मंजूर कामांचा निधी दडवला

0

नाशिक |प्रतिनिधी  जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामातून मंजूर कामांचे प्रस्ताव सादर केले जात नसताना जिल्हाधिकार्‍यांनी या विभागाला स्मरणपत्र दिले. मात्र प्रस्ताव सादर करणे तर बाजूलाच जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांचा सुमारे २४ कोटींचा निधीही शासनाला परत न करता तो आपल्याकडेच दडवून ठेवल्याने प्रशासनाची विकासकामांबद्दलची उदासीनता यातून समोर आली आहे.

जिल्ह्याच्या विकास आराखड्यात विभागनिहाय कामे मंजूर करत त्यासाठी निधीची तरतूद केली जाते. यात सुमारे पन्नास टक्के कामे ही जिल्हा परिषदेची असतात. त्यामुळे या विकासकामांसाठी दिलेला निधी मुदतीत खर्च करणे अपेक्षित असते.

अखर्चित असलेला निधी त्याच आर्थिक वर्षात शासनाकडे परत करत पुन्हा पुढील आर्थिक वर्षात त्याची मागण्याची तरतूद आहे. राज्यस्तरीय इतर विभागांना हा नियम लागू आहे. परंतु जिल्हा परिषदेला मात्र हा निधी चालू आर्थिक वर्षासह लगतच्या आर्थिक वर्षातही ठेवण्याची परवानगी आहे.

त्यानुसार एक वर्ष जिल्हा परिषद अखर्चित कामांचा निधी ठेवू शकते. इतर विभागांच्या तुलनेत एका वर्षाची वाढीव मुदत असतानाही बांधकाम, आरोग्य, अंगणवाड्यांची तसेच पशुसंवर्धनसह बहुतांशी कामे जिल्हा परिषदेकडून झालीच नाही.

त्यामुळे २०१५-१६ या आर्थिक वर्षातील तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी शिल्लक राहिला. हा निधी पुढच्या वर्षी शासनास सादर करणे आवश्यक असतानाही तो केलाच नाही. शिवाय त्यानंतर २०१६-१७ या आर्थिक वर्षातील १६ कोटींचा विविध कामांवरील निधी अखर्चित राहिला.

अखर्चित निधी समर्पित करण्याचे आदेशही शासनाने दिले. परंतु अद्यापही तो जिल्हा परिषदेने समर्पित केला नाही. शिवाय तो खर्चही करता येत नसल्याने हा निधी पडून तरी उपयोग काय होणार? हा निधी शासन जमा केला असता तर पुन्हा तो शासनाकडून वितरित करून घेता आला असता. परंतु आता तसेही करणे शक्य नसल्याने निधी तत्काळ समर्पित करण्याचे आदेश जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी दिले आहेत.

 

 

22 September 2018

0

शनिवार, 22 सप्टेंबर 2018

0

406 घरकुलांसाठी 24 कोटींचा प्रस्ताव

0

जळगाव । पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वमालकीच्या जागेवर 406 घरकुल बांधण्यासाठी महानगरपालिकेने प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर 24 कोटीच्या निधीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

प्रत्येकांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना लागू केली. त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिकेने जून महिन्यात 406 लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार या प्रस्तावास म्हाडाकडून परवानगी मिळाली आहे.

त्यामुळे 406 लाभार्थ्यांना आपल्या स्वमालकीच्या जागेवर घर बांधण्यासाठी शासनाकडून अडीच लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. तर उर्वरीत खर्च हा लाभार्थ्यांनी स्वत: करावयाचा आहे. मनपाकडून लाभार्थ्यांना गटारी व रस्त्यांची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

406 लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे निधीसाठी देखील मनपाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दि.24 रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे. त्यानंतर केंद्रीय शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

