शेवगाव गेवराई राजमार्ग बनला मृत्यूचा सापळा

0

चापडगाव वार्ताहर – शेवगाव गेवराई हा राज्यमार्ग मृत्यूचा सापळा बनू पाहतोय या राजमार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होत आहेत. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खड्डे बुजवण्याचे काम केले जात नाही. दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून आपले वाहन चालवताना अनेकदा मोठी कसरत करावी लागते आहे. या राजमार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत तसेच अरुण पूलही आहेत.

या धोकादायक वळणावर कोणतेही सूचना फलक सार्वजनिक बांधकाम खात्याने लावलेले नाही. अनेक ठिकाणी या सूचना फलकाच्या अभावामुळे वाहन चालकांना रस्त्याचा नीटसा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात या मार्गावर होत आहेत. अनेक पुलावरील संरक्षक कठडे नाहीत तसेच संरक्षक कुंडही मोडून पडलेले आहेत या रस्त्याची फुलांची अनेक दिवसापासून दुर्दशा आहे. या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

“काव्यप्रेमी” पहिल्या दिवाळी अंकाचे मोठ्या थाटात प्रकाशन

0

नवापूर | यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील एस.पी.एम.गिलाणी महाविद्यालयाच्या सभागृहा मध्ये शासनमान्य नोंदणीकृत “काव्यप्रेमी शिक्षक मंच” तर्फे  पाचवा राज्यस्तरीय काव्य महोत्सव उत्साहात पार पडला.

काव्य महोत्सवाचे उद्घाटन सदृद्दीनभाई गिलाणी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करुन व फीत कापुन रीतसर पार पडले तर सम्मेलनाध्यक्ष म्हणून छत्तीसगढ़ येथील अखिल भारतीय किसान महासंघाचे अध्यक्ष तथा भारत सरकार राष्ट्रीय आयुर्वेद विश्व परिषदचे अध्यक्ष राजारामजी त्रिपाठी विराजमान होते.

प्रमुख अतिथि म्हणून अड. अनिरुद्धजी लोणकर, शिप्रा त्रिपाठी, प्रा.डॉ एम.ए.शहजाद, असलमभाई गिलाणी, देवीदास टोंगे, संगीता मुनेश्वर, संजय ताजणे तसेच काव्यप्रेमी राज्य समितीचे अध्यक्ष आनंद घोडके, सचिव कालिदास चवडेकर कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे आदि उपस्थित होते.

सम्मेलनाध्यक्ष राजारामजी त्रिपाठी यांनी प्राचीन युगापासून तर आज पर्यंत कवितेच्या प्रवासाचे वर्णन आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हाटसपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या शिक्षक कवींच्या काव्यप्रेमी संस्थेच्या पहिल्या “काव्यप्रेमी” दिवाळी अंकाचे तसेच “अष्टाक्षरी” या प्रा. सत्येंद्र राऊत संपादीत प्रातिनिधीक कवितासंग्रहाचे,श्री. व्यंकटेश काटकर लिखित “विचारवेध” व कवी क.वि. नगराळे यांच्या “मिसय” व राजारामजी त्रिपाठी यांच्या “ककसाड” या पुस्तकांचे थाटामाटात प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी समाजातील विविध समस्यांना वाचा फोडणारे व सामाजिक बांधिलकी बाळगणार्या विविध वृत्तपत्रांचे वार्ताहर /पत्रकार प्रतिनिधी अनंत नखाते, कैलाश कोरवते, पांडुरंगजी निवल, मुकेश चिव्हाणे व आकाश बुर्रेवार व घाटंजी तालुका पत्रकार संघटनेचे सचिव दिनेश गाऊत्रे तसेच यवतमाळ आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक प्रमोद बाविस्कार व मंगला माळवे यांचा काव्यप्रेमी संस्थे तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.

