जिल्ह्यातील 5 लाख 16 हजार मुलांना गोवर रुबेला लसीकरण

0
नंदुरबार । नंदुरबार राज्य शासनाने नऊ महिने ते 15 वर्षे वयाच्या मुलांसाठी गोवर आणि रुबेला आजारावर लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. ही मोहिम 27 नोव्हेंबर पासून जिल्ह्यात राबविण्यात येईल, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील 5 लाख 16 हजार 714 मुलांना गोवर रुबेला लस दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज दिली.

लहान मुलांमध्ये आढळून येणार्‍या गोवर व रुबेला आजाराची लस तीन हजार रुपयांपर्यंत मिळते. ही लस बाजारात विकत घेणे सामान्य पालकांना शक्य नाही, म्हणून शासनाने ही लस मोफत उपलब्ध करुन दिली आहे. शिवाय दि. 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणासाठी जिल्ह्यात मोहिम राबविण्यात येणार आहे. 9 महिने वयाच्या बालकांपासून 15 वर्षे वयाच्या मुलांना ही लस देण्यात येणार आहे.

या लसीकरण मोहिमेसाठी शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत आहे. शिवाय शिबीरे घेऊन माहिती दिली जात आहे. या गोवर रुबेला लसीपासून कुठलाही दुष्परिणाम होणार नाही याची खात्री शासनाने दिली आहे. ही मोहिम आरोग्य विभाग, शिक्षण विभाग,

आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून या बाबतचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला.जिल्ह्यातील 5 लाख 16 हजार 714 मुलांना गोवर रुबेला लस देण्यासाठी 5 लाख 73 हजार गोवर रुबेला लस किटची मागणी करण्यात आली असून लसीकरण 7 हजार 396 सत्राच्या माध्यमातून केले जाणार असून त्यात 2 हजार 437 अंगणवाड्या,

2 हजार 57 शाळा, 290 उपकेंद्रे, 58 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 12 ग्रामीण रुग्णालये, 2 उपजिल्हा रुग्णालय व 1 सामान्य रुग्णालय, नगरपालिकेचे 2 रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरण केले जाणार आहे.या आढावा बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, डॉ. अनिल पाटील, डॉ. एन.एल. बावा, डब्ल्युएचओचे कमलाकर लटकरे, युनिसेफचे डॉ. प्रशांत हिंगणकर सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सीडीपीओ उपस्थित होते.

अधिकारी व ठेकेदारांमधील असमन्वयामुळे रहाटयावड प्रकल्प रखडला

0
मोदलपाडा ता.तळोदा । वार्ताहर- तीस वर्षांपासून लघु पाटबंधारे योजनेचे अधिकारी व ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्याने रखडलेल्या शहादा तालुक्यातील मंदाणे येथील रहाट्यावड धरणाबाबत यंदाच्या हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याची माहिती आ.उदेसिंग पाडवी यांनी दिली.

याबाबत आ.उदेसिंग पाडवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहादा तालुक्यातील घोगलेपाडा-खपर्‍या नाल्यावर लघुपाटबंधारे योजनेमार्फत रहाट्यावड (मंदाणे) धरण बांधण्यासाठी 41 लाख 76 हजार 977 रुपयांची प्रथम मान्यता प्रदान करण्यात आली होती. परंतु धरणाची किंमत व्यपगत झाल्यामुळे सन 1999-2000 च्या दरसूचीनुसार सुधारित नवीन मान्यता 2 कोटी 35 लाख 31 हजार 590 रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे दि.20 डिसेंबर 1999 रोजी नवीन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.

मुख्य अभियंता लघुसिंचन (जलसंधारण) पुणे कार्यालयाच्या 31 जानेवारी 2000 अन्वये नवीन तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली आहे. वन खात्याने व केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे पत्र दि.17 ऑगस्ट 2001 अन्वये विधीवत मंजुरी प्रदान केली. धरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर धरणाच्या रेषेवर त्यास लागून असलेल्या अग्री शेड्युल जमीन असलेल्या शेतकर्‍यांना प्रचंड विरोध असल्याने ठेकेदाराने काम बंद केले. स्थानिक लोकांची मागणी पाहता अतिक्रमण क्षेत्र धरणांच्या एका बाजूला असल्याने ते धरणांच्या क्षरेषेबाहेर ठेवून वगळण्याचा पर्याय शक्य असल्याने क्ष रेषा बदलण्याचा प्रस्ताव तयार करून त्यास क्ष रेषेतून वगळण्याची मान्यता दिली.

