मनमाड-येवला रस्त्यावर कार आयशरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा ठार

0

राजेंद्र शेलार | येवला-मनमाड महामार्गावर विसापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता इनोव्हा कारचा चक्काचूर होऊन मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत विखुरले होते.

आर्टिगा कार क्रमांक एमएच 17 बीएल 1881 कार व आयशर ट्रक क्रमांक एच आर 45 ए 7070 यांच्यात समोरासमोर धडक झाली आणि दोन्हीही वाहने भरधाव वेगात असल्यामुळे कारचा चुराडा झाला.

मृतांमध्ये एक सहा महिन्यांच्या बाळाचा, तीन पुरुषांचा आणि दोन महिलांचा समावेश असून सर्व मृतदेह येवला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. सहा पैकी दोन मृतदेहाची ओळख पटली आहे. मृतांचे नातेवाईक येवल्यात येत असल्याचे समजते.

अपघातानंतर येवला-मनमाड महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. येवला तालुका पोलीस स्टेशन निरीक्षक भापकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार बाळनाथ मुरलीधर आनंद यांच्यासह कुटुंबातील इतर पाच जण जागेवर ठार झाले आहेत.
अपघातानंतर आयशर गाडीचा चालक क्लीनर फरार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुष आणि एक लहान मुलगा यांचा समावेश आहे

मृतांची नावे 

1 बाळासाहेब मुरलीधर आनाड (वय 60)
2 इंदुबाई बाळासाहेब अनाड (वय 55)
3 श्रीनाथ बाळासाहेब आनाड (वय 25) तिन्ही राहणार शारदा नगर कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर
4 मोहिनी गणेश खांदवे
5 हरी गणेश खांदवे (वय 5) वर्षे दोघे राहणार अहमदनगर
6 भिमाबाई बापू गोखले (वय 70) रा. इंदोर

सुरगाणा तालुक्यात 12 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

0

नाशिक । प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सलग दुसर्‍या दिवशी सुरगाणा तालुक्यातील बर्डिपाडा शिवारात कारवाई करत राज्यात विक्रीस बंदी असलेल्या मद्यसाठ्याची वाहतूक करणार्‍या वाहनावर छापा टाकून 7 लाख 50 हजार रुपयांचा देशी मद्याचा साठा व 5 लाखाचे वाहन असा साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळालेल्या खबरीनुसार, अवैध मद्याची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, एस.एस. रावते, कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, अमन तडवी, सोनाली चंद्रमोरे, अनिता भांड यांच्या भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील बर्डिपाडा शिवारात वनविभागाच्या चेकनाक्याजवळ सापळा रचण्यात आला होता. सोमवारी (दि.19) सायंकाळी सहाच्या सुमारास (एमएच 48 एजी 1766) या क्रमांकाचे संशयित वाहन येताच दबा धरून बसलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हा केला.

परंतु पुढे नाकाबंदी असल्याचे पाहून चालकाने वाहन तेथेच सोडून पळ काढला. पथकाने वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी घातलेला विदेशी दारुसाठा आढळून आला. त्यानुसार विभागाने साडे सात लाख रुपयांचा मद्यसाठा आणि 5 लाख रुपयांचे वाहन असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पथ्लृकाने अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कामांंचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

0

नाशिक । प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूकांच्या तयारीला वेग आला असून नववर्षाच्या सुरूवातीला आचारसंहीता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असून आचारसंहीतेपुर्वी जिल्हा नियोजन समितीकडील विकासकामांना मान्यता देण्यासाठी प्रशासनाने धावाधाव सुरू केली आहे. या संदर्भात नुकतीच जिल्हाधिकारयांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात येउन विकास कामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारयांनी यंत्रणांना दिले.

