बंगाल चौकी जमीनदोस्त

0

नगर टाइम्स,

अहमदनगर(प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालय व बाजार पेठेकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेली बंगाल चौकी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.21) दुपारी 4 वाजेच्या सुमारास जमीनदोस्त केली. दरम्यान बंगाल चौकी ही वाहतुकीला अडथळा ठरत होती. ते हटविण्यासाठी स्थानिक नागरिक मागणी करत होते. शहरातील माळीवाडा परिसरातचौकात मध्यभागीच बंगाल पोलिस चौकीची खोली होती. ब्रिटिश काळापासून ही चौकी असून तेथे 10-15 वर्षापुर्वी पोलिस कर्मचारी येवून बसत असे. त्यामुळे या चौकाला बंगल चौक असे नाव पडले होते. त्याठिकाणी पोलिसांचे कामकाजही त्याठिकाणी चालत होते.

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती बंद अवस्थेत होती. चौकीच्या या खोलीचे छतही ढासळले होते. ती पुर्णपणे मोडकळीस आलेली होती. चौकीचे छत आणि भिंतीही कधी कोसळतील याचा भरवसा राहिलेला नव्हता. बंगला मोडकळीस आलेली ही चौकी येथून हटवावी अशी मागणी वारंवार केली गेली. मात्र पोलिस प्रशासनाने या मागणीकडे अनेक वर्ष दुर्लक्ष केले. मात्र जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या मागणीची दखल घेत सर्व नगरकर मोहरम विसर्जन मिरवणुकीच्या धामधुमीत असताना अतिक्रमण विरोधी पथकाला बंगाल चौकीवर जेसीबी चालवण्याचे आदेश दिले. त्यानुसार विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.

नाशिक-मुंबई पर्यावरण संवर्धन सायकल रॅलीचे आयोजन, नोंदणी सुरु

0

नाशिक : नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन, सिटीझन नागरी पतसंस्था, महाराष्ट्र पर्यटन विकास महामडंळ व इंडीया टुरिझम (अत्युल्य भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती भारतीय सायकल दिवस म्हणून साजरा व्हावा या उद्देशाने 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान नाशिक ते मुंबई अशी 186 किमीच्या दोन दिवसीय पर्यावरण संवर्धन सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीसाठी नोंदणी सुरु झाली असून प्राधान्य यानुसार प्रथम 100 सायकलीस्ट यासाठी नोंदणी करू शकणार आहेत.

नाशिक सायकलिस्