सौ.जया नेरे-राज्य समिती सदस्या यांना सोपवलेले पालकत्व जिल्हा नंदुरबार व धुळे पैकी उपक्रमशिल काव्यप्रेमी शिक्षकमंच म्हणून नंदुरबार जिल्ह्याला मान मिळाला व त्या बद्दल नंदुरबार जिल्हाध्यक्ष-सौ.सरला साळूंखे यांचा मा.शिप्राजी त्रिवेदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या महोत्सवात काव्यप्रेमी राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष आनंद घोडके,उपाध्यक्ष पी.नंदकिशोर, सचिव कालिदास चवडेकर, सहसचिव दीपक सपकाळ, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, सदस्य -प्रमोद बाविस्कर, भाऊसाहेब सोनवणे, जया नेरे, प्रा.सत्येंद्र राऊत,रामदास देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत राज्यभरातून 200 हून अधिक जेष्ठ ,श्रेष्ठ व नवोदित कवी कवयित्रींनी विविध विषयांवर ज्यामध्ये आई,बाप,शेतकऱ्यांच्या व्यथा, सामाजिक अवस्था यासारख्या विविध विषयांवर रचना सादर केल्या. या प्रसंगी सर्व कवींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले.

संपूर्ण महोत्सवासाठी निवास, भोजन व उत्कृष्ट सभागृह व्यवस्था व संपूर्ण उत्कृष्ट नियोजना बद्दल महोत्सवाचे मुख्य संयोजक व राज्य समितीचे सहसचिव दीपक सपकाळ, काव्यप्रेमी यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय बिंदोड, सचिव गजानन कावडे, फिरोज पठाण व अमरावती जिल्हाध्यक्षा वर्षा भांदर्गे यांचाही सत्कार करण्यात आला.

या काव्य महोत्सवाच्या यशस्वीते करिता काव्यप्रेमी राज्य कार्यकारिणी तसेच अमरावती व यवतमाळ जिल्हा शाखा यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी सम्मेलनाचे मुख्य संयोजक दीपक सपकाळ यांच्या परिवारा तर्फे राज्यभरातून आलेल्या महिला कवयित्रींना दिवाळीची साडी भेट देण्यात आली.

मुख्य समारंभाचे सुत्र संचलन भाऊसाहेब सोनवणे यांनी तर संपूर्ण कवी सम्मेलनाचे सुत्र संचलन वर्षा भांदर्गे यांनी केेले तर आभार दीपक सपकाळ यांनी मानले.

राजकीय शाल जोडीत झाले रावेरात ज्वारी खरेदी केंद्राचे काटापूजन 

0

रावेर | दि.१६ | प्रतिनिधी   :  रावेरला शुक्रवारी ज्वारी खरेदी केंद्राचे  काटापूजन आमदार हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत पार पाडले.यावेळी झालेल्या राजकीय फटकेबाजीत आमदार हरिभाऊ यांनी विरोधकासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याची चांगलीच खरडपट्टी काढली.यावेळी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेस पदाधिकारी यांच्यात चांगलीच शाल-जोडे बसलेले जाणवत होते. 

