सुपर फोरमध्ये उद्या भारत-बांग्लादेश लढत

0

यूएई दि. २० | युनिमनि आशिया  चषकात  सुपर फोरची उद्या लढत होत आहे. पाकिस्तान नंतर भारताचा प्रतिस्पर्धी संघ म्हणून बांग्लादेशकडे बघितले जाते. हॉंगकॉंगकडून निसटता विजय संपादन केल्यानंतर भारताने कालच्या  भारत पाक रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानला धूळ चारत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

बांग्लादेशसाठी  चिंतेची  बाब  म्हणजे  मुशफिकूर  रहीम  वगळता  इतर  फलंदाजाचे अपयश. तसेच तमीम  इक्बालच्या  तंदुरुस्तीबाबत  प्रश्नचिन्ह? असल्याने बांगलादेश सध्या तरी कमकुवत परिस्थितीत आहे.

भारत  आणि  बांगलादेश  या दोन्ही  संघांची आशिया  चषकातील  कामगिरीवर  नजर  टाकली  तर  भारताचे  पारडे  कायमच  जड राहिले  आहे.  २०१२ साली  झालेल्या  भारत  बांगलादेश  सामन्यात  बांगलादेश संघाने  भारताला  पराभूत  केले  होते त्यामुळे भारताला बांगलादेशविरोधात योग्य रणनीती आखून मैदानात उतरावे लागणार आहे.

कमकुवत समजल्या जाणाऱ्या बांग्लादेशने २०१५ विश्वचषकापासून ते २०१७ चॅम्पिअनस करंडकापर्यंत उल्लेखनीय कामगिरी मैदानात केली आहे.

आज  हा संघ जगातील कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो इथवर ते येऊन पोहोचले आहेत. भारताप्रमाणेच  बांगलादेश  संघातही  सामन्याचा निकाल बदलू शकणारे अनेक खेळाडू आहेत. भारतीय  संघाचा  अष्टपैलू  हार्दीक  पंड्या  पाकविरुद्ध  लढतीत  पाठदुखीमुळे  फलंदाजी  आणि  गोलंदाजी  करू  शकला  नाही. त्यामुळे  बांगलादेश  विरुद्ध तो खेळणार  की  नाही हे अस्पष्टच आहे.

असा असेल भारतीय  संघ : रोहीत  शर्मा  (कर्णधार), शिखर  धवन , लोकेश  राहुल , आंबटी  रायुडू , केदार  जाधव , मनीष  पांडे , हार्दीक  पंड्या , अक्षर  पटेल , कुलदीप  यादव , दिनेश  कार्तिक , एम एस  धोनी (यष्टीरक्षक), युझवेन्द्र  चहल , शार्दूल  ठाकूर , खलील  अहेमद , जसप्रीत  बुमराह  आणि  भुवनेश्वर  कुमार.

बांगलादेश  संघ : तमीम  इक्बाल , लिटोन  दास , मुशफिकर  रहीम , शाकीब अल  हसन , महेंदी  हसन , नजमूल  हुसेन शांतो , मोमिनुल  हक , अबू  हैदर , मुस्ताफिझूर  रहमान , मोश्रफी  मोर्तझा (कर्णधार), रुबेल  हुसेन , मोहमदुलाह , अरीफुल  हक.

  • सलील  परांजपे  देशदूत  नाशिक

पोलीस अधीक्षकांच्या एक गाव एक गणपतीला १०२३ गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नाशिक | पोलीस अधीक्षकांच्या एक गाव एक गणपती या आवाहनाला जिल्ह्यातील १०२३ गावांनी प्रतिसाद दिला आहे. पोलीस प्रशासनाकडून तंटा मुक्त समितीच्या माध्यमातून गावागावांत एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे. यामुळे गावात शांतता टिकून आहे तसेच जातीय सलोखा निर्माण झाला आहे.

पोलीस अधीक्षक संजय दराडे जिल्ह्यातील गणेशोत्सवाला भेट देत आहेत. गणेशोत्सव काळात डाल्बी/ डी.जे.च्या आवाजाचा सर्वसामान्य नागरीक, रूग्ण, महिला, लहान मुले व वृध्द व्यक्तींना त्रास होवु नये व ध्वनीप्रदूषणास बसावा यासाठी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांतर्फे शाळा महाविद्यालयांमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, प्रचार फे-या, पथनाटये आयोजित करून जनजागृती केली जात आहे.

