शबरीमलाः तृप्ती देसाई केरळमध्ये; विमानतळावरच रोखले!

0

तिरुअनंतपुरमः शनिशिंगणापुरातील शनि चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई आता शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासाठी सरसावल्या आहेत. काही महिला कार्यकर्त्यांसह त्या केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र, त्यांना विमानतळावरच रोखण्यात आलं आहे.

शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी भुमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या केरळमध्ये पोहोचल्या आहेत. मात्र, येथील विमानतळावर आगमन होताच त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केल्याने तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच थांबावे लागलेय. आता त्या विमानतळावरुन कधी बाहेर पडणार आणि त्या मंदिरात प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तृप्ती देसाई आज पहाटे पुण्याहून आपल्या सात महिला कार्यकर्त्यांसह कोची येथे दाखल झाल्या. आंदोलकांनी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू नये, असे आवाहन देसाई यांनी केलं. ‘माझ्या जिवाला धोका आहे. गेल्या दोन दिवसांपासून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. केरळ सरकार आम्हाला कशा प्रकारे संरक्षण पुरवतं, यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितलं. केरळ सरकारकडून कोणतेही संरक्षण मिळाले नाही, तरी आम्ही पुढे जाणार आहोत, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

‘प्रादेशिक परिवहन’ला ३८ कोटी महसूल

0
नाशिक| प्रतिनिधी  दसरा व दिवाळी सणांमुळे नाशिक प्रादेशिक कार्यालयावर लक्ष्मीकृपा झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ६४९१ दुचाकी तर १ हजार ३०० चारचाकी वाहनांची विक्री झाली. त्यातून १८ कोटींचा महसूल जमा झाला आहे. ऑक्टोंबर महिन्यात ३१०० दुचाकी तर १३७० चारचाकी वाहनांची विक्री होऊन त्यातून १८. ५० कोटींचा महसूल मिळाला. वाहनधारकांना आवडत्या आकर्षक क्रमांकातून ९१ लाखांचा महसूल मिळाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली.
जीवनशैली गतिमान झाली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे प्रत्येकाची अपेक्षित कामे नियोजित वेळेत होत आहेत. गणेशोत्सव, दसरा व दिवाळी या सणांमुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. साडेतीन मुहूर्तांपैकी दिवाळीत येणारा एक मुहूर्त व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुटुंबियांकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असलेच पाहिजे, असा आग्रह अनेकांचा असतो. त्यामुळे वाहन खरेदी करण्यासाठी दुचाकी व चारचाकी शोरुममध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अनेकांंनी दसरा व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाहन मिळावे, यासाठी जादा रक्कमही मोजली.
अहिरे म्हणाले, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे एप्रिल ते ऑक्टोबर २०१८ या सात महिन्यात दुचाकी आणि चारचाकी मिळून सुमारे ४९ हजार ६०० नवीन वाहनांची नोंद झाली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात १२,२६१ नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. या नोंदीतून परिवहन कार्यालयाला ३६ कोटी ९९लाख रुपये महसूल मिळाला आहे.
दसरा आणि दिवाळी सणादरम्यान सप्टेंबर महिन्यात व ऑक्टोबर महिन्यात १२,२६१ इतक्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे. वाहनविक्रीतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ३६ कोटी ९९ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. १ लाख ५० हजार रुपयांच्या चॉइस क्रमांकाची मागणी सात वाहनधारकांनी केली होती. तर ७० हजार रुपयांच्या चॉइस क्रमांकाची मागणी ८ वाहनधारकांनी केली. ५० हजार रुपयांच्या चॉइस क्रमांकाची मागणी ३४ वाहनधारकांनी केली.
आवडत्या क्रमांकातून ९१ लाख
एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात सुमारे ४ हजार २०० वाहनधारकांनी आकर्षक क्रमांकाची मागणी केली. त्यातून ङ्गआरटीओफला ३ कोटी ११ लाखांचा महसूल जमा झाला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर २०१८ महिन्यात सुमारे १ हजार २२६ नवीन वाहनधारकांनी चॉइस क्रमांक घेतले. त्यातून परिवहन कार्यालयास ९१ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

