‘व्हीव्हीपॅट’बाबत आता गावोगाव जनजागृती

0

नाशिक । दि. 19 प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येणार्‍या मागणीनुसार व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल) यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नाशिकमध्ये 5 हजार 479 यंत्रे दाखल झाली आहेत. मतदाराने कोणत्या पक्षाला तसेच उमेदवाराला मत दिले आहे हे त्यांना पावती स्वरुपात समजणार आहे. उद्या मंगळवारपासून या मशीनची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून 15 डिसेंबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक गावागावांत जाऊन मशीनचे प्रात्याक्षिक दाखवण्यात येणार आहे.

मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक शाखेने तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत आधी बॅलेट युनिट मतपत्रिका आणि कंट्रोल युनिट आणले गेले होते.

आता बंगळुरूहून सहा कंटनेरमधून व्हीव्हीपॅट यंत्र दाखल झाले आहे. जिल्ह्यातील 4 हजार 446 मतदान केंद्रांवर हे मशीन लावण्यात येणार आहे. उद्यापासून व्हीव्हीपॅट यंत्र प्रत्येक मतदान यंत्राला जोडून त्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी, कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन करण्यात येणार आहे. पुढील काळात व्हीव्हीपॅट यंत्राविषयी जनजागृतीचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. या यंत्राची कार्यपद्धती न्यायीक, पोलीस यंत्रणा, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासमोर सादर केली जाईल. नंतर सार्वजनिक ठिकाणी व्हीव्हीपॅटविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

महिनाभर राबवणार मोहीम
व्हीव्हीपॅट मशीनबाबत नागरिकांमध्ये अफवा पसरवल्या जात आहेत. या शंकांचे निराकरण करण्यासाठी आता 15 डिसेंबर ते 15 जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे, आठवडे बाजार तसेच गावोगावी पथकामार्फत प्रात्याक्षिक सादर करून नागरिकांच्या शंकांचे निराकरण करण्यात येणार आहे. याकरिता विशेष पथकही नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

सहकार्य करावे
निवडणूक यंत्रणेविषयी राजकीय पक्षांकडून नेहमीच आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांसाठी ही तपासणी मोहीम खुली ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या तपासणीदरम्यान उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
– राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

पुणेरी ठरले झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचे ‘उस्ताद’

0

नाशिक । दि. 14 प्रतिनिधी
झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या महाअंतिम सोहळ्यात शांताराम मनवे व परितोष पेंटर यांच्या पुणेरी उस्ताद संघाने शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारत, झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या विजेतेपदावर नाव कोरले. यानिमित्त त्यांनी यशवंत सातार्‍याची विजयी माला मोडीत काढली. मालिका विजयाचा मानकरी पुणेरी उस्तादचा आर्मीमॅन विनोद कुमार ठरला.
सिनेसृष्टीतील तारे व अनेक मान्यवरांंच्या उपस्थितीत झी महाराष्ट्र कुस्ती दंगल कुस्तीचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला.

कुस्ती दंगलचा हा अंतिम सामना श्री शिव छत्रपती क्रीडापीठ म्हणजेच पुण्याच्या महाळुंगे-बालेवाडी स्टेडियममध्ये रंगला. आजवरचे सर्व सामने जिंकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या यशवंत सातारा हा संघ पहिल्या दिवसापासून आपले वर्चस्व सिद्ध करत आला होता. मात्र महाअंतिम सोहळ्यात पुणेरी उस्तादने त्यांचे हे अढळस्थान हिसकावत 4-2 ने असे दणदणीत यश मिळवले.काळजाचे ठोके वाढवणारा असा उत्कंठावर्धक हा अंतिम सामना रंगला. कडवी झुंज देत अखेर झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सामन्यात पुणेरी उस्ताद हा संघ यशवंत ठरला. झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या विजेत्या संघाला 50 लाख, उपविजेत्यांना 30 लाख, तर तिसर्‍या संघाला 20 लाखांचे इनाम देण्यात आले. ही दंगल दरवर्षी होणार आणि पुढच्या वर्षी अधिक मोठ्या स्तरावर होईल, याची परिषद काळजी घेईल, असे शरद पवार यांनी आश्वासन दिले.