पोलीस अधीक्षक दराडे यांनी ओझर व पिंपळगाव येथील गणेश मंडळांना भेट दिली. मुंबई आग्रा हायवेवर असलेल्या गणेशोत्सव मंडळांनादेखील दराडे यांनी भेट देत विविध उपक्रमांची प्रशंसा केली.

 कर्जबाजारीपणातून होळपिंप्रीत शेतक-यांची आत्महत्या

0
रत्नापिंप्री ता.पारोळा :  वार्ताहर |  येथून जवळच असलेले होळपिंप्री येथिल शेतक-यांने निसर्गाच्या लहरीपणा व कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली

याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक होत असतांना उधार उसनवारीने घेतलेला पैसा आणि आपल्या कुटूंबाचा पालन पोषणाचा गाडा कसा चालणार ह्या विवंचनेत  होळपिंप्री येथिल शेतकरी राजू नामदेव वानखेडे या शेतकरी पुत्राने दि.२० सप्टेंबर रोजी पहाटे ५:३० ते ६ वाजेच्या सुमारास आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली

ह्या घटनेची माहिती होताच रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री ग्रामस्थांनी गर्दी केली तर होळपिंप्रीचे पोलिस पाटील गौतम भालेराव, रत्नापिंप्रीचे पोलिस पाटील प्रभाकर पाटील, दबापिंप्रीचे पोलिस पाटील प्रकाश भागवत यांनी पारोळा पोलिस स्टेशनला माहिती दिली याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली

मृत शेतक-यांच्या  पश्चात आई,वडील, पत्नी, भाऊ, मुले असा परीवार आहे ते नामदेव लवखा वानखेडे यांचा मोठा मुलगा होत

सारडा सर्कल ते दत्त मंदिर चौक उड्डाणपुल लवकरच; साडेबाराशे कोटी येणार खर्च

0
नाशिक । व्दारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सारडा सर्कल ते दत्तमंदिर दरम्यानचा उडडाणपुल बांधण्यासाठी अखेर मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ७.२३ किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे बांधकाम केले जाणार आहे, अशी माहिती देवळाली लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

गेल्या तीन वर्षांपासून व्दारका ते दत्तमंदिर या मार्गावर चारपदरी उडडाणपूल व्हावा याकरीता केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर प्रस्तावाला मंजुरी देत तांत्रिक सल्लागार कंपनीची निवड करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या सर्व कामांचा गोडसे पाठपुरावा करत होते.

द्वारका सर्कल हे नाशिकचे मुख्य प्रवेशव्दार आहे. वाहतूक कोंडी निर्माण झाल्यावर याठिकाणी नाशिकरोडच्या बाजूने, मुबई नाक्याच्या बाजूने तसेच शालिमारच्या बाजूने सुमारे दोन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. सर्वेक्षणाच्या आधारे थेट सहा ठिकाणी चढ-उतारासाठी रॅम्प असलेला सारडा सर्कल ते दत्त मंदीर असा पूल करावा असे सुचविण्यात आले होते.

त्यानूसार आकार अभिनव या कंपनीने सदरच्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व्हेक्षण करून विविध पर्याय सुचवले होते. पुणे, मुंबई आणि नाशिक शहरात येणार्‍या वाहनांचा संगम व्दारका चौकात होतो. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची अधिक गर्दी होते.

व्दारकापासून नाशिकरोडकडे जाणारी 60 टक्के वाहने ही पुण्याकडे जाते. असे सर्व्हेक्षणाचा अहवालावरून सांगण्यात आले होते. तसेच शहरांतर्गत या मार्गावरून 55 टक्के दुचाकी, 16 टक्के रिक्षा, 17 टक्के कार, 70 टक्के खाजगी वाहने आणि 3 टक्के बस वाहतूक होत असल्याचेही स्पष्ट झाले होते.