पूर्व भागातील शेतकर्‍यांचा मंगळवारी वावीत रास्तारोको

0
सिन्नर |वार्ताहर  संपूर्ण तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असून शासनाकडून अत्यावश्यक उपाययोजनांसह पिण्याचे पुरेसे पाणी व जनावरांसाठी चार्‍याची व्यवस्था करण्यात आली नाही. दुष्काळ जाहीर करण्यापलीकडे शेतकर्‍यांना दिलासा देणारी कोणतीही कृती शासनाकडून केली जात नसून याचा निषेध करण्यासाठी येत्या मंगळवारी (दि.२०) सकाळी ११ वाजता वावी येथे शिर्डी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पूर्व भागातील शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे यांनी दिली.
शासनाने विशेष अधिसूचनेद्वारे सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी प्रशासनाकडे कोणतेही नियोजन नाही. शेतकरी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा मागणी करत असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यात शासकीय यंत्रणेला दुष्काळात जनतेला मदत करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडला नसल्याचा आरोप करत डॉ. शिंदे यांनी शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचा आरोप केला आहे.
पूर्व भागात जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. टँकरद्वारे वाड्या -वस्त्यांवर तसेच गावांमध्ये टँकरद्वारे सुरु असलेला पाणीपुरवठा पुरेसा नाही. याबाबत वर्णावर मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येते. दुष्काळी परिस्थितीचे प्रशासनाला गांभीर्य नसल्यानेच शेतकरी अडचणीत सापडला आल्याकडे आहे.
मागणी करूनही जनावरांसाठी चारा पुरवला जात नाही परिणामी बहुसंख्य शेतकर्‍यांनी आपल्या पशुधनाला बाजार दाखवला आहे. भुकेने व्याकुळ होणारी जनावरे दारासमोर मेलेली बघण्यापेक्षा कसायाला विकलेली बरी या निर्णयाप्रत तालुक्यातील व विशेषकरून पूर्व भागातील शेतकरी आले असल्याचे डॉ. शिंदे यांचेसह पूर्व भागातील शेतकर्‍यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शेतकर्‍यांकडे असणार्‍या जनावरांच्या संख्येच्या प्रमाणात पाणी व चारा पुरवावा. शेतीत काम नसल्याने मजुरांची होणारी उपासमार थांबवावी व त्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा ही शेतकर्‍यांची प्रमुख मागणी आहे.
या मागण्यांची शासनाकडून न मागता पूर्तता होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याने शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. मंगळवारी करण्यात येणार्‍या आंदोलनात पूर्व भागातील शेतकरी आपली जनावरे घेऊन रस्त्यावर उतरणार असून यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनची राहील असा इशारा शेतकर्‍यांच्या वतीने डॉ. शिंदे यांनी दिला आहे.
तहसीलदार नितीन गवळी यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले असून यावेळी नितीन अत्रे, भास्कर कहांडळ, चांगदेव हलवर यावेळी उपस्थित होते.
…तोपर्यंत समृध्दीचे काम नको
भोजापूरचे पूरपाणी हा पूर्व भागातील शेतकर्‍यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक पावसाळ्यात भोजापूर धरण ओव्हर फ्लो होते. मात्र अनेक वर्षांपासून एकदाही हे पाणी दुशिंगवाडीच्या बंधार्‍यात पोहचले नाही. धरणातून निघणार्‍या पुरचारीद्वारे दुशिंगपूरचा बंधारा भरून घेण्याचे नियोजन असते. मात्र पाटबंधारे विभागाकडून हे पूरपाणी भलतीकडेच वळवले जाते.
या पाण्यावर पूर्व भागातील शेतकर्‍यांचा हक्क असताना सातत्याने अन्याय केला जात आहे. याशिवाय भोजापूरमधून फुलेनगरच्या बंधार्‍यासाठी ४.३९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे. मात्र हे पाणी एकदाही फुलेनगरकरांना मिळाले नाही. गेल्या महिन्यात खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारातून फुलेनगर व दुशिंगवाडीच्या बंधार्‍यात पाणी पोचायला येणारे अडथळे दूर करून पुरचारी खोल व आवश्यक तेथे रुंद करण्यात आली आहे.
त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत असणारी गरज ओळखून या दिनही बंधार्‍यात भोजापूर धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी डॉ. शिंदे व पूर्व भागातील शेतकर्‍यांनी केली आहे. याशिवाय अकोले तालुक्यातील निळवंडे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सिन्नरमधील कहांडळवाडी, दुशिंगवाडी, मलढोण , सायाळे, पाथरे, वारेगाव हि सहा गावे येतात.
मात्र वितरिकांचे काम रखडल्याने या गावांना अद्याप प्रकल्पाचा फायदा झालेला नाही. हि सर्व गावे शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणार्‍या समृद्धी महामार्गात येतात. निळवंडेच्या वितरिकांचे काम पूण होऊन पाण्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याखेरीज समृद्धी महामार्गाचे काम सुरु करू नयेत ही देखील या आंदोलनातील मागणी असणार आहे.

