शनिवार, 22 सप्टेंबर 2018

0

406 घरकुलांसाठी 24 कोटींचा प्रस्ताव

0

जळगाव । पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वमालकीच्या जागेवर 406 घरकुल बांधण्यासाठी महानगरपालिकेने प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर 24 कोटीच्या निधीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

प्रत्येकांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना लागू केली. त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिकेने जून महिन्यात 406 लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार या प्रस्तावास म्हाडाकडून परवानगी मिळाली आहे.

त्यामुळे 406 लाभार्थ्यांना आपल्या स्वमालकीच्या जागेवर घर बांधण्यासाठी शासनाकडून अडीच लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. तर उर्वरीत खर्च हा लाभार्थ्यांनी स्वत: करावयाचा आहे. मनपाकडून लाभार्थ्यांना गटारी व रस्त्यांची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

406 लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे निधीसाठी देखील मनपाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दि.24 रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे. त्यानंतर केंद्रीय शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

पाळधी बायपासजवळ मोटारसायकल-स्कूलव्हॅनच्या धडकेत तिघे ठार

0
जळगाव । महामार्गावरील पाळधी बायपासजवळ मोटारसायकल-स्कूलव्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मोटारसायकलच्या मागे बसलेला युवक व स्कूलव्हॅनचालक दोघे जागीच ठार झाले. तर मोटारसायकलचालक गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना दुपारी त्याचादेखील मृत्यू झाला.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील सहयोग कॉलनीतील दिवाकर नारायण सोनकर हे त्यांच्या मालकीची एमएच 19 बीजे 2475 ही स्कूलव्हॅन घेवून पाळधीकडे इम्पिरिया स्कूलचे विद्यार्थी घेण्यासाठी जात होते. दरम्यान बन्सीलाल राठोड (रा.हिसाळे, ता.शिरपूर) व त्यांचा शालक अर्जून उत्तम पवार (रा.खडकातांडा, ता.एरंडोल) हे दोघे एमएच 19 बीके 3268 या मोटारसायकलीने एरंडोलकडून जळगावी येत होते. पाळधी बायपासजवळ मोटारसायकल व स्कूलव्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात मोटारसायकलच्या मागील बाजुस बसलेले बन्सीलाल राठोड हे स्कूलव्हॅनच्या काचेवर आदळले. तर स्कूलव्हॅनचालक दिवाकर सोनकर हे गाडीत दाबले गेले. त्यामुळे अपघातात बन्सीलाल राठोड व दिवाकर सोनकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलचालक अर्जून पवार हा गंभीर जखमी झाला. खासगी रुग्णवाहिकेने तिघांना तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी दोघांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. तर अर्जून याला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात हलविले. दुपारी त्याचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त दोन्ही वाहने पाळधी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाण जीवघेणे खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. त्यातच खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकवेळा अपघात होत असून यात नागरिकांचा जीव जात आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाची सहाय्यक संचालकांकडून पाहणी

0
जळगाव । जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षासाठीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीची महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर याठिकाणी आवश्यक असलेल्या गरजा तात्काळ पूर्ण करुन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिष्ठातांना दिल्या.

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून लागलीच द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यानुसार द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. द्वितीय वर्षाच्या तयारीचा देखील आढावा घेण्यासाठी एमसीआयचे पथक येणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील तयारीचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी अचानक जिल्हा रुग्णालयास भेट दिली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील उपस्थित होते.

प्रत्येकाने घरच असल्या सारख काम करा- डॉ. प्रकाश वाकोडे
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापकांसह कर्मचार्‍यांची बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी कर्मचार्‍यांना सुचना दिल्या. दरम्यान सर्व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करतांना सहाय्यक संचालक डॉ. वाकोडे म्हणाले की, प्रत्येक अधिकारी कर्मचार्‍याने महाविद्यालय व रुग्णालय हे आपलं घर असून आपल्या घरात ज्या प्रमाणे आपण जस काम करतो. त्याप्रमाणेच मन लावून काम करा असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महाविद्यालयाला येणार्‍या अडचणी त्यांनी जाणून घेत स्थानिक पातळीवर ज्या अडचणी सोडविता येणे शक्य आहे. अशा अडचणी तात्काळ सोडविण्याच्या सुचना त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या.

