कायद्याचेच ढोल

0

नगर टाइम्स,

उद्या श्रींना निरोप डीजे, बंदी कायम, 14 मंडळ सहभागी, 113 सीसीटीव्ही

अहमदनगर (प्रतिनिधी) – बाप्पांना निर्विघ्न निरोप देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पण केला आहे. मात्र, विसर्जन मिरवणुकीत डीजे लावून मनमानी करण्याचा काही मंडळांनी विडा उचलला आहे. कोर्टाने डीजेबंदी कायम ठेवल्याने कायद्याचाच ढोल वाजविण्यास प्रशासनाला बळ मिळाले. काल झालेल्या मोहरमच्या मिरवणुकीत त्याचा प्रत्यय आला. ठरलेल्या वेळेत त्यांनी मिरवणूक दिल्लीगेटबाहेर नेली. त्यामुळे डीजेचा आवाज दाबला जाणार आहे, हे निश्‍चित. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यासोबत प्रशासन कायद्याचे ढोल बडवणार आहे. दरम्यान, उद्या (रविवारी) सकाळी दहा वाजता ग्रामदैवत विशाल गणपतीची मिरवणूक सुरू होईल. ती सहाच्या ठोक्याला दिल्लीगेट वेशीबाहेर पडेल.

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या गणेश मंडळांसाठी पोलीस प्रशासनाने कडक नियम लावले आहेत. एकाही मंडळाला डीजे वाजू दिला जाणार नाही. प्रत्येक मंडळांसोबत स्वतंत्र पोलीस बंदोबस्त असणार आहे. बंदोबस्ताचे मायक्रो प्लॅनिंग पोलीस प्रशासनाने केले आहे.
श्री विशाल गणेशाची उत्थापनाची पूजा उद्या (रविवारी) सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. सजविलेल्या रथातून श्रींची मिरवणूक पारंपरिक वाद्य, झांज, लेझिम, टिपर्‍या, तालयोगी हलगी (कडे), ढोल, टिपर्‍याच्या संघाचा या मिरवणूकीत सहभाग असणार आहे.

विशाल गणपतीचा विसर्नज रथ दहा वाजता रामचंद्र खुंट येथून मार्गस्थ होणार आहे. 11 वाजता दाळमंडई कोपरा,साडेअकरा वाजता युनियन बँक जवळ, 12 वजता तेलीखुंट चौक, पाऊण वाजता घासगल्ली चौक, दीड वाजता भिंगारवाला चौक, दोन वाजता अर्बन बँकेजवळ, पावणेतीन वाजता नवीपेठ कोपरा, पावणेचार वाजता नेताजी सुभाष चौक, सव्वाचार वाजता अहमदनगर वाचनालय, पावणेपाच वाजता चितळे रोड आणि बरोबर सहा वाजता दिल्लीगेट बाहेर निघणार आहे.

मिरवणुकीच्या प्रारंभी बैलगाडी, सनई चौघडा, नगारा वाद्य, त्यामागे पारंपारिक वाद्य, श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रम शाळा (टाकळी काझी, ता.नगर) यांचे झांज पथक, लेझिम, बुर्‍हाणनगर तालयोगी हलगी(कडे)पथक, रुद्रनाथ व रिदम् यांचे ढोल पथक तसेच सावता माळी महिला मंडळ आणि माळीवाडा कपिलेश्वर महिला यांचे टिपर्‍या पथक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. शहरातील गणेश मंडळं बाळाजीबुवा बारवेत तर सावेडीतील यशोदानगर, सनी हॉटेल जवळील विहीर, भिंगार येथील शुकलेश्‍वर जवळील विहीर आदी ठिकाणी गणेशाचे विसर्जन होणार आहे. केडगांव, सावेडी येथील विसर्जन मिरवणूक निघाणार आहे. सावेडी, उपनगरात विविध गणेश मंडळानी विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी घेण्यासाठी अर्ज दिले आहेत.