 

चणकापूरचे ‘आवर्तन’ आज सुटणार

0
मालेगाव-सटाणा | प्रतिनिधी  कसमादे भागात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईचे पार्श्‍वभूमीवर आज  (दि. १६) रोजी चणकापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज दिले. या आवर्तनामुळे मालेगाव-सटाण्यासह गिरणावरील लहान-मोठ्या योजनांना पाणी उपलब्ध होवून सटाण्यासह अनेक गावांवरील पाणीटंचाईचे संकट दूर होणार असल्याने जनतेस दिलासा मिळाला आहे.
चणकापूर धरणात आजमितीस २ हजार ३११ द.ल.घ.फुट (९५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. चणकापूरच्या पाण्यावर मालेगावसह सटाणा, देवळा, दाभाडी बारागाव, कळवण आदी शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. कसमादे भागातील लहान-मोठ्या तब्बल ५२ योजनांना गिरणाव्दारे होत असलेल्या आवर्तनामुळे पाणी उपलब्ध होत असते.
मालेगाव शहरास पाणीपुरवठा करणार्‍या तळवाडे साठवण तलावालगत शंभर एकर जागेवर दुसर्‍या तलावाची निर्मिती मनपातर्फे करण्यात आल्याने ८४ द.ल.घ.फुट पाणीसाठा आवर्तनाव्दारे करता येणे शक्य झाले आहे. तळवाडे साठवण तलावात ३० द.ल.घ.फुट पाणीसाठा शिल्लक मालेगाव शहराचा पाणीपुरवठा दिवसाआड सुरळीत सुरू आहे.
मात्र अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे दाभाडी बारागाव योजनेतील अनेक गावांना १३ ते १४ दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली असल्याने या गावातील नागरीकांतर्फे डिसेंबरऐवजी नोव्हेंबर महिन्यातच चणकापूरचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी केली जात होती.
चणकापूर धरणातून गत तीन वर्षापासून शेती सिंचनासाठी डिसेंबर, जानेवारी दरम्यान एक आवर्तन सोडले जात आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठला असून अनेक पाझर तलाव व नाले कोरडे आहेत.
दाभाडीसह बारा गावांमध्ये १३ ते १४ दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तोही अपुर्ण वेळ होत असल्यामुळे पाणीटंचाईने ग्रामस्थ विशेषत: महिला अक्षरश: हवालदिल झाल्या होत्या. त्यामुळे सिंचन व पिण्यासाठी संयुक्त आवर्तन नोव्हेंबरमध्येच सोडावे, अशी मागणी येथे केली जात होती.
आजअखेर जिल्हाधिकार्‍यांनी पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत पाटबंधारे विभागास आदेश दिल्याने आज  सकाळी चणकापुरातून १ हजार क्युसेस पाणी गिरणा पात्रात सोडण्यास प्रारंभ होणार आहे. गिरणा नदीत सोडण्यात येणार्‍या आवर्तनाच्या पार्श्‍वभूमीवर नदीकाठावरील गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे आदेश संबंधित विभागास देण्यात आले आहेत.
सटाणावासियांची पाणीटंचाईतून मुक्तता
गेल्या काही दिवसांपासून एैन सणासुदीच्या काळात दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सनपातर्फे घेण्यात आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासियांना अक्षरश: भटकंती करण्याची वेळ आली होती. चणकापूरचे आवर्तन सुटण्याचे जाहिर झाल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
दहा ते अकरा दिवसाआड तोही अपुर्णवेळ होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे सनपा कारभाराविरूध्द जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. हा रोष टँकरव्दारे प्रभागात पाणीपुरवठा करत नगरसेवकांतर्फे कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. दहा दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे पाणी साठविण्यासाठी शहरवासियांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत होती. तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता डिसेंबरऐवजी नोव्हेंबर महिन्यातच चणकापूरचे आवर्तन सोडावे यास्तव आ. दिपीका चव्हाण, नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत साकडे घातले होते.
दरम्यान, आज (दि. १६) चणकापूर धरणातून ४०० द.ल.घ.फुट पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिल्यामुळे लखमापूर, ठेंगोडा, सटाणा, देवळा परिसरातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना तसेच कळवण तालुक्यातील इतर पाणीपुरवठा योजनांना दि. १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत चणकापूर धरणातून सोडण्यात येणार्‍या आवर्तनामुळे दिलासा मिळणार आहे.
शहरात सनपातर्फे दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. या आवर्तनामुळे येत्या १९ नोव्हेंबरपासून एक दिवासआड पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार असल्याचे मत नगराध्यक्ष मोरे यांनी व्यक्त केले.