द्वितीय वर्षासाठीचे नियोजनाचा घेतला आढावा
वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला सुरुवा झाली असून द्वितीय वर्षासाठीचे नियोजन महाविद्यालयाकडून केले जात आहे. यामध्ये द्वितीय वर्षात विद्यार्थ्यांना शरीरविकृत शास्त्र, सुक्ष्मजीव शास्त्र, औषध शास्त्र, जनआवश्यक शास्त्र, न्यायवैद्यकीय शास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याने या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यासाठी पूर्व नियोजन करुन त्यासाठी आवश्यक असलेली जागा, मनुष्यबळ यासह यंत्रसामुग्रीचे नियोजन करुन त्याबाबतचा आढावा वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी घेतला.

रुग्णालय, महाविद्यालयासह वस्तीगृहांची केली पाहणी
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहाय्यक संचालकांनी महाविद्यालय, रुग्णालय यासह प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची पाहणी केली.

रेल्वेतून पर्स लांबविणार्‍या चोरट्यास अटक

0
जळगाव । जळगाव रेल्वे स्थानकावर लखनऊ पुणे एक्सप्रेसमधून महिलेची पर्स लांबवून पळ काढणार्‍या चोरट्याला रात्री 2.20 वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षादलाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पर्स हस्तगत करून त्याची तपासणी केली असता 49 हजार 428 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जीआरपीएफचे कर्मचारी हरेन्द्र पाल व भुषण पाटील हे रेल्वेस्थानकावर रात्री ड्युटीवर होते. रेल्वे क्रमांक 11401 लखनऊ पुणे एक्सप्रेस रात्री 2.20 वाजेच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून सुटली. रेल्वे पुढे सरकताच एक तरुण हातात लेडीज पर्स घेऊन उतरला.

उतरल्यानंतर तरुणाने विरुद्ध दिशेला पळ काढला ते पाहून नरेंद्र पाल व भुषण पाटील यांनी त्याचा पाठलाग करून अक्षय चंद्रकांत शिंदे वय 21 रा. जुनी जोशी कॉलनी याला ताब्यात घेतले. त्याच्या हातातील पर्सबाबत त्याची चौकशी केलयानंतर त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांना संशय आल्याने त्याची रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात आणून पर्स तपासली.

दरम्यान पर्समध्ये पाच हजार,13 हजार रुपयांचा मोबाईल, तीन सोन्याच्या अंगठ्या, 1 हजार 400 रुपये रोख व इतर महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज मिळून आला. पथकाने चौकशी केली असता पर्स चोरी झाल्याबाबतची फिर्याद महिलेने कोपरगाव पोलीस दुरक्षेत्र येथे नोंदविली असल्याचे समजले. तरूणाला पोलिसांनी कोपरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव मोटारसायकल स्कूलव्हॅनवर धडकली

0
जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी बायपासजवळील हॉटेल सुगोकीसमोर ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरासमोर भरधाव मोटारसायकल स्कूल व्हॅनवर जोरदार धडकल्याची घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात स्कूल व्हॅनचालक व मोटारसायकलवरील एक जण असे दोन जण जागीच ठार झाले. तर मोटारसायकलचालकाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला. अपघातात भीषण असल्याने मोटारसायकलीचा पूर्णपणे चुराडा झाला होता.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील हिसाडे गावातील रहिवाशी असलेले बन्सीलाल सुभाष राठोड (वय 30) यांची पत्नी व एका वर्षाच्या मुलीवर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याने बन्सीलाल राठोड व त्यांचे शालक अर्जून उत्तम पवार (वय 35, रा.खडकातांडा, ता.एरंडोल) हे दोघे मोटारसायकल क्रमांक एमएच 19 बीके 3268ने एरंडोलकडून जळगावकडे येत होते. दरम्यान शहरातील पिंप्राळ्यातील सहयोग कॉलनीतील रहिवासी असलेले दिवाकर नारायण सोनकर (वय 48) हे त्याच्या मालकीची एमएच 19 बीजे 2475 या क्रमांकाची स्कूल व्हॅन घेवून पिंप्राळ्यातून पाळधीकडे इम्पिरिया स्कूलचे विद्यार्थी घेण्यासाठी जात होते.

 

पाळधी बायपासजवळील हॉटेल सुगोकीसमोर ओव्हरटेकच्या प्रयत्नात बन्सीलाल राठोड, त्याचा शालक अर्जून पवार यांची मोटारसायकल पिंप्राळ्याकडून पाळधीकडे जाणार्‍या स्कूलवर जोरदार धडकली. अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकलच्या मागे बसलेले बन्सीलाल राठोड हे स्कूलव्हॅनच्या काचेवर जोरदार आदळले. तर स्कूल व्हॅनचालक दिवाकर सोनकर हे गाडीत दाबले गेले. या भीषण अपघातात बन्सीलाल राठोड व स्कूल व्हॅनचालक दिवाकर सोनकर हे दोघे जागीच ठार झाले. तर अर्जून उत्तम पवार हा गंभीर जखमी झाला.

