वीजनिर्मितीसाठी महाराष्ट्र स्वावलंबी – विश्वास पाठक

0
जळगाव । राज्यात वीज तयार करण्यासाठी अनेक वीज निमिर्ती केंद्र सुरु झाले आहे. त्यामुळे मागणीच्या बरोबरीने वीज निर्मीती होत असल्याने राज्यातील भारनिमयम बंद झाले असून वीज निर्मीतीसाठी महाराष्ट्र स्वावलंबी असल्याची माहिती राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वासक पाठक यांनी दिली. महावितरण ऊर्जा विभागातर्फे महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रगतीची चार वर्ष या माहिती पुस्तकेचे प्रकाशनानंतर पत्रकारांशी वार्तालाप करीत असतांना ते बोलत होते.

दरम्यान पुढे बोलतांना श्री. पाठक म्हणाले की, ज्या भागातून वीज बिलांची थकबाकी गेल्या अनेक वर्षांपासून थकीत आहे. अशाच ठिकाणीच्या फिडरवर भारनियमयन केले जात असते. महावितरणकडून आता ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरणे, तक्रार करणे यासह नवीन कनेक्शन घेण्यासाठी देखील आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा महावितरणकडून करण्यात आली आहे.

वीज कंपनींचे थर्ड पार्टीकडून ऑडीट
महावितरण कंपनी राज्यासह देशातील वीज निर्मीती करणार्‍या खासगी कंपन्यांकडून वीजेची खरेदी केली जात असते. त्यामुळे वीज खरेदीचा खर्च यासह वीज ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी लागणार खर्च, कर्मचार्‍यांचे पगार या सर्वांचे थर्डपार्टीकडून ऑडीट केले जात असून खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे श्री. पाठक यांनी सांगितले.

पाड्यांवर डिसेंबर अखेरपर्यंत लखलखाट
सौभाग्य अर्थात प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेद्वारे राज्यातील गावागावात वीज पोहचलेली आहे . यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील केवळ मोजक्याच पाड्यांमध्ये अद्यापर्यंत वीज पोहचलेली नसून डिसेंबरपर्यंत त्या पाडयांवर वीज पोहचेल असा विश्वास देखील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक तथा भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी व्यक्त केला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : नराधमाला सक्तमजुरी

0
जळगाव । धरणगाव तालुक्यातील वराड गावी मामाकडे शिकण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करणार्‍या नराधम तरुणाला न्यायालयाने दोषी ठरवून 10 वर्षाची सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वराड येथे मामाच्या गावी इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेली 11 वर्षीय तरुणी घरात एकटी असतांना दुपारच्या सुमारास घराशेजारी राहणार्‍या पांडुरंग सोमा वाल्डे वय 27 रा. वराड ता. धरणगाव या तरुणाने घरात घेवून तिच्याशी अंगलटपणा करीत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दि.7 एप्रिल 2015 रोजी दुपारी 2 वाजता घडली होती.

याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात संशयित पांडुरंग सोमा वाल्डे या तरुणाविरुध्द भादवी कलम 376 (2)(आय),342, 448ख 506, बालकांचे लैगिंग अत्याचारापासून संरक्षण कलम कायदा 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी रात्रीच संशयित आरोपी पांडुरंग वाल्डे याला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याच्या खटल्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयात या खटल्याप्रकरणी पिडीत मुलगी, पंच साक्षीदार गजानन पाटील, सुरेश पतवडे,

चुडामण पाटील, पिडीत तरुणीची फिर्याद घेणार्‍या महिला पोलिस अधिकरी पीएसआय कविता भुजबळ, उज्वला पवार, डॉ. हिरा दामले, पिडीत तरुणीच्या शाळेतील मुख्याध्यापिका कल्पलता राजपूत, तपासाधिकारी सपोनि देविदास ढुमणे या 9 जणांच्या साक्षी न्यायालयात महत्वपूर्ण ठरल्या. साक्षी व पुराव्यांवरून न्यायालयाने संशयित आरोपी पांडुरंग वाल्डे याला दोषी ठरवून भादवी कलम 376 (2) खाली 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, 20 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष साधी कैद, कलम 448 खाली 1 वर्ष शिक्षा 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी शिक्षा सुनावली.

पिडीतेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
दंडाच्या 21 हजारच्या रक्कमेतील 20 हजार पिडीतेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तसेच पिडीत मुलीला अनुदान मिळवून देण्याबाबत विधीसेवा प्रधिकरणाला देखील न्यायालयाने आदेश दिले आहे.

