पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या विकास आराखड्यासाठी ५ कोटींची तरतूद

0

नांदगांव । दि.२० (संजय मोरे) | अतिप्राचीन पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी आमदार पंकज भुजबळ यांनी वनपर्यटन अंतर्गत वन पर्यटन केंद्र मंजूर केलेले असून त्यासाठी विकास कामांच्या आराखड्यास सद्यस्थितीत ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

असून  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत वनहक्क कायद्याअंतर्गत वन विभागाची परवानगी मिळवून पिनाकेश्वर मंदिरावर वीज पोहचविण्यात आली आहे. प्रामुख्याने पिनाकेश्वर मंदिरावर जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न महत्वाचा आहे आणि तो प्रश्न सोडविण्यासाठी आमदार पंकज भुजबळ यांनी सातत्याने मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक नाशिक) व वनसंरक्षक पूर्व भाग नाशिक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचेशी चर्चा करून व त्यांनी केलेल्या सूचनेनुसार दि. १९ सप्टेंबर रोजी रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यामुळे लवकरच रस्याचा प्रश्न सुटणार आहे.

तसेच ढेकु खु. येथिल नाथआश्रम परिसराचा देखील वन पर्यटन अंतर्गत विकास व्हावा यासाठी आमदार पंकज भुजबळ यांनी वनमंत्री यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यासंदर्भात सकारात्मक आदेश वन मंत्र्यांमार्फत सचिवांना देण्यात आलेले आहे. या परिसराचाही विकास करण्याच्या दृष्टीकोनातून आमदार पंकज भुजबळ प्रयत्नशील आहेत. या अगोदरही नांदगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपुरचा छगन भुजबळ  यांच्या माध्यमातून विकास करण्यात आलेला आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष  संतोष गुप्ता, आमदार पंकज भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक अशोक गायकवाड, राजेंद्र लाठे, नारायण पवार, विजय पाटील, पंढरीनाथ पवार, अंकुश वर्पे, कैलास तुपे, शिवाजी गायकवाड, विष्णू माळकरी, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता  पाटील,  संरक्षक  कापसे, वनक्षेत्रपाल  भंडारी, वनपाल दौंड येथील  ग्रामस्थ उपस्थित होते.

गणेश विसर्जनासाठी ३० नैसर्गिक तर ४६ ठिकाणी कृत्रिम तलाव

0
File photo
नाशिक | गोदाप्रदूषण रोखण्यासाठी येत्या रविवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी नाशिक महानगरपालिकेने ३० ठिकाणी नैसर्गिक तर ४६ ठिकाणी कुत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. शहरातील विविध भागात नदीकाठी ही व्यवस्था मनपाकडून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक, गंगापूर रोड, नाशिक पूर्व, पश्चिम अशा विविध विभागात तलाव उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच नाशिकमधील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मूर्ती संकलन, देव द्या देवपण घ्या सारखे उपक्रम गणेश विसर्जनस्थळी राबविण्यात येणार आहेत.

नाशिकमधील ३० नैसर्गिक तलाव

पंचवटी- राजमाता मंगल कार्यालय, सीता सरोवर म्हसरूळ, नांदूर, मानूर गोदाघाट, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा, रामवाडी जॉगींग ट्रॅक.

नाशिक पूर्व- लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ परिसर, नंदीनी गोदावरी संगम.

सातपूर- आनंदवल्ली गाव घाट, सोमेश्वर मंदिर घाट, गंगापूर धबधबा, अंबड लिंकरोडवरील नंदीनीनदी पुल, मते नर्सरी पुल, आयटीआयपुल औदुंबरनगर.

नाशिकरोड- चेहडी गाव दारणा नदीपात्र, पंचक गोदावरीघाट, दसक घाट, वालदेवी नदी देवळालीगाव, वडनेर पंपींग नदीकिनारी, विहीतगाव वालदेवी नदीकिनारी.

नाशिक पश्चिम- य. म. पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिध्देश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमानघाट, अशोकस्तंभ.

