Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगावातून करण पाटील, रावेरातून श्रीराम पाटलांचा अर्ज दाखल

जळगावातून करण पाटील, रावेरातून श्रीराम पाटलांचा अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन

जळगाव – लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील तर रावेर मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी जळगाव शहरातून रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले.

जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. जळगाव मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील तर रावेरातून शरद पवार गटाचे श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून जिल्ह्यात भाजपासाठी कडवे आव्हान उभे करण्यात आले आहे. जळगावातून भाजपाच्या स्मिता वाघ तर रावेरातून विद्यमान खासदार रक्षा खडसे ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

संजय राऊत, जयंत पाटलांची उपस्थिती
महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी ठाकरे गटाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत व शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासह माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, अरूणभाई गुजराथी यांनी उपस्थिती दिली. अर्ज भरण्यापूर्वी संजय राऊत, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. त्यानंतर शिवतीर्थ मैदानापासून रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीत जळगावचे उमेदवार करण पाटील आणि रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी खुल्या जीपमधून मतदारांना अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आयोजित छोटेखानी सभेत संजय राऊत, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली.

- Advertisment -

ताज्या बातम्या