माजी महापौरांच्या वडिलांना गंडविले

0
जळगाव । काव्यरत्नावली चौक ते महाबळ रस्त्यावरील जाणता राजा प्रतिष्ठानजवळ माजी महापौर किशोर पाटील यांचे वडील काशिनाथ पाटील हे बसलेले असतांना हेल्मेट घालून मोटारसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी पुढे चोरी झाली आहे.

तुमच्या हातातील अंगठी व पाकीट रुमालात ठेवा असे सांगून चोरट्यांनी पलायन केल्याची घटना आज सकाळी 9.10 वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा व वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. याबाबत रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली महिती अशी की, माजी महापौर किशोर पाटील यांचे वडील नेहमीप्रमाणे सकाळी जाणता राजा प्रतिष्ठानच्या कार्यालयाबाहेरील कट्टया बसले होते. यावेळी विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी पुढे चोरी झाली आहे.

तुमच्या हातातील अंगठी व पाकीट त्यांच्यात रुमालात ठेवण्यास सांगून तोच रुमाल त्याच्याजवळ दिला. व मोटारसायकलस्वार हिंदी-मराठी भाषेत बोलणारे तरुण पसार झाले. क्षणातच काशिनाथ पाटील यांनी रुमाल उघडला असता, त्यातून समान त्यांना दिसून आला नाही. मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी अंगठी व पाकीट लुटून नेल्याचे समजून आले. त्यानंतर त्यांनी लगेचच किशोर पाटील यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

त्यानंतर कशिनाथ पाटील व किशोर पाटील हे तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलिसात आले होते. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असून संशयित त्यात कैद झाले असल्याचे समजते. दरम्यान याबाबत उशिरापर्यंत रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

टॉवरचौक ते कोर्टचौकपर्यंत रस्ते मोकळे होणार!

0
जळगाव । शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे अतिक्रमण करुन व्यवसाय करणार्‍यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मनपातर्फे शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेण्यात येणार असून याबाबत पोलिस बंदोबस्तासाठी महापालिकेतर्फे पोलिस अधिक्षकांना पत्र देण्यात आले असून लवकरच अतिक्रमण निर्मुलनाची मोहिम राबविण्यात येणार आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीरपणे वाहने किंवा दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रुंद असलेले रस्ते देखील अरुंद झाले असल्याने वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झालेली आहे. या विरोधात महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाची मोहिम हाती घेणार आहे. यात प्रथम टॉवर चौक ते कोर्ट चौकपर्यंतच्या रस्त्याच्या बाजुला नगररचना विभागातर्फे आखणी करुन रस्त्यात असणारे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केले जाणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.

शहरातील रस्ते होणार अतिक्रमण मुक्त
शहरात मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पार्कींग नसल्याने ते आपली वाहने रस्त्यांवर उभी करीत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे शहरातील संपूर्ण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात येणार आहे.

पोलिस अधिक्षकांना दिले पत्र
अतिक्रमण काढतांना कोणत्याही प्रकारे प्रकारची अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलिस बंदोबस्तात काढण्यात येणार असल्याने बंदोबस्त मिळण्यासाठी महापालिकेतर्फे पोलिस आयुक्त दत्ता शिंदे यांना पत्र देण्यात आले आहे.

कोर्टचौकातील दुकानांचे अतिक्रमण देखील काढणार
शहरातील कोर्टचौकातील दुकानांची मुदत संपलेली आहे. या दुकानदारांना दुकाने रिकामे करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. तसेच या दुकानदारांनी रस्त्यावर देखील अतिक्रमण केले असून या दुकानांचे देखील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

स्थायी सभापतींकडून रथाच्या मार्गाची पाहणी

0
जळगाव । रथाच्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनी झालेली असल्याने रथाला मार्गस्थ होण्यासाठी अडथळे निर्माण होवू नये. यासाठी मनपा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

पाहणी दौर्‍यात अभियंता सुनिल भोळे, उदय पाटील, एच. एम. खान, व्ही. ओ. सोनवणी, संजय पाटील, पोलिस पाटील प्रभाकर पाटील उपस्थित होते. त्यांच्याकडून जूने जळगावातील श्रीराम मंदिर, कोल्हेवाडा, भोईटे गढी यासह संपूर्ण रथाच्या मार्गाची पाहणी करण्यात आली.

