारख

नाशिक, ता. २४ : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०१८ द्वारे विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या महिलांच्या प्रेरणादायी यशकथा दैनिक देशदूतमधून प्रसिद्ध होत असून त्यावर आधारित प्रश्नमंजुषेची अचूक उत्तरे पाठविणाऱ्या या आठवड्यातील दोन भाग्यवान वाचकांची निवड आज पारख ॲप्लायन्सेसचे संचालक रवी पारख यांच्या हस्ते लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आली.

दिनांक १७ ते २३ मार्चदरम्यान या लकी ड्रॉमध्ये प्रथम भाग्यवंत होण्याचा मान भाऊसाहेब विश्वनाथ सोमवंशी, सुंदरपूर, ता. निफाड यांना तर द्वितीय भाग्यवान होण्याचा मान गणेश दत्तात्रय कुशारे मु.पो.कुंदेवाडी,ता.निफाड यांना मिळाला.

विजेत्यांना सोनी गिफ्टतर्फे आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे. दरम्यान रवि पारख यांनी कर्मयोगिनी पुरस्कार उपक्रमाचे कौतुक करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटून दोन ठार , १२ जखमी : पिंपळगाव हरेश्‍वरजवळील कवली गावाजवळील घटना

0
 जळगाव : पिंपळगाव हरेश्‍वरजवळील कवली गावापुढे रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटून दोन क्रिकेटपटू जागीच ठार झालेत. तर १२ जण जखमी झाले आहेत.

पाचोरा तालुक्यातील प्रिंपी डांभूर्णी येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सोयगाव तालुक्यातील न्हावी तांडा येथील खेळाडू हे एका रिक्षाने जात होते.

रिक्षा कवली गावापुढे येताच चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. त्यात भरत शिवदास राठोड व राहूल हरी जाधव हे दोघे जागीच ठार झालेत. तर उर्वरीत ११ खेळाडू व चालक जखमी झाले आहेत.

लासलगावला बारदान गोदामास आग; लाखोंचे नुकसान

0

लासलगाव (वार्ताहर) ता. २४ : लासलगाव रेल्वे स्टेशन रोडवरील बँक ऑफ बड़ोदा शेजारील धार्मी ऍग्रो मार्केटिंगच्या बारदान गोदामास आग लागून लाखोंचे नुकसान झाले असून सर्व माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

गोडावून मधील शेकडो बारदानच्या गाठी जळून खाक झाल्याने ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज असल्याची माहिती व्यवस्थापक अजय घनावटे यांनी दिली.

आग लागल्याचे कारण अद्याप समजले नसून आग सकाळी 11 वाजेच्या सुमारास लागताच आगीने झपाट्याने पेट घेतला.

हवा जोरात असल्याने आगीने रुद्र रूप धारण केले.आजूबाजूतील व परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन टँकरने मिळेल त्याठिकाणाहून पाणी उपलब्ध करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

दुपारी पावणेबाराच्या सुमारास पिंपळगाव बसवंत येथील अग्निशामक दलाच्या गाडी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली.

सामुहिक अत्याचारानंतर पाचवीतील मुलीला रॉकेल टाकून जाळले

0
छायाचित्र : प्रतीकात्मक

नागाव (आसाम) ता. २४ – पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर तिघा अल्पवयीन मुलांनी अत्याचार करून रॉकेल टाकून तिला पेटवून दिले.

त्यात ९० टक्के भाजल्यानंतर तिचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाल आहे. आसाममधील नागाव जिल्ह्यात ही घटना घडली.

मृत्यूपूर्व जबानीत मुलीने पोलिसांना आपल्यावरील आपबिती कथन केली. अत्याचार करणाऱ्या दोघा विधीसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतले असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे.

यापूर्वीही या परिसरात एका ३५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार झाला होता. त्यावेळी ८ जणांना ताब्यात घेतले होते.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील महिला आणि मुली दहशतीखाली असून छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्याने त्यांनी धास्ती घेतली आहे.‍

अलिकडेच येथील आमदारांनी या बाबत आवाज उठविला होता.

अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण सरपंचावर प्राणघातक हल्ला

0
अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण येथील सरपंच नरेंद्र बाळु पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी मारवड पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  याबाबत अधिक असे की,सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र बाळु पाटील हे ग्रा.प.कार्यालया समोर उभे असता गावातील संजय पितांबर पाटील हा आला व तो ग्रामस्थांना शिवीगाळ करीत होता. तेव्हा त्याने सरपंच नरेंद्र पाटील यांच्या मोटारसायकल लाथ मारून पाडली त्यास या बाबत जाब विचारता असता आरोपी त्याचा राग येवुन सरपंच यास शिवीगाळ करून मारण्याचा दम दिला. तसेच त्याच्या हातातील आडजात काठीने उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारली तेव्हा परिसरातील उपस्थित नागरिक वासुदेव पाटील,श्रीराम पाटील,नितीन पाटील,लीलाधर पाटील,यांनी मला त्याच्या तावडीतून सोडले.
गुडघ्याजवळ मार बसल्याने मी उपचाऱ्या ग्रामीण रुग्णालयात अंमळनेर येथे गेलो तपासणी केली असता गुडघ्याचे हाड फॅक्चर झाल्याने सांगण्यात आले.
याबाबत सदर हल्ला प्रकरणी  सरपंच नरेंद्र बाळू पाटील यांनी दि.23 रोजी मारवड पोलीस स्टेशन ला भाग-5 गु.र.न.15/2015 भा.द.वि.कलम ३२५,३२३,५०४,५०६ प्रमाणे स्टेशन डाहिरीत नोंद करण्यात येऊन पुढील तपास मारवड पोलिस स्टेशनचे ए.पी.आय.चव्हाण हे करीत आहेत.

