मनमाड चौफुलीवर तिहेरी अपघात; बस पेटली, चालकाचा होरपळून मृत्यू

0
मालेगाव दि. २३ प्रतिनिधी 

शहराजवळील चंदनपूरी शिवारात आगळ्या-पंढाळा नाल्याजवळ खासगी लक्झरी बसेसचा तिहेरी अपघात झाला. यात बसने पेट घेतल्याने बसचालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर पंधरापेक्षा अधिक प्रवासी या घटनेत जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला. मालेगाव-मनमाड रस्त्यावर अचानक एका खासगी बस चालकाने ब्रेक लावल्याने पाठीमागून येणार्‍या दुसर्‍या बसने धडक दिली अशी माहिती प्रत्यक्षदर्शीकडून समजते.

पाठीमागून धडक दिलेल्या बसला पुन्हा मागून एका लक्झरी बसने धडक दिली. त्यानंतर बसने पेट घेतला या बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र चालक अडकलेला होता.

अशा या तिहेरी विचित्र अपघातात एका बसमधील चालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर एकूण १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी आहेत. जखमींना मालेगावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी मालेगाव पोलिसांनी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मदतकार्य सुरु होते.

 

अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन फसवल्याप्रकरणी ११ जण ताब्यात

0

नाशिकरोड | प्रतिनिधी अमेरिकेतील नागरिकांशी ऑनलाईन संपर्क साधून तुम्हाला एस एस ए ही पॉंलिसी बंधनकारक आहे. या पॉलीसी  कोंडचा दुरउपयोग करण्यात आला आसुन तुमच्यावर कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल होईल आसे सागुन आर्थिक फसवणुक गेल्या दोन वर्षापासुन नाशिकरोड येथून केली जात होती सदर प्रकार एका गुप्त माहिती व्दारे उपनगर पोलीसांना समजल्यानंतर पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्री धाड टाकून आकरा जणांना ताब्यात घेतले या सर्वाना न्यायालया समोर उभे केले आसता आठ दिवसांची पोलीस कोठाडी सुनावण्यात आली आहे.

नाशिक पुणे महामार्गावर आसलेला स्टार झोन मॉंलच्या चौथ्या मजल्यावरील एस – ५ या गाळ्यातुन रात्री दहा ते पहाटे चार पर्यंत हे संशयित युवक अमेरिकेमधील नागरिकांना आँनलाईन संपर्क साधत होते. संपर्क साधल्यानंतर तुम्ही एस.एस.ए. या पॉंलीसीच्या कोड च्या दुरुपयोग केला आहे. त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होणार आहे. गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुम्ही व्हॉंलमार्ट कार्ड किंवा त्याचा डीजीट नंबर पाठवा.

एकदा डिजीट नंबर मिळाला की त्यावरुन ५०० ते ५ हजार डॉंलर हे दुसर्‍या मिनीटाला काढुन घेतले जात होते. यासाठी स्काय पी अँप्सचा वापर केला जात होता. गत दोन वर्षापासुन हा सर्व प्रकार नाशिकरोड आणि काठेगल्लीतील या दोन्ही केंद्रावरुन सुरु असल्याचे उपनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक प्रभाकर रायते आणि पोलीस उपनिरिक्षक गणेश जाधव यांनी सांगितले.

उपनगरपोलीसांना या बाबतचा सुगावा लागला असता शुक्रवारी मध्यरात्री उपनगर पोलीसांनी नाशिक पुणे महामार्गावरील स्टार झोन मॉंलच्या चौथ्या मजल्यावर एस.५ या गाळ्यामध्ये धाड टाकली असता त्यावेळी मोईन असिम खान (वय,२१ अन्सारी सो.संसारी लेन.दे.कँम्प), चेतन बलाई रॉंय(वय ३१, शिवराज नगर,पोरजे मळा वडनेर दुमाला),ऋतिक तेजपालराम कटारिया (वय१९, दयाल कॉंटेज गुरुद्वारा रोड दे.कँम्प),पंकज शामलाल धामाई(वय २४,सुर्यनगरी सो.दे.कँम्प), सॉंमीयल बालकृष्ण नायडु (वय १९ रा. ३६ आर्मी क्वार्टर ए सी पावर हाऊस दे.कँम्प), रोहाण सलीम खान (वय २४, मुल्ला वाडा भगुर),ऋषीकेश दिलीप माळवे (वय २५ रा.कांचवाला टॉंवर, रंगुबाई जुन्नरे शाळेजवळ काठेगल्ली),दिनेश सतिश अग्रवाल (वय २५ भंडारदरा रोड घोटी), शिवा रवि स्वामी (रा.शिवशक्ती रो हाऊस, लोटस हॉंटेल जवळ लँम रोड), शेख सरफराज फयाज (वय २६, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ संसारी) या युवकांना ताब्यात घेतले.

हे सर्व युवक इंग्रजी माध्यमातील शाळेमधुन दहावी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले असुन ते उत्तम इंग्रजी बोलतात.त्यांना उपनगर पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कस्टडी सुनावली आहे. मात्र या गुन्ह्यामध्ये अमेरिकेतील किती नागरिकांची आणि किती रुपयांची फसवणुक झाली आहे हे अद्याप पुढे आले नसुन पोलीस त्याचा तपास करीत आहे.मात्र आतापर्यंत ५४ हजार नागरिकांसोबत संपर्क साधल्याचे तपासात पुढे आले आहे.

