सहकारमहर्षी माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचे निधन

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- माजी आमदार व सहकारमहर्षी तालुक्यात पाहिला सह्कारी तत्वावर कारखाना सुरू करणारे राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष असलेले शिवाजीराव नारायणराव नागवडे यांनी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. मागील दोन महिन्यापासून ते वैद्कीय उपचार घेत होत. आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

काजी सांगवी येथे स्वाईन फ्लूचा बळी

0

काजीसांगवी वार्ताहर : सोनीसांगवी येथील भिवराज केंदु ठाकरे (42) यांच्या स्वाईन फ्यु सदुश्य आजाराने काल दि. 19 रोजी नाशिक उपचारा दरम्यान पहाटे पाच वाचता निधन झाले.

येथील भिवाजी ठाकरे हे गेल्या दोन दिवसापासुन खोकल्याच्या आजारावर चांदवड येथे खाजगी हाँस्पिटल मध्ये उपचार घेत असताना त्यांची तब्बेत खालावली त्यांना त्वरीत नाशिक येथील शासकिय रुग्णालयात हालविण्यात आले.

तेथे स्वाईन फ्ल्युने आजारावर उपचार चालु असताना त्याची काल पहाटे प्राणज्योत मावळली. त्याच्यावर सोनीसांगवी मुळ गावी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

इगतपुरी येथील सुगत बुद्धविहाराजवळील नालीचे बांधकाम काम सुरु

0

इगतपुरी । शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गाचा सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता व एक कि.मी.चा डांबरीकरण रस्ता गेली चार वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केला होता. मात्र रस्ता करतांना सुगत बुद्धविहाराजवळ या ठिकाणी पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाणी साचत असल्याने येथुन मार्गक्रमण करणाऱ्या नागरीकांपासुन ते विहारात जाणाऱ्या बौद्ध बांधवांना वंदनेसाठी जाणाऱ्या बांधवांना ओले वस्त्र व घाण पायाने जाण्याची वेळ येत होती.

याबाबत अनेक वेळा नागरिक व बौध्द बांधवांनी तक्रार करुनही दुर्लक्षच होत असल्याने अखेर भाजपाचे नगरसेवक दिनेश कोळेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने विषय मांडला. अखेर बांधकाम विभागाने या ठिकाणी पाण्याचा निचरा होणे कामी नाली काढण्याचे काम मंजुर केले. काल या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली यावेळी नगरसेवक दिनेश कोळेकर यांच्या हस्ते काल कुदळ मारून कामाला सुरवात करण्यात आली. नगरसेवक दिनेश कोळेकर व शिष्ट मंडळ यांनी जिल्हा मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याशी भेट घेऊन तातडीने हा विषय मांडला. आणि १५ दिवसांतच विहारापासुन नाली काढून थेट बसस्थानकापर्यंत तयार नाली तयार करण्याचे कामाला सुरुवात करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच रस्त्याला झालेल्या खडडयांची डागडुजी कामी सुमारे आठ लाख ८० हजार रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुर केला.

यावेळी सुगत विहाराचे प्रमुख शंकर डांगळे, भारीपचे अनिल पवार, मनोज मोरे, रमेश साळवे, रिपाईचे तालुका संघटक पोपट दोंदे, मधुकर रोकडे, भाजपाचे सुरेश संधान, सचिन उघाडे, रफिक शेख, सुमित बोधक, श्रीरंग पवार, रामचंद्र गोरे, माजी नगरसेवक मिलींद हिरे, विठोबा अहिरे, मुकेश रुपवते, अजय पवार आदी उपस्थित होते.

Video : जळगावला पाऊस सरी

0

जळगाव , प्रतिनिधी | दि. १९ :  गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या जळगावकराची धावपळ उडाली.

( व्हिडीओ संकलन : पंकज पाटील, देशदूत डिजीटल )

आडवाणी यंदा गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता

0

अहमदाबाद : आगामी येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. यातच सत्तेत असलेला भाजप देखील तितकाच सक्रिय झाला असून भाजपचे ज्येष्ट नेते लालकृष्ण आडवाणी हे २०१९ ची लोकसभा निवडणूक गुजरातमधील गांधीनगरमधून लढवणार असल्याची शक्यता आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी याबाबत माहिती दिली.