नाशिक जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमधील विविध समस्यांचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

0

मुंबई, दि. 23 : नाशिक जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमधील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक‍ झाली. जिल्हा रुग्णालयात आवश्यक असणारी औषधे, रिक्त पदांची भरती, सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मुत्रपिंड प्रत्यारोपण सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली.

विधीमंडळातील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, राहुल आहेर, अनिल कदम, राजाभाऊ वाजे, हेमंत टकले, पंकज भुजबळ उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, सामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. औषधांची उपलब्धता नसल्यास त्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात स्थानिक स्तरावर खरेदी करावी. औषधांवाचून रुग्णांना परत पाठवू नये. असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सुपरस्पेशालिटी मधील विविध सुविधांचा आढावा घेताना या ठिकाणी मुत्रपिंड प्रत्यारोपणाची सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

स्थानिक लोकप्रतिनीधींनी यावेळी मांडलेल्या विविध समस्यांविषयी विभागातर्फे सकारात्मक निर्णय येत असून सामान्यांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे डॉ.सावंत यांनी सांगितले. विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त डॉ.संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ.सतीश पवार,जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. जगदाळे यांनी आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपायायोजनांची माहिती दिली.

Video : नागादेवी पाझर तलावाचे काम १५ एप्रिलपासून सुरू न झाल्यास आमदारद्वयी करणार उपोषण

0

यावल | प्रतिनिधी | दि. २४ : यावल तालुक्यातील नागादेवी पाझर तलावाच्या कामास १५ एप्रिलपासून सुरवात न झाल्यास आम्हीच उपोषणाला बसू अशी ग्वाही आ. हरीभाऊ जावळे व आ. चंद्रकांत सोनवणे यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली.

याबाबत काय म्हणताहेत आमदार द्वयी पहा या व्हिडीओत

 

( व्हिडीओ संकलन : अरुण पाटील देशदूत डिजिटल यावल )

 

 

अनंतनागमध्ये दोन अतिरेकी ठार

0
श्रीनगर : काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी भारतीय सैन्याने दोन अतिरेक्यांना ठार केले आहे.

हिजबुल मुजाहिदीनच्या या दोन अतिरेक्यांकडून एके ४७ रायफलींसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील डोरू या परिसरात हे अतिरेकी असल्याची माहिती सैन्यास मिळाली.

त्यानुसार राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलिस व सीआरएफने संयुक्त कारवाई करत या दोघांना घेराव घातला. आपण वेढलो गेल्याचे लक्षात येताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सैन्याने प्रत्युत्तर देत या दोघांना यमसदनी पाठवले.

लालु प्रसाद यादव यांना ७ वर्षाच्या शिक्षेसह ३० लाखाचा दंड

0
नवी दिल्ली : चारा घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांना ७ वर्षाची शिक्षा व ३० लाखाचा दंड सीबीआयच्या न्यायालयाने सुनावला आहे.

दुमका कोषागारातून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

विजयाच्या जल्लोषाला शिक्षेचे कोेदंण

बिहारमधील लोकसभा निवडणूक जिंकल्याचा जल्लोष यादव परिवार साजरा करत असतांनाच शिक्षा सुनावली गेल्याने जल्लोषाला ब्रेक बसला आहे.

आधीच साडेतेरा वर्षाची शिक्षा

चारा घोटाळ्यात यापुर्वी लालु प्रसाद यादव यांनासाडेतेरा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यात या शिक्षेची भर पडली आहे. लालू यादव सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरूंगात शिक्षा भोगत आहेत.

मोदी नव्हे गडकरी पंतप्रधान होणार : हार्दीक पटेलची भविष्यवाणी

0
मुंबई : २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपाचा विजय होत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे चित्र भाजपातर्फे दाखवण्यात येत असले तरी २०१९ च्या निवडणूकांमध्ये मोंदी नव्हे तर नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा आरएसएसची आहे. अशी भविष्यवाणी गुजरात पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी वर्तविली आहे.
काय म्हणाले हार्दिक पटेल

२०१९ मध्ये जर भाजपा निवडूण आले आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप(धान झाले तर देशात राष्ट्रपती राजवट लागु केली जाईल. त्यामुळे भाजपाच्या जागा कमी व्हाव्यात अशी संघासह एनडीएची इच्छा आहेे. तसे झाले तर पराभावाची शिक्षा म्हणून संघ पंतप्रधानपदी नितीन गडकरी यांना नियुक्त करेल. असेही त्यांनी सांगितले. त्याची भविष्यवाणी कितपत खरी निघते हे २०१९ मध्येच कळेल.

Social Media

23,328FansLike
4,923FollowersFollow
497SubscribersSubscribe
error: Content is protected !!