कुटुंबाच्या भेटीने बंदिवान भारावले

0
नाशिकरोड | प्रतिनिधी  येथील मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांना आपल्या चिमुकल्यांसह कुटुंबियांची गळाभेट घेता आली. या गळाभेटीने बंदीवानासह त्यांच्या कुटुंबियांना अश्रु अनावर झाल्याचे दिसून आले. या दृश्याने कारागृहाचे चित्र भावनावश झाले होते.
बंदिवानांची कुटुंबियांशी गळाभेट व्हावी, मनमोकळ्या गप्पा मारता याव्या, यासाठी कारागृह प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविला जातो. असा उपक्रम नागपुर कारागृहात राबविण्यात आला होता. त्याच धर्तीवर हा उपक्रम येथेही राबविण्यात येत असून कारागृह अधिक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरंगाधिकारी वाय.बी. फड, अशोक कारकर, पल्लवी कदम यांच्या उपस्थित कार्यक्रमास सुरवात झाली.
सकाळी सहा वाजेपासूनच नाशिकसह औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, नगर, मुंबई आदीसह राज्याच्या कानाकोपर्‍यातुन कुटूंबीय बंदीवानांची भेट घेण्यासाठी हजर झाले होते. नेहमी केवळ तुरुंग अधिकारी, कर्मचार्‍यांची उपस्थिती असलेला कारागृह परिसर काल बंदिजनांच्या नातेवाइकांच्या गर्दीने भरून गेला होता.
यावेळी बंदिजनांसह त्यांचे कुटुंबिय भावनावश झाले होते. एकमेकांशी मुक्तपणे संवाद साधताना बंदिवानांवर कोणतेही बंधन नव्हते. बंदीवानाला भेटून आल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते. आपल्या माणसाला भेटण्याचे समाधान बंदीवानांच्या चेहर्‍यावर होते.
येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना महिन्यातून दोनदा जेलच्या कक्षात दूरवरून नातेवाइकांशी वीस मिनिटे संवाद साधण्याची परवानगी आहे. तर पंधरा दिवसांत रक्ताच्या नातेवाइकांशी फोनवर पाच मिनिटे बोलण्याचीही सुविधा आहे. मात्र गळाभेट उपक्रमाद्वारे एक तास मुक्तपणे कुटुंबीयांना भेटता येते. याद्वारे कठोर शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला जगण्याची उमेद मिळते.
गेल्या दोन वर्षापासून मध्यवर्ती कारागृहात हा उपक्रम राबविला जातो. यावेळी आप्तांनी बंदीवानांची भेट घेत पुढच्या भेटीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर जड अंत:करणाने त्यांना निरोप दिला.