गणेश विर्सजनासाठी कृत्रिम तलाव

पंचवटी- राजमाता मंगल कार्यालय, गोरक्षनगर कृत्रिम, आरटीओ, सीता सरोवर म्हसरूळ, नांदूरमानूर, कोणाकॅनगर, तपोवन, गौरी पटांगण, नरोत्तम भवन पंचवटी कारंजा, रामवाडी जॉगींग ट्रॅक.

नाशिक पूर्व- लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ परिसर, नंदिनी गोदावरी संगम परिसर, साईनाथनगर चौक, रामदास स्वामीनगर टाकळीरोड, शिवाजीवाडीपुल नंदिनीनदीजवळ, किशोरनगर शारदा शाळेजवळ, राणेनगर, कलानगर चौक राजसारथी सोसायटी.

सातपूर- आनंदवली गाव घाट परिसर,सोमेश्वर मंदिर परिसर, गंगापूर धबधबापरिसर, अंबडलिंकरोडवरील नंदिनी पुल परिसर, मते नर्सरीपुल परिसर, आयटीआय पुल औदुंबरनगर, शिवाजीनगर धर्माजी कॉलनी, रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ पाईपलाईनजवळ, अशोकनगर पोलिस चौकी.

नाशिकरोड- मुक्तीधाममागे मनपा शाळा क्रमांक १२५ मैदान, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी जयभवानी रोड, मनपा मैदान चेहडी पंपंीग श्रमिकनगर ट्रक टर्मिनस, नारायण बापू चौक जेलरोड.

नाशिक पश्चिम- चोपडा लॉन्स पुल परिसर, चव्हाण कॉलनी परिची बाग पंपीग स्टेशन परिसर, फॉरेस्ट नर्सरी पुल, बॅडमिंटन हॉल येवलेकर मळा, दोदें ब्रिज नदींनीनदी पुल, महात्मा नगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्लब ग्राऊंड जुनी पंडित कॉलनी, शितला देवी मंदिर, टाळकुटेश्वर मंदिराजवळ.

सिडको – राजे संभाजी स्टेडीअम अश्विननगर, डे केअर सेंटर इंदिरानगर, जिजाऊ वाचनालय गोदिवंदनगर, पवननगर पाण्याची टाकी, कामटवाडा शाळा, वालदेवी नदीघाट कृत्रिम पिंपळगाव खांब.

नगर टाइम्स ई-पेपर : गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

0

मनमाडमध्ये मुस्लीम युवक गणेशोत्सव मंडळ ‘अध्यक्ष’ तर हिंदू पाच पिढ्यांपासून करतात ‘मोहरम’

0

मनमाड (बब्बू शेख) | ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना, हिंदी है हम! वतन हिंदुस्तान हमारा’ या उक्तींचा आदर्श देणारी घटना मनमाडमध्ये घडली आहे. मनमाडमधील सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष मुस्लीम तरुण आहे.  त्यांच्याकडून जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतानाच शहरातील हिंदू कुटुंबिय भक्तिभावाने मोहरम सण त्यांच्या पाच पिढ्यांपासून साजरा करत आहे.

गणेशोत्सव आणि मोहरम एकाच वेळी आल्यामुळे या घरात गणपती बाप्पा आणि मोहरम असे दोन्ही उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी होत असल्यामुळे सध्या मनमाडमधील या घटनेची चर्चा पंचक्रोशीत चांगलीच रंगली आहे.

पाच पिढ्यांपासून या कुटुंबियात मोहरम निमित्त ताजीये (डोले) बनविले जातात. यंदा तर मोहरम व गणेशोत्सव सोबत आल्याने या कुटुंबियाच्या घरात एकाच वेळी मोहरम व गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे घर जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतिक बनले आहे.

मनमाड शहराच्या शिवाजी चौकातील राजू गायकवाड व त्यांचे कुटुंबिय ब्रिटीश काळापासून राहतात. त्यांना हतगडी नावाने ओळखले जाते. या कुटुंबियात पाच पिढ्यांपासून ताजीये बनवून भक्तिभावाने मोहरम साजरा करण्याची परंपरा आहे.