यावेळी रस्ते दुरुस्ती करणे, उघड्या गटारींवर ढापे टाकून त्या बंदिस्त करण्याच्या सुचना सभापती जितेंद्र मराठे यांनी दिल्या.

खान्देश मॉलमधून जनरेटर हिट एक्सेंजच्या अ‍ॅल्युमिनिअम प्लेट लंपास

0
जळगाव । खान्देश सेंटल मॉलच्या मागील बाजुस असलेल्या मोकळया जागेतून जनरेटर हिट एक्सेंजच्या 30 हजार रुपये किंमतीच्या 94 अ‍ॅल्युमिनीअम प्लेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि.10 च्या मध्यरात्री घडली. याबाबत मॉलचे ऑपरेशन मॅनेजर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खान्देश सेंटल मॉलच्या मागील बाजूस असलेल्या डी.जी.शेडमध्ये जनरेटर लावले असून याठिकाणी प्रवेशद्वार आहे. दरम्यान याठिकाणी जनरेटर हिट एक्सेंजच्या तीन सेट मध्ये असलेल्या प्रत्येकी 32 प्लेट असून तांत्रिक अडचणीमुळे शेडच्या भिंतीजवळ लावून ठेवल्या होत्या.

या शेडच्या बाहेर सिक्युरिटी नेमण्यात आला होता. दरम्यान दि.10 च्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने शेडच्या मागील खिडकी तोडून 30 हजार रुपये किंमतीच्या 3 सेटमधील 32 प्लेट अ‍ॅल्युमिनीयमप्रमाणे 94 प्लेटा चोरून नेल्या. ही घटना दि.11 रोजी सकाळी उघडकीस आली.

सुपर व्हॉयझर जितेंद्र पाटील यांनी याबाबत सुक्यरिटीला विचारणा केली. त्यावेळी त्यांना या प्लेटा दिसून आल्या नव्हत्या. दरम्यान याप्रकरणी खान्देश सेंटल मॉलचे ऑपरेशन मॅनेजर स्वप्नील मराठे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय हिंगोले करीत आहे.

घरकुलांमध्ये अनाधिकृत ताबा घेणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करणार!

0
जळगाव । पिंप्राळा हुडको परिसरात बांधण्यात आलेल्या नवीन घरकुलांपैकी विनापरवानगीने 76 घरकुलांमध्ये ताबा घेणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. दरम्यान संदर्भात पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांच्याशी चर्चा करुन कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुध फेडरेशन भागातील दांडेकर नगर झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यामुळे या झोपडपट्टीमधील 472 कुटुंबियांचे पुनवर्सन करण्यासाठी पिंप्राळा-हुडको भागात 472 घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. त्यापैकी 276 घरांमध्ये सोडतद्वारे विस्थापीत नागरिकांचे पुनवर्सन करण्यात आले. त्यानतंर उर्वरीत लाभार्थ्यांसाठी 76 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 76 घरकुलांसाठी सोडत पद्धतीने घरकुले वितरीत करण्यात येणार होती. परंतु गुरुवारी 76 घरकुलांचे कुलूप तोडून महापालिकेची परवानगी न घेता, अनधिकृतपणे ताबा घेतला.

त्यामुळे अन्य लाभार्थ्यांनी सोमवारी महानगरपालिकेत धाव घेवून महापौर आणि उपायुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडला होता. घरकुलांच्या संख्या कमी व लाभार्थींची संख्या जास्त असल्याने अनेक लाभार्थींना घरकुल मिळणार अशी भिती होती. त्यामुळे राष्टवादी कॉँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाच्या सूचनेनंतर काही लाभार्थींनी अनधिकृतपणे या घरांवर ताबा घेतल्याचा आरोप लाभार्थींनी केला आहे.

काहींनी काढले साहित्य बाहेर
अनधिकृतपणे ताबा घेणार्‍यांना सोडतमध्ये सहभागी करुन घेणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला. त्यामुळे भितीपोटी काही जणांनी आज आपले साहित्य बाहेर काढले. तर काही जणांनी अजूनही ताबा सोडलेला नाही.

पोलीस अधिक्षकांशी करणार चर्चा
अनधिकृतपणे ताबा घेणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्या आधी पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांच्याशी चर्चा करुनच कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले.

Social Media

26,800FansLike
5,154FollowersFollow
1,345SubscribersSubscribe
error: Content is protected !!