काही क्षेत्र वगळण्याने धरणाचा कमी होणारा साठा कायम ठेवण्यासाठी धरणांची उंची वक्र क्षेत्र 0 ते 1305 मध्ये 40 से.मी.ने वाढविणे अपरिहार्य असल्याने सर्वेक्षण करून अंदाजपत्रकास द्वितीय प्रशासकीय मान्यतेसाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला मान्यता प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून अथवा शासकीय अधिकार्‍यांकडून हे धरण पूर्ण होण्यासाठी कुठलाच पाठपुरावा करण्यात आला नव्हता हे धरण त्या भागासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याकारणाने आ.उदेसिंग पाडवी यांनी शासन दरबारी पाठपुराव्यास सुरुवात केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात दि.7 ऑगस्ट 2014 रोजी विधानसभेत रहाट्यावड प्रकल्प पूर्ण होण्याबाबत ना.जयकुमार रावल यांच्यामार्फत प्रश्न उपस्थित केला. त्या अनुषंगाने दि.13 जानेवारी 2016, 16 फेब्रुवारी 2016 व 15 जून 2016 रोजी विनंती अर्ज समितीत रहाट्यावड धरण पूर्ण होण्यासाठी साक्ष घेवून चर्चा घडवून आणली. त्यामुळे या धरणाच्या उर्वरित कामांना चालना मिळत गेली. तब्बल 30 ते 32 वर्ष रखडलेल्या प्रकल्पाला केवळ आणि केवळ विनंती अर्ज समीतीमुळे धरणाच्या कामाला मंजुरी मिळाली व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

परंतु ल.पा.योजनेचा अधिकारी व ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्याने तसेच संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळोवेळी मागणी करूनदेखील कागदपत्रे सहकार्य न केल्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या कामांमुळे धरणांचे उर्वरित काम बंद पडले आहे. धरणांच्या केलेल्या कामाप्रमाणे ठेकेदाराला पैसे दिले नाही. अशी ठेकेदारांची तक्रार आहे. काम केल्याप्रमाणे पूर्ण पेमेंट देण्यात यावे व प्रकल्प बांधकामाची मुदत संपलेली असल्याने मुदतवाढ देण्यात यावी तसेच संबंधित विभागाकडून मुदतवाढीचा प्रस्ताव उशिरा पाठविला गेला.

त्यातील त्रुटीची अजूनही संबंधित विभागाने पूर्तता केलेली नाही. त्यामुळे मुदतवाढीस विलंब होत आहे असे ठेकेदाराचे म्हणणे आहे. हिवाळी अधिवेशनात आ.उदेसिंग पाडवी लक्ष घालून मुदतवाढ मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे मुदतवाढीशिवाय काम सुरू करता येत नाही. मुदतवाढ मिळाल्यानंतर त्वरीत काम सुरू न झाल्यास ठेकेदार बदलण्यात येईल व येणार्‍या दोन तीन महिन्यांत धरणांचे काम सुरू होईल, प्रकल्पासाठी शेतकर्‍यांनी कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नये असे आवाहन आ.पाडवी यांनी केले आहे.

तळोदा पंचायत समितीकडून शौचालय उद्दीष्टपूर्ती कागदावर शौचालय वापराबाबत उदासिनता

0
चेतन इंगळे
मोदलपाडा । तळोदा येथील पंचायत समितीकडून शौचालय वापराबाबत शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीच्या दावा केला जात असला तरी तळोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शौचालयाचे बांधकाम हे अपूर्ण स्वरूपात असून केवळ अनुदान काढण्यापुरते शौचालय बांधकाम दाखवण्यात आले आहे.

त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी वर्षानुवर्षे पाण्यात जातो. तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात शौचालय वापराविषयी मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. पंचायत समिती प्रशासन मात्र कागदोपत्री उद्दिष्टपूर्ती साधण्यातच समाधानी दिसून येत आहे.