विसर्जन मिरवणुकीतील मंडळं
संगम तरूण मंडळ, माळीवाडा तरूण मंडळ, आदिनाथ तरूण मंडळ, दोस्ती तरूण मंडळ, नवजवान तरूण मंडळ, महालक्ष्मी तरूण मंडळ, कपिलेश्‍वर तरूण मंडळ, नवरत्न तरूण मंडळ, समझोता तरूण मंडळ, शिवशंकर तरूण मंडळ, आनंद तरूण मंडळ, शिवसेना मंडळ अशी 13 मंडळे विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणार आहे.

चौकीतून नियोजन
विसर्जन मार्गवर पोलिस प्रशासाने 113 सीसीटिव्ही बसविले आहे. तसेच विसर्जनाची पहाणी करण्यासाठी 3 ड्रेन कॅमेरे देखील ठेवण्यात आले होते. सीसीटिव्हीचे सर्व फुटेज चितळे रोड येथील पोलिस चौकी व एसपी ऑफिसच्या कन्ट्रोल रूमला लिंक असणार आहे. तेथे बसल्या जागी मिरवणुकीची हालचाल टिपली जाणार आहेे. विसर्जन मिरवणूक मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे.

आव्वाजासाठी मंडळांनी केली तयारी
डीजे वाजविण्याला कोर्टाने बंदी घातली आहे. पोलिसांनी अगोदरच मंडळांना नोटीस बजावत डीजे न लावण्याचे बजावले आहे. मात्र तरीही काही मंडळ डीजे लावणार असल्याचे समजते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मिरवणुकीत शक्तीप्रदर्शन करण्याचा बेतही काही मंडळांनी आखला आहे. त्यामुळं पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे. शुक्रवारी निघालेल्या मोहरम विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी आपली झलक दाखवून दिली आहे. तीच झलक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतही दिसणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 22 सप्टेंबर 2018

0

ओरिसातील वादळ थंडावले; मात्र ८ राज्यांवर संकट कायम

0

भुवनेश्वर : ओरिसातील डेई चक्रीवादळ आता थंडावले असून आता ते वादळ इतर राज्यात पुढे सरकत आहे. ओरिसात थैमान घातलेल्या वादळामुळे देशातील वातावरणात बदल होत असून आठ राज्यांना अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

ओरिसासह  तेलंगणा, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीच्या भागात अजूनही वादळी वारे वाहत असून जोरदार पाऊस पडत आहे. या वादळामुळे महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, मध्ये प्रदेशच्या काही भागात पाऊस पडत आहे.

या चक्रीवादळाने ओरिसात मोठा फटका बसला असून अजूनही या ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत. यादरम्यान मुसळधार पावसाबरोबरच भूस्खलनाच्या घटना घडल्या असून मलकानगिरी जिल्ह्याला वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील काही भागात पाणी साचले आहे.

विविध ठिकाणी अडकलेल्या 150 लोकांनी सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशाच्या कोरापूटमध्ये 100 मिमी तर बालासोरमध्ये 141 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

वादळामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणही बदलले आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह देशातील अनेक भागात वादळामुळे पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह आठ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

लष्करी ताफ्यावर झालेल्या गोळीबारात २४ ठार

0

इराण : अहवाज या शहरात लष्करी संचालन सुरु असताना काही हल्लेखोरांनी गोळीबार करत २४ जणांचा जीव घेतला. तसेच या घटनेत ५० जण जखमी झाल्याचे माहिती मिळाली आहे.

संचलन सुरू असताना शेजारच्या उद्यानातून हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोर लष्करी गणवेशात होते, अशी माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी हा हल्ला परकीय शत्रूकडून आल्याचे बोलले जात आहे. तर, सरकारी माध्यमांनी आणि अधिकाऱ्यांनी या हल्ल्यास सुन्नी कट्टरवादी किंवा अरब राष्ट्रवादी यांना जबाबदार धरलं आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.00 वाजता हा हल्ला झाला. चार हल्लेखोरांचा त्यात समावेश होता. हल्लेखोरांनी नागरिक आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला. लष्करानं दिलेल्या प्रत्युत्तरात दोन हल्लेखोर जागीच ठार झाले तर दोघांना अटक करण्यात आली.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वावी विद्यालय अजिंक्य; तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0

सिन्नर । रयत शिक्षण संस्थेच्या सिन्नर तालुक्यातील वावी येथील नूतन विद्यालय व अ‍ॅड. रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यलयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या कब्बडी संघाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवत बाजी मारली असून तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचे नेतृत्व करणाऱ्या संघात निवड झाली आहे.