   आमदार हरिभाऊ जावळे यांच्यातील आक्रमकता शुक्रवारी झालेल्या ज्वारी मका खरेदी केंद्राच्या काट्याचे पूजनाप्रसंगी दिसून आली.प्रारंभी ज्वारी खरेदीचे उद्घाटन झाले.प्रथम क्रमांकाने नोंदणी केलेल्या संजय पाटील (मसाका व्हा.चेअरमन भागवत पाटील यांचे बंधू ) यांची ज्वारी मोजली, त्यांचा सत्कार आमदार जावळे यांनी केला.
या नंतर झालेल्या अनौपचारिक  चर्चेदरम्यान आमदार जावळे यांना जिल्हा परिषदचे माजी सदस्य रमेश पाटील,सोपान पाटील,मसकाचे व्हा.चेअरमन भागवत पाटील यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताच आमदार जावळे यांनी देखील आक्रमकपणे सर्व आरोप फेटाळले,दरम्यान बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्याच्या कामाबाबत सुरु असलेल्या चर्चेत,चार दिवसात बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गाचे काम झाले पाहिजे नाहीतर बदली करा असा गर्भित इशारा जावळे यांनी बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता इम्रान शेख यांना दिला.
पिक विमा बाबत देखील त्यांनी आक्रमकपणे बाजू मांडली.तर दुष्काळी परिस्थितीत देखील त्यांनी सरकारची बाजू मांडली.रमेश पाटील यांनी सरकार कडे पैसे नाहीत त्यामुळे काम होत नसल्याचे अधिकारी सांगतात,असे बोलून शहनिशा करण्यसाठी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता इम्रान शेख यांना कॉल करून विचारणा केली असता शेख यांनी डांबर नसल्याने काम बंद असल्याचे सांगतच आमदार जावळे,सुरेश धनके व पद्माकर महाजन यांनी रमेश पाटील यांच्यावर बूमरॅॅग केले.
  याप्रसंगी तहसीलदार विजयकुमार ढगे,जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंके,सुरेश धनके,पद्माकर महाजन,पं. स. सभापती माधुरी नेमाडे, मसाका व्हा. चेअरमन भागवत पाटील, रा.कॉ.किसान सभा जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील,शेतकी संघाचे चेअरमन पी.आर. पाटील,जिजाबराव चौधरी,बाजार समिती सभापती नीलकंठ चौधरी,भाजपा तालुका अध्यक्ष सुनील पाटील,लक्ष्मण मोपारी, सुर्यभान चौधरी,रमेश पाटील, यादवराव पाटील, कृ. उ.बा. संचालक श्रीकांत महाजन, पितांबर पाटील, डि.सी. पाटील, जि.प. सदस्या रंजना पाटील, गोपाळ नेमाडे, पंचायत समितीचे गटनेते पी के महाजन,सदस्या  योगिता वानखेडे,निलेश चौधरी, किशोर पाटील, विनोद पाटील, सचिन पाटील, विलास ताठे,बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन,संघाचे व्यवस्थापक  विनोद चौधरी,ग्रेडर प्रशांत पाटील व शेतकरी उपस्थित होते.
कोणतीच अडचण येता कामा नये-आमदार जावळे 
खरेदी केंद्राच्या काटापूजांनाप्रसंगी आमदार जावळे यांनी ग्रेडर प्रशांत पाटील यास बोलवून बारदान,सुतळी कोणतीच कमतरता खरेदी केंद्रावर जाणवता कामा नये,विरोधकांना बोलण्याची संधी देवू नका अशा सूचना यावेळी दिल्या आहेत.तर रावेर यावल तालुक्यात झालेल्या कमी पाऊसाने दुष्काळ जाहीर झाला आहे.हेक्टरी दुष्काळी भागात १० किं ज्वारी खरेदी होत आहे,मात्र आपण रावेर साठी निकष वेगळा लावून आणला असल्याचे त्यांनी सांगितले

सोलापुर येथे होणाऱ्या राज्यस्तरिय सरपंच परिषदेला येणार  मुख्यमंत्री 

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरपंच परिषदेचे आमंत्रण  देतांना  संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, कैलास गोरे, श्रीकांत महाजन (तांदलवाडी ता. रावेर), दत्ता काकडे, विकास जाधव, सचिन जगताप, उषा काळे, कौसर जहांगिरदार, गोविंदराव माकणी, सुहास चव्हाण, अतुल लांजेकर आदी दिसत आहे.
रावेर |दि. १६ | प्रातिनिधी  : सोलापुर येथे होणाऱ्या राज्यस्तरिय सरपंच परिषदेत  मुख्यमंत्र्यानी उपस्थित रहावे हे आमत्रंण देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, जानेवारीत होणाऱ्या या परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या होकाराने बळकटी आली आहे.
  गुरुवारी मुंबई येथिल सह्याद्रीवर अखिल भारतीय सरपंच परिषद संघटनेच्या १० सरपंचानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री ९ वा. भेट घेतली. यावेळी संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, कैलास गोरे, श्रीकांत महाजन (तांदलवाडी ता. रावेर), दत्ता काकडे, विकास जाधव, सचिन जगताप, उषा काळे, कौसर जहांगिरदार, गोविंदराव माकणी, सुहास चव्हाण, अतुल लांजेकर आदी सरपंच यावेळी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने  सोलापुरला जयंतराव पाटील (कुर्डकर) यांच्या मार्गदर्शनातुन होणारी राज्यस्तरीय सरपंच परिषदेचे निमंत्रण दिले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी  ग्रामीण भागातील विकासा बाबत चर्चा देखिल झाली. उपस्थितांनी समस्यांचे निवेदन देखील  दिले आहे.