तळोदा तालुक्यात सन 2017-18 मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 6 कोटी 42 लाख 72 हजार एवढा निधी उपलब्ध झाला होता.त्यातून तालुक्यात 5356 शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. प्रशासनाकडून शौचालय बांधणीचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरात शौचालय बांधणीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला असला तरी त्याची उपयुक्तता अत्यल्प प्रमाणात असल्याचे निदर्शनात येत आहे. आजही नागरिक मोठ्या प्रमाणावर उघड्यावर शौचास जाताना दिसून येतात. त्यामुळे पंचायत समिती प्रशासन करीत असलेल्या उद्दिष्टपूर्तीची फलश्रुती निरर्थक ठरत आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.

स्वच्छता हा शासनासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण व प्राधान्यक्रमाचा विषय राहिला आहे. त्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च केला जातो. परंतु प्रशासकीय यंत्रणेकडून निधीच्या विनियोग करत असतांना कागदोपत्री उद्दिष्टपूर्ती साधण्यावर भर दिला जात असल्याने शासनाच्या अशा अनेक महत्त्वपूर्ण योजनांना हरताळ फासला जातो. त्याचाच प्रत्यय तळोदा तालुक्यातील स्वच्छ भारत मिशन याबाबत पंचायत समिती प्रशासनाकडून येऊ लागला आहे. पंचायत समितीकडून शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीच्या दावा केला जात असला तरी तळोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शौचालयाचे बांधकाम हे अपूर्ण स्वरूपात असल्याचे सांगितले जाते किंवा नुसता अनुदान काढण्यापुरते शौचालयास बांधकाम दाखवण्यात येते. प्रत्यक्षात मात्र त्याचा वापर केला जात नाही असाही अनुभव आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी वर्षानुवर्षे पाण्यात जातो.

स्वच्छतेबाबत सुधारित धोरण आणि पर्याप्तेच्या माध्यमातून ग्रामीण समाजाला पूर्णपणे सामावून घेण्यासाठी यांनी 2 ऑक्टोबर 2014 पासून भारत सरकारच्या वतीने स्वच्छ भारत मिशन राबविण्यास सुरुवात केली. यामध्ये महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2019 मध्ये संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या व्याप्तीची गती वाढवून 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारतचे स्वप्न साकार करणे,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह हागणदारीमुक्तीच्या कार्यक्रमातील जुन्या उणिवा दूर करुन तो प्रभावीपणे राबविणे, शाश्वत स्वच्छतेच्या साधनांचा प्रसार करणार्‍या पंचायतराज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जागृती व आरोग्य शिक्षण याव्दारे प्रेरित करणे, पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, ही या अभियानाची उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली आहे. पण तळोदा तालुक्यातील सद्यस्थिती बघता प्रशासनकडून येत्या वर्षभरात कागदोपत्री उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.

स्वच्छ भारत मिशनचा कालावधी पूर्ण होण्यासाठी आता केवळ आठ ते दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. असे असताना या अभियानाला अधिक गती देणे गरजेचे आहे. त्यासाठी पंचायत समिती प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधनाची मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शौचालय बांधकाम अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत असताना त्याला शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम असणार्‍या या योजनेची व उद्दिष्टांची जाणीव करून दिली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन गावागावांमध्ये जाऊन शौचालय वापराबाबत जनजागृती व प्रबोधन करण्याची गरज आहे. पंचायत समिती प्रशासनाने कागदी उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याऐवजी स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एखादा कृती कार्यक्रम आगामी काळात ठरवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

लवकरच नाशिक कल्याण प्रवास जलद होणार

0

नाशिक : नाशिककरांच्या सोयीच्यादृष्टीने अत्यावश्यक असणारी मध्य रेल्वेची कल्याण नाशिक लोकल सेवा सुरू करण्याच्यादृष्टीने लवकरच चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर लोकलसेवा सुरू करण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. यामुळे नाशिकहून मुंबईपर्यंतची लोकल हे दोन्ही शहरे जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