पोलिसांच्या कॉर्नर मिटींगला प्रतिसाद

0
नाशिकरोड | प्रतिनिधी  सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे आणि उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सहका-यांसह देवळालीगावात नागरिकांची कार्नर मिटींग घेतली. कायदा सुव्यवस्थेबाबत जनजागृती करण्यात आली.
आम्रपाली झोपडपट्टी, जेतवननगर, लोखंडे मळा, हनुमाननगर, रोकडोबावाडी, फर्नांडिसवाडी, आऩंदनगर येथेही अशा मिटींग घेण्यात आल्या. मुक्तीधाम येथे वाहतूक समस्येबाबत बैठक घेऊन प्रबोधन करण्यात आले.
कायदा सुव्यवस्थित राखण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन वसावे यांनी केले. चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीला प्रतिबंध कसा करावा, थंडीत घरफोड्यांचे प्रमाण वाढते, त्याला आळा कसा घालावा याबाबत वसावे आणि रायते यांनी प्रबोधन केले.
सामाजिक संस्थांनी महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही लावण्याचे आवाहन करण्यात आले. एटीएम सुरक्षेबाबतही बँक अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. एटीएममध्ये अलार्म सिस्टीम, ई सव्हेलन्स सिस्टीम, डिटेक्टिंग सिस्टिम तसेच प्रभावी सीसीटिव्ही बसविण्याची सूचना पोलिसांनी केली.

सोनसाखळी चोराला अटक; मुद्देमाल जप्त

0
नाशिकरोड | प्रतिनिधी  उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चेन स्नॅचिंग करणार्‍या एका अट्टल चोरट्यास गुप्त माहितीच्या आधारे उपनगर पोलीसांनी शिताफीने अटक केली करत त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला असून त्याला न्यायालयात उभे केले असता पोलीस कोठडी देण्यात आली.
वपोनि प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा उघडकीस आला असून पोलीस कर्मचारी विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चेन ओरबाडणारा संशयित नाशिक-पुणे महामार्गावरील आयनॉक्स सिनेमाजवळ होता.
त्यानंतर पाटील यांच्यासह हवालदार सुर्यवंशी, पवार, टोपले, कुंवर, वाणी आदींनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला.
परंतु पोलीसांनी हिसका दाखवताच तो खरे बोलू लागला. चौकशीत त्याचे नाव अक्षय बलराज क्षत्रिय (२४) रा. देवळाली कॅम्प असे असल्याचे समजले असून त्याच्याविरूद्ध या आधी असाच गुन्हा दाखल झाला होता.
संशयिताने बोधले नगर परिसरात चेन ओरबाडल्याची कबुली दिली असून पोलीसांकडे मुद्देमाल जमा केला. पुढील तपास वपोनि रायते यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि बी.के.गवळी करीत आहेत.

16 November 2018

0

Social Media

26,850FansLike
5,154FollowersFollow
1,347SubscribersSubscribe
error: Content is protected !!