मोहरमचे चंद्रदर्शन होताच गायकवाड कुटुंबिय ताजिया (डोले) बनविण्याच्या कामाला सुरुवात करतात. दरवर्षीप्रमाणे यंदा ही मोहरमचे चंद्रदर्शन होताच त्यांनी ताजिये बनविण्यास सुरुवात केली.

घरातील सर्वजण दहा दिवस परिश्रम करून केवळ ताजीयेच बनवत नाही तर मोहरमच्या सर्व प्रथा देखील काटेकोरपणे पाळतात. यंदा मोहरम व गणेशोत्सव हे दोन्ही सण सोबत आले असल्यामुळे गायकवाड कुटुंबिय एकीकडे मोहरमसाठी ताजीये बनवीत असतानाच घरातील बाप्पांचीदेखील विधिवत पूजा अर्चा ते करतात.

मी जेंव्हा सून म्हणून मनमाडला आली तेंव्हा माझ्या सासूबाईनी मला मोहरम साजरा करण्याबाबत माहिती देतांना सांगितले की, त्यांच्या घराण्यात पांच पिढ्यापासून मोहरम साजरा करण्याची परंपरा आहे. या घराण्यातील पूर्वजांनी नवस केला आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या मोहरम निमित्त ताजिया बनवून त्यांची मिरवणूक काढून मोहरम पारंपारिक पद्धतीने साजरा करतील. आज माझ्या सासूबाईनी सांगितल्याप्रमाणे मी व माझे मुले ही परंपरा कायम ठेवून मोहरम साजरा करीत आहोत. मोहरम साजरा करतानाच आम्ही घरात बाप्पाच्या मूर्तीचीदेखील प्रतिष्ठापना केली असून विधिवत पूजा अर्चा आम्ही दररोज करतो.

रुपाली गायकवाड,  सून

Ganeshotsav With Difference

0

Gaurav Pardeshi                                                                                                NASHIK: The whole country is going frenzy with the festivities. Bright and colourful idols of Lord Ganesha are installed everywhere with a lot of enthusiasm and excitement. There are many who have displayed their creativity in the installation of Ganapati. Most of them have expressed a care for the environment through their idol or decoration. Using innovative ideas, people in Nashik city have also displayed a sense of responsibility in the celebrations this festive season. In Nashik city. Deshdoot Times talks to a few citizens who have used such innovative and eco-friendly ideas.

Sachin Joshi, founder Espilier School – Among the school’s beliefs, is important to nature. So the celebration of the Ganapati festival in school has to be eco-friendly. We also teach our students to respect nature and trees and so the idea was to see god in trees in the most natural form.  Our teachers and students decided to make an idol of the coconut tree in the campus and used dried leaves and natural stuff to make ears and trunk of the god. The festival was started by Tilak to bring about social awareness and we thought that we can be in line if we propagate the idea that one should respect trees as you respect to god.

 

  Kiran Patil, founder of Yuva Astitva Foundation, Nashik.- Keeping in mind that we all need to contribute to the environment, we have done a very simple and yet beautiful decoration by using bricks. We have arranged bricks in piles and these can be reused. We have done a deliberate avoidance of plastic. The Mandal has also put up messages for social awareness for ‘Beti Bachav, Beti Padhav’ , ‘Aai-vadil hech khare daivat’, Niradhar aani garjunna madat kara’.

 

Amol Kulkarni, psychologist and environment activist, Nashik Road – Since many years me and my friend Prashant Belgaonkar have been going to schools for creating awareness for environmental Ganapati celebration and immersion. In continuation of that since last few years we have developed the concept of Ankur Ganesh which is an idol of Gnapati made out of black soil available locally and we have put seeds in the idol. So when it is immersed in a pot the idol dissolves to mud and the seeds germinate into a plant. This is an eco friendly alternative to Plaster of Paris and also to Shadu mud which is now being excavated in large quantities.

Sanjay Kamble, a resident at Samangao, Nashik – We have installed Ganapati idol made up of paper pulp. Devotees of the Aniruddha Bapu ashram write Ramnam on notebooks and every year we collect over 50 lakh such notebooks from all over India.  To make best use of these we make Ganapati idols from this paper pulp mixed with shadu mud. We install these idols specially made and we cherish the feeling that the Ganapati is made from Ramnam.