नाशिक ते मुंबई प्रवासासाठी अनेक रेल्वेगाड्या आहेत. मात्र, या गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाहीत. अनेक प्रवाशांना काही मुख्य स्टेशनवर उतरून लहान स्टेशनवर जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जनतेसाठी रेल्वे विभागाकडे कसारा ते नशिक लोकलची मागणी केली होती. मात्र, कसारा ते नाशिक लोकल सुरू केल्यास ही लोकल तोट्यात जाईल, असा निकष रेल्वेने काढला होता. म्हणून रेल्वे बोर्डाने या गोष्टीचा अभ्यास करून रेल्वे अधिकारी, प्रवासी यांच्याकडून सूचना मागवल्या होत्या. त्यांनतर खा. गोडसे यांनी 2016 मध्ये कल्याण ते नाशिक रेल्वे सुरू करावी, अशी सूचना मांडली होती. ही सूचना विचारात घेऊन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेला हिरवा कंदील दाखवला होता.यासाठी तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरू करण्यात येत आहे. त्यानूसार मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता अनुप कुमार अग्रवाल यांनी रेल्वे विकास प्राधिकरण बोर्डचे तांत्रिक संचालक अलोक सिध्दार्थ यांना नाशिक कल्याण लोकलसाठी घाटामध्ये चाचणी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

रेल्वे तज्ञ मुख्य इंजिन निरिक्षक व्ही.एम.सांगळे यांनी रेल्वे बोर्डाला बॅकर न लावताही कसारा घाटात लोकल कशी चालु शकते याचे प्रात्याक्षिक सुचवले आहे. या लोकलचा फायदा शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक अशा सर्वांनाच होणार आहे, यामुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले.ही लोकल लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी नाशिककर आतुरतेने वाट पाहत आहेत.

असा होणार लाभ
ही सेवा सुरू झाल्यास कल्याण ते नाशिक दरम्यान येणार्या स्थानकांना लोकलमुळे लाभ मिळणार असून, नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे प्रवाशांची एका स्थानकावरून दुसर्या स्थानकापर्यंत होणारी पायपीट वाचेल. ही लोकल सुरू झाल्यास एस्क्प्रेसवर पडणारा प्रवाशांचा भारही कमी होईल. या भागातील शेतकर्‍यांना मुंबईत भाजीपाला आणणे सोपे होईल. तसेच चालकांच्या ओव्हरटाइममुळे रेल्वेला पडणारा आठ ते दहा कोटींचा भुर्दंड वाचू शकेल.

लोकलमुळे वेळेत बचत
डायरेक्ट करंटवर चालणार्‍या गाड्या अल्टरनेटिव्ह करंटवर परिवर्तीत करण्यात आल्याने गाड्याचा वेग वाढला असला तरी मेल एक्स्प्रेससाठी वांरवार बँकर इंजिन बदलावे लागत असून यात तब्बल 40 मिनिटांचा वेळ वाया जातो. नव्या बनावटीच्या लोकल आणि मेल मध्ये आधुनिक प्रणाली वापरण्यात आली असून यात बँकर इंजिन लावण्यापेक्षा दोन्ही बाजूला मोटरमन दिल्यास पुश थ्रूच्या माध्यमातून चालकाच्या सिग्नलवर मागच्या दिशेकडील मोटरमन गाडी मार्गस्थ करू शकेल. यामुळे हा 40 मिनिटांचा वेळ आणि 4 बँकर इंजिन रिक्त होऊन ती इतरत्र मालगाड्यांना वापरता येतील.

Helmet checking drive intensified: Police check over 25k vehicles, slap Rs 18 lakh fine

0

NASHIK: Implementing strict helmet rule in the city, the police further intensified its helmet check drive on the second day Saturday and acted against more than 3000 rule violators including two-wheel riders for not wearing helmets and four-wheeler owners for not following seat-belt guidelines.

During the massive helmet check drive which was carried out simultaneously at 26 different places under the jurisdiction of 13 police stations in the city, the police checked over 25,000 vehicles and acted against more than 3000 vehicle riders to recover fine to the tune of Rs 18 lakh in a single day.

During the drive, asst police commissioners, PIs, 250 police personnel besides 10 officials of the city traffic branch and its 225 employees were pressed into service. The drive was well supported by traffic ambassadors and NGOs who were seen creating awareness among the people about wearing helmet and safe driving.

Earlier on the first day of the drive on Friday the city police had taken action against 22,000 vehicles among which 20,000 were two-wheelers and 2,000 other vehicles and recovered a fine over Rs. 10 lakh.