महामार्गावर वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती कळताच पाळधी दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी विजय चौधरी, सुमित पाटील यांनी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर रुग्णवाहिकेने तिघांना उपचारार्थ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

रुग्णवाहिकेने तिघांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात हलविले
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्कूल व्हॅनमध्ये अडकलेले दिवाकर सोनकर यांना नागरिकांनी बाहेर काढले. त्यानंतर जैन इरिगेशन व राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेने तिघांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी दिवाकर सोनकर व बन्सीलाल राठोड यांना मयत घोषित केले.

जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नातेवाईकांनी घेतली धाव
घटनेची माहिती कळताच दोन्ही मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेवून हळहळ व्यक्त केली. अर्जून पवार याचे नातेवाईक रुग्णालयात आल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पत्नी व मुलीला भेटण्यासाठी बन्सीलाल येत होता जळगावला
बन्सीलाल राठोड यांची पत्नी व मुलगी जळगावातील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल होते. तो सकाळी भावाचा साला अर्जून पवार (रा.खडकीतांडा) याला घेवून त्याच्या मोटारासायकलीने जळगावी येत होता. अपघातातात दोघांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. बन्सीलाल राठोड याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. तर अर्जून हा सेंट्रींग काम करायचा. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, 10 महिन्यांचा मुलगा, बहिणी असा परिवार आहे.

अर्जून पवारचा उपचारादरम्यान मृत्यू
अपघातात अर्जून पवार गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुपारी उपचारादरम्यान अर्जूनचा मृत्यू झाला.

इम्पिरिया स्कूलचे विद्यार्थी घेण्यासाठी जात होते दिवाकर सोनकर
स्कूलव्हॅनचे चालक दिवाकर सोनकर यांचा अपघातात मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सोनकर हे रिक्षाचालक म्हणून शाळेचे विद्यार्थी ने-आण करण्याचे काम करत होते. गेल्या दीड-दोन वर्षापूर्वी त्यांनी रिक्षा विकुन टाटा मॅजिक व्हॅन विकत घेतली होती. त्यामुळे ते सध्या इम्पिरिया स्कूलच्या विद्यार्थ्यांना पोहचविण्याचे काम करत होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पिंप्राळ्याहून पाळधीकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या व्हॅनमध्ये कोणीही नव्हते. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, पुतणे असा परिवार आहे.

सुरेगावातील पाचवीच्या विद्यार्थ्याचा गळा कापणार्‍या वाबळेला जन्मठेप

0

कोपरगाव(प्रतिनिधी)– तालुक्यातील सुरेगाव येथील इयत्ता पाचवीत शिकणारा आशुतोष प्रदीप वाबळे याचा विळ्याने गळा कापणारा आरोपी गणेश शिवाजी वाबळे याला कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एम. श्रीमंगले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आरोपी गणेश वाबळे याने शेतातील विहिरीच्या पाण्याच्या वादातून 13 मे 2013 रोजी सुरेगाव येथील विद्या प्रदीप वाबळे यांचा पाचवीत शिकणारा मुलगा आशुतोष हा अंगणात खेळत असताना त्याचा विळ्याने गळा कापला. मुलाचा आरडाओरडा ऐकून सौ. विद्या बाहेर आल्या. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने शेजारीच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावरून आरोपीविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात भादंवि 307, 309 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

कोपरगाव पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या गुन्ह्याची सुनावणी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. यावेळी सरकारपक्षातर्फे चौदासाक्षीदार तपासण्यात आले.यात फिर्यादी विद्या वाबळे, प्रभाकर वाबळे, प्रदीप वाबळे, बाळू मेहरखांब, रवींद विघे, अमोल नागरे, तपाशी अधिकारी बाळासाहेब पारखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्कर लेले, डॉ. शेखर फडके, सुरेगावचे पोलिस पाटील संजय वाबळे यांच्या साक्षी झाल्या.

आशुतोष याने दिलेली साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारपक्षाचे म्हणणे व युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधिश एन.एम. श्रीमंगले यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. याकामी सरकारकडून अ‍ॅड. शरद गुजर यांनी काम पाहीले. तर अ‍ॅड. अशोकराव वहाडणे यांनी सहाय्य केले. अ‍ॅड. सौ. एस.एस. देशमुख यांनी मूळ फिर्यादीच्या वतीने काम पाहीले.

 

Social Media

26,092FansLike
5,154FollowersFollow
1,134SubscribersSubscribe
error: Content is protected !!