नविन वर्ष हे निवडणूकिचे वर्ष आहे. त्यामुळे जानेवारीपासून प्रशासकिय यंत्रणा निवडणूक कामात गुंतणार आहे. तत्पूर्वी विकास कामांसाठी प्राप्त निधी परत जाउ नये याकरीता तातडीने विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी या बेैठकित सुचना देण्यात आल्या. जिल्हा नियोजन समितीच्या आराखडयात सर्वाधिक हिस्सा हा जिल्हा परिषदेचा आहे. मात्र जिल्हा परिषदेने निधी खर्चाबाबत उदासिनताच दाखवल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या 130 कोटीपैकी 33 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता आहे.

त्यामुळे जि.प.ने वेळेत 100 कोटीच्या कामांना प्रशासकिय मान्यता न दिल्यास, निवडणूकीत आचारसंहितेमुळे शंभर कोटीची कामे अडकण्याची चिन्हे आहेत. डिसेंबर-जानेवारीत नियोजन समितीची बैठक घेउन आचारसंहितेपूर्वी कामे मंजूरीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. विविध शासकीय यंत्रणाकडून प्रतिसादही मिळतो आहे फक्त अपवाद जिल्हा परिषदेचा आहे. जि.प. परिषद यंत्रणेचे कामकाज मात्र अतिशय संथ पध्दतीने सुरु आहे. त्यामुळे पुढील दिड महिन्यात अशाच गतीने जि.प. प्रशासनाची वाटचाल राहिल्यास,आचारसंहितेच्या बडग्यात सगळी कामे अडकून पडण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय निधीकडे लक्ष
केंद्र शासन व राज्य शासनाच्या एकत्रित निधीतून अनेक विभागाची कामे प्रस्तावित आहेत. मात्र, अनेक योजनांना केंद्र शासनाकडून पैसेच आलेले नाहीत. त्यामुळेही प्रशासकीय यंत्रणेची अडचण झाली आहे. राज्याच्या हिश्साची कामे करतांना केंद्रीय हिस्सा कधी मिळतो याकडेही यंत्रणेचे लक्ष आहे. विशेष ग्रामीण पाणीपुरवठा योजना 20 कोटी केंद्रीय निधी बाकी असून याशिवायल लहान लहान योजनांचे सात ते आठ कोटी केंद्रीय हिस्सा बाकी आहे.

नैसर्गिक गॅसपुरवठा योजनेचा उद्या शुभारंभ; नाशिकसह सात शहरात पाईपलाईनव्दारे गॅसपुरवठा

0

नाशिक । प्रतिनिधी
स्वच्छ इंधन योजनेंतर्गत भारत सरकारमार्फत देशातील 174 शहरात नैसर्गिक गॅस पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात नाशिकसह सात शहरांचा या योजनेत सामावेश करण्यात आला असून याव्दारे ग्राहकांना घरपोच शाश्वत गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ उद्या दि. 22 रोजी होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे नाशिककरांशी संवाद साधणार आहे.

गुरूवारी मविप्रच्या राबवसाहेब थोरात सभागृहात दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खा. हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.उपस्थित राहणार आहेत. देशात 2030 पर्यंत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण 33 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे केंद्र शासनाचे उदिदष्ट आहे. त्याअंतर्गत नैसर्गिक वायुचा पुरवठा वाढवत देशातील प्रदुषण नियंत्रण साध्य करण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे.

नैसर्गिक वायुच्या वापरातून पेट्रोल डिझेलचे अवलंबित्व कमी करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. याव्दारे वाहनचालकांना पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत अवघ्या 25 ते 30 टकके खर्चात आपली इंधनाची गरज पुर्ण करता येणार आहे. उद्या पंतप्रधान मोदी हे सातही शहरांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधणार असून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणारआहे.

या शहरात राबवणार योजना
राज्यात भारत गॅस रिर्सोसेस लि., आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.च्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. नाशिकसह धुळे, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, सातारा, सांगली, नगर शहरांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या तीन शहरांची जबाबदार भारत गॅस रिर्सोसेस लि., तर औरंगाबाद, सातारा, सांगली, नगर शहराची जबाबदारी महाराष्ट्र नॅचरल गॅस.लि. कडे सोपविण्यात आली आहे.