 

अमेरिकेतील सेंट लुईसमधील गणेशोत्सव

0
कुठल्याही शुभकार्याचा आरंभ करावयाचा असेल तर गणपतीची पूजा करतात. भारतासोबतच विविध देशातील आणि शहरातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे.
भारतातील अनेक नागरिक कुठल्या ना कुठल्या कारणास्तव विदेशात वास्तव्यास गेले आहेत. आहेत त्याच ठिकाणी एकत्र येऊन ते भारतीय संस्कृती जपतात.
गणेशोत्सवदेखील त्यातीलच एक भाग आहे. अमेरिकेतील सेंट लुईसमधील गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात गेल्या ४५ वर्षांपासून साजरी केला जातो. विशेष म्हणजे अनेकांची वार्षिक कार्यकारिणी गणेशोत्सवापासून सुरु होते.
सेंट लुईसमध्ये ४५ वर्षांपूर्वी गणेशमंडळाची स्थापना  झाली.  तेव्हा  येथील  सदस्यसंख्याही  अगदी  एका  हाताच्या  बोटावर  मोजण्याईतकी  होती. गणेशोत्सवाचा प्रारंभ एका तळघरात गणपती बसवून झाली होती असे अनेकजण सांगतात.
सगळा  प्रसाद , जेवणाचा  बेत  सगळ्यांनी  घरी  तयार  करून  आणला.  मातृभूमी  आणि  आपल्या  कुटुंबापासून  हजारो मैल दूर असूनही याठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची रीत तेव्हापासून रुजली.
विदेशातील भारतीयांची संख्या वाढू लागली. कालांतराने अनेक सदस्य जोडली गेली. अनेक नवीन सदस्य  येताना  नव्या  कल्पना  सोबत  घेऊन  आले. त्यानंतर गणेशोत्सवाचे स्वरूपदेखील बदलले. कार्यक्रमांच्या  स्वरूपात  बदल  झाला.  आणि येथील गणेशोत्सव जगात प्रसिद्ध झाला.
सेंट ल्युईस येथे  एक  छोटेसे गणेश  मंडळ  आहे. दरवर्षी गणेशोत्सव याठिकाणी जल्लोषात साजरी केला जातो. हिंदू  मंदिरात एक गांधी  केंद्र  आहे,  येथे गणेश उत्सव साजरी होतो. गणेशोत्सव काळात प्रसिद्ध उकडीचे  मोदक येथेही बनवले जातात.
विसर्जनाच्या दिवशी सकाळी  ११ वाजता  लेझीम  आणि  टाळ्यांच्या  गजरात  बाप्पाची  मिरवणूक  निघते.  गणपती  बाप्पा  मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!  अशा  घोषणा देत सेंट ल्युईस शहरातून भक्तिभावात मिरवणूक निघते.
गणरायाची  विधिवत पूजा  केली जाते. नेवैद्य  दाखवला  जातो.  मंत्रपुष्पांजली  आणि  गणपती अथर्वशीर्षयाचे  पठण करून  गणेशभक्त  भोजनाचा आस्वाद  घेतात.  जेवणात  श्रीखंड पुरी , मसाले  भात, मटकीची  उसळ  आणि  प्रत्येक ताटात  उकडीचे  मोदक असतात. नंतर  सांकृतिक  मनोरंजन व  स्थानिक  कलाकारांच्या  कलाप्रदर्शनाने  कार्यक्रमाची सांगता होते.
सेंट लुईस  विषयी  थोडेसे 
सेंट लुईस  हे   अमेरिकेच्या  मिड  वेस्ट  भागातील मध्यम शहर आहे. या शहराची  सध्याची  लोकसंख्या  ३ लाख ८ हजार ६२६ इतकी आहे. अमेरिकेच्या  महत्वाच्या शहरामध्ये या शहराचा समावेश होतो.
संकलन : सलिल  परांजपे, नाशिक

