राफेल  युद्धविमाने खरेदी : सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला निर्णय

0
नवी दिल्ली :  फ्रान्सकडून ३६ राफेल युद्धविमाने खरेदी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला.
सुमारे पाच तास ही सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान सर्व संबंधित पक्षकारांनी आपले म्हणणे मांडले. याचिकाकर्ते आणि सरकारसह वायुसेनेच्या अधिकाऱ्यांची बाजूही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.के. कौल आणि न्या. के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला. राफेलची किंमत सार्वजनिक करण्यास मात्र कोर्टाने स्पष्ट नकार दिला. राफेलची किंमत सार्वजनिक करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी केली होती.

सरकारी आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांमध्ये यावेळी युक्तिवादाच्या फैरी झडल्या. सरकारतर्फे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, ‘वायुसेनेला राफेल विमानांची तत्काळ गरज होती. कारगिल युद्धावेळी आपण आपले अनेक सैनिक गमावले. त्यावेळी आपल्याकडे राफेल युद्धविमाने असती तर कमी नुकसान झाले असते.’

दसॉल्टने सरकारला ऑफसेट भागीदारांची माहिती दिलेली नाही. त्यांना दसॉल्टने निवडले आहे. सरकारचा यात हात नाही, असं वेणुगोपाल यांनी कोर्टाला सांगितलं. फ्रान्सने या ३६ विमानांची कोणतीही गॅरंटी दिलेली नाही. केवळ पंतप्रधानांनी लेटर ऑफ कम्फर्ट दिलं आहे, असेही केंद्र सरकारच्या वतीने वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले.

बऱ्हाणपूरच्या अर्चना चिटणीस यांच्या विजयासाठी गुजरात व महाराष्ट्राची  मदत 

0

चंद्रकांत विचवे | रावेर :   बऱ्हाणपूर राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढतच असून प्रचारात अधिक रंगत येण्यासाठी महाराष्ट्रातील तगडे नेते गिरीश महाजन यांच्यासह नवसारी येथील खासदार सी आर पाटील यांनी देखील चिटणीस यांच्या मदतीला धावून आल्याने, बऱ्हाणपूर विधानसभा संघाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित होत आहे.

चिटणीस यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पहिले जाते,त्यांची प्रचारातील आघाडी विरोधी पक्षाचे “हार्ट बीट”वाढवणारी आहे.चिटणीस यांच्या प्रचारात पक्षाअंतर्गत खासदार नंदकुमार चव्हाण यांचा गट  सध्यातरी प्रचार सभा पासून लांब असून,त्यांचे लक्ष  बऱ्हाणपूर पेक्षा नेपानगर जागेवर जास्त दिसत आहे.

चिटणीस यांना तिसऱ्यांदा विधानसभेत जाण्यासाठी महाराष्ट्र,गुजरात मधून मदत होत आहे. त्यांच्या प्रचाराकरिता जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,गुजरात मधील नवसारी चे खासदार सी.आर.पाटील,यांच्यासह जळगाव जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,जिल्हा उपाध्यक्ष तथा बऱ्हाणपूर विधानसभा प्रभारी पद्माकर महाजन देखील बऱ्हापुर येथे जाऊन प्रचार करत आहे.

आज माघारीच्या शेवटच्या दिवशी चिटणीस यांनी सकाळपासून गांधी चौक वार्ड,अब्दुल कादिर वार्ड,खानका वार्ड, जयस्तंभ वार्ड,राजपुरा वार्ड, डाकवाड़ी वार्ड, एवम न्यामतपुरा वार्ड याभागात जनसंपर्क साधला.”समृद्ध मध्यप्रदेश-समृद्ध बुरहानपुर” या अभियानाला साथ द्या असे आवाहन त्यांनी मतदार संपर्क अभियानात केले.

कॉग्रेस कडून रिंगणात असलेले रवींद्र महाजन यांनी चापोरा,दापोरा,आडगाव,नेर,भातखेडा,सिरसोदा,नाचनखेडा या भागात जाऊन प्रचार केला.अपक्ष सुरेंद्रसिह ठाकूर यांनी सुद्धा ग्रामीण भागात प्रचार केला.

महिंद्रा जावा ३०० होणार बाजारात दाखल

0
प्रतिकात्मक फोटो

नाशिक : भारतात ९० च्या दशकात कित्येकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी जावा मोटारसायकल पुन्हा एकदा दाखल होण्यास सज्ज झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या अंतर्गत क्लासिक लीजंड्स हि कंपनी जावा मोटरसायकलला लाँच करणार आहेत.