…Then farmers will take law into their hands, warns Bhujbal

0

NASHIK: Taking an offensive stand over the release of water for Rabi crop, former state minister and senior NCP leader Chhagan Bhujbal on Saturday warned the district administration that they should not force him to create ruckus in the upcoming winter session of state legislature over the issue which is of utmost importance to farmers.

“The farmers will take law into their hands if the administration failed to release water, or defer muhurat for discharge of water from Palkhed left canal for Rabi crop on scheduled Monday (Nov 19),” warned Bhujbal after his crucial meeting with district collector Radhakrishnan B at the collectorate here on Saturday.

Bhujbal demanded that water should be released from the left canal of Palkhed for Rabi crop in talukas of Dindori, Niphad and Yeola on a given date. The administration should not force him to create ruckus in the upcoming winter session of state legislature over this key issue.
The former dy chief minister also demanded that drought should be declared in revenue circles of Yeola, Lasalgaon, Ojhar and Pimpalgaon, promising that the issue would also be raised in the winter session.

Looking ahead to life amidst uncertainties

0

NASHIK: The stories of the youngsters who have grown out of an orphanage have many shades; some motivating, happy, forward-looking while some, depressing, traumatic and sad. However, one thing among all stories is common is that these youngsters want to look ahead to life and are ready to work for it.

This was experienced at the two days get together of such youngsters organized by NGO Anathancha Adhar in Nashik and which began on Saturday. This event which has brought youngsters from the all over Maharashtra including places like Pune, Jalgaon, Mumbai, Thane,

Nagpur and Nashik had some sharing of experiences in the morning session on Saturday.
The session conducted by Dr Vaishali Balajiwale, executive editor Deshdoot Times, saw them open out and speak about their lives and their goals. Their strengths and weaknesses and importantly their need to make life good for others like them.

“We all go through the same experience of uncertainty after getting out of orphanages at 18 or 21 years. Life then looks bleak. Those who get some guidance or those who gather the courage to face the uncertainty and carve a path for their lives do good. But others need and hand to hold”, says Mayuri who now runs an NGO for such orphans in Pune and also looks after some boys and girls like her.

The problems these youngsters face are different. “ I have faced humiliation whenever I approached people for a job. Many told me that if I did not know my lineage what identity did I have. This was very upsetting. I then decided to face this boldly and accepted the fact that I may not have a family past but I will create a future.

I got trained and acquired skills as a driver. I earn my living respectfully and also run an NGO Sarathi Mitra for drivers”, says Dipak Gohit, from Mumbai. There are many among this group who are studying with a goal. Dhanraj Nayadu, Is a young boy studying in the first year of Retail Management in Pune.

He wants to do this course, work for experience and then start his own business. “I will appoint people like me who have grown in orphanages and would also want to create a home for them”, he talks about his dream, his eyes lighting up even as he speaks about it.
While there are those with dreams there also are those who need guidance in this group.

Some girls look confused as they shy even from speaking. “We don’t have the confidence like others”, they say. Julie wants to learn dance and start her academy but is very not very sure where she would get to learn.

Chandu stands very differently among all girls. She is very tomboyish and appears very tough. “I prefer to be this way now and am comfortable with myself. Earlier I used to cry asking why me ? But now I don’t. I did my graduation in BSW, I work, earn my living and also help my fellow brethren”, says Chandu who has won medals in sports and has done Pune to Kanyakumari cycle rally. “You have to learn to be tough’, she says.

While in Nashik to attend the programme organised by Anathancha Adhar by Sulkshana Aher, they all are in a happy mood. They visited Trimbakeshwar and have a fun filled programme on Sunday including a formal felicitation programme and also a picnic.
                                                                                     (With inputs from Gaurav Pardeshi)

Rain deficit, drought, ground water depletion set to hit onion farming in district

0

NASHIK: Nashik district is likely to see a fall in both area and production of onion on account of drought conditions with the failure of the monsoon. The district is the major producer of onion in the country.

However, normal area under the bulb in the district is likely to make up for the loss due to several factors, key among these are deficit rainfall, prevailing drought-like conditions and decline in the ground water table. It is crystal clear from the farming area of onion crop, which has reduced almost 7000 hectares when compared to the corresponding period of the last year.