Flyover between Sarda Circle to Dutta Mandir Chowk soon: Godse

Flyover between Sarda Circle to Dutta Mandir Chowk soon: Godse

0

Nashik: The imbroglio over the proposed four-lane flyover between Circle to Dutta Mandir Chowk has finally been resolved. Interestingly, the union government has decided the construction of this 7.23 Kilometre (Km) long flyover will be undertaken by the National Highway Authority of India (NHAI) instead of the state Public Works Department (PWD).

The flyover will be constructed at an estimated cost of Rs 1200 crore. The construct of the flyover will result in resolving the frequent traffic congestion at Dwarka Circle, said Nashik constituency’s Member of Parliament (MP) Hemant Godse.

Traffic congestion at the Dwarka Circle has become a major issue of concern for Nashikites. Owing to the frequent traffic jams at the circle during the peak hours causes a chaos. Besides, citizens and motorists are compelled to face huge inconvenience. Accordingly, in order to resolve the issue permanently, since past three years MP Hemant Godse has been into regular follow-up with the union government for the flyover project.

Interestingly, a few months ago the union government sanctioned the project. In the meantime, there were confusions over who would undertake the construction of the flyover, whether the NHAI or the PWD department. Consequently, the project was stranded into red tape. Meanwhile, around a 10,000 vehicles ply on the stretch between Sarda Circle to Dutta Mandir Chowk.

Thus according to the union government’s directives the construction work of the flyover has been transferred to the NHAI instead of PWD. The decision was taken in a high level meeting held at the Ministry of Road Transport and Highways on Wednesday, September 19. Meanwhile, Navi Mumbai-based Akar Abhinav Consultancy has been appointed as the technical advisor for the project. The project work is expected to begin soon, said MP Hemant Godse.

Video : ‘शुभ लग्न सावधान’चा मंगलमय ट्रेलर सोहळा

0

लग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच ! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित येत्या १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच मंगलमय वातावरणात ट्रेलर लाँच करण्यात आला.

दादर येथील नक्षत्र मॉलमध्ये पार पडलेल्या या दिमाखदार ट्रेलर सोहळ्याचा उपस्थितांनी मनमुराद आस्वाद घेतला. मराठमोळ्या लग्नसमारंभाचा माहौल तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, हजर राहिलेल्या प्रत्येकांचा विशेष पाहुणचारदेखील यादरम्यान करण्यात आला.

लग्नसंस्थेवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमधून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांची रेलचेल या चित्रपटात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर ‘लग्न’ या विषयावर फिरतो. लग्नाबद्दलचे विविध लोकांचे मतमतांतरे यात आपल्याला पाहायला मिळतात.

शिवाय, ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक ख्रिश्चनधर्मीय लग्नदेखील यात आपणास दिसून येत आहे. तसेच, लग्नापासून दूर पळत असलेल्या नायकाची प्रेमाबद्दलची परिभाषादेखील यात पाहायला मिळते. एकंदरीतच, हा ट्रेलर पाहताना, ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा संपूर्णतः कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याची जाणीव होते.

डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. विवाहोत्सुकांना आपलासा करणारा हा सिनेमा, कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून आकारास आला आहे.

तसेच या सिनेमास तृप्ती पुराणिक व त्यांच्या स्टुडियो एलिमेंटस्ने निर्मिती सहाय्य केले आहे. सहनिर्मात्यांची धुरा अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे आणि तुषार कर्णिक यांनी सांभाळली आहे. नवरात्रीच्या धामधुमीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला’शुभ लग्न सावधान’ हा चित्रपट कुटुंबियांसोबत पाहायला जाण्यास प्रेक्षकदेखील नक्कीच आतुर झाले असतील, हे निश्चीत!

माजी आमदार शिवाजीराव नागवडेंच्या अंत्यविधीसाठी जनसमुदाय एकटवला

0
अहमदनगर : राज्य साखर संघाचे अध्यक्ष, श्रीगोंदे तालुक्याचे माजी आमदार, शिवाजीराव नारायणराव नागवडे (८५) यांचे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता दीर्घ अाजारामुळे निधन झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवार (दि.२० सप्टेंबर)मी रोजी वांगदरी (ता. श्रीगोंदे) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान नागवडे यांच्या अंत्यविधीप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित झाला आहे. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, माजी आमदार अशोक पवार, आ.स्नेहलता कोल्हे, पांडूरंग अभंग, आ.राहुल जगताप, भानुदास मूरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विजयसिंह मोहिते पाटील, दादापाटील शेळके, पालकमंत्री ना .राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माळेगाव कारखाना अध्यक्ष रंजन तावरे, झेडपी अध्यक्षा शालीनीताई विखे, मधुकरराव पिचड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले आहे.