सुपर फोरमध्ये उद्या भारत-बांग्लादेश लढत

0

यूएई दि. २० | युनिमनि आशिया  चषकात  सुपर फोरची उद्या लढत होत आहे. पाकिस्तान नंतर भारताचा प्रतिस्पर्धी संघ म्हणून बांग्लादेशकडे बघितले जाते. हॉंगकॉंगकडून निसटता विजय संपादन केल्यानंतर भारताने कालच्या  भारत पाक रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानला धूळ चारत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

बांग्लादेशसाठी  चिंतेची  बाब  म्हणजे  मुशफिकूर  रहीम  वगळता  इतर  फलंदाजाचे अपयश. तसेच तमीम  इक्बालच्या  तंदुरुस्तीबाबत  प्रश्नचिन्ह? असल्याने बांगलादेश सध्या तरी कमकुवत परिस्थितीत आहे.

भारत  आणि  बांगलादेश  या दोन्ही  संघांची आशिया  चषकातील  कामगिरीवर  नजर  टाकली  तर  भारताचे  पारडे  कायमच  जड राहिले  आहे.  २०१२ साली  झालेल्या  भारत  बांगलादेश  सामन्यात  बांगलादेश संघाने  भारताला  पराभूत  केले  होते त्यामुळे भारताला बांगलादेशविरोधात योग्य रणनीती आखून मैदानात उतरावे लागणार आहे.

कमकुवत समजल्या जाणाऱ्या बांग्लादेशने २०१५ विश्वचषकापासून ते २०१७ चॅम्पिअनस करंडकापर्यंत उल्लेखनीय कामगिरी मैदानात केली आहे.

आज  हा संघ जगातील कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो इथवर ते येऊन पोहोचले आहेत. भारताप्रमाणेच  बांगलादेश  संघातही  सामन्याचा निकाल बदलू शकणारे अनेक खेळाडू आहेत. भारतीय  संघाचा  अष्टपैलू  हार्दीक  पंड्या  पाकविरुद्ध  लढतीत  पाठदुखीमुळे  फलंदाजी  आणि  गोलंदाजी  करू  शकला  नाही. त्यामुळे  बांगलादेश  विरुद्ध तो खेळणार  की  नाही हे अस्पष्टच आहे.

असा असेल भारतीय  संघ : रोहीत  शर्मा  (कर्णधार), शिखर  धवन , लोकेश  राहुल , आंबटी  रायुडू , केदार  जाधव , मनीष  पांडे , हार्दीक  पंड्या , अक्षर  पटेल , कुलदीप  यादव , दिनेश  कार्तिक , एम एस  धोनी (यष्टीरक्षक), युझवेन्द्र  चहल , शार्दूल  ठाकूर , खलील  अहेमद , जसप्रीत  बुमराह  आणि  भुवनेश्वर  कुमार.

बांगलादेश  संघ : तमीम  इक्बाल , लिटोन  दास , मुशफिकर  रहीम , शाकीब अल  हसन , महेंदी  हसन , नजमूल  हुसेन शांतो , मोमिनुल  हक , अबू  हैदर , मुस्ताफिझूर  रहमान , मोश्रफी  मोर्तझा (कर्णधार), रुबेल  हुसेन , मोहमदुलाह , अरीफुल  हक.

  • सलील  परांजपे  देशदूत  नाशिक

पोलीस अधीक्षकांच्या एक गाव एक गणपतीला १०२३ गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नाशिक | पोलीस अधीक्षकांच्या एक गाव एक गणपती या आवाहनाला जिल्ह्यातील १०२३ गावांनी प्रतिसाद दिला आहे. पोलीस प्रशासनाकडून तंटा मुक्त समितीच्या माध्यमातून गावागावांत एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे. यामुळे गावात शांतता टिकून आहे तसेच जातीय सलोखा निर्माण झाला आहे.

पोलीस अधीक्षक संजय दराडे जिल्ह्यातील गणेशोत्सवाला भेट देत आहेत. गणेशोत्सव काळात डाल्बी/ डी.जे.च्या आवाजाचा सर्वसामान्य नागरीक, रूग्ण, महिला, लहान मुले व वृध्द व्यक्तींना त्रास होवु नये व ध्वनीप्रदूषणास बसावा यासाठी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांतर्फे शाळा महाविद्यालयांमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, प्रचार फे-या, पथनाटये आयोजित करून जनजागृती केली जात आहे.