पाळधी बायपासजवळ मोटारसायकल-स्कूलव्हॅनच्या धडकेत तिघे ठार

0
जळगाव । महामार्गावरील पाळधी बायपासजवळ मोटारसायकल-स्कूलव्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मोटारसायकलच्या मागे बसलेला युवक व स्कूलव्हॅनचालक दोघे जागीच ठार झाले. तर मोटारसायकलचालक गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना दुपारी त्याचादेखील मृत्यू झाला.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील सहयोग कॉलनीतील दिवाकर नारायण सोनकर हे त्यांच्या मालकीची एमएच 19 बीजे 2475 ही स्कूलव्हॅन घेवून पाळधीकडे इम्पिरिया स्कूलचे विद्यार्थी घेण्यासाठी जात होते. दरम्यान बन्सीलाल राठोड (रा.हिसाळे, ता.शिरपूर) व त्यांचा शालक अर्जून उत्तम पवार (रा.खडकातांडा, ता.एरंडोल) हे दोघे एमएच 19 बीके 3268 या मोटारसायकलीने एरंडोलकडून जळगावी येत होते. पाळधी बायपासजवळ मोटारसायकल व स्कूलव्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात मोटारसायकलच्या मागील बाजुस बसलेले बन्सीलाल राठोड हे स्कूलव्हॅनच्या काचेवर आदळले. तर स्कूलव्हॅनचालक दिवाकर सोनकर हे गाडीत दाबले गेले. त्यामुळे अपघातात बन्सीलाल राठोड व दिवाकर सोनकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलचालक अर्जून पवार हा गंभीर जखमी झाला. खासगी रुग्णवाहिकेने तिघांना तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी दोघांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. तर अर्जून याला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात हलविले. दुपारी त्याचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त दोन्ही वाहने पाळधी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाण जीवघेणे खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. त्यातच खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकवेळा अपघात होत असून यात नागरिकांचा जीव जात आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाची सहाय्यक संचालकांकडून पाहणी

0
जळगाव । जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षासाठीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीची महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर याठिकाणी आवश्यक असलेल्या गरजा तात्काळ पूर्ण करुन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिष्ठातांना दिल्या.

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून लागलीच द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यानुसार द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. द्वितीय वर्षाच्या तयारीचा देखील आढावा घेण्यासाठी एमसीआयचे पथक येणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील तयारीचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी अचानक जिल्हा रुग्णालयास भेट दिली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील उपस्थित होते.

प्रत्येकाने घरच असल्या सारख काम करा- डॉ. प्रकाश वाकोडे
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापकांसह कर्मचार्‍यांची बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी कर्मचार्‍यांना सुचना दिल्या. दरम्यान सर्व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करतांना सहाय्यक संचालक डॉ. वाकोडे म्हणाले की, प्रत्येक अधिकारी कर्मचार्‍याने महाविद्यालय व रुग्णालय हे आपलं घर असून आपल्या घरात ज्या प्रमाणे आपण जस काम करतो. त्याप्रमाणेच मन लावून काम करा असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महाविद्यालयाला येणार्‍या अडचणी त्यांनी जाणून घेत स्थानिक पातळीवर ज्या अडचणी सोडविता येणे शक्य आहे. अशा अडचणी तात्काळ सोडविण्याच्या सुचना त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या.

द्वितीय वर्षासाठीचे नियोजनाचा घेतला आढावा
वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला सुरुवा झाली असून द्वितीय वर्षासाठीचे नियोजन महाविद्यालयाकडून केले जात आहे. यामध्ये द्वितीय वर्षात विद्यार्थ्यांना शरीरविकृत शास्त्र, सुक्ष्मजीव शास्त्र, औषध शास्त्र, जनआवश्यक शास्त्र, न्यायवैद्यकीय शास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याने या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यासाठी पूर्व नियोजन करुन त्यासाठी आवश्यक असलेली जागा, मनुष्यबळ यासह यंत्रसामुग्रीचे नियोजन करुन त्याबाबतचा आढावा वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी घेतला.

रुग्णालय, महाविद्यालयासह वस्तीगृहांची केली पाहणी
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहाय्यक संचालकांनी महाविद्यालय, रुग्णालय यासह प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची पाहणी केली.

Social Media

26,092FansLike
5,154FollowersFollow
1,134SubscribersSubscribe
error: Content is protected !!