गिरणारे येथे शेतकरी आणि कामगार यांच्यामध्ये वाद झाल्याने तणाव

0

गिरणारे : टोमॅटो पिकाचा पडलेला भाव आणि कामगार वर्गामध्ये रोजावरून झालेले मतभेद यामुळे काल गिरणारे येथे किरकोळ वाद होऊन आठवडे बाजार बंद पाडण्यात आला. सकाळी बैठक होऊन कामगार आणि शेतकरी वर्गात समेट घडवून आणण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून पुन्हा एकदा कामगार वर्ग कामावर येणार असल्याची माहिती आहे.

शेतमालाला मिळालेला मातीमोल भाव आणि वाढलेली मजुरी यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी त्रस्त झाला आहे. रोजगार कमी करावा म्हणून मजुरांना काही शेतकरी विश्वासात घेत होते. तसेच शेतकऱ्यांकडून अन्याय होत असल्याच्या तक्रारी मजूर करत होते.

याचवेळी मजूर आणि शेतकरी यांच्यात वाद झाले. वादामुळे गिरणारेसह परिसरात प्रचंड तणाव होता. प्रकरण पोलिसांत गेले नसल्याने आपापसात हे प्रकरण मिटवण्यात आले असून यावर दोन्ही वर्गांनी समजून घेत उद्या पासून दैनंदिन बाजार सुरळीत राहणार आहे.

कामगार वर्ग व शेतकरी वर्ग यांना बोलवून यावर तोडगा काढण्यात आला असून उद्यापासून दैनंदिन बाजार सुरळीत राहणार आहेत. ९५ सालापासून हा आठवडे बाजार भरत असून पहिल्यांदा असा तणाव निर्माण झाला. परंतु गावातील प्रतिनिधींनी एकत्र येत दोन्ही वर्गामध्ये सामंजस्य घडवून आणले आणि वाद निवळला.
– अनिल थेटे , शेतकरी , गिरणारे

गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच; मोदींचं आव्हान

0

भोपाळ : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता जोरात सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दोन्ही राज्यांमध्ये आज सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये मोदींनी गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली. काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी 5 वर्षांसाठी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवावे.

काँग्रेसने मोदींवर केलेल्या टीकेला उत्तर देत असताना मोदींनी हे आव्हान दिलं आहे. पंडित नेहरूंच्या दूरदर्शी धोरणामुळेच एक चहावाला आज देशाचा पंतप्रधान होऊ शकला. नेहरूंनी संस्था एवढय़ा मजबूत बनवल्या की सर्वसामान्य माणूसही देशाच्या सर्वोच्च पदावर जाण्याचे स्वप्न बघू शकतो अशी टीका काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केली होती.

मी दररोजच सरकारनं चार वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब देतो. पण एक चहावाला पंतप्रधान कसा झाला, या विचारानं काही लोक रोज रडगाणं गातात. लोकशाही समजून घेत नाहीत, तोपर्यंत तुम्ही चहावाल्याला बोलत राहणार. नेहरू यांच्यामुळं चहावाला पंतप्रधान झाला असं काँग्रेसचे लोक सांगत सुटले आहेत. पण पाच वर्षांसाठी गांधी कुटुंबाच्या बाहेरच्या एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षाचा अध्यक्ष करा, असं आव्हानही मोदींनी दिलं.

 

ब्लॉग : पबजीने केला तरुणाईच्या डोक्याचा चोथा

0

वीर जवान केशव गोसावी शहीद झाल्याची बातमी एकीकडे वाऱ्यासारखी पसरत असतांना देशातील लाखो तरुण पबजी खेळण्यात व्यस्त आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले आहेत. त्यामुळे हातातले काम, आपल्या जबाबदाऱ्या विसरून अनेकांना मोबाईलने अक्षरश: वेड्यात काढले आहे.

केशव गोसावी शहीद झाल्याची वार्ता मिळाली तो दिवस सर्वांसाठीच काळा दिवस होता. बातम्या येत होत्या. शासकीय इतमामातील अंत्यसंस्काराबाबत अनेकजन तर्कवितर्क लढवत होते.

मला काही काम होती त्यामुळे मी घराच्या बाहेर पडलो. ज्या-ज्या ठिकाणी गेलो त्या-त्या ठिकाणी काही तरुण एकत्र बसून मोबाईल हाताळताना दिसले…हे काही नवीन नव्हतं…पण मधेच त्यांच्यातून, तो मागून आला रे, त्या बिल्डिंगमध्ये आहे.

