जमलं बुवा एकदाचं!

0

जागा वाटपाची रस्सीखेच

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीसाठी आघाडीच्या चर्चेचे गुर्‍हाळ काल संपुष्टात आले. काँग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रविवारी सायंकाळी उशिरा राष्ट्रवादी 43 काँग्रेसला 25 असा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र कोणत्या वार्डात, कोणत्या जागेवर कोण लढणार याचा तोडगा सायंकाळपर्यंत निघाला नव्हता. जागा वाटपाचा घोडं आडलं असून उद्याच त्यावर मार्ग निघेल असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.

राष्ट्रवादीच्या कोट्यातून अशोक गायकवाड यांच्या युनायटेड रिपब्लीकनला 3 आणि काँग्रेसच्या कोट्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला तीन जागा देण्यात आल्या आहेत. युनायटेड पक्षाला निवडणूक चिन्ह नसल्याने ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे अशोक गायकवाड यांनीही त्याला दुजोरा दिला. तर भाकप विळाकणीस या स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढणार आहे.

महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची घोषणा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांनी केली. आमदार संग्राम जगताप, युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील, शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, रेश्मा आठरे, सुनील कोतकर, अभिजित खोसे यावेळी उपस्थित होते.काँग्रेसला 31 जागांची अपेक्षा असल्याचे डॉ. विखे याांनी सांगितले, मात्र विनाकारण जागांची संख्या वाढविण्यापेक्षा जेवढ्या जागा जिंकता येणे शक्य आहेत, तेवढ्या जागा काँग्रेसने घेतलेल्या आहेत. विनाकरण हट्ट धरण्यापेक्षा मनपात आघाडीची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. मनपा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांच्या तीन वेळेस मैत्रीपूर्ण बैठका झाल्या त्यातून हा निर्णय झाला आहे.

आघाडीचा फॉर्म्युला तयार झाला असला तरी जागा वाटपाचं घोडं मात्र आडलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळं इच्छुकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ऑनलाईनच्या कटकटीतून सुटका झाल्याने अर्ज भरण्यासाठी आता उड्या पडणार आहे. उद्या अखेरचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात झुंबड उडणार आहे.

भाऊ-अप्पांमध्ये धुमशान?

0

दोन दिग्गज समोरासमोर देण्याच्या हाल‘चाली’

सावेडी (वार्ताहर) – महानगरपालिका निवडणुकीत काही लढती चुरशीच्या होणार असून त्या कोणत्या याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे. शिवसेनेच्या युवराजाचा ‘बाण’ रोखण्यासाठी भाजपने ‘भाऊ अस्त्र’ बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार नंबर वार्डात दोन जागा खुल्या असल्याने हे दोघे समोरासमोर येतात की कसं? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

शिवसेनेने 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात शिवसेनेचे युवराज योगीराज गाडे यांचा नंबर लागला. ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे चिरंजीव आहे. विद्यमान नगरसेवक असल्याने अन् तिकिट घोषीत झाल्याने त्यांनी वार्डात प्रचाराला जोर दिला. भाजपने अवघ्या 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एकास एक लढती फायनल करताना अन् शिवसेनेच्या दिग्गजांची कोंडी करण्याची हाल‘चाल’ आखली आहे. त्याचाच भाग म्हणून योगीराज गाडे यांच्या विरोधात विद्यमान नगरसेवक स्वप्नील(भाऊ) शिंदे यांचे नाव जवळपास फायनल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिंदे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजप प्रवेश केला आहे. त्यांचा वार्डातील जम बघता भाजपने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. शिवाय शिंदे यांच्यामुळे शिवसेनेच्या गाडेंची कोंडी होणार आहे. युवराजाच्या विजयासाठी स्वत: गाडेसरांना वार्डात गुंतवले तर त्यांचे शहरातील इतर वार्डाकडे दुर्लक्ष होईल, त्याचा फायदा भाजपला होईल असंही समीकरण त्यामागं असल्याचे सूत्रांकडून समजले. वार्डात दोन जागा (क,ड) खुल्या असल्याने योगीराज गाडे कोणत्या जागेवर लढणार अन् त्यांच्यासमोर स्वप्नील शिंंदे येतात की कसं याकडे नगरकरांचं लक्ष लागून आहे.

