पथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस

0

नागपूर, ता. १६ (युएनआय) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि तेथील व्यवस्था प्रमुखांसह नागपूरच्या कोतवाली पोलिस ठाण्याला येथील सत्र न्यायलयाने नोटीस बजावली आहे.

संघाच्या संचलनात काठीचा वापर केला जातो, त्यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात एक याचिका न्यायालयात दाखल झाली होती.

पथसंचलनासारख्या कार्यक्रमात संघ स्वयंसेवक काठी घेऊन वावरतात. यंदाच्या २८ मे रोजी अशाच एका  संचलनात सुमारे ७०० स्वयंसेवकांनी खांद्यावर काठी घेऊन संचलन केले होते.

मात्र अशा कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी संघाने लाठीचे प्रदर्शन करू नये यासाठी मोहनीश जबलपुरे यांनी याचिका दाखल केली होती.

जबलपुरे यांनी सार्वजनिक पथसंचलनात लाठी वापरण्याबाबत काय नियम आहे? अशी माहिती माहितीच्या अधिकाराअंतर्गत पोलिसांकडून मागविली होती.

त्यात दिलेल्या उत्तरानुसार पथसंचलनादरम्यान लाठी वापरण्यास मनाई असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संघाच्या लाठी वापरण्यावर त्यांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यात त्यांनी असे म्हटले आहे की सार्वजनिक ठिकाणी लाठी वापरणे आणि त्याचे प्रदर्शन करण्यामुळे जनतेच्या मनात दहशत निर्माण होते. त्यामुळे लाठी वापरण्यावर बंदी असावी. त्यांनी असेही म्हटलेय की शस्त्रास्त्र कायद्यानुसार पथसंचलानादरम्यान लाठी वापरता येत नाही.

नागपूर सत्र न्यायालयाने ही  याचिका  दाखल करून घेत सरसंघचालक मोहन भागवत, व्यवस्था प्रमुख अनिल बोकरे आणि कोतवाली पोलिस ठाण्याला नोटीस बजावत या प्रकाराबद्दल लेखी स्पष्टीकरण मागविले आहे.

गुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार

0

मुंबई : आपल्याला वाट चुकल्यावर निश्चित स्थळी नेणाऱ्या गुगल मॅपने १३ वर्षाच्या कारकिर्दीत उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे लोकांना प्रवास करणे सोपे झाले असून म्हणून गुगल लवकरच एक नव फिचर आणणार आल्याची माहिती आहे.

आपल्या प्रवासात मार्गदर्शक होणारे गुगल मॅप आता संदेश पाठवण्यास मदतही करणार आहेत. कारण आपल्या मॅपमध्ये गुगल लवकरच टेक्स मेसेज फिचरचा समावेश करणार असल्यामुळे गुगल मॅपवर आता तुम्ही मेसेज करून संवाद साधू शकणार आहात. मेसेज सिस्टिम गुगल मॅपने एकत्रित केली आहे.

सध्या Android आणि IOS यांच्यासाठी गुगल मॅपचे मेसेज फिचर असेल. या महिन्यातील गुगल मॅपमध्ये होणारे पहिले अपडेट आहे. गुगल सतत नवीन फिचर्स घेऊन एक नवा प्लॅटफॉर्म युजर्सना देत असतो.

प्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा

0

नवी दिल्ली : मातृत्व लाभ कायद्यात (मॅटरनिटी बेनिफिट अॅक्ट) सुधारणा केल्यानंतर काही कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याच्या वृत्तानंतर सरकारनं त्यांचा रोजगार वाचवण्यासाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे. प्रसूती रजेच्या कालावधीत महिला कर्मचाऱ्यांचा रोजगार आणि नोकरी टिकवण्यासाठी भत्ता (इन्सेंटिव्ह) देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. प्रसूती रजा १२ ऐवजी २६ आठवडे करण्यात आली. त्यामुळं वाढीव १४ पैकी ७ आठवड्यांचा पगार सरकारकडून देण्यात येणार आहे.

केंद्रीय महिला आणि बाल विकार मंत्रालयाने गुरूवारी ही घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, 15 हजाराहून अधिक मासिक वेतन मिळणाऱ्या महिलांना 7 आठवड्यांचा प्रसुती रजेबाबतचा पगार सरकार कंपन्यांना परत करणार आहे. सरकारने ही घोषणा तेव्हा केली होती जेव्हा प्रसुती रजा हा 12 आठवड्यांवरून ती 26 आठवडे केली होती. वाढवण्यात आलेल्या १४ आठवड्यांपैकी ७ आठवड्यांचा पगार संबंधित कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव रोजगार मंत्रालयानं सरकारला दिला आहे, अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्यानं दिली.