अंतिम सामना पुणेरी उस्ताद(4) विरुद्ध यशवंत सातारा(2) असा झाला. 55 वजनगटातील विश्रांती पाटील विरुद्ध अंशु मलिक यांच्यात एकतर्फी पहिला डाव रंगला. अक्षरशः दीड मिनिटाच्या आत यशवंत सातार्‍याच्या अंशुने विश्रांतीला चितपट केले. दुसर्‍या डावात-74 वजनगटातील विनोद कुमार विरुद्ध अक्षय चोरगे हा खतरनाक डाव होता. आर्मीमॅन विनोदला दुखापत झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. अटीतटीच्या या डावात अखेर, पुणेरी उस्तादच्या विनोदनेच 7-11ने यश मिळवले. तिसर्‍या डावात- 65 वजनगटातील राहुल आवारे विरुद्ध सूरज कोकाटे यांच्यात काटेकी टक्कर बघायला मिळाली. अत्यंत चुरशीच्या या डावात अखेर पुणेरी उस्तादच्या कॅप्टन राहुलने 16 गुण मिळवत 6-16ने सुरजला नमवले.

चौथ्या डावात-86 वजनगटातील संग्राम पाटील विरुद्ध कौतुक डाफळे या तुफानी लढतीत दोन्ही मल्ल अप्रतिम खेळले. उत्कंठा वाढवणार्‍या या डावात शेवटी पुणेरी उस्तादच्या संग्रामने 10-9ने महत्त्वाचा विजय मिळवून देत संघाला विजेतेपदाच्या जवळ नेले. अखेरच्या डावात 86 पेक्षा अधिक वजनगटातील गणेश जगताप विरुद्ध आदर्श गुंड हा निर्णायक डाव अत्यंत रंजक ठरला. हा डाव म्हणजे महाअंतिम सामन्यातील निर्णायक डाव ठरला. पुणेरी उस्तादच्या गणेशने 7-2 ने संघाला चौथा विजय मिळवून देत महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये बाजी मारली. 57 वजनगटातील पंकज पवार विरुद्ध उत्कर्ष काळे हा शेवटचा डाव थरारक ठरला. पंकजला दुखापत झाल्याने यशवंत सातार्‍याच्या उत्कर्षला विजयी घोषित करण्यात आले.

जाहीर केलेल्या शिष्यवृत्ती:
* सुभाष चंद्रा यांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने 3 मुले व 1 मुलीसाठी प्रत्येकी महिना 50 हजार रुपये अशी शिष्यवृत्ती 2 वर्षांसाठी जाहीर केली.
* महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील सदस्यांच्या वतीने 3 मुले व 1 मुलीसाठी प्रत्येकी महिना 50 हजार रुपये अशी शिष्यवृत्ती 2 वर्षांसाठी जाहीर केली.
* सुप्रिया सुळे आणि यश पवार यांच्या वतीने किरण भगत, अभिजित कटके, उत्कर्ष काळे आणि राहुल आवारे यांना पुढील 2 वर्षांसाठी दर महिना 1 लाख रुपये देण्यात येतील.

जिल्ह्यात 91 शेतकरी आत्महत्या

0

नाशिक । दि. 19 प्रतिनिधी
दुष्काळाच्या दाहकतेबरोबर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. आजमितीस जिल्ह्यात 91 शेतकर्‍यांनी कजर्र्बाजारीपणा, शेतीमालाला भाव न मिळणे आदी कारणास्तव जीवनयात्रा संपवली. गेल्यावर्षी संपूर्ण वर्षभरात 84 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. यंदा मात्र नोव्हेंबरच्या मध्यावर 91 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली असून, यामुळे प्रशासन चिंतीत आहे. मागील दोन दिवसात दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.

पहिल्या घटनेत दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील शेतकरी विलास सुकदेव महाले (48) यांनी रविवारी (दि. 18) विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. बागलाण तालुक्यातील टेंभे येथील अशोक उत्तम ठोके(56) यांनी शुक्रवारी (दि. 16) राहत्या घरात गळफास घेऊन जीवनप्रवास संपविला. मयत विलास महाले यांनी परमोरी येथील शिवारातील गट नंबर 222 मधील शेतात महाले पिकांवर फवारण्यासाठी आणलेल्या कीटकनाशकाचे सेवन केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी महाले यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत झाल्याचे घोषित केले.