The farming community is now facing another problem i.e., sowing of rabi crop. Adding to the woes of the farmers, ground water level has also been declined considerably in most parts of the district, particularly, in 8 drought-hit villages declared by state government.

These adverse conditions would badly hit cash crop like onion and would certainly bring tears in the eyes of onion growers, traders and eventually the ruling politicians. Currently, 37,0097 hectares of area is under onion crop for kharif season with total area under onion cultivation of 46,440 hectares.

The farmers were waiting for the retreating rains to sow (summer) onion seeds during the late kharif period (rabi). Unfortunately, the returning rains also disappointed the onion growers forcing them to reduce the land area under onion. Persistent lack of rainfall has worried even for the Rabi during which a bulk of the onions is produced.

During the corresponding period of the last year, total area under late kharif cultivation was 53,184 hectares. Today it is 46,440 hectares — a decrease of about 7000 hectares this season. A decline in production can result in prices shooting up.

Winter time : Good food and happiness

0

Pooja Tipre / Nashik: Nashikites has been experiencing cold weather since last few days. Doctors express that cold weather is good for the health of the season. Your appetite increases drastically.

And our digestive system is also working perfectly. Therefore, the advice is given by the elderly to eat good food in the winter. There is a lot of demand for dry fruit and sweet items. The sugar content of our body is appropriate due to the sweet product. People should avoid eating oily and heavy foods in cold weather.

Alternatively, it is preferred to eat a little bit of spice and sweet foods. This season is the real festive treat for the foodies. Even if the chill increases by the evening, hotels and restaurants and even small food joints are crowded with people trying out different foods.

Winter also calls for a season of sports. There are many school as well as local tournaments during the cold months. Many institutions observe sports days as the weather is good for physical exercise.

Even the jogging tracks look more crowded during winters with people getting out for their morning exercise. With Christmas and new year nearing , the general mood is that of happiness and people also ake their travel plans during this time of the year.

Deshdoot Times tried to know the way Nashkites enjoys the cold pleasures.
The winter is pleasant and the best part is that it is not sunny or hot as in summers. It is a good time to play outdoor games. I prefer playing some game every winter. Cricket is my favorite game and this winter to I have made time to play.
                                                                                          – Shubham Kabra, student

Winter is a happy time. It is also a good time to build health and eat good food. The cold of the winter may cause some health issues but if you take proper intake and keep good energy levels, exercise well, you can keep better and healthy even in the winters.
                                                                                                              – Sheela Tipre

Winter is time for good food, particularly laddoos made with dry fruits. And the fun of eating this laddoo in winter is a divine experience. Such foods are good for health and even if some calories are added with winter foods, it is worth the taste. Dry fruits and hot milk on Ravivar Karanja are the real joy of cold weather.
                                                                                                – Sumit Gite, businessman

ZP union puts pressure on Govt for their various demands

0

NASHIK: The long-pending demands of Zilla Parishad employees have finally found some sympathizers. The state government has assured the ZP employees union of fulfilling their demands within the shortest period.

A high level meeting of the delegates of Zilla Parishad Employees Union was held with Maharashtra state chief secretary Dineshkumar at Mantralaya in Mumbai to deliberate on the various long pending issues concerning ZP employees.

The union at the meeting pressed for applicability of the benefits of the state-run group insurance policy to the ZP employees also. They also demanded promotion to office assistants as per the guidelines of the Supreme Court, cashless mediclaim, subsidy on the interest accrued on housing loan, recruitment on compassionate basis, age relaxation in recruitment, amendments in service rules, appointment of junior accounts officers at panchayat samiti level etc.

The subjects discussed at the meeting were finally got ministry’s nod and were forwarded to principal secretary Asim Gupta of the rural development department for further approval.
State union president Balraj Magar, Vijaysingh Suryavanshi (accounts), Arun Kharmate (health), dy secretary (rural development) Girish Bhalerao and additional secretary P S Kamble were present.

From Nashik, Vijaykumar Halde strongly favoured promotion policy for ZP office assistants. He was accompanied by Ajay Kasture, Shrirang Dixit, Ajit Avhad, Madhukar Adhav, Rajendra Bairagi, Sanjay Pagar and Vijay Deore.

Social Media

26,893FansLike
5,154FollowersFollow
1,354SubscribersSubscribe
error: Content is protected !!