काही कंपन्या गर्भवती महिलांना कामावरून देखील काढून टाकत आहेत. सरकारी आणि खाजगी कंपन्यांत काम करणाऱ्या महिलांकरता आता सरकारकडून खास घोषणा करण्यात आली आहे. महिला आणि बाल विकास विभाग सचिव राकेश श्रीवास्तव यांनी सांगितलं की, श्रण कल्याण अंतर्गत असलेल्या धनाचा वापर याकरता करणार आहे.

गड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप

0

नाशिक : सर्वांच्या जीवनात आनंद, प्रकाश निर्माण करणारा दीपोत्सव सणादरम्यान येथील गड रेंजर्स या पर्यटन प्रेमी संस्थेने गड किल्ले जतन करणाऱ्या गावकऱ्यांसोबत साजरी केली.

ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणाऱ्या रतनगडा लगतच्या साम्रद या गावी गड रेंजर्सने भेट दिली. यावेळी प्रत्येक घरात कागदी पिशवी, फराळ, ग्रामस्थांना कपडे यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी गड रेंजर्सच्या परिवाराने आपल्याकडे असणारे कपडे , खाऊ जमा करून या उपक्रमाला हातभार लावला. फराळ वाटपद्वारे विद्यार्थ्यांचे तोंड गोड करून युवकांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. दरम्यान, युवकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी गड रेंजर्सचे सुयश दिघे, भाग्येश दीक्षित, हरीश चव्हाण, संकेत वाजे, ऋषिकेश चव्हाण, शुभम शेलार उपस्थित होते.

आंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी

0

हैदराबाद : केंद्रीय अन्‍वेषन विभागाच्या (सीबीआय) अंतर्गत भ्रष्‍टाचाराच्या आरोपावरून सुरू झालेला वाद सर्वोच्‍च न्यायालयात पोहोचला. अशातच आता आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाने सर्वांना धक्‍का दिला आहे. चंद्राबाबूंच्या सरकारने परवानगीशिवाय सीबीआयला राज्याचे दरवाजे बंद केले आहेत. या निर्णयामुळे केंद्र आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्‍हे आहेत.

आंध्र प्रदेश सरकारने एक महत्वाचं परिपत्रक जारी करत राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयचा हस्तक्षेपाचा अधिकार पूर्णपणे काढून घेतला आहे. प्रत्येक राज्य सरकार हे दिल्लीतील विशेष पोलीस आस्थापनेला त्यांचे अधिकार संबंधित राज्यात वापरण्यास होकार देत असते. हा होकार आंध्र प्रदेशने मागे घेतल असल्याचं परिपत्रक आंध्र प्रदेशाच्या गृह विभागाच्या सचिव ए.आर.अनुराधा यांनी जारी केलं आहे. हा होकार काढून घेतल्याने आंध्र प्रदेशात होणाऱ्या कोणत्याही घटनेचा तपास करण्याचे अधिकार सीबीआयला उरलेले नाहीत.

भाजपवर गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीबीआय, आरबीआय सारख्या संविधानिक संस्थांना खिळखिळं करून स्वत:च्या हातचं बाहुलं बनवत असल्याचा आरोप नायडू यांनी केला आहे. केंद्रातील सगळ्या महत्वाच्या पदांवर गुजरातमधील अधिकारी आणून बसवले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. सीबीआयचे रजेवर पाठवण्यात आलेले विशेष संचालक राकेश अस्थाना हे मोदींचे इंटेलिजन्स मॅन असल्याचाही त्यांनी आरोप केला होता.

 

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0

मुंबई – प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित आगामी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाचे संवादलेखन, कथा, पटकथा प्रविण तरडे यांनी केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता ओम भूतकर यांच्या तोंडी असलेले संवाद प्रेक्षकांवर छाप पाडणारे आहे.

 

अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुळशी पॅटर्न’ बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘नो कोशियारी नो व्होट’ ईपीएफ पेन्शनधारकांचा मोर्चा

0

नाशिक | १८६ उद्योगातील कामगारांना ईपीएस ९५ योजनेतून पेन्शन अतिशय तुटपुंजी आहे. पेन्शनधारकांना आरोग्यसुविधा मिळावी, पेन्शनची रक्कम तसेच महागाई भत्ता वाढवून मिळावा. अशा विविध मागण्यांसाठी आज इपीएफ पेन्शनधारकांनी मोर्चा काढला. मागण्या मान्य न केल्यास नो होशियारी नो व्होट म्हणून मतदानावर आंदोलक पेन्शनर्सने बहिष्काराचा इशारा दिला आहे.

भाजप सरकार विरोधी पक्षात असताना सध्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इपीएस ९५ पेन्शन धारकांना ३ हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा यासाठी मागणी केली होती. कामगारांची पेन्शन वाढविण्यासाठी त्यांनी डॉ. भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सभेच्या अध्यक्षांकडून एक समिती नियुक्त केली होती.