बांधकाम कामगारांना सुरक्षा उपकरणे वाटप

0
सातपूर | प्रतिनिधी बांधकाम कामगार मंडळ व सिटू संघटनेच्या संयुक्त विद्यमाने  बांधकाम मजुरांना सुरक्षा उपकरणे व अत्यावश्यक किटचे वाटप करण्यात आले. राज्यातील तीन लाख तर जिल्हाभरातील २० हजार.बांधकाम कामगारांना याच फायदा होणार आहे.
बांधकाम कामगारांना आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेण्यासाठी या किटचे वाटप सुरु करण्यात आले आहे. सलग पंधरा दिवस या किटचे वाटप सुरु रहाणार आहे. मुंबई आग्रा रोडवरील बांधकाम कामगार मंडळाच्या कार्यालयात या किटचे वाटप करण्यात आले.
सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, बांधकाम कामगार फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम ठोंबरे, चिटणिस सिंधु शार्दुल, पुरुषोत्तम गायकवाड, गौतम कोंगळे, राहूल नारनवरे यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांनी लाभ घ्यावा
संघटनेतर्फे वेळोवेळी आंदोलन केल्यामुळे हे यश मिळाले आहे. सलग पंधरा दिवस या किटचे वाटप सुरु रहाणार कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
सिताराम ठोंबरे,(अध्यक्ष, बांधकाम कामगार फेडरेशन)

जिल्हयात दोन लाख नवमतदारांची नोंद

0

नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यात तब्बल दोन महिने घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनर्रीक्षण मोहिमेमध्ये तब्बल 2 लाख 11 हजार 917 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मालेगाव मध्य मतदारसंघात सर्वाधिक 22176 मतदार नोंदणी झाली आहे. नवमतदार नोंदणीत नाशिक हे मुंबई, ठाण्यानंतर राज्यात तिसर्या स्थानी आहे. जिल्हयात एकूण मतदारांची संख्या 44 लाख 75 हजार 248 इतकि झाली आहे.

लोकसभा निवडणूकांचा बिगूल वाजण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आत्तापासूनच निवडणूकीच्या तयारीला प्रारंभ केला आहे. राज्यासह देशभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर याकाळात मतदार याद्या पुनर्रीक्षण मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघात ही मोहिम घेण्यात आली. निवडणूक शाखेने या दोन महिन्यात घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्ह्यात 2 लाखांहुन अधिक नवमतदारांनी नोंदणी करण्यात आली.

दरम्यान, या मोहिमेअंतर्गत निवडणूक शाखेने बीएलओंमार्फत (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) प्रत्येक मतदारसंघातील कुटुंबांना भेटी देत 18 वर्षे पुर्ण झालेल्या युवकांचे अर्ज भरून घेतले. याशिवाय राजकीय पक्षांसह महाविद्यालये, वसतीगृह, सरकारी कार्यालये, एनजीओ, विविध संस्थांंची या मोहिमेसाठी मदत घेतली. त्यामुळे नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक शाखेला हातभार लागला.

जिल्ह्यातून दाखल झालेल्या एकुण अर्जापैकी 10 टक्के अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून भरण्यात आले आहेत. दरम्यान, एकुण दाखल अर्जांपैकी 2 लाख 4 हजार 917 अर्जांच्या डेटा एन्ट्रीचे काम आयोगाच्या संकेतस्थळावर पुर्ण झाले आहे. सात हजार अर्जांची माहिती भरण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पंधराही विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 22176 अर्ज मालेगाव मध्य मतदारसंघातून दाखल झाले आहेत. त्याखालोखाल नाशिक पुर्वमधून 19536 अर्ज आले आहेत. दरम्यान, नवमतदारांबरोबर मतदारयादीतून नाव वगळणे, पत्ता व नाव दुरूस्तीची मोहिम हाती घेण्यात आली होती. गेल्या काही वर्षात निवडणूक शाखेने केलेल्या कामामुळे नाव व पत्ता दुरूस्तीची अर्ज कमी दाखल झाल्याची माहिती निवडणूक शाखेचे तहसिलदार गणेश राठोड यांनी दिली.

