गड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप

0

नाशिक : सर्वांच्या जीवनात आनंद, प्रकाश निर्माण करणारा दीपोत्सव सणादरम्यान येथील गड रेंजर्स या पर्यटन प्रेमी संस्थेने गड किल्ले जतन करणाऱ्या गावकऱ्यांसोबत साजरी केली.

ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणाऱ्या रतनगडा लगतच्या साम्रद या गावी गड रेंजर्सने भेट दिली. यावेळी प्रत्येक घरात कागदी पिशवी, फराळ, ग्रामस्थांना कपडे यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी गड रेंजर्सच्या परिवाराने आपल्याकडे असणारे कपडे , खाऊ जमा करून या उपक्रमाला हातभार लावला. फराळ वाटपद्वारे विद्यार्थ्यांचे तोंड गोड करून युवकांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. दरम्यान, युवकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी गड रेंजर्सचे सुयश दिघे, भाग्येश दीक्षित, हरीश चव्हाण, संकेत वाजे, ऋषिकेश चव्हाण, शुभम शेलार उपस्थित होते.

आंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी

0

हैदराबाद : केंद्रीय अन्‍वेषन विभागाच्या (सीबीआय) अंतर्गत भ्रष्‍टाचाराच्या आरोपावरून सुरू झालेला वाद सर्वोच्‍च न्यायालयात पोहोचला. अशातच आता आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाने सर्वांना धक्‍का दिला आहे. चंद्राबाबूंच्या सरकारने परवानगीशिवाय सीबीआयला राज्याचे दरवाजे बंद केले आहेत. या निर्णयामुळे केंद्र आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्‍हे आहेत.

आंध्र प्रदेश सरकारने एक महत्वाचं परिपत्रक जारी करत राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयचा हस्तक्षेपाचा अधिकार पूर्णपणे काढून घेतला आहे. प्रत्येक राज्य सरकार हे दिल्लीतील विशेष पोलीस आस्थापनेला त्यांचे अधिकार संबंधित राज्यात वापरण्यास होकार देत असते. हा होकार आंध्र प्रदेशने मागे घेतल असल्याचं परिपत्रक आंध्र प्रदेशाच्या गृह विभागाच्या सचिव ए.आर.अनुराधा यांनी जारी केलं आहे. हा होकार काढून घेतल्याने आंध्र प्रदेशात होणाऱ्या कोणत्याही घटनेचा तपास करण्याचे अधिकार सीबीआयला उरलेले नाहीत.

भाजपवर गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीबीआय, आरबीआय सारख्या संविधानिक संस्थांना खिळखिळं करून स्वत:च्या हातचं बाहुलं बनवत असल्याचा आरोप नायडू यांनी केला आहे. केंद्रातील सगळ्या महत्वाच्या पदांवर गुजरातमधील अधिकारी आणून बसवले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. सीबीआयचे रजेवर पाठवण्यात आलेले विशेष संचालक राकेश अस्थाना हे मोदींचे इंटेलिजन्स मॅन असल्याचाही त्यांनी आरोप केला होता.

 

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0

मुंबई – प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित आगामी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाचे संवादलेखन, कथा, पटकथा प्रविण तरडे यांनी केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता ओम भूतकर यांच्या तोंडी असलेले संवाद प्रेक्षकांवर छाप पाडणारे आहे.

 

अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुळशी पॅटर्न’ बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘नो कोशियारी नो व्होट’ ईपीएफ पेन्शनधारकांचा मोर्चा

0

नाशिक | १८६ उद्योगातील कामगारांना ईपीएस ९५ योजनेतून पेन्शन अतिशय तुटपुंजी आहे. पेन्शनधारकांना आरोग्यसुविधा मिळावी, पेन्शनची रक्कम तसेच महागाई भत्ता वाढवून मिळावा. अशा विविध मागण्यांसाठी आज इपीएफ पेन्शनधारकांनी मोर्चा काढला. मागण्या मान्य न केल्यास नो होशियारी नो व्होट म्हणून मतदानावर आंदोलक पेन्शनर्सने बहिष्काराचा इशारा दिला आहे.

भाजप सरकार विरोधी पक्षात असताना सध्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इपीएस ९५ पेन्शन धारकांना ३ हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा यासाठी मागणी केली होती. कामगारांची पेन्शन वाढविण्यासाठी त्यांनी डॉ. भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सभेच्या अध्यक्षांकडून एक समिती नियुक्त केली होती.

या कमिटीचा अहवाल डिसेंबर २०१३ साली राज्यसभेत सादर झाला होता. अहवालात पेन्शनधारकांना कमीत कमी ३ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावे असे सुचविण्यात आले आहे. भाजप सरकार येऊन साडेचार वर्षे पूर्ण झाली परंतु अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.