या कमिटीचा अहवाल डिसेंबर २०१३ साली राज्यसभेत सादर झाला होता. अहवालात पेन्शनधारकांना कमीत कमी ३ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावे असे सुचविण्यात आले आहे. भाजप सरकार येऊन साडेचार वर्षे पूर्ण झाली परंतु अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.

लवकरच देशात लोकसभा निवडणूक होत आहे. निदान याकाळात तरी आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास नो कोशियारी नो व्होट असा पवित्रा इपीएफ पेन्शनधारक करणार आहेत.

यावेळी राजू देसले, सुधाकर गुजराथी, डीबी जोशी, सुभाष काकड, विलास विसपुते, चेतन पनेर, शिवाजी शिंदे, बापूर रांगणकर, शिवाजी ढोबळे, नारायण आडणे, प्रवीण पाटील, प्रकाश नाईक यांची उपस्थिती होती.

नो पेन्शन नो व्होट…#नो_कोशियारी_नो_व्होट

Raju Desale यांनी वर पोस्ट केले गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

या आहेत मागण्या

९ हजार रुपये पेन्शन + महागाई भत्ता देण्यात यावा

डॉ कोशियारी समितीच्या अहवालानुसा ३ हजार पेन्शन आणि महागाई भत्ता द्यावा

हायर सलरी हायर पेन्शनचा लाभ मिळावा. ३१-०५/२०१७ चे परिपत्रक रद्द व्हावे

सन २००९ ते २०१६ मध्ये सेवामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना २ वर्षांचा फरक मिळावा

अन्न सुरक्षेचा कायदा इपीएस ९५ चे पेन्शनधारकांना लागू करा

पेन्शनर्सला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी.

दीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं

0

मुंबई : बॉलिवूडमधील लव्‍हली कपल लग्‍नाच्‍या बंधनात अडकले आहे. इटलीत ‘लेक कोमो’ मध्ये हा ग्रॅण्‍ड लग्‍नसोहळा उत्‍साहात  पार पडला. लग्‍न जरी झाले असले तरी अजून लग्‍नानंतरच्‍या काही विधी बाकी आहेत. लग्‍नानंतर हे क्‍यूट कपल आता मुंबईत परतरणार आहे. आपल्‍या लाडक्‍या सुनेच्‍या गृह प्रवेशासाठी रणवीरचे घर सजले आहे.

रणवीरचा बंगला हा मुंबईतील वांद्रे परिसरात असून त्याच्या या विलाचं नाव ‘श्री’ आहे. दीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरच्‍या मुंबईतील घरावर आकर्षण रोषणाई करण्‍यात आली आहे. लग्‍नसोहळा ज्‍याप्रमाणे ग्रॅण्‍ड होता त्‍याचप्रमाणे दीपिकाचे मुंबईत स्‍वागतही ग्रॅण्‍ड होणार आहे हे यावरुन लक्षात येते.

21 नोव्हेंबरला बंगलुरूमध्ये रिसेप्शन असून मुंबईत 28 नोव्हेंबरला ग्रँड हयातमध्ये रिसेप्शन असणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका मुंबईतील प्रभादेवीमधील फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर सियाझ कार पेटली

0
सिन्नर (अजित देसाई) | नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर नांदूरशींगोटे येथील बायपासवर मारुती सियाझ कार पेटल्याची घटना घडली.

दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाभळेश्वर (लोणी) येथील ही कार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

कार मालक लघु शंकेसाठी वावी चौफुलीवर थांबले असता कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे या घटनेत जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच सिन्नर पालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचला. काही वेळ याठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.

सपना चौधरीच्या कार्यक्रमात जबरदस्त गोंधळ; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

0
बिहार : बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिच्या कार्यक्रमात गुरुवारी रात्र जोरदार धिंगााणा झाला. लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. अखेर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यादरम्यान एका व्यक्तिचा मृत्यू झाला.

प्रत्येक वर्षी भरौल येथे छठ महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावर्षीही महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी सपना चौधरी पोहोचली होती. सपना चौधरीला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. सपना चौधरी येताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि धावपळ सुरु झाली. कार्यक्रम सुरु होताच लोकांनी बॅरिगेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सपना चौधरीच्या कार्यक्रमात अशाप्रकारे गोंधळ किंवा हिंसा होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही बिहार आणि उत्तर प्रदेशात अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये सपना चौधरीचा कार्यक्रम रद्द कऱण्यात आला होता.

Social Media

26,854FansLike
5,154FollowersFollow
1,347SubscribersSubscribe
error: Content is protected !!