मतदारसंघनिहाय नवमतदार नोंदणी
नांदगाव : 12016, मालेगाव मध्य : 22176, मालेगाव बाह्य : 12565, बागलाण : 13181, कळवण : 9794, चांदवड : 8947, येवला : 11506, सिन्नर : 12643, निफाड : 11145, दिंडोरी : 14687, नाशिक पुर्व : 19536, नाशिक मध्य : 18269, नाशिक पश्चिम : 14973, देवळाली : 12549, इगतपुरी : 10930

21 November 2018

0

प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अभिनव आंदोलन

0
जळगाव । महामार्गाला समांतर रस्ता तयार करण्यासाठी समांतर रस्ते कृती समितीतर्फे गेल्या सहा दिवसांपासून लाक्षणीक उपोषण सुरु आहे. उपोषणात आज हिंदू मुस्लिम धर्मानुसार प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान आज आंदोलनाला 9 संघटनांनी पाठिंबा दिला असून 3 हजार नागरिकांनी स्वाक्षरी करुन पाठिंबा दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या समांतर रस्ते कृती समितीतर्फे गेल्या सहा दिवसांपासून लाक्षणीक उपोषण सुरु आहे. आज या आंदोलनात शिवसेनेचे माजी आ. आर. ओ. पाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे, सुनील महाजन, किशोर भोसले, गजानन मालपुरे, नितीन बरडे, प्रताप पाटील, प्रशांत नाईक, संदेश भोईटे, प्रकाश बेदमूथा, माजी महापौर सदाशिव ढेकळे, करीम सालार, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सुभाष साखला, गाळेधारक संघटनेचे शांताराम सोनवणे, युवराज वाघ, राजेश पिंगळे, मनपाच्या महिला बाल विकास समिती अध्यक्षा मंगला चौधरी, प्रा. डी डी बच्छाव, सलमान खटीक, शोभा चौधरी, राष्ट्रवादी राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे कल्पना पाटील, कल्पिता पाटील, सविता बोरसे, मीनाक्षी चव्हाण, ममता तडवी, लता बाविस्कर, डॉ.सुषमा चौधरी, अर्चना कदम, युवा विकास फाउंडेशनतर्फे विष्णू भंगाळे, मराठा प्रीमियर हिरेश कदम, श्रीराम पाटील, किरण बच्छाव, विजय देसाई, शंभू सोनवणे, एम. आय. एम.चे अध्यक्ष जिया बागवान, समन्वयक बशीर बुरहानी, नगरसेवक रियाज बागवान, नगरसेवक हाजी रशीद खान, चांद पटेल, वसीम बापू, जावेद शेख उपस्थित होते.

व्हीलचेअर, स्ट्रेचरचे प्रदर्शन
समांतर रस्त्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात महामार्गावर अपघात झाल्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात जाण्यासाठी रुग्णवाहिका, व्हीलचेअर, कुबड्या, स्ट्रेचर, आदी वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

सर्व धर्मगुरुंची सामुहिक प्रार्थना
आंदोनस्थळी सर्व धर्मातील धर्मगुरुंतर्फे प्रार्थना करण्यात आली. यामध्ये हिंदूधर्मातर्फे विश्वनाथ जोशी, मुस्लिमधर्मातर्फे मुफ़्ती अतीकुर्रहमान, ख्रिश्चनधर्मातर्फे फादर फ्रान्सिस, बौद्धधर्माच्यावतीने भन्ते संघरत्नजी यांनी सामुहिक प्रार्थना केली.

तिरडी घेवून आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात
आंदोलनात सहभागी झालेले आंदोलकांनी हिंदू धर्म पद्धतीनुसार तिरडी तयार करुन तर मुस्लिम धर्मानुसार जनाजा तयार करुन दोघ अंत्ययात्रा आंदोलन स्थाळापासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेण्यात आल्या. यावेळी अंत्ययात्रेत आंदोलनकांडून राम नाम सत्य है, कलम ए अशहद ला इलाहा इल्लल्लाह असे म्हणत प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली.

Social Media

26,929FansLike
5,154FollowersFollow
1,364SubscribersSubscribe
error: Content is protected !!