लवकरच देशात लोकसभा निवडणूक होत आहे. निदान याकाळात तरी आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास नो कोशियारी नो व्होट असा पवित्रा इपीएफ पेन्शनधारक करणार आहेत.

यावेळी राजू देसले, सुधाकर गुजराथी, डीबी जोशी, सुभाष काकड, विलास विसपुते, चेतन पनेर, शिवाजी शिंदे, बापूर रांगणकर, शिवाजी ढोबळे, नारायण आडणे, प्रवीण पाटील, प्रकाश नाईक यांची उपस्थिती होती.

नो पेन्शन नो व्होट…#नो_कोशियारी_नो_व्होट

Raju Desale यांनी वर पोस्ट केले गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

या आहेत मागण्या

९ हजार रुपये पेन्शन + महागाई भत्ता देण्यात यावा

डॉ कोशियारी समितीच्या अहवालानुसा ३ हजार पेन्शन आणि महागाई भत्ता द्यावा

हायर सलरी हायर पेन्शनचा लाभ मिळावा. ३१-०५/२०१७ चे परिपत्रक रद्द व्हावे

सन २००९ ते २०१६ मध्ये सेवामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना २ वर्षांचा फरक मिळावा

अन्न सुरक्षेचा कायदा इपीएस ९५ चे पेन्शनधारकांना लागू करा

पेन्शनर्सला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी.

दीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं

0

मुंबई : बॉलिवूडमधील लव्‍हली कपल लग्‍नाच्‍या बंधनात अडकले आहे. इटलीत ‘लेक कोमो’ मध्ये हा ग्रॅण्‍ड लग्‍नसोहळा उत्‍साहात  पार पडला. लग्‍न जरी झाले असले तरी अजून लग्‍नानंतरच्‍या काही विधी बाकी आहेत. लग्‍नानंतर हे क्‍यूट कपल आता मुंबईत परतरणार आहे. आपल्‍या लाडक्‍या सुनेच्‍या गृह प्रवेशासाठी रणवीरचे घर सजले आहे.

रणवीरचा बंगला हा मुंबईतील वांद्रे परिसरात असून त्याच्या या विलाचं नाव ‘श्री’ आहे. दीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरच्‍या मुंबईतील घरावर आकर्षण रोषणाई करण्‍यात आली आहे. लग्‍नसोहळा ज्‍याप्रमाणे ग्रॅण्‍ड होता त्‍याचप्रमाणे दीपिकाचे मुंबईत स्‍वागतही ग्रॅण्‍ड होणार आहे हे यावरुन लक्षात येते.

21 नोव्हेंबरला बंगलुरूमध्ये रिसेप्शन असून मुंबईत 28 नोव्हेंबरला ग्रँड हयातमध्ये रिसेप्शन असणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका मुंबईतील प्रभादेवीमधील फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर सियाझ कार पेटली

0
सिन्नर (अजित देसाई) | नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर नांदूरशींगोटे येथील बायपासवर मारुती सियाझ कार पेटल्याची घटना घडली.

दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाभळेश्वर (लोणी) येथील ही कार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

कार मालक लघु शंकेसाठी वावी चौफुलीवर थांबले असता कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे या घटनेत जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच सिन्नर पालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचला. काही वेळ याठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.

सपना चौधरीच्या कार्यक्रमात जबरदस्त गोंधळ; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

0
बिहार : बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिच्या कार्यक्रमात गुरुवारी रात्र जोरदार धिंगााणा झाला. लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. अखेर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यादरम्यान एका व्यक्तिचा मृत्यू झाला.

प्रत्येक वर्षी भरौल येथे छठ महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावर्षीही महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी सपना चौधरी पोहोचली होती. सपना चौधरीला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. सपना चौधरी येताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि धावपळ सुरु झाली. कार्यक्रम सुरु होताच लोकांनी बॅरिगेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सपना चौधरीच्या कार्यक्रमात अशाप्रकारे गोंधळ किंवा हिंसा होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही बिहार आणि उत्तर प्रदेशात अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये सपना चौधरीचा कार्यक्रम रद्द कऱण्यात आला होता.

सीबीआय वाद: सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली – सीबीआयमधील अंतर्गत वादावर सीव्हीसीने आपला अहवाल सादर केल्यानंतर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या विवादावर महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. यावेळी सुट्टीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सीव्हीसीच्या अहवालाची प्रत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच वर्मा यांनी या अहवालावर सोमवारपर्यंत आपले स्पष्टीकरण सादर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाचा अहवाल बंद लिफाफ्यात आलोक वर्मा यांना देण्यात येणार असून, त्यावर ते आपलं उत्तर दाखल करु शकतात. त्याच्या आधारे न्यायालय निर्णय घेईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय विशेष संचालक राकेश अस्थाना यांना चौकशी अहवाल देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालय 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी घेणार आहे.