यंदाची निवडणूक ही विशेष ठरणार असल्याने तळागाळातून यासाठी जोरदार तयारी चालू आहे. मागील निवडणुकीत अडवाणी यांची निवडणूक लढवण्याची शाश्वती नव्हती. २०१९ हि अतितटीची लढत असल्याने यावेळी आडवाणी निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

‘आमची भेट झाल्यानंतर मी त्यांना सांगितले कि तुमची इच्छा असेल तर तुम्ही गांधीनंगरमधून निवडणूक लढवू शकतात. यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया किंवा निर्णय घेतलेला नाही. ते लोकसभा निवडणूक लढवतील की नाही यावर देखील निर्णय झालेला नाही’, असे वाघेला यांनी सांगितले.

शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘बाप्पा रे’ गाणे हिट

0

मुंबई : शंकर महादेवन आपल्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकताच म्युझिक नेटवर्क 9X मीडिया ने SpotlampE.com सोबत गणेशोत्सवानिमित्त ‘बाप्पा रे’ हे गीत लाँच केले आहे. 9X मीडिया नेटवर्क हे चित्रपटबाह्य संगीताकरिता एक ओरिजिनल प्लॅटफॉर्म आहे. नवीन व मुख्य प्रवाहातील प्रतिभावान कलावंतांच्या ओरिजिनल ट्रॅक्सना स्पॉटलॅम्प-ई लेबल अंतर्गत तयार करून वितरित करण्यात येईल. ‘बाप्पा रे’ एक एक्सक्लुझिव्ह स्पॉटलॅम्प-ई ट्रॅक आहे, ज्याला गणेशोत्सव साजरा करण्याकरिता, ‘बाप्पा रे’ 9XM, 9X जलवा आणि 9X झक्कास वर प्रसारित होईल.

या व्यासपीठाच्या माध्यमातून चित्रपटबाह्य संगीताची रचना करून त्यातून कलाकारांचा स्तरही उंचावला जाणार आहे आणि त्यांना त्यांच्या सुयोग्य स्तरावर नेले जाईल. कुडी तू पटाका, बिंगो मॅड अँजल्स साँग, बजने दो नाईट अँड डे यासह सर्व 9X मीडिया ओरिजिनल्यस स्पॉटलॅम्प-ई लेबलचा भाग असतील.

स्पॉटलॅम्प-ईच्या लाँचप्रसंगी क्रिएटिव्ह कंटेंट आणि न्यू बिझनेस 9 एक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट रजिता हेमवानी, म्हणाल्या, ”आम्हाला स्पॉटलॅम्प-ईच्या लाँचची घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे. हे नॉन-फिल्म संगीत व कंटेंट तयार करण्याचे आणि त्याचे संवर्धन करण्याचे व्यासपीठ आहे. हा प्लॅटफॉर्म भारतभरात व जगभरात असलेल्या नवीन आणि प्रस्थापित कलाकारांना आपली प्रतिभा दाखवण्याकरिता संधी प्रदान करेल. स्पॉटलॅम्प-ई संगीत प्रेमींना मोठ्या प्रमाणावर संगीत प्रतिभांना जाणण्यामध्ये मदत करेल.”

‘बाप्पा रे’ या गाण्याला अमेय नाईक यांनी संगीत दिले आहे तर स्पॉटलॅम्प-ईने निर्मित व दिग्दर्शित केले आहे. या गाण्याचे बोल परितोष वैष्णव यांचे आहेत. या संगीतमय म्युझिक व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला सामील करण्यात आले आहे. ‘बाप्पा रे’चे प्रमाशेन सोशल मीडिया आणि 9XM, 9X जलवा आणि 9X झक्कास वर करण्यात येईल. हा ट्रॅक या तीन चॅनेल्सवर संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान २३ सप्टेंबर २०१८ पर्यंत धुमधडाक्यात वाजवण्यात येईल.