 

23 September 2018

0

ओजश्री सारडा यांना राष्ट्रीय उपविजेतेपदाचा मान

0

नाशिक । नाशिक येथील युवा वास्तुविशारद आणि यू प्लस कलेक्टिव्हच्या सहसंस्थापिका ओजश्री सारडा यांना नुकतेच राष्ट्रीय पातळीवरील ‘सेरा वेब-वॉशरूम डिझाईन चॅलेंज 2018’ स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान मिळाला. त्यांनी सादर केलेल्या पेटी शौचालयाच्या मॉडेलमुळे स्वच्छ भारत अभियानाला आणखी बळकटी मिळाली आहे.

साधारण आर्थिक स्थिती असलेल्या घरात वापरता येईल, अशा प्रकारचे स्वस्त आणि खतोत्पादक शौचालयाचे मॉडेल त्यांनी या स्पर्धेत सादर केले होते. सुरुवातीला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा या तीन राज्यांतील विभागीय पातळीवर विजेतेपद मिळवल्यानंतर त्यांच्या ‘पोर्ट-ओ-लोओ’ या मॉडेलची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली होती. त्यानंतर मुंबई येथील ताज जीव्हीके येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अंतिम फेरीत त्यांना दुसर्‍या उपविजेतेपदाचा पुरस्कार देण्यात आला.
भारतात आजही लाखो लोकांकडे स्वत:चे शौचालय नाही.

तसेच अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे चांगली शौचालये त्यांना परवडू शकत नाही. याशिवाय जागेचीही अडचण अनेक ठिकाणी असते. या सर्व बाबींचा विचार करून ओजश्री यांनी सहज परवडणारे आणि खतोत्पादक अशा पर्यावरणपूरक शौचालय तयार केले. या शौचालयाचे वैशिष्ट्य म्हणजे याची घडी होऊ शकते आणि हे कुठूनही कुठे नेण्यास सोपे पडते. घडी केल्यावर त्याचा आकार पेटीसारखा दिसतो. ‘यू प्लस कलेक्टिव्ह’ संस्थेच्या सह-संस्थापिका असलेल्या ओजश्री सारडा या वास्तुरचना, अंतर्गत रचना, लँडस्केप डिझाइन आणि शहरी डिझाइनच्या क्षेत्रात काम करतात. शौचालयाच्या या मॉडेलबद्दल त्या सांगतात की, कॉम्पॅक्ट टू कंपोस्टच्या संकल्पनेवर आधारित अशी याची रचना आहे. स्वस्त गृहनिर्माण श्रेणीसाठी हे मॉडेल तयार केले आहे.

काही दिवसांपूर्वी सेप्टिक टँकमध्ये पडून सफाई कामगाराचा मृत्यू झाला होता. ती घटना मनावर कोरली गेली आणि ज्याची साफसफाई करावी लागणार नाही, अशा स्वस्त शौचालय निर्मितीचा मी ध्यास घेतला. त्यांनी तयार केलेल्या या शौचालयासोबत द्विकूप प्रणालीचा वापर करून उत्तम अशा सोनखताचीही निर्मिती होते आणि साफसफाईसाठी मनुष्यबळाचीही आवश्यकता लागत नाही.

ओजश्रीचे हे उत्पादन सर्वांसाठी सोयीस्कर आहे. आर्थिकदृष्ट्याही त्याचा खर्च कमी येतो. प्रवासामध्येही ते उपयुक्त ठरते. त्यामुळेच कुंभमेळा-वारी किंवा विशेष कार्यक्रम शिबिरे अशा गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातही हे संशोधित शौचालय अत्यंत उपयोगी ठरणार आहे. लोकांच्या आर्थिक कुवतीनुसार ते बांबूचे तट्टे, सिमेंट किंवा जी. आय. शीटस्चा वापर शौचालयाच्या भिंतींसाठी करू शकतात. त्यालाही तुलनेत कमी खर्च येतो. पर्यावरणपूरक हवेशीर आणि कुणालाही सहज किरकोळ खर्चात हे शौचालय उभारता येत असल्याने या राष्ट्रीय स्पर्धेत ज्युरींनी अंतिम फेरीत ‘पोर्ट-ओ-लोओ’ या मॉडेलची उपविजेतेपदाच्या पुरस्कारासाठी निवड केली.

‘स्वच्छ भारत मिशन’ला बळ
सध्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत भारतभर वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये आणि स्वच्छतागृहांच्या निर्मितीची मोहीम सुरू आहे. अशावेळी नाशिककर असलेल्या ओजश्रीने तळागाळातल्या सामान्य लोकांच्या हिताचा विचार करून कमी खर्चातील, सहज वापरता येईल, असे शौचालयाचे नावीन्यपूर्ण मॉडेल तयार केले. इतकेच नव्हे, तर या मॉडेलची राष्ट्रीय पातळीवर वाखाणणीही झाली, ही गोष्ट नाशिककरांसाठी भूषणावह आहे. या संशोधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ला आणखी बळ मिळणार आहे.

रविवार, 23 सप्टेंबर 2018

0

शब्दगंध – रविवार, 23 सप्टेंबर 2018

0

Social Media

26,101FansLike
5,154FollowersFollow
1,140SubscribersSubscribe
error: Content is protected !!