मयत महाले यांच्या लहान भावाचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने, तर काही महिन्यांपूर्वी वडिलांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. यामुळे कुटुंबीयांची सर्वस्व जबाबदारी आल्याने विलास यांच्यावर असल्याने ते नेहमी तणावात राहत असत. त्यातच कुटुंबावर असलेले कर्ज, शेतमालास भाव मिळत नसल्याने नैराश्य येऊन विलास महाले यांनी विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

दुसर्‍या घटनेतील मयत अशोक ठोके यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाला बागलाण तहसिलदारांंकडून प्राप्त झालेल्या अहवालात ठोके यांचे त्यांच्या नातेवाईक शवविच्छेदन न करताच त्यांच्या अंत्यसंस्कार केले. त्यामुळे मृत्यूचे कारण समजले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

20 Novembar 2018

0

19 लाख बालकांना देणार गोवर, रुबेला लस

0

नाशिक । दि. 19 प्रतिनिधी
जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून राबवण्यात येणार्‍या गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेद्वारे जिल्ह्यातील जवळपास 19 लाख 23 हजार 970 बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, विविध सामाजिक संस्था, महिला बालकल्याण व सर्वच विभागातून मिळणार्‍या सहकार्यातून जिल्ह्याचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.

लहान मुलांना होणारा गोवर हा संक्रमक आणि घातक आजार आहे. सरकारने सन 2020 पर्यंत गोवर निर्मूलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याअंतर्गत राज्यात नोव्हेंबर महिन्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम 27 नोव्हेंबरला सुरू होणार असून पाच आठवडे चालणार आहे. तालुक्यातील सर्व शाळांमध्ये पहिल्या दोन ते तीन आठवड्यांत लसीकरण सत्र आयोजित करण्यात येतील.

त्यानंतर उर्वरित 35 ते 40 टक्के लाभार्थींचे गोवर, रुबेला लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमित लसीकरण उपकेंद्र येथे करण्यात येईल. या लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थींना गोवर, रुबेला लसीचे एक इंजेक्शन दिले जाईल, अशी माहिती डॉ. डब्ल्यूएचओचे विभागीय अधिकारी डॉ. कमलाकर लष्करे यांनी दिली. गोवरमुळे होणारे बालमृत्यू, आंधळेपणा, मेंदुज्वर यांसारखे मोठे आजार होऊ शकतात. गोवर, रुबेला या आजारांवर फारसा उपचारही नाही. परंतु गोवर, रुबेलाचे प्रमाण लसीकरणामुळे कमी करता येऊ शकते.

म्हणून सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी उपस्थित होते.

जिल्ह्यात 19 लाख उद्दिष्ट
जिल्ह्यात 19 लाख 23 हजार 970 लाभार्थी बालके असून महापालिका क्षेत्रात 1 लाख 93 हजार 222 तसेच नाशिक ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात 11 लाख 40 हजार 488 लाभार्थी बालके आहेत. जिल्ह्यातील 5504 ग्रामीण शाळेमधील सत्र त्याचप्रमाणे 3320 बाह्य संपर्क सत्र, 219 जोखीमग्रस्त भाग, 3880 संस्थेतील लसीकरण सत्र असे एकूण 12 हजार 923 ठिकाणी लसीकरण सत्र राबवण्यात येणार आहे. यासाठी 865 आरोग्यसेविका, 3516 स्वयंसेविका, आरोग्य सहायक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

ई पेपर- मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

0

शेती महामंडळाचा जमीन टेंडर रद्द करण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाचा तूर्तास आदेश नाही

0

कोर्टाकडून महामंडळाला एकलहरेतील खंडकर्‍यांच्या जमीन वाटपाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश; पुढील सुनावणी 22 तारखेला

टिळकनगर (वार्ताहर) – खंडकरी शेतकर्‍यांना आपल्या हक्काच्या जमिनीपासून वंचित ठेवून, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडून श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर मळ्यातील 1201 एकर क्षेत्रात संयुक्त शेती पध्दतीने पिके योजना राबविण्याबाबत शेती महामंडळाने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली होती. या टेंडर मध्ये तालुक्यातील एकलहरे गावाच्या जमिनीचा समावेश करण्यात आला असल्याने, गावांतील 419 एकर 19 गुंठे जमीन खंडकरी शेतकर्‍यांना आजपर्यंत मूळ गावी मिळाली नसल्याने एकलहरेतील जमीन टेंडर पध्दत रद्द व्हावी म्हणून नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.

