गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन

0

नाशिक : गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी नाशिक पोलिसांच्या वतीने शहरात ध्वजसंचलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सीपी कार्यालयापासून ते शहरातील उद्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मार्गावर हे ध्वजसंचलन करण्यात आले.

शहर पोलिसांच्या वतीने आज शहरातील सीपी कार्यालयापासून पोलिसांनी ध्वजसंचलनाला सुरवात केली. यामध्ये २०० ते २५० पोलिसांचा सहभाग होता. शहरातील महत्वाची पोलीस स्टेशन सहभागी होते. पोलीस, कमांडो, दंगा पथक अन्य पोलीस फोर्स सोबत हे ध्वजसंचलन करण्यात आले.

नाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन

0

देशदूत डिजिटल वृत्त

सातपूर (विशेष प्रतिनिधी) ता. २२ : नाशिकच्या रस्त्यांवर येत्या काही दिवसांतच स्मार्ट एलईडी दिव्यांचा झगमगाट पसरणार आहे. आवश्यकतेनुसार उजेड कमी जास्त करण्याची या दिव्यांची क्षमता असून त्यामुळे वीजेचीही बचत होणार आहे.

याशिवाय येत्या तीन महिन्यांत नाशिकमध्ये भूमिगत गॅस पाईपलाईनचे काम सुरू होत असून नाशिककरांना आता पाईपमार्फत घरगुती इंधन गॅस मिळणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत पुढील तीन वर्षांत या पाईपलाईनचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.‍

आज ‘वॉक वुईथ कमिशनर’ या उपक्रमांतर्गत आज पाईपलाईन रोड, आनंदवल्ली येथील जॉगिंग ट्रॅकवर नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लोकांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

यावेळी अनेक नागरिकांनी मांडलेल्या अनेक समस्यांचा निपटारा करण्यात आला. भटकी कुत्री, रस्त्यावरील खड्डे अशा अनेक समस्या यावेळी नागरिकांनी मांडल्या.

भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण सुरू असून आगामी काळात त्याचा अपेक्षित परिणाम दिसेल, तसेच शहरातील खडीकरण केलेल्या रस्त्यांचे लवकरच डांबरीकरण करण्यात येणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.

पाळीव प्राण्यांची काळजी नागरिकांनी स्वत:च घ्यायची असून त्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षताही घ्यायची आहे. जर पाळीव कुत्र्यांचा नागरिकांना त्रास झाला, तर त्याच्या मालकांवर कारवाई केली जाईल अशी तंबीही यावेळी देण्यात आली.

शहरासाठी फुटपाथ, सायकल ट्रॅक, खेळाची मैदाने, सक्षम शहर वाहतूक व्यवस्था, खडीकरण झालेल्या रस्त्यावर आधी डांबरीकरण करणे यावर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले.

आज या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मंजूर कामांचा निधी दडवला

0

नाशिक |प्रतिनिधी  जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामातून मंजूर कामांचे प्रस्ताव सादर केले जात नसताना जिल्हाधिकार्‍यांनी या विभागाला स्मरणपत्र दिले. मात्र प्रस्ताव सादर करणे तर बाजूलाच जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांचा सुमारे २४ कोटींचा निधीही शासनाला परत न करता तो आपल्याकडेच दडवून ठेवल्याने प्रशासनाची विकासकामांबद्दलची उदासीनता यातून समोर आली आहे.

जिल्ह्याच्या विकास आराखड्यात विभागनिहाय कामे मंजूर करत त्यासाठी निधीची तरतूद केली जाते. यात सुमारे पन्नास टक्के कामे ही जिल्हा परिषदेची असतात. त्यामुळे या विकासकामांसाठी दिलेला निधी मुदतीत खर्च करणे अपेक्षित असते.

अखर्चित असलेला निधी त्याच आर्थिक वर्षात शासनाकडे परत करत पुन्हा पुढील आर्थिक वर्षात त्याची मागण्याची तरतूद आहे. राज्यस्तरीय इतर विभागांना हा नियम लागू आहे. परंतु जिल्हा परिषदेला मात्र हा निधी चालू आर्थिक वर्षासह लगतच्या आर्थिक वर्षातही ठेवण्याची परवानगी आहे.

त्यानुसार एक वर्ष जिल्हा परिषद अखर्चित कामांचा निधी ठेवू शकते. इतर विभागांच्या तुलनेत एका वर्षाची वाढीव मुदत असतानाही बांधकाम, आरोग्य, अंगणवाड्यांची तसेच पशुसंवर्धनसह बहुतांशी कामे जिल्हा परिषदेकडून झालीच नाही.

त्यामुळे २०१५-१६ या आर्थिक वर्षातील तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी शिल्लक राहिला. हा निधी पुढच्या वर्षी शासनास सादर करणे आवश्यक असतानाही तो केलाच नाही. शिवाय त्यानंतर २०१६-१७ या आर्थिक वर्षातील १६ कोटींचा विविध कामांवरील निधी अखर्चित राहिला.

अखर्चित निधी समर्पित करण्याचे आदेशही शासनाने दिले. परंतु अद्यापही तो जिल्हा परिषदेने समर्पित केला नाही. शिवाय तो खर्चही करता येत नसल्याने हा निधी पडून तरी उपयोग काय होणार? हा निधी शासन जमा केला असता तर पुन्हा तो शासनाकडून वितरित करून घेता आला असता. परंतु आता तसेही करणे शक्य नसल्याने निधी तत्काळ समर्पित करण्याचे आदेश जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी दिले आहेत.

 

 

22 September 2018

0

शनिवार, 22 सप्टेंबर 2018

0

406 घरकुलांसाठी 24 कोटींचा प्रस्ताव

0

जळगाव । पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वमालकीच्या जागेवर 406 घरकुल बांधण्यासाठी महानगरपालिकेने प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर 24 कोटीच्या निधीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

प्रत्येकांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना लागू केली. त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिकेने जून महिन्यात 406 लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार या प्रस्तावास म्हाडाकडून परवानगी मिळाली आहे.

त्यामुळे 406 लाभार्थ्यांना आपल्या स्वमालकीच्या जागेवर घर बांधण्यासाठी शासनाकडून अडीच लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. तर उर्वरीत खर्च हा लाभार्थ्यांनी स्वत: करावयाचा आहे. मनपाकडून लाभार्थ्यांना गटारी व रस्त्यांची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

406 लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे निधीसाठी देखील मनपाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दि.24 रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे. त्यानंतर केंद्रीय शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

Social Media

26,092FansLike
5,154FollowersFollow
1,135SubscribersSubscribe
error: Content is protected !!