वावी विद्यालयाच्या कबड्डी संघाने सिन्नर येथे झालेल्या तालुका, नाशिक येथील जिल्हा तर धुळे येथे पार पडलेल्या विभागीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाना चीत करत अव्वल स्थान कायम ठेवले होते. परभणी येथे राज्यस्तरावरील स्पर्धेत अंतिम सामन्यात अमरावती संघाविरुद्ध नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करताना या संघाने ३० गुणांनी विजय मिळवला.

या स्पर्धेत गौरव तपकीर, सूरज पाटील, श्रेयस उंबरदंड, मुस्ताफा शेख, रोशन आव्हाड, मनीष जोशी, पवन भोर, निखिल भोर, सत्यजीत पानसरे, ओंकार गाडे, ओंकार लाळगे, ओंकार चांदगुडे यांनी दमदार कामगिरी करत राज्य अजिंक्यपदावर वावी विद्यालयाच्या नावाची मोहोर उमटवली. संघातील गौरव तपकीर, सूरज पाटील व श्रेयस उंबरदंड या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मध्यप्रदेश राज्यात देवास येथे ही कबड्डी स्पर्धा होणार आहे. संघातील खेळाडूंना क्रीडाशिक्षक महेश कोल्हे, भाऊसाहेब गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्य स्तरावर संघाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या व राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. भगीरथ शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष कन्हैयालाल भुतडा, रामनाथ कर्पे, विठ्ठलराजे भोसले, उपसरपंच विजय काटे, ईलाहीबक्ष शेख, प्राचार्य अनिल वसावे, पर्यवेक्षक सुधीर वाघमारे यांच्यासह शालेय समिती सदस्य व ग्रामस्थांनी कौतूक केले आहे.

एसबीआय बँक सोलर पॅनलचा वापर करीत वीजनिर्मिती करणार

0

मुंबई : पर्यावरणाची वाढती हानी लक्षात घेता एसबीआय ने याबाबत महत्वाचे पाऊल उचलले आहे. देशात वाढणाऱ्या कार्बनचे उत्सर्जन घटविण्यास आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यास भारतीय स्टेट बँकेने पुढाकार घेतला आहे. एसबीआयने पुढील दोन वर्षांत देशातील 10 हजार एटीएममध्ये सोलार पॅनेलचा वापर करत वीज निर्मिती करण्याचे ठरविले आहे.

सध्यापर्यंत देशातील 1,200 एटीएममध्ये सोलार पॅनेल लावण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त देशातील 150 इमारतींवर सोलार पॅनेल लावण्यात येणार असून 2020 पर्यंत ही संख्या 250 वर नेण्यात येईल.

2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन घटविण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. देशातील 12 शहरांमध्ये ग्रीन मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे असे एसबीआयचे प्रमुख वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले. एसबीआय 2008 पासून सोलारवर चालणाऱया एटीएमचा वापर करत आहे.

देशात पहिल्यांदा सोलारवर चालणारे एटीएम दाखल करणारी ती पहिली बँक ठरली आहे. 2014 मध्ये 2.63 गिगावॅट असणारी सौर ऊर्जा निर्मिती आता 22 गिगावॅटवर पोहोचली आहे. पवन ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती गेल्या चार वर्षात 21 वरून 34 गिगावॅटवर पोहोचली आहे.

झोपडपट्टीवासीयांसाठी शासनातर्फे मोबाईल ॲपद्वारे ‘आसरा’

0

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ (AASRA) या मोबाईल ॲपचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली.