काल या विषयी सुनावणी झाली. यावेळी शेती महामंडळाने न्यायालयास सांगितले की, आम्ही एकलहरे गावातील खंडकरी शेतकर्‍यांना जमिनी देण्यास तयार आहोत, जी टेंडर पध्दतीने जमीन काढली आहे, त्याव्यतिरिक्तही क्षेत्र शेती महामंडळ कडे शिल्लक आहे. त्यांवर न्यायालयाने शेती महामंडळाला सांगितले की, एकलहरेतील खंडकर्‍यांना जमीन वाटप कोठे व कधी करणार याबाबत 22 तारखेला प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश दिले, त्यास शेती महामंडळाने होकार दिल्याचे समजते. तसेच शासनाने सुद्धा 5 जानेवारी 2018 च्या शासन आदेशानुसार शेती महामंडळने एकलहरेकरांना जमीन देण्यात काही हरकत नसल्याचे स्पष्टपणे न्यायालयात सांगितले. तसेच जी 1201 एकर जमीन टेंडरे पध्दतीने काढण्यात आली होती त्यापैकी एकलहरेतील जमीन टेंडर रद्द करण्याबाबत न्यायालयात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेती महामंडळाला एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे.

वस्तुस्थिती पाहता शेती महामंडळाने टेंडर पध्दतीने जी जमीन कसण्यास काढली आहे, ती कसण्यास योग्य असून जी शिल्लक जमीन आहे त्यास शेती महामंडळ एकलहरेतील खंडकर्‍यांना मूळ गावात की, टिळकनगर मळ्यातील उर्वरित असलेल्या इतर गावांतील जमीन देण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर कसे करते हे आता येणार्‍या 22 तारखेलाच कळेल. राज्य शेती महामंडळाने टिळकनगर मळ्यातील जी 1201 एकर जमीन टेंडर पध्दतीने काढली आहे. त्यापैकी एकलहरे गावांतील 457 एकर जमिनीचा समावेश असून, त्या खालोखाल खंडाळा, उक्कलगाव, रांजणखोल, ऐनतपूर, वळदगाव येथील सुद्धा जमिनी ह्या टेंडर पध्दतीने कसण्यास देण्यात येणार आहेत.

 

साईबाबा संस्थान विश्वस्तांची आज बैठक

0

अध्यक्षांना भेटण्यासाठी शिष्टमंडळांना पोलिसांची आचारसंहिता

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या आज होणार्‍या बैठकी दरम्यान संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना निवेदन देण्यासाठी जाणार्‍या विविध पक्षांच्या शिष्टमंडळांना शिर्डी पोलिसांनी आचारसंहिता आखून दिली आहे. मागील बैठकी दरम्यान ग्रामस्थ आणि संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या दरम्यान घडलेल्या अनुचित प्रकारामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्याची पुनरावृत्ती होऊ नये त्याअनुषंगाने शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे यांनी संबंधित शिष्टमंडळांना पोलीस ठाण्यात बोलावून आचारसंहितेबद्दल सूचना दिल्या.

तसेच आज मंगळवारी होणार्‍या बैठकीस राजकीय तसेच शिष्टमंडळाच्या प्रत्येकी दोघे या प्रमाणे निवेदन देण्यासाठी साई अतिथीगृह येथे सोडले जाणार असल्याचे सांगितले. या दरम्यान कायदा सुव्यस्था तसेच शांततेचा भंग केल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शिर्डीतील मागील बैठकी दरम्यान वादग्रस्त ठरलेल्या 17 ग्रामस्थांनी डॉ. हावरे यांना जमिनी खरेदी प्रस्ताव प्रकरणी जाब विचारण्यासाठी जाण्यास परवानगी मिळावी यासाठी पोलीस उपअधीक्षक शिवथरे यांची भेट घेतली. मात्र यावेळी पोलिसांनी आचारसंहितेचे पालन करत अध्यक्षांच्या परवानगीने भेटीस सोडणार असल्याचे संबंधितांनी सांगितले, तर त्याचबरोबर 17 ग्रामस्थांनी देखील याचे पालन करणार असल्याचे आश्वासन दिले.

पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देण्याच्या प्रकरणावरून साईनगरीत मोठा गदारोळ झाला होता. काही ठराविक ग्रामस्थांनाच संस्थानचे अध्यक्ष यांच्या भेटीसाठी सोडल्याचा आरोप करत वातावरण तणावग्रस्त झाले होते तर आता उद्या देखील असा वाद उफाळू नये यासाठी पोलीस यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत असून कायद्याचे उल्लघन आणि शांतता भंग करणार्‍यांवर कारवाईसाठी सज्ज असल्याचे विश्वसनीय पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.

साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना जमिन खरेदी प्रस्ताव प्रकरणी जाब विचारण्यासाठी जातांना पोलीस उपअधिक्षक शिवथरेंनी आचारसंहिता घालून दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवथरे यांच्या निर्णयाचे स्वागत करून आम्ही पालन करणार आहोत.ज्या प्रामाणे पोलीस सांगतील तेवढे व्यक्ती आम्ही भेटण्यासाठी जाणार आहोत. पोलीस आणि कायद्याचा आम्ही सन्मान करतो. मात्र हे करत असतांना सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या आचारसहितेचे पालन करावे हीच माफक अपेक्षा आहे.
– विजय कोते, अध्यक्ष साईनिर्माण ग्रुप

अकोलेतील कालव्यांची कामे सुरू करण्याच्या हालचाली

0

डाव्या व उजव्या बाजूच्या शेतकर्‍यांना नोटिसा

अकोले (प्रतिनिधी)- निळवंडे धरणाची अकोले तालुक्यातील कालव्यांची कामे सुरू करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. संबंधित शेतकर्‍यांना जलसंपदा विभागाच्यावतीने नुकत्याच नोटिसा याबाबत बजावण्यात आल्या असल्याची माहिती निळवंडे प्रकल्प कालवे विभागाचे उपकार्यकारी अभियंता जनार्दन सहाणे यांनी सार्वमतशी बोलताना दिली.

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबई येथे अधिकार्‍यांची बैठक पार पडली. यामध्ये ना. शिवतारे यांनी अधिकारी पातळीवरून कालव्यांची कामे सुरू करण्याच्यादृष्टीने कोणत्या हालचाली केल्यात अशी विचारणा केली होती. त्यानुसार निळवंडे धरणापासून उजव्या व डाव्या बाजूकडील 12 किलोमीटरपर्यंतच्या शेतकर्‍यांना नोेटिसा देण्यात आल्या आहेत. आपण कालव्यासाठी क्षेत्र संपादीत केले आहे. कालव्यांची कामे सुरू करावयाची असल्याने शेतात नवीन पेरणी करू नये किंवा संपादीत क्षेत्रात काही मालमत्ता असेल तर ती काढून घ्यावी अशा आशयाच्या नोटिसा जलसंपदा विभागाच्यावतीने संबंधीत शेतकर्‍यांना देण्यात आल्या आहेत. 1987 ला जमिन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. कागदोपत्री या जमिनी शासनाच्या ताब्यात असल्या तरी प्रत्यक्षात शेतकरी जमिन कसत होते. आता जलसंपदा विभागाने या शेतकर्‍यांना नोटीसा दिल्याने खळबळ उडाली आहे.

निळवंडेच्या कालव्यांच्या कामाची निविदा पूर्ण झाली असून तालुक्यातील रेडे, सुगाव, कुंभेफळ, कळस तसेच परखतपूर, मनोहरपूर, कळस येथे कामे सुरु असल्याचे श्री. सहाणे यांनी सांगितले. दरम्यान निळवंडेचे कालवे भूमिगत पध्दतीने करायची अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांची मागणी असतांना दुसरीकडे मात्र कालव्यांची कामे सुरु करण्याच्या दृष्टीने नोटीसा बजावण्यात आल्राने आगामी काळात तालुक्यात या प्रश्‍नावरुन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.

निळवंडेच्या डाव्या बाजूच्या निंब्रळ, म्हाळादेवी, बहिरवाडी, मेहंदूरी, टाकळी, ढोक्री येथील सुमारे 100 तर उजव्या बाजूच्या रुंभोडी, इंदोरी, औरंगपूर, धुमाळवाडी व अकोलेपर्यंतच्या सुमारे 12 किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांतील 60 ते 70 शेतकर्‍यांना या नोटिसा दिल्या गेल्या आहेत.

Social Media

26,925FansLike
5,154FollowersFollow
1,363SubscribersSubscribe
error: Content is protected !!