दादांची काटमारी

0

कोअर कमिटीत ओढाताण इच्छुकांची दातखिळी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी निघालेल्या भाजपकडं एका जागेसाठी दोन-दोन दिग्गज दावेदार असल्याने कोअर कमिटी गोंधळात पडली. तिकिटाचा तिढा सोडविण्यासाठी यादी थेट दानवेदादांकडे पोहोचली. दादांनी एकावर काट मारत अंतिम यादी फायनल केली. आता दादांच्या हातसफाईने कोणावर खाट पडली अन् कोण खाटेवर बसलं याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

महापालिका निवडणूक तिकिटासाठी भाजपकडे तब्बल 267 जणांनी हजेरी लावली. तिकिट वाटपासाठी पक्षाने पालकमंत्री राम शिंदे, आ. सुरजितसिंह ठाकूर, प्रदेशचे रघुनाथ कुलकर्णी, खा. दिलीप गांधी, अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांची कोअर कमिटी केली. या कमिटीसमोर इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत मुलखती दिल्या. त्यानंतर भाजपने 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

अद्याप दुसरी यादी मात्र जाहीर झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला केवळ सहा तासाचा अवधी शिल्लक राहिलेला असताना तिकिट डिक्लिअर होत नसल्याने इच्छुकांचा जीव खाली-वर होत आहे. अनेक इच्छुकांनी रविवारी खा. दिलीप गांधी आणि कोअर कमिटीचे डोकं खाल्लं! कोअर कमिटीने यादी फायनल केली आहे. अर्ध्या तासात जाहीर होईल असं सांगून या इच्छुकांची समजूत काढली जात होती. प्रत्यक्षात 24 तास उलटल्यानंतरही यादी जाहीर झालेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार तिकिट वाटपात बहुतांश जागांवर कोअर कमिटीच्या सदस्यांत एकमत होत नव्हते. त्यामुळं गुंतागुंतीची यादी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदादांकडे पाठविण्यात आली.

नगर भाजपचे काही लोक ही यादी घेऊन दादांना औरंगाबादला भेटले. दादांनी यादीवर नजर टाकून हात‘सफाई’ केली. त्यानंतरही यादी डिक्लिअर झाली नाही. त्यामुळं यादी नेमकी लटकली कुठं? या विचाराने तिकिटाकडे डोळे लावून बसलेल्यांची घालमेल सुरू आहे. तिकिटासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली. कोणी संघामार्फत तर कोणी थेट प्रदेश नेत्यांमार्फत फोनफोनी करून तिकिटाची गळ घालत आहे.

कोअर कमिटीत कोणतीही ओढताण नाही. विरोधकांच्या रणनीतीचा अंदाज घेताना यादीला विलंब झाला. विरोधकांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याकरीता भाजपची ही स्टॅ्रॅटीजी आहे. यादी फायनल झाली असून ती आज डिक्लीअर होईल.
– सुरजितसिंह ठाकूर,
आमदार तथा निरीक्षक

तीन विद्यमानांची धाकधूक
भाजपच्या यादीत नंदा कुलकर्णी, स्वप्नील शिंदे आणि मनिषा काळे-बारस्कर या तीन विद्यमान नगरसेवकांची धाकधूक सुरू आहे. पहिल्या यादीत या तिघांनाही स्थान मिळालेले नाही. यात गायत्री कुलकर्णी या 13 नंबरमधून इच्छुक आहेत. सहा नंबरमधून मनिषा काळेंचे मिस्टर राजेंद्र काळे स्वत:च इच्छुक आहेत. स्वप्नील शिंदे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला. तेही चार नंबरमधून रेसमध्ये आहेत. मात्र तिघांचेही तिकिट अजून फायनल झालेले नाही.

गुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद

0
file photo
नाशिक | स्वच्छ इंधन योजनेअंतर्गत भारत सरकार महत्वपूर्ण टप्पा पार पाडत आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून शहरी गॅस पुरवठा योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतून होत आहे. यावेळी मोदी नाशिककरांशी संवाद साधणार आहेत.

नाशिक शहराचाही या योजनेत समावेश असून नाशिकमधील उद्घाटन कार्यक्रम येत्या गुरुवारी (दि.२२) रोजी दुपारी तीन वाजता रावसाहेब थोरात सभागृहात पार पडेल.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे व योगेश घोलप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या शुभारंभ कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्स होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

राजापूर येथे सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू

0

राजापूर / येवला :  तालुक्यातील राजापूर येथील रहिवासी योगेश्वर सुर्यभान चव्हाण यांची मूलगी सोनाली योगेश्वर चव्हाण(6) हिला सर्पदंश झाल्याने मूत्यू झाला.  ही मूलगी दिवाळीनिमित्त मामाच्या गावाला रस्ते सूरेगाव येथे आली होती.

सकाळी दात घासत असताना अचानक सापाने तिच्या उजव्या पायाला चावा घेतल्याने मूलगी ओरडली असता व पायाला सपॆदंश झाला हे मामाच्या लक्षात आल्याने तातडीने येवला येथील दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी या मुलीस उपचारादरम्यान मृत घोषित केले.

त्यानंतर राजापूर येथे तलाठी रोखले यांनी पंचनामा केला. राजापूर येथे भैरवनाथवाडी येथे दफनविधी करण्यात आला. या घटनेने राजापूर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

शहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

0

अजनुज (वार्ताहर) – श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथील मेजर कपिल नामदेव गुंड भारतीय लष्करी सेवेत  कार्यरत असताना गुरूवारी रात्री मोठा स्फोट होऊन दोन भारतीय  सैनिक  जखमी झाले होते. त्यात कपिल मोठ्या प्रमाणात  जखमी झाला होता त्यात कपिल वीरमरण आले.

पुण्याहून गुंड यांचा मृतदेह अजनुजला आणण्यात आला व अंत्यदर्शनसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ठेवण्यात आला. त्यानंतर तो मृतदेह राहत्या घरी ठेवण्यात आला. अंत्यदर्शनानंतर गुंड यांचे पार्थिव यात्रा निघाली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. यावेळी अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

वाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी 

0
तोंडापुर ता जामनेर :       वाकोद त जामनेर येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १९९८  या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शाळेत स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते याप्रसंगी तब्बल २० वर्षानंतरच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यावेळच्या सर्व गुरुजनांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला तसेच शाळेला भेट वस्तू देण्यात आली.
      यावेळी दोन वर्गाचा हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच वीस ते चोवीस वर्षानंतर भेट होत असलेल्या त्यावेळचे विद्यार्थी आताचे नागरिक शासकीय कर्मचारी प्रगतीशील शेतकरी गृहिणी तसेच विविध पदावर असलेले पदाधिकारी  यांनी वेगळाच आनंदोत्सव साजरा केला सध्या सार्वजन विविध चांगल्या पदावर कार्यरत असून देखील यावेळी मात्र त्यांनी एक विद्यार्थी म्हणूनंच भूमीका बजावली  प्रत्येकाने आपल्या मनोगतातून आपला परिचय करत आपले जुने अनुभवातील किस्से मांडले यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला
 याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी निवृत्त मुख्याध्यापक पी बी पाटील होते व्यासपीठावर जैन फार्म वाकोद्चे व्यवस्थापक विनोद्सिंह राजपूत  शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक व्ही के चौधरी पर्यवेक्षक आर एस चौधरी लोहारा शाळेचे मुख्याध्यापक एस बी निकम तोंडापूर शाळेचे पर्यवेक्षक डी एस पाटील एस के पाटील एस व्ही शिंदे वाकडी शाळेचे माजी मुख्याध्यापक ए डी बाविस्कर डी के पाटील निव्रुत्त शिपाई पी के पवार  आदी उपस्थित होते.
यावेळी विलास जोशी निलेश पाटिल कृष्णगीर गोसावी जीतेन्द्र शर्मा जगदीश पाटिल नितिन बोरुडे गजानन कमले रोहिदास पोपळघट शंकर शिरसाठ योगेश सोन्ने कोमल जैन संजय पांढरे यांच्या नियोजनातून या स्नेह मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते यावेळी विद्या पाटिल अलका बागुल ज्योति पाटिल मीरा थोरात संगीता वानखेडे संगीता भोसले अनीता वानखेडे सविता देठे उषा पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास जोशी यांनी केले व् आभार रोहिदास पोपळघट यांनी मानले यावेळी आत्माराम मोहिते ,प्रभाकर थोरात ,दिलीप उबाळे ,संतोष पाटिल, किशोर चौधरी , संजय दांडगे, श्री पंडित उपस्थित होते.

पंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान

0

नवी दिल्ली – अमृतसर येथे रविवारी (18 नोव्हेंबर) सकाळी निरंकारी पंथाच्या ‘संत समागम’ या धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या भाविकांवर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्यामागे लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा हात असल्याचा संशय आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे नेते आमदार एच.एस.फुल्का यांनी केला आहे. फुल्का यांच्या या वादग्रस्त विधानाने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या या विधानामुळे वाद उपस्थित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

अमृतसर ग्रेनेड हल्ल्यावरुन पंजाबच्या राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. दरम्यान आपचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते एच.एस. फुल्का यांनी हल्ल्यानंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांना लक्ष्य केलं आहे. लष्करप्रमुख बिपिन रावत पंजाबमध्ये आले होते.

त्यावेळी राज्यावर दहशतवादी कारवायाचं सावट असल्याचं त्यांनी म्हटले होते. त्यामुळे कदाचित त्यांनीच आपल्या माणसांचा वापर करुन हा हल्ला घडवला असेल, असे ते म्हणाले. फुल्का यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे. माझे वक्तव्य हे काँग्रेसच्या विरोधात होते, लष्करप्रमुखांच्या विरोधात नाही, तरीही मी माफी मागतो, असे रावत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य

0
नाशिक : नुकत्याच आसामच्या तेजपूर येथे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वल सोनवणेने तेरा वर्षाखालील गटात एकेरी प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.
या स्पर्धेत त्याला प्रथम मानांकन मिळाले. प्रज्वलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकाची कमाई केली.  प्रज्वलला उपउपांत्यपूर्व फेरीत आसामच्या अनिमेश गोगईने चांगली टक्कर दिली.
प्रज्वलने या सामन्यातील पहिला सेट २७-२५ असा जिंकला,  तर दुसऱ्या सेटमध्ये प्रज्वलला ११-२५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये प्रज्वलने संयमाने उत्कृष्ट खेळ करत तिसरा सेट २५- १५ असा जिंकून उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत प्रज्वलने उत्तराखंडच्या अंश नेगीचा २१-०७ आणि २१ – १५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रज्वलचा अंतिम सामना महाराष्ट्राच्या ठाण्याच्या ओम गोवंडी सोबत झाला. या सामन्यात पहिला सेट ओम गोवंडीने २१- १५ अश्या फरकाने  जिंकून आघाडी घेतली.
मात्र दुसऱ्या सेटमध्ये प्रज्वलने जोमाने खेळ करून हा सेट २१-१६ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या  निर्णायक सेटमध्ये ओम गोवंडीने प्रथमपासून सावध खेळ करून हा सेट २१- १४  असा जिंकून विजेतेपद पटकावले.
तर प्रज्वलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ओम गोवंडी आणि प्रज्वल सोनावणे हे दोघेही दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून एकत्र खेळतात.
प्रज्वलने याआधी गेल्या महिन्यात गुंटूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. प्रज्वल नाशिकच्या फ्रावशी  अकॅडमीमध्ये शिकत असून तो गेल्या सात वर्षांपासून नाशिकच्या शिवसत्य मंडळात मकरंद देव यांच्याकडे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे.
प्रज्वलच्या  या यशाबद्दल नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव अनंत जोशी,  उपाध्यक्ष एस. राजन, डॉ. शिर्मिला कुलकर्णी  तसेच फ्रावशी अकॅडमीचे संचालक रतन लथ आदिंनी अभिनंदन केले.
प्रज्वल सोनवणे लगेचच २२ नोव्हेंबरपासून कडप्पा, आंध्र प्रदेश येथे  आयोजित राष्ट्रीय  बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. तो या स्पर्धेमध्येही चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्याचे प्रशिक्षक मकरंद देव यांनी व्यक्त केला आहे.

समांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा

0

जळगाव ।  प्रतिनिधी :  समांतर रस्ता कृती समितीततर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस असून सुद्धा जळगाव फर्स्ट, सारस्वत समाज व ब्राह्मण समाज यांनी आज साखळी उपोषणात प्रत्यक्ष सहभाग घेऊन समितीला पाठिंबा दर्शविला.

सभामंडपात माजी आमदार चिमणराव पाटील, ज्येष्ठ विधीतज्ञ अ‍ॅड. सुशील अत्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मीकांत पाटील, नरेंद्र राजपूत, राजेंद्र महाजन, विशाल पाटील, ब्राह्मण सभेचे वैद्य, संभाजी ब्रिगेडचे सुरेंद्र पाटील, प्रमोद पाटील, जिल्हा पेठ मित्र मंडळाचे अभय सोमानी जळगाव असोसिएशनचे तथा समर्थ शैक्षणिक संस्थेचे पाटील आदींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला.

काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जमील शेख, व नदीम काझी यांनी आपली पाठिंबा पत्र कृती समितीचे फारुक शेख, अनंत जोशी गजानन मालपुरे, सरिता माळी, विनोद देशमुख यांना सुपूर्द केली. माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सदर लाक्षणिक उपोषण संयुक्तरित्या स्वरूपात करणे भाग असल्याचे स्पष्टीकरण केले तर अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी कोणत्याही सरकारला राजकीय पक्षाला अथवा नेत्याला दोष न देता ही जळगावकरांची सहनशीलता आहे ते अद्याप आपल्या हक्क मागू शकत नाही.

घनश्याम अग्रवाल यांनी आंदोलन झाल्यास सारस्वत समाज आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे जमील शेख यांनी हे आंदोलन आता थांबता कामा नये यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

आय.एम.आय.चे उपाध्यक्ष डॉ.अनिल पाटील व सहसचिव स्नेहल फेगडे, डॉ.विलास भोळे, जिल्हा बँक संचालक संजय पवार, जयदीप राजपूत यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. उद्या जेसीई फाऊंडेशन व जनसंग्राम संघटनेचा सहभाग
सोमवारी या उपोषणाचा पाचवा दिवस असून जे.सी.ई फाउंडेशन व जनसंग्राम या संघटना उपोषणात सहभागी होतील.  रविवार असताना सुद्धा 1752 नागरिकांनी या ठिकाणी स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शवला.

यावेळी गिरीश कुलकर्णी, राष्ट्रीय खेळाडू शीतल तिवारी, मयुर वाघ, पंचायत समिती सदस्य राजेंद्र महाजन, आनंद पाटील, नदीम काझी, मिलिंद पितळे, विजय पाटील, नरेंद्र राजपूत, कैलास माळी, अतुल गुजराती, मनोहर कोळी यांचा सहभाग होता.

आ.खडसेंचा भ्रमणध्वनीद्वारे पाठिंबा

आ.एकनाथराव खडसे यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपोषणास पाठिंबा दर्शवून आपण सर्वांनी एकत्रित रित्या येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी मी सुद्धा आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.

Social Media

26,915FansLike
5,154FollowersFollow
1,361SubscribersSubscribe
error: Content is protected !!