क्लासिक लिजेंड या कामापनीला २०१६ मध्ये महिंद्राने खरेदी केले होते. त्यामुले आता पुन्हा एकदा आकर्षणाचा विषय राहिलेली jawa ३०० ला भारतामध्ये लाँच करण्याची घोषणा महिंद्राने केली आहे. Jawa Motorcycles ला महिंद्रा अँड महिंद्रा १५ तारखेला लाँच करणार आहे.

अद्याप या बाईकची किंमत समोर आलेली नसून अंदाजे दोन लाखांच्या आसपास या बाईकची किंमत असू शकते. Jawa Motorcycles चा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय आहे.

देवळा तालुक्यात मका पीकाची ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ

0

भऊर (वार्ताहर) : देवळा येथे शासकीय आधारभूत किंमत १७०० रुपये प्रति क्विंटल दराने मका खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंगचा शुभारंभ शेतकी संघाचे अध्यक्ष चिंतामण आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. विठेवाडी येथील बाळासाहेब गमण निकम हया शेतकऱ्याच्या मका पीकाची ऑनलाईन नोंदणी करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आतापर्यंत २६८ शेतकऱ्यांनी मका पीकाची ऑनलाईन नोंदणी केली असल्याची माहिती व्यवस्थापक गोरख आहेर यांनी दिली आहे.

शेतकरी संघाच्या कार्यालयात झालेल्या ह्या कार्यक्रमासाठी देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष चिंतामण आहेर, सहायक निबंधक संजय गीते, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे, योगेश आहेर, सचिव दौलतराव शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातून देवळा तालुका शेतकरी संघाची उप अभिकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सन २०१८ / १९ खरीप पणन हंगाम आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत प्रति क्विंटल १७०० रुपये दराने शेतकरी संघामार्फत मका खरेदी केला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतिचा स्वच्छ व कोरडा केलेला मका आणावयाचा आहे. हया मक्याची आर्द्ता १४ टके विहीत करण्यात आलेली आहे. ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी शेतकऱ्यांनी मका पीकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार क्रमांक, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल क्र, इत्यादी शेतकरी संघाच्या कार्यालयात जमा करून नोंदणी करून घ्यावी व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी संघाचे अध्यक्ष चिंतामण आहेर यांनी केले आहे.

यावेळी शेतकरी संघाचे उपाध्यक्ष संजय गायकवाड, अतुल आहेर, अमोल आहेर, बापू आहेर, महेंद्र आहेर,डॉ. राजेंद्र ब्राम्हणकर, साहेबराव सोनजे, सुनिल देवरे आदी संचालक व शेतकरी उपस्थित होते.

आ.एकनाथराव खडसे यांना बंधू शोक

0

मुक्ताईनगर| दि. 14  वार्ताहर :  कोथळी ता मुक्ताईनगर जि जळगाव येथील विश्वनाथ गणपतराव खडसे (वय 75) यांचे आज 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वा . वृद्धापकाळाने निधन झाले . 

स्व.विश्वनाथ खडसे यांचे शिक्षण मराठवाडा विद्यापीठातून 1968 साली Msc केमिस्ट्री मधून पूर्ण करून ते विद्यापीठातून पहिले गोल्ड मेडॅलिस्ट होते.त्यानंतर त्यांनी सिबागाई(बिनाका) मुंबई या विदेशी कंपनीत  वरिष्ठ
शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले.

त्यांच्या  पश्चात चार भाऊ,एक बहीण,पत्नी,दोन मुलं,सुना,नातवंडे असा परिवार आहे.  ते आ. एकनाथराव खडसे यांचे वडील बंधू तर सचिन व निर्मल खडसे यांचे वडील होत.

परदेशवारीला जाताय? मग या सर्वात स्वस्त देशात जा…

0

परदेशात फिरण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. अनेक देशांच्या तुलनेत भारताचा रुपया खूप हलका आहे त्यामुळे बड्या देशात फिरायला जाण्यासाठी खिसा जास्तीचा हलका होईल यामुळे पुढे येत नाही.

पण जगात असे काही देश आहेत तेथे फिरायला गेल्यावर तुमचा खिसा जास्त हलका होणार नाही. तसेच तुम्हाला राहण्याखाण्यापासून नवनवीन गोष्टीही याठिकाणी उपलब्ध होतील.