केंद्र सरकारने सहकारी बँकांना मदत करावी, सहकाराला बळ द्या – शरद पवार

0
राष्ट्रीयकृत बँका जेव्हा अडचणीत आल्या तेव्हा केंद्र सरकारने ८६ हजार कोटी रुपयांची मदत त्यांना केली. पण सहकार क्षेत्रातील बँक किंवा दुसरी संस्था अडचणीत आली की तिच्यावर चौकशीची, बरखास्तीची कारवाई केली जाते. सहकार क्षेत्रातील संस्था या सामान्य माणसाला मदत करत असतात, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांच्या बाबतीतही मदतीची भूमिका घ्यायला हवी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
ते मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयममध्ये पार पडलेल्या सारस्वत सहकारी बँकेच्या शतकपूर्ती समारंभात बोलत होते. 
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीदेखील उपस्थिती होती. तसेच बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने, संचालक पद्मर्शी मधू मंगेश कर्णिक, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अनिल देसाई आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, सारस्वत बँकेला व्ही. पी वर्दे, डॉ. पी. डब्लू. रेगे, सुरेश प्रभू आदींचे यशस्वी नेतृत्व लाभले आहे. या बँकेचा विस्तार वाढवण्यात व ती नावारूपाला आणण्यात दिवंगत एकनाथ ठाकूर यांनी मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्र व गुजरातमध्येही सहकारी बँक चळवळीला चांगले धोरण आखून प्रोत्साहन देण्याचे काम हे गुजरातमधील लल्लुभाई छबिलदास व वैकुंठभाई मेहता यांनी केले.
महाराष्ट्रातील धनंजय गाडगीळ यांनीही मोलाचे योदान दिले. अशा द्रष्ट्या नेत्यांनी घातलेल्या पायामुळेच देशभरातील एकूण सहकारी बँकांपैकी ७० टक्के बँका महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये आहेत. 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची अवस्था एक हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीसारखी झालेली आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थाच मेटाकुटीला आलेली आहे.
त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या या हत्तीवर माहूत म्हणून बसायला कुणीही तयार नाही. याचवेळी प्रकाशित झालेल्या बँकेचे संचालक पी एन जोशी यांच्या ‘आर्थिक व बँकिंग धोरणाच्या बदलत्या छटा’ या पुस्तकाचा धागा पकडून ते पुढे म्हणाले की, या पुस्तकात अर्थव्यवस्थेच्या विविध बाबी, नोटबंदीचे यशापयश आदी गोष्टी मांडल्या असून ते वाचनीय झाले आहे.
देशाची अर्थव्यवस्था सध्या लयाला गेलेली आहे. कोणालाच काही कळत नाही, तरीही आंधळे एकमेकांचा हात धरून आहेत. पण माहूत म्हणून हत्तीवर बसायचे धाडस कोणीच करत नाही. सामान्य माणसाची स्थिती मात्र एक आंधळा आणि सात हत्तींसारखी झालेली आहे.
प्रत्येकजण त्याला इकडून तिकडून डिवचत आहे. त्यामुळे तो जखमी होऊन पडला आहे. त्याला मदतीची गरज आहे. पण ते न करता त्याला तू भोसकले की मी भोसकले या वादातच आधीचे व आताचे सरकार पडले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 
 
बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यावेळेस म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वी सारस्वत समाजाच्या आर्थिक गरज भागवण्यासाठी क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. त्याची उत्तरोत्तर वाढ होत गेल्याने १९३२ साली बँकेचा दर्जा मिळाला होता.
आज सारस्वत बँकेचा वटवृक्ष झाला असून देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक झाली आहे. बँकेचे देशभरात २८१ शाखांचे कार्यक्षेत्र आहे. गेल्या दहा वर्षांत बँकेची झपाट्याने वाढ झाली असून ३८ हजार कोटींवरून ५८ हजार कोटींवर व्यवसाय पोहोचला आहे.
सारस्वत बँकेच्या ‘सारस्वत बँक १०० डिजिटल अकाउंट’
या सुविधेअंतर्गत आधार कार्ड क्रमांकाद्वारे येणाऱ्या ओटीपीच्या आधारे तीन मिनिटांत सेव्हिंग अकाउंट उघडले जाईल.  ‘सारस्वत बँक रूपे कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड’ या डेबिट कार्डद्वारे ग्राहक केवळ कार्ड टॅप करून पेमेंट करू शकतील. या सुविधांचे ही अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

