केंद्र सरकारने सहकारी बँकांना मदत करावी, सहकाराला बळ द्या – शरद पवार

0
राष्ट्रीयकृत बँका जेव्हा अडचणीत आल्या तेव्हा केंद्र सरकारने ८६ हजार कोटी रुपयांची मदत त्यांना केली. पण सहकार क्षेत्रातील बँक किंवा दुसरी संस्था अडचणीत आली की तिच्यावर चौकशीची, बरखास्तीची कारवाई केली जाते. सहकार क्षेत्रातील संस्था या सामान्य माणसाला मदत करत असतात, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांच्या बाबतीतही मदतीची भूमिका घ्यायला हवी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
ते मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयममध्ये पार पडलेल्या सारस्वत सहकारी बँकेच्या शतकपूर्ती समारंभात बोलत होते. 
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीदेखील उपस्थिती होती. तसेच बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने, संचालक पद्मर्शी मधू मंगेश कर्णिक, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अनिल देसाई आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, सारस्वत बँकेला व्ही. पी वर्दे, डॉ. पी. डब्लू. रेगे, सुरेश प्रभू आदींचे यशस्वी नेतृत्व लाभले आहे. या बँकेचा विस्तार वाढवण्यात व ती नावारूपाला आणण्यात दिवंगत एकनाथ ठाकूर यांनी मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्र व गुजरातमध्येही सहकारी बँक चळवळीला चांगले धोरण आखून प्रोत्साहन देण्याचे काम हे गुजरातमधील लल्लुभाई छबिलदास व वैकुंठभाई मेहता यांनी केले.
महाराष्ट्रातील धनंजय गाडगीळ यांनीही मोलाचे योदान दिले. अशा द्रष्ट्या नेत्यांनी घातलेल्या पायामुळेच देशभरातील एकूण सहकारी बँकांपैकी ७० टक्के बँका महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये आहेत. 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची अवस्था एक हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीसारखी झालेली आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थाच मेटाकुटीला आलेली आहे.
त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या या हत्तीवर माहूत म्हणून बसायला कुणीही तयार नाही. याचवेळी प्रकाशित झालेल्या बँकेचे संचालक पी एन जोशी यांच्या ‘आर्थिक व बँकिंग धोरणाच्या बदलत्या छटा’ या पुस्तकाचा धागा पकडून ते पुढे म्हणाले की, या पुस्तकात अर्थव्यवस्थेच्या विविध बाबी, नोटबंदीचे यशापयश आदी गोष्टी मांडल्या असून ते वाचनीय झाले आहे.
देशाची अर्थव्यवस्था सध्या लयाला गेलेली आहे. कोणालाच काही कळत नाही, तरीही आंधळे एकमेकांचा हात धरून आहेत. पण माहूत म्हणून हत्तीवर बसायचे धाडस कोणीच करत नाही. सामान्य माणसाची स्थिती मात्र एक आंधळा आणि सात हत्तींसारखी झालेली आहे.
प्रत्येकजण त्याला इकडून तिकडून डिवचत आहे. त्यामुळे तो जखमी होऊन पडला आहे. त्याला मदतीची गरज आहे. पण ते न करता त्याला तू भोसकले की मी भोसकले या वादातच आधीचे व आताचे सरकार पडले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 
 
बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यावेळेस म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वी सारस्वत समाजाच्या आर्थिक गरज भागवण्यासाठी क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. त्याची उत्तरोत्तर वाढ होत गेल्याने १९३२ साली बँकेचा दर्जा मिळाला होता.
आज सारस्वत बँकेचा वटवृक्ष झाला असून देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक झाली आहे. बँकेचे देशभरात २८१ शाखांचे कार्यक्षेत्र आहे. गेल्या दहा वर्षांत बँकेची झपाट्याने वाढ झाली असून ३८ हजार कोटींवरून ५८ हजार कोटींवर व्यवसाय पोहोचला आहे.
सारस्वत बँकेच्या ‘सारस्वत बँक १०० डिजिटल अकाउंट’
या सुविधेअंतर्गत आधार कार्ड क्रमांकाद्वारे येणाऱ्या ओटीपीच्या आधारे तीन मिनिटांत सेव्हिंग अकाउंट उघडले जाईल.  ‘सारस्वत बँक रूपे कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड’ या डेबिट कार्डद्वारे ग्राहक केवळ कार्ड टॅप करून पेमेंट करू शकतील. या सुविधांचे ही अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

माणसाचे मोठेपण सांगणारे ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’

0

मुंबई : प्रत्येक प्रसिद्ध माणसाच्या जीवनात एक रहस्य दडलेलं असत. त्यातून ते प्रेरणा घेऊन ध्येयाने वेड होत जीवनात यशस्वी होत असतात. या नावाजलेल्या व्यक्तींचे मोठेपण आपल्याला लक्षात येते परंतु ते माणूस म्हणून कसे आहेत, त्यांची कधी न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे कलर्स मराठीवरील “अस्सल पाहुणे इरसाल नमुने” या नव्या कार्यक्रमामध्ये. प्रेक्षकांना नक्कीच हा कार्यक्रम बघायला मज्जा येणार आहे कारण पाहुण्यांबरोबरच कार्यक्रमामध्ये असणार आहेत.