मग जगातील हे स्वस्त देश कोणते जाणून घेऊया.

थायलंड

बीच आणि पार्टीसाठी कोणता देश प्रसिद्ध आहे असे जर कुणी विचारले तर पटकन थायलंडचे नाव समोर येते. येथे तुम्हाला अवघ्या २५० रुपयांपर्यंत रुम मिळू शकते. तसेच २०० रुपयांत जेवण मिळू शकते. थायलंड हा सुट्ट्या घालविण्यासाठी चांगला पर्याय असल्याचे सांगितले जाते.

नेपाळ

नेपाळ नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही ६०० रुपयांती तीन वेळा जेवणाची मजा घेऊ शकता. तसेच २७० रुपयांत तुम्ही रुमही बुक करु शकता. भारताला लागुनच असलेला देश नेपाळ हा एक चांगला पर्याय आहे.

व्हिएतनाम

स्वस्त जेवण आणि भरपूर शॉपिंगसाठी तुम्ही या देशाची निवड करु शकता. इथे व्हिएतनामी डिशची मजा केवळ ६६ रुपयांपर्यंत घेता येते. तसेच २०० रुपयांपर्यंत रुम बुक करण्याची सुविधा आहे. त्यामुळे परदेशवारीसाठी हा एक चांगला पर्याय असेल.

चीन

चीनमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागणार नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा खर्च चीनमध्ये केवळ ६६ रुपये इतका होतो. चीनमध्ये अनेक निसर्गरम्य ठिकानं आहेत. कमी खर्चात तुमची सफर होऊ शकते.

इंडोनेशिया

नॅचरल ब्युटीची मजा घ्यायची असल्यास इंडोनेशियाला नक्की भेट द्यावी. टुरीस्ट इंडोनेशियात केवळ ६७ रुपयांत डिनर करु शकता. तसेच २५० रुपयांत हॉटेल बुक करु शकता. भारतापासून अगदी जवळ हा देश असून चेन्नईवरून इथे जाण्यासाठी अधिक सोयीस्कर असल्यामुळे इथून जास्त पर्यटक इंडोनेशियाकडे रवाना होतात.

बुल्गारिया

बुल्गारिया ईस्टर्न युरोपमध्ये आहे. युरोप, साऊथ-ईस्ट एशिया आणि अमेरिकेपेक्षाही महाग आहे. मात्र बुल्गारियमध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाही. तेथे १ लीटर बियर १३० रुपयांत मिळते. येथे तुम्ही ६०० रुपयांत रुम बुक करु शकता.

कंबोडिया

कंबोडियामध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाही. येथे हॉटेलमध्ये तुम्ही २५० रुपयांपर्यंत जेवण जेवू शकता. त्यामुळे कंबोडियासुध्दा आपल्याला फिरायला एक चांगले ठिकाण आहे.

पेरु

जगातील कुल आणि मॅजिकल ठिकाण म्हणजे पेरु. येथे तुम्ही ५०० रुपयांत रुम बुक करु शकता. ३५० रुपयांत तुम्हाला जेवण मिळते.

छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला

0
छत्तीसगड :  छत्तीसगडमध्ये आज पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांच्या बसवर चौफेर गोळीबार करत आयईडी स्फोट घडवून आणला. त्यात ५ जवानांसह सहा नागरिक जखमी झाले आहेत. 

बिजापूरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बिजापूर खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या या आयईडी स्फोटात बीएसएफचे ४ जवान, एक डिआरजी आणि सहा नागरिक जखमी झाले आहेत.

जखमींना तात्काळ बिजापूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नक्षलविरोधी ऑपरेशनचे महासंचालक पी.सुंदरराज यांनीही या नक्षली हल्ल्याच्या वृत्ताला पृष्टी दिली आहे.

फुटीरतवादी नेते सज्जाद लोन  जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ?

0
काश्मीर  :  काश्मीरमधील एकेकाळचे फुटीरतवादी नेते सज्जाद लोन हे जम्मू-काश्मीरचे आगामी मुख्यमंत्री म्हणून भाजपची पसंती असल्याची चर्चा आहे. सज्जाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला अधिक उधाण आले आहे. सज्जाद लोन हे फुटीरतावादी नेते आणि हुर्रियतचे ज्येष्ठ नेते अब्दुल गनी लोन यांचे चिरंजीव आहेत.