११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीतमध्ये या ॲपचे सादरीकरण करण्यात आले होते. या अॅपमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिक पारदर्शी आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

‘आसरा’ हे ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असणार असून या ॲपद्वारे विविध सोयी सुविधा आणि योजनांची माहिती मिळणार आहे. यामुळे प्रत्येक सामान्य व्यक्तीला या ॲपचा लाभ होणार आहे.

त्याचबरोबर सामान्य झोपडीधारक आपली झोपडी व झोपडपट्टीसंबंधित झोपडी क्रमांक, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा, स्लम क्लस्टर २०१६ आदी माहिती ॲपद्वारे घेऊ शकतील.

पोलिसांनी रात्रीतून शोधली चोरलेली म्हैस

0

श्रीगोंदा ता. २२ : अवघ्या काही तासांमध्ये चोरीला गेलेली म्हैस पोलिसांनी शोधून मूळ मालकाला सुपूर्त केल्यची घटना येथे घडली आहे.

आजच्या काष्टी येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी सांगली येथील मकदूल शेख यांनी म्हैस विक्रीसाठी शुक्रवारी आणली होती. काल रात्रीच्या सुमारास सुमारे ८० हजार रुपये मूल्याची ही म्हैस  चोरट्यांनी चोरुन नेली.

याबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी गस्तीवर असलेल्या पोलीसांच्या साह्याने रात्रीतून ही म्हैस शोधून काढली. परंतु चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

रात्र पाळीच्या गस्तीदरम्यान सहा. फौजदार शिरसाट, पो.हेड .कॉ. बोन्द्रे ,पोलीस कर्मचारी अमोल अजबे यांना चोरीच्या म्हशीबद्दल माहिती मिळाली.

यानंतर त्यांनी गस्तीदरम्यान काष्टी गणेशा रोडवर पाठलाग केला. परंतु रस्ता खराब असल्यामुळे चोर हाती लागले नाही. पोलिसांची गाडी पाहून म्हशीला रस्त्यावरच सोडून चोर पळून गेले.

त्यानंतर पोलिसांनी सदर म्हैस एका वस्तीवर बांधून मालकाला काष्टी बोलावून त्याच्या ताब्यात दिली.

प्रहार या बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी

0

ओडिसा : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच ‘डीआरडीओ’ने प्रहार या बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी केली. ओडिशा येथील बालासोर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथून ही चाचणी घेण्यात आली.

याबाबतची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली. गुरुवारी दुपारी ही चाचणी घेण्यात आली.

प्रहार एकाच वेळी विविध टार्गेटला नेस्तनाबुत करू शकते. तसेच उन्हाळा,पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये लक्ष भेदू शकते. मोबाईल लॉन्चरद्वारे या मिसाईला लॉन्च करण्यात आले असून याची मारक क्षमता १५० किमी आहे. मिसाईलची लांबी ७.३२ मीटर असून तिचा व्यास ४२० मिलीमीटर आहे.

मिसाईलचे वजन १.२८ तर ही मिसाईल २०० किलो वजन वाहून नेऊ शकते. प्रहारच्या चाचणीवेळी सेना प्रमुख जनरल बिपिन रावत, डीआरडीओ प्रमुख डॉ. जी सतीश रेड्डी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

घर शोधताय ? इथे या केवळ ७० रुपयांत मिळणार घर

0

इटली : होय, हे खर आहे. जगातील सुंदर देशांपैकी एक असलेल्या इटलीमध्ये केवळ १ युरो म्हणजेच भारतीय ७० रुपयांत घर मिळते आहे. येथील ओलोलीम या शहरात लोकसंख्या कमी होत चालली आहे.

त्यामुळे येथील सरकारने येथील घरे विक्री साठी काढली आहेत. मात्र त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. ती म्हणजे हे घर घेतल्यावर तीन वर्षाच्या आत त्याचे रिनोवेशन करावे लागले. ज्यासाठी ७ लाख ९५ हजार ३७५ रुपये खर्च येईल.

सौजन्य : विकिपीडिया

Social Media

26,091FansLike
5,154FollowersFollow
1,137SubscribersSubscribe
error: Content is protected !!