‘लवरात्री’ नव्हे आता ‘लवयात्री’

0

हिंदू संघटनांच्या विरोधानंतर सलमानने बदलले सिनेमाचे नाव

मुंबई : सलमान खान निर्मित ‘लवरात्री’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.  सिनेमाच्या नावावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला होता. अखेर हा वाद मिटवत सलमान खानने आपल्या सिनेमाचे नाव बदलून ‘लवरात्री’ ऐवजी  ‘लवयात्री’ असे ठेवले आहे.

हिंदू धर्माशी संबंधित ‘नवरात्री’ या सणाशी मिळतेजुळते नाव असल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत काही हिंदू संघटनांनी या सिनेमाच्या टायटलवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे सलमानने विरोध टाळण्यासाठी सिनेमाचे टायटलच बदलले आहे. सलमानने सिनेमाच्या बदललेल्या टायटलची घोषणा करत फिल्मचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. येत्या 5 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून सलमानचा मेहूणा आयुष शर्मा या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. त्यासोबत वरिना हुसैन ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे.

 

वीजमीटरमध्ये फेरफार करून साडेसात लाखांची वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल

0
File Photo

नाशिक | वीजमीटरमध्ये फेरफार करून दोन वर्षांत साडेसात लाखांची वीजचोरी केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील कॉलेजरोड परिसरात घडली. जवळपास ४१ हजार ५०८ युनिटची वीजचोर दोन वर्षांत झाली असून याप्रकरणी जागामालक व खासगी क्लासचालक या दोघांवर भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, गेल्या दोन वर्षांपासून जयकृष्ण प्रवीण वसंतराव (दुसरा मजला, पूजा एन्क्लेव, कॉलेज रोड नाशिक) या वीजग्राहकाने डिजिटल मीटरमध्ये फेरफार केलेला आढळून आला. सध्या ही जागा अनिल गोपीचंद चव्हाण (रा. मोशन क्लासेस दुसरा मजला, पूजा एन्क्लेव, कॉलेज रोड नाशिक) यांनी भाडेतत्वावर घेतली आहे.

दरम्यान, दोन वर्षांपासून एकाच मीटरवर भार येत असल्याचे अभियंता विनय काळे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वीजग्राहक आणि वीजवापर करणार या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेत गेल्या दोन वर्षांपासून ४१५०८ युनिट वीज एकूण ७ लाख ३९ हजार रुपयांची वीजचोरी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना गंगापूररोड पोलिसांच्या हद्दीत घडली असल्यामुळे भद्रकाली पोलिसांनी गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यास वर्ग केला आहे.

खुशखबर: छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ

0

नवी दिल्‍ली : छोट्या बचत योजनाधारकांसाठी खुशखबर आहे. छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात व्याजात वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी याबाबत घोषणा केली आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या तिमाहीसाठी सरकारनं नव्या व्याजदरांची घोषणा केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), किसान विकास पत्र (KVP) आणि पोस्टाच्या मुदत ठेवींवर ०.३ ते ०.४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. उलट, जानेवारी ते मार्च २०१८च्या तिमाहीत व्याज दर कमी करण्यात आले होते. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये नाराजी होती. नव्या निर्णयामुळं ती दूर होणार आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार यापुढं पीपीएफ व एनएससीवर ८ टक्के व्याज मिळेल. सुकन्या समृद्धी योजनेतील बचतीवर ८.५ टक्के तर, ज्येष्ठ नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या बचतीवर ८.७ टक्के व्याज मिळणार आहे.

Social Media

26,082FansLike
5,154FollowersFollow
1,128SubscribersSubscribe
error: Content is protected !!