‘हा रिपोर्ट तुम्हाला बंद लिफाफ्यात देऊ शकतो आणि तुम्ही बंद लिफाफ्यात त्याचं उत्तर देऊ शकता’, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं. उत्तरासाठी आलोक वर्मा यांना सोमवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय दक्षता आयोगाने आलोक वर्मा यांना क्लीन चीट दिलेली नाही. याप्रकरणी अजून तपास करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

 

Breaking : बंधाऱ्यात अडविलेले पाणी पोलीस संरक्षणात सोडले

0

सार्वमत ऑनलाईन 

सोनेवाडी( वार्ताहर) – जायकवाडीला सोडलेले पाणी गोदापात्रातील बंधार्‍यांत अडविल्याने जायकवाडी धरणात अपेक्षीत पाणी पोहचले नाही. त्यामुळे अडविलेले बंधार्‍यांतील पाणी सोडून देण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिल्याने गोदाकाठचा शेतकऱ्यांमध्ये नाराजीजे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार (दि.१६ नोव्हेंबर) रोजी सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात डाऊच खुर्द व हिंगणी बंधाऱ्यातून 63.42 दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीस सोडण्यात आले. दरम्यान जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये या मागणीसाठी खासदार सदाशिव लोखंडे सडे बंधारा येथे पोहचले आहे.

Live Update :
खासदार सदाशिव लोखंडे सडे बंदारा येथे जाऊन पाणी न सोडण्याची मागणी
पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह 50 पोलिसांचे पथक बंधाऱ्याजवळ तैनात
जमावबंदी आदेश असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी बंधाऱ्याकडे जाण्यास टाळले
पाणी सोडल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून साईमंदिरात निषेध सभेचे नियोजन
हिंगणी बंदरावरून कारवाईला सुरुवात नाही
डाऊच खुर्द बंधार्यावर मशीन जाण्यास परिस्थिती नसल्याने पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच खोलले बंधाऱ्याचे फाटके

Video : नाशिक शहरात हजारो विनाहेल्मेट धारकांवर कारवाई

0

नाशिक दि. १६ प्रतिनिधी | अनेक दिवसांपासून हेल्मेटसक्ती मोहीम थंडावलेली असताना नाशिक शहर पोलिसांकडून आज शहरातील विविध भागांत हेल्मेट ड्राईव्ह मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी दहा वाजेपासून या मोहिमेला शहरातील विविध भागात सुरुवात झाली असून त्याअंतर्गत विनाहेल्मेट चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे शहरातील मध्यवर्ती सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकीधारकांची प्रचंड गर्दी झाली होती.

या मोहिमेत शहरातील १३ पोलीस ठाण्यांचा सहभाग असून विनाहेल्मेट चालकांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला.

काही वाहनधारकांकडे यावेळी दंड भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे वाहन जमा करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या.

ज्यांनी दंड भरला नाही त्यांच्या गाड्या दंड भरल्यानंतर सोडण्यात आल्या. तसेच यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले.

दरम्यान, कारवाईची वार्ता अनेक ठिकाणी सोशल मीडियातून काल रात्रीपासून पसरली होती. पोलिसांकडून एक पत्रक जारी करण्यात आले होते त्यात कागदपत्र आणि हेल्मेट सोबत बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी आज दुचाकीला आराम देत रिक्षाने प्रवास केला.

या ठिकाणी झाली कारवाई

आडगाव पोलीस ठाणे – हॉटेल मिरची ढाबा आणि जत्रा हॉटेल

म्हसरूळ पोलीस ठाणे – राज स्वीट आणि ओंकार बंगला

पंचवटी पोलीस ठाणे – काट्या मारुती चौक आणि रामवाडी पूल

भद्रकाली पोलीस ठाणे – शालीमार चौक आणि काठे गल्ली सिग्नल

मुंबईनाका पोलीस ठाणे – मुंबई नका सर्कल आणि अशोक मार्ग

सरकारवाडा पोलीस ठाणे – सद्भावना पेट्रोल पंप आणि भवानी मार्ग

गंगापूर पोलीस ठाणे – होल्मार्क चौक आणि एबीबी सर्कल

सातपूर पोलीस ठाणे – अंबड टी पॉइंट आणि रिलायंस पेट्रोल पंप

अंबड पोलीस ठाणे – त्रिमूर्ती चौक आणि सिडको हॉस्पिटल

इंदिरानगर पोलीस ठाणे – कलानगर आणि पाथर्डी फाटा

उपनगर पोलीस ठाणे – डीजीपी नगर आणि तपोवन

नाशिकरोड पोलीस ठाणे – पोलीस स्टेशन समोर आणि दसक

देवळाली कॅम्प पोलीस ठाणे – भाटीया कॉलेज आणि झेंडा चौक

Social Media

26,854FansLike
5,154FollowersFollow
1,347SubscribersSubscribe
error: Content is protected !!