माणसाचे मोठेपण सांगणारे ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’

0

मुंबई : प्रत्येक प्रसिद्ध माणसाच्या जीवनात एक रहस्य दडलेलं असत. त्यातून ते प्रेरणा घेऊन ध्येयाने वेड होत जीवनात यशस्वी होत असतात. या नावाजलेल्या व्यक्तींचे मोठेपण आपल्याला लक्षात येते परंतु ते माणूस म्हणून कसे आहेत, त्यांची कधी न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे कलर्स मराठीवरील “अस्सल पाहुणे इरसाल नमुने” या नव्या कार्यक्रमामध्ये. प्रेक्षकांना नक्कीच हा कार्यक्रम बघायला मज्जा येणार आहे कारण पाहुण्यांबरोबरच कार्यक्रमामध्ये असणार आहेत.

इरसाल नमुने जे या पाहुण्यांशी गप्पा तर मारणारच आहेत, पण त्यांच्या अतरंगी,खुशखुशीत विनोदशैली तसेच त्यांचे बेधडक, बिनधास्त विनोदाने प्रेक्षकांना दर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानी देखील मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे करणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका “अस्सल पाहुणे इरसाल नमुने”- इथे गप्पांना नसणार तोटा कारण पाहुणा असणार मोठा २० सप्टेंबरपासून गुरु – शुक्र रात्री ९.३० वा. असणार आहे.

अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांनामराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने हे काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत. कार्यक्रमामध्ये कलर्स मराठीवरील प्रसिध्द मालिकांमधील लाडक्या सासू म्हणजेच घाडगे अँड सूनमधील सुकन्या कुलकर्णी आणि अतिशा नाईकतर राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील कविता लाड, तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उज्ज्वल निकम, भरत जाधव, केदार शिंदे ही मंडळी हजेरी लावणार आहेत. तेंव्हा या लोकप्रिय मंडळींची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळणार आहे.

वावरे महाविद्यालयाचा हँन्डबॉल संघ विजयी

0

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालयातील मुलांचा संघ जिल्हास्तरीय शालेय हँन्डबॉल क्रीडा स्पर्धेत विजयी झाला. याठिकाणी एकूण  नऊ संघ सहभागी झाले होते.

अंतिम सामना के.टी.एच.एम. महाविद्यालय विरुद्ध के.एस.के. डब्ल्यू. महाविद्यालय सिडको यांच्यात झाला. यात के.एस.के.डब्ल्यू. महाविद्यालय सिडको संघाने के.टी.एच.एम. महाविद्यालयचा 12-8 असा पराभव करत निर्वीवाद वर्चस्व मिळवले.

खेळाडूंच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य डॉ.ए.के. शिंदे, ज्युनियर विभागप्रमुख प्रा. हेमंत पाटील,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. मिनाक्षी गवळी, डॉ.किरणर किबे, क्रीडासंचालक प्रा.दिपक दळवी, प्रभाकर गांगुर्डे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

सदर स्पर्धा गुरुगोविंद सिंग महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या या विजयी संघात गणेश बोरसे, अभिषेक कदम, श्रेयश शिंदे, प्रसाद गांगुर्डे, महेश थोरात, विश्वजीत पवार, वैभव महाले, निखिल घुले, मयूर बडवे, वैभव आहेर, प्रतीक काळे, यशोदीप जाधव, श्लोक पाटील.

यंदाच्या एम्मी पुरस्कारात सर्वोत्कृष्ट नाटक ‘गेम ऑफ थ्रॉन्स’

0

अमेरिका : अमेरिकन टीव्ही सीरिअल ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ ने यंदाचा एमी पुरस्कार २०१८ पटकावला आहे. त्यासोबतच आणखी ९ पुरस्कार पटकावले आहेत.

या मालिकेत टिरीयर लॅनिस्टर ची भूमिका करणारा पीटर डिंक्लेज ला सर्वोत्कृष्ट सह्हायक अभिनेता पुरस्कार मिळाला.

या मालिकेला एमी पुरस्कारात २२ वेळा नामांकन प्राप्त झाले असून तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे.

Social Media

26,074FansLike
5,154FollowersFollow
1,126SubscribersSubscribe
error: Content is protected !!