इरसाल नमुने जे या पाहुण्यांशी गप्पा तर मारणारच आहेत, पण त्यांच्या अतरंगी,खुशखुशीत विनोदशैली तसेच त्यांचे बेधडक, बिनधास्त विनोदाने प्रेक्षकांना दर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानी देखील मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे करणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका “अस्सल पाहुणे इरसाल नमुने”- इथे गप्पांना नसणार तोटा कारण पाहुणा असणार मोठा २० सप्टेंबरपासून गुरु – शुक्र रात्री ९.३० वा. असणार आहे.

अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांनामराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने हे काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत. कार्यक्रमामध्ये कलर्स मराठीवरील प्रसिध्द मालिकांमधील लाडक्या सासू म्हणजेच घाडगे अँड सूनमधील सुकन्या कुलकर्णी आणि अतिशा नाईकतर राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील कविता लाड, तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उज्ज्वल निकम, भरत जाधव, केदार शिंदे ही मंडळी हजेरी लावणार आहेत. तेंव्हा या लोकप्रिय मंडळींची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळणार आहे.

वावरे महाविद्यालयाचा हँन्डबॉल संघ विजयी

0

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालयातील मुलांचा संघ जिल्हास्तरीय शालेय हँन्डबॉल क्रीडा स्पर्धेत विजयी झाला. याठिकाणी एकूण  नऊ संघ सहभागी झाले होते.

अंतिम सामना के.टी.एच.एम. महाविद्यालय विरुद्ध के.एस.के. डब्ल्यू. महाविद्यालय सिडको यांच्यात झाला. यात के.एस.के.डब्ल्यू. महाविद्यालय सिडको संघाने के.टी.एच.एम. महाविद्यालयचा 12-8 असा पराभव करत निर्वीवाद वर्चस्व मिळवले.

खेळाडूंच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य डॉ.ए.के. शिंदे, ज्युनियर विभागप्रमुख प्रा. हेमंत पाटील,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. मिनाक्षी गवळी, डॉ.किरणर किबे, क्रीडासंचालक प्रा.दिपक दळवी, प्रभाकर गांगुर्डे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

सदर स्पर्धा गुरुगोविंद सिंग महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या या विजयी संघात गणेश बोरसे, अभिषेक कदम, श्रेयश शिंदे, प्रसाद गांगुर्डे, महेश थोरात, विश्वजीत पवार, वैभव महाले, निखिल घुले, मयूर बडवे, वैभव आहेर, प्रतीक काळे, यशोदीप जाधव, श्लोक पाटील.

यंदाच्या एम्मी पुरस्कारात सर्वोत्कृष्ट नाटक ‘गेम ऑफ थ्रॉन्स’

0

अमेरिका : अमेरिकन टीव्ही सीरिअल ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ ने यंदाचा एमी पुरस्कार २०१८ पटकावला आहे. त्यासोबतच आणखी ९ पुरस्कार पटकावले आहेत.

या मालिकेत टिरीयर लॅनिस्टर ची भूमिका करणारा पीटर डिंक्लेज ला सर्वोत्कृष्ट सह्हायक अभिनेता पुरस्कार मिळाला.

या मालिकेला एमी पुरस्कारात २२ वेळा नामांकन प्राप्त झाले असून तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे.

खामखेडा चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी

0
खामखेडा ( वार्ताहर ) | देवळा  तालुक्यातील खामखेडा येथील चौफुली रस्त्यावर  गतिरोधक टाकण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.

साक्री- नामपूर-सटाणा-खामखेडा-बेज-कळवण-नांदुरी-वणी-नाशिक हा राज्य महामार्ग क्रमांक १७ असून हा रस्ता नाशिक व सप्तशृंगीच्या दर्शनासाठी नंदुरबार, साक्री,धुळे, नावापुर आदी भागातील भाविका मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर नेहमी जातात.

तसेच हा मार्गानेे  नाशिक येथे जाण्यासाठी जवळ असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते.परंतु या रस्तावरील खामखेडा खामखेडा येथे  चौफुली असून येथे चार रस्ते येऊन मिळतात. या चौफुलीजवळ वळण रस्ता आहे.

परंतु या चौफुलीवरील रस्त्यावर गतिरोधक टाकले नसल्याने येणारी आणि जाणारी वाहने ही  जोरात येतात त्यामुळे या अचानक दिसणाऱ्या वाहनामुळे दोन वाहन चालकांमध्ये अचानक गोंधळ निर्माण अनेक वेळा अपघात होतात; तेव्हा या रस्त्यावर गतिरोधक टाकल्यास वाहनांचा वेग कमी होऊन अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.

या रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात यावे असे खामखेडा ग्रामस्थांच्या वतीने निवेदन  देतानां वसाकाचे माजी संचालक आण्णा पाटील, शिवसेनेेेचेे उपतालुकाअध्यक्ष प्रशात शेवाळेे, स्वाभीमनी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र शेवाळे ओकर शेवाळे आदीच्या हस्ते देण्यात आलेे.

इस्पॅलियरच्या विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा

0

नाशिक (प्रतिनिधी) | सध्या सगळीकडे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होत असतांना  नारळाच्या झाडाचा कल्पकतेने वापर करून इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमधील विद्यार्थ्यांनी नारळाच्या झाडातच इकोफ्रेंडली गणपती बाप्पा साकारला आहे. शाळेतील मुलांनी कल्पतेतून साकारलेल्या या गणेश मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले असून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले जात आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदुषणामुळे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे निसर्गातच देव शोधून वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन व्हावे या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांनी नारळाच्या झाडात गणेश मूर्ती साकारून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे.

तसेच वृक्षांची कत्तल न करता मोठ्या संख्येने झाडे लावावी व त्यांचे संगोपन करून ते वाढवावीत असे आवाहन देखील शाळेतील विद्यार्थ्यांनी केले आहे. शाळेचे प्रमुख सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला.

ऐतिहासिक तिहेरी तलाक विधेयकाला केंद्र सरकारची मंजूरी

0

नवी दिल्ली : राज्यसभेत अडकून पडलेल्या तिहेरी तलाक विधयेकावर केंद्र सरकारने अध्यादेश काढून मंजुरी देण्यात आली. कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक ६ महिन्यांसाठी लागू होणार आहे. या साझा महिन्याच्या कालावधीत सदर विधेयक संसदेतून मंजूर करुन घ्यावे लागणार आहे. लोकसभेत विधेयक पारित झाल्यानंतर राज्यसभेची मंजुरी मिळवण्यासाठी राज्यसभेकडे पाठवण्यात आले होते.

तर, या विधेयकात बदल करण्यात यावी अशी काँग्रेसची मागणी होती. परंतु, बुधवारी केंद्र सरकारने या विधेयकास मंजूरी दिली आहे. दरम्यान, तिहेरी तलाक संदर्भात लढाई करणाऱ्या मुस्लीम महिला संघटनांनी याचे स्वागत केले आहे.

Video : निफाडला जोरदार पावसाची हजेरी

0

निफाड | जिल्ह्यात परतीच्या पावसाचे आगमन झाले असून काल (दि..१८)  ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आज सकाळपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सकाळपासूनच ऊन सावलीचा खेळ सुरु होता. अखेर आज दुपारी एक वाजेच्या सुमारास निफाड शहर परिसरात धो-धो पाऊस बरसला.

दुपारी आलेल्या पावसामुळे क्षणभरातच रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाचे ऐन गणेशोत्सवात आगमन झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. धोक्यात आलेल्या रब्बी हंगामाला आजच्या पावसाने दिलासा दिल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

निफाड तालुक्यातील करंजी खुर्द परिसरातही जोरदार पावसाचे आगमन झाले. तिकडे भाऊसाहेबनगरमध्ये पावसाने हजेरी लावली. चांदोरी सायखेडा परिसरात दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली.

 

आज भारत पाकिस्तान आमने सामने

0

मुंबई : हाँगकाँग सोबतचा सामना जिंकल्यानंतर प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर आजचा सामना रंगणार आहे. भारत -पाकिस्तान सामना हा क्रिकेटप्रेमींना पर्वणीच असल्याने आज एक सुपरहिट सामना पाहायला मिळणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने उभे ठाकणार आहेत.

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत ११ वेळा आमनेसामने आले असून असून भारताने सहा वेळा तर पाकिस्तानने ४ वेळा विजय मिळवला आहे. तर एक लढत ही ड्रॉ ठरली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्याचं दडपण दोन्ही संघावर असल्याचं मत पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज खान यानं व्यक्त केलं आहे.

विंचुर येथे स्वाईन फ्लूचा एक बळी

0

नाशिक : विंचुर येथील स्वाईन फ्लूचा बळी गेला असून अकिल लतीफ मोमीन वय 42 असे मृत झालेल्या व्यक्तीच नाव आहे. यास स्वाइन फ्ल्यू झाल्याने उपचारासाठी नाशिक च्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आहे होते, मात्र उपचारा दरम्यान आज त्याचा मृत्यू झाला आहे.

स्वाइन फ्लूचा कहर शहरामध्ये वाढत असल्याचे चित्र आहे. पावसाळा हा स्वाइन फ्लूच्या विषाणूंना पोषक ऋतू असतो. त्यामुळे स्वाइन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरणातील बदलामुळे संशयित रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीत देखील वाढ होताना दिसत आहे.

 

Social Media

26,074FansLike
5,154FollowersFollow
1,125SubscribersSubscribe
error: Content is protected !!