सज्जाद लोन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असली तरी या दोघांमधील चर्चेचा तपशील अद्यापही बाहेर आलेला नाही. मात्र काश्मीरमधील एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना सज्जाद यांनी मोदींसोबत निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ही भेट झाल्यापासून सज्जाद प्रचंड खूश असल्याचंही सांगण्यात येतं.

मोदी आणि सज्जाद यांची भेट घडवून आणण्यामागे भाजपचे महासचिव राम माधव असल्याचं सांगितलं जातं.फुटीरतावादी राजकारणाला सोडचिठ्ठी देत मुख्यप्रवाहात आल्यानंतर सज्जाद यांनी मोदींची भेट घेतली. ही भेट झाल्यापासून सज्जाद यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचं त्यांचे निकवर्तीय सांगतात. सज्जाद आता हंदवाड्यातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने काश्मीर खोऱ्यात त्यांचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेसची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

काश्मीरमध्ये भाजपने दहा मुस्लिम उमेदवारांना तिकिट दिलं आहे. तसेच अनेक ठिकाणी इतर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. काश्मीरमध्ये बहुमतासाठी ४४ सदस्य संख्येची गरज आहे. या आकड्याच्या जवळपास भाजप आल्यास मुख्यमंत्री  सज्जाद लोन यांच्या नावाला भाजप पाठिंबा देण्याची शक्यता आहे. सज्जाद यांना इतर मुस्लिम आमदारही पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे भाजपने आतापासून रणनिती आखायला सुरुवात केली आहे.

अब्दुल गनी लोन आणि सज्जाद लोन यांनी २००२ मध्ये पीपल्स कॉन्फरन्सची स्थापना केली होती. काश्मीरला भारतापासून तोडण्याचा या पक्षाचा मुख्य अजेंडा होता. शिवाय हा पक्षही इतर फुटीरतावाद्यांप्रमाणे निवडणूक लढवण्याच्या विरोधात होता.

२००२ मध्येच अब्दुल गनी लोन यांची हत्या करण्यात आली. तसेच यूपीए सरकारच्या काळात सज्जाद यांना व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यामुळे सज्जाद हे त्यांच्या पाकिस्तानी नागरिक असलेल्या पत्नीला आणि दोन मुलांना दोन वर्ष भेटू शकले नव्हते. त्यानंतर त्यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार?

0
file photo

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात घसरण

नवी दिल्ली : गेल्या २ महिन्यात आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ सुरु होती. त्यामुळे दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत होत्या. याचा थेट परिणाम भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर झाला होता. पण आता अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये घसरण सुरु झाली आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय तेल बाजारात प्रति तेल पिंपाचा दर ६९ डॉलरपेक्षा कमी झाला आहे. सहाजिकच यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये आणखी कपात अपेक्षित असून महागाई देखील नियंत्रणात येईल असे दिसून येत आहे.

अमेरिकेने इराणवर निर्बंध लावले आहेत. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतींमुळे अमेरिकेला भारतासह अन्य सात देशांना इराणकडून तेल खरेदीची नाईलाजाने परवानगी द्यावी लागली आहे.

नेहरुंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला – शशी थरूर

0

नवी दिल्ली – काँग्रेस नेते शशी थरूर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. थरूर यांनी केलेल्या एका विधानामुळे ते पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाच्या विकासातील योगदान या विषयावर बोलत असताना नेहरुंमुळे एक चहावाला पंतप्रधान म्हणून देशाला लाभल्याचे वक्तव्य शशी थरूर यांनी केले आहे.

थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली आहे. नेहरुंच्या जीवनावरील ‘नेहरु : द इन्व्हेन्शन’ या थरूर यांनी लिहीलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात थरूर यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. थरूर यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

थरुर म्हणाले, आज आपल्याला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभू शकतो, ते केवळ नेहरुंजीमुळे शक्य झाले आहे. नेहरुंनी निर्माण केलेल्या संस्थात्मक धोरणांमुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. त्यामुळे नेहरु भारतमातेचे एक महान पुत्र असताना त्यांच्यावर इंटरनेटवरुन चिखलफेक करणारे लिखान केले जाते. त्यांच्या संस्थात्मक रचनांच्या उभारणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही त्यांनी केला आहे.

Social Media

26,833FansLike
5,154FollowersFollow
1,345SubscribersSubscribe
error: Content is protected !!