पोलीस अधीक्षक दराडे यांनी ओझर व पिंपळगाव येथील गणेश मंडळांना भेट दिली. मुंबई आग्रा हायवेवर असलेल्या गणेशोत्सव मंडळांनादेखील दराडे यांनी भेट देत विविध उपक्रमांची प्रशंसा केली.

 कर्जबाजारीपणातून होळपिंप्रीत शेतक-यांची आत्महत्या

0
रत्नापिंप्री ता.पारोळा :  वार्ताहर |  येथून जवळच असलेले होळपिंप्री येथिल शेतक-यांने निसर्गाच्या लहरीपणा व कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली

याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक होत असतांना उधार उसनवारीने घेतलेला पैसा आणि आपल्या कुटूंबाचा पालन पोषणाचा गाडा कसा चालणार ह्या विवंचनेत  होळपिंप्री येथिल शेतकरी राजू नामदेव वानखेडे या शेतकरी पुत्राने दि.२० सप्टेंबर रोजी पहाटे ५:३० ते ६ वाजेच्या सुमारास आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली

ह्या घटनेची माहिती होताच रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री ग्रामस्थांनी गर्दी केली तर होळपिंप्रीचे पोलिस पाटील गौतम भालेराव, रत्नापिंप्रीचे पोलिस पाटील प्रभाकर पाटील, दबापिंप्रीचे पोलिस पाटील प्रकाश भागवत यांनी पारोळा पोलिस स्टेशनला माहिती दिली याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली

मृत शेतक-यांच्या  पश्चात आई,वडील, पत्नी, भाऊ, मुले असा परीवार आहे ते नामदेव लवखा वानखेडे यांचा मोठा मुलगा होत

सारडा सर्कल ते दत्त मंदिर चौक उड्डाणपुल लवकरच; साडेबाराशे कोटी येणार खर्च

0
नाशिक । व्दारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सारडा सर्कल ते दत्तमंदिर दरम्यानचा उडडाणपुल बांधण्यासाठी अखेर मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ७.२३ किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे बांधकाम केले जाणार आहे, अशी माहिती देवळाली लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

गेल्या तीन वर्षांपासून व्दारका ते दत्तमंदिर या मार्गावर चारपदरी उडडाणपूल व्हावा याकरीता केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर प्रस्तावाला मंजुरी देत तांत्रिक सल्लागार कंपनीची निवड करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या सर्व कामांचा गोडसे पाठपुरावा करत होते.

द्वारका सर्कल हे नाशिकचे मुख्य प्रवेशव्दार आहे. वाहतूक कोंडी निर्माण झाल्यावर याठिकाणी नाशिकरोडच्या बाजूने, मुबई नाक्याच्या बाजूने तसेच शालिमारच्या बाजूने सुमारे दोन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. सर्वेक्षणाच्या आधारे थेट सहा ठिकाणी चढ-उतारासाठी रॅम्प असलेला सारडा सर्कल ते दत्त मंदीर असा पूल करावा असे सुचविण्यात आले होते.

त्यानूसार आकार अभिनव या कंपनीने सदरच्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व्हेक्षण करून विविध पर्याय सुचवले होते. पुणे, मुंबई आणि नाशिक शहरात येणार्‍या वाहनांचा संगम व्दारका चौकात होतो. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची अधिक गर्दी होते.

व्दारकापासून नाशिकरोडकडे जाणारी 60 टक्के वाहने ही पुण्याकडे जाते. असे सर्व्हेक्षणाचा अहवालावरून सांगण्यात आले होते. तसेच शहरांतर्गत या मार्गावरून 55 टक्के दुचाकी, 16 टक्के रिक्षा, 17 टक्के कार, 70 टक्के खाजगी वाहने आणि 3 टक्के बस वाहतूक होत असल्याचेही स्पष्ट झाले होते.

Flyover between Sarda Circle to Dutta Mandir Chowk soon: Godse

Social Media

26,082FansLike
5,154FollowersFollow
1,129SubscribersSubscribe
error: Content is protected !!