यहा शॉटगन हे चाहिये तो ले-ले, मार उसको, अरे मेरी गोलिया खतम हो गयी, मुझको गोली लगी है, हे न असे कितीतरी वाक्य एकामागून एक ऐकायला आले…अंग शहारलं या देशाचा जवान ज्या लोकांच्या संरक्षणासाठी शहिद झाला…ती तरुण पिढी पबजी गेम खेळण्यात व्यस्त होती…त्यांच्याच मस्तीत…

एक जवान त्याचे वडील वृद्ध, दोन बहिणी, गरोदर पत्नी, होणाऱ्या बाळाचा, त्यांच्या संसाराचा विचार न करता देशासाठी कामी आला. ज्यांना देशातील नागरिकांची दिवाळी, सण, उत्सव साजरे व्हावे यासाठी स्वत: ला कुटुंबासोबत सण साजरे करता येत नाहीत.

सीमेवर 24 तास जागता पहारा देत ‘माझा देश’ वाचविण्यासाठी नियमित एखाद्या अभेद्य बुरुजासारखे उभे असतात.    वास्तवातील हा खेळ, जो स्वतःसाठी नाही तर देशासाठी आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी, स्वतःची कुठलीही पर्वा न करता खेळला जातो. ज्याचं महत्व आणि गांभीर्य हे असले खेळ खेळण्याच्या नादात या पोरांना राहिलं नाही.

या देशाचा दुसरा जवान मुलगा, ज्याच्या घरी दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी झाली कुटुंबासोबत,  बाहेर गेला की आई वडिलांना वाटतं काहीतरी कामात असेल पोरगं, तो पोरगा मोबाईलमधला खेळ खेळत असतो.

ज्यात अनेक बिनकामच्या गोळ्या खर्ची होतात. आजूबाजूला बसणाऱ्यांच्या डोक्याची खिचडी होते. दुसऱ्याला गोळी मारण्याचा आनंद या खेळामध्ये आपण मेल्याच दुःख हे फक्त आपल्या पुरतच मर्यादित असतं.

देशातील तरुण पिढी या पबजीमध्ये तासनतास डुबून डोक्याने अधू होत चालली आहे की काय? नव्हे अधुच झाली आहे.. ऐन तारुण्यातले उमेदीचे दिवस आणि रात्र या खेळात वाया चालले आहेत.

देशाची तरुण पिढी पबजी सारख्या खेळाच्या व्यसनात डुबतेय आणि सरकारच यावर कुठलंही नियंत्रण नाही. यामुळे एक संपूर्ण पिढीच आणि पर्यायाने देशाचं नुकसान होत आहे. अश्या ऑनलाईन खेळांवर बंदी आणायला हवी, नाहीतर परिणाम घातक होत जातील.

हा लेख वाचून अनेक पबजी प्रेमी माझ्यावर नाराजही होतील. आपण आपल्या जबाबदाऱ्या आणि  कर्तव्य विसरत चाललो आहोत. मित्रांनो पबजी हा खेळ आता आला. विज्ञानाच्या प्रगतीत अनेक खेळ अजून येतील, परंतु आपल्या देशाप्रती असलेला आपला आदर जपून ठेवा. वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय कुठलाही मार्ग नसतो.

  • विक्रम राजाभाऊ कदम 

पथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस

0

नागपूर, ता. १६ (युएनआय) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि तेथील व्यवस्था प्रमुखांसह नागपूरच्या कोतवाली पोलिस ठाण्याला येथील सत्र न्यायलयाने नोटीस बजावली आहे.

संघाच्या संचलनात काठीचा वापर केला जातो, त्यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात एक याचिका न्यायालयात दाखल झाली होती.

पथसंचलनासारख्या कार्यक्रमात संघ स्वयंसेवक काठी घेऊन वावरतात. यंदाच्या २८ मे रोजी अशाच एका  संचलनात सुमारे ७०० स्वयंसेवकांनी खांद्यावर काठी घेऊन संचलन केले होते.

मात्र अशा कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी संघाने लाठीचे प्रदर्शन करू नये यासाठी मोहनीश जबलपुरे यांनी याचिका दाखल केली होती.

जबलपुरे यांनी सार्वजनिक पथसंचलनात लाठी वापरण्याबाबत काय नियम आहे? अशी माहिती माहितीच्या अधिकाराअंतर्गत पोलिसांकडून मागविली होती.

त्यात दिलेल्या उत्तरानुसार पथसंचलनादरम्यान लाठी वापरण्यास मनाई असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संघाच्या लाठी वापरण्यावर त्यांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यात त्यांनी असे म्हटले आहे की सार्वजनिक ठिकाणी लाठी वापरणे आणि त्याचे प्रदर्शन करण्यामुळे जनतेच्या मनात दहशत निर्माण होते. त्यामुळे लाठी वापरण्यावर बंदी असावी. त्यांनी असेही म्हटलेय की शस्त्रास्त्र कायद्यानुसार पथसंचलानादरम्यान लाठी वापरता येत नाही.

नागपूर सत्र न्यायालयाने ही  याचिका  दाखल करून घेत सरसंघचालक मोहन भागवत, व्यवस्था प्रमुख अनिल बोकरे आणि कोतवाली पोलिस ठाण्याला नोटीस बजावत या प्रकाराबद्दल लेखी स्पष्टीकरण मागविले आहे.

गुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार

0

मुंबई : आपल्याला वाट चुकल्यावर निश्चित स्थळी नेणाऱ्या गुगल मॅपने १३ वर्षाच्या कारकिर्दीत उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे लोकांना प्रवास करणे सोपे झाले असून म्हणून गुगल लवकरच एक नव फिचर आणणार आल्याची माहिती आहे.

आपल्या प्रवासात मार्गदर्शक होणारे गुगल मॅप आता संदेश पाठवण्यास मदतही करणार आहेत. कारण आपल्या मॅपमध्ये गुगल लवकरच टेक्स मेसेज फिचरचा समावेश करणार असल्यामुळे गुगल मॅपवर आता तुम्ही मेसेज करून संवाद साधू शकणार आहात. मेसेज सिस्टिम गुगल मॅपने एकत्रित केली आहे.

सध्या Android आणि IOS यांच्यासाठी गुगल मॅपचे मेसेज फिचर असेल. या महिन्यातील गुगल मॅपमध्ये होणारे पहिले अपडेट आहे. गुगल सतत नवीन फिचर्स घेऊन एक नवा प्लॅटफॉर्म युजर्सना देत असतो.

प्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा

0

नवी दिल्ली : मातृत्व लाभ कायद्यात (मॅटरनिटी बेनिफिट अॅक्ट) सुधारणा केल्यानंतर काही कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याच्या वृत्तानंतर सरकारनं त्यांचा रोजगार वाचवण्यासाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे. प्रसूती रजेच्या कालावधीत महिला कर्मचाऱ्यांचा रोजगार आणि नोकरी टिकवण्यासाठी भत्ता (इन्सेंटिव्ह) देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. प्रसूती रजा १२ ऐवजी २६ आठवडे करण्यात आली. त्यामुळं वाढीव १४ पैकी ७ आठवड्यांचा पगार सरकारकडून देण्यात येणार आहे.

केंद्रीय महिला आणि बाल विकार मंत्रालयाने गुरूवारी ही घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, 15 हजाराहून अधिक मासिक वेतन मिळणाऱ्या महिलांना 7 आठवड्यांचा प्रसुती रजेबाबतचा पगार सरकार कंपन्यांना परत करणार आहे. सरकारने ही घोषणा तेव्हा केली होती जेव्हा प्रसुती रजा हा 12 आठवड्यांवरून ती 26 आठवडे केली होती. वाढवण्यात आलेल्या १४ आठवड्यांपैकी ७ आठवड्यांचा पगार संबंधित कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव रोजगार मंत्रालयानं सरकारला दिला आहे, अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्यानं दिली.

काही कंपन्या गर्भवती महिलांना कामावरून देखील काढून टाकत आहेत. सरकारी आणि खाजगी कंपन्यांत काम करणाऱ्या महिलांकरता आता सरकारकडून खास घोषणा करण्यात आली आहे. महिला आणि बाल विकास विभाग सचिव राकेश श्रीवास्तव यांनी सांगितलं की, श्रण कल्याण अंतर्गत असलेल्या धनाचा वापर याकरता करणार आहे.

Social Media

26,855FansLike
5,154FollowersFollow
1,349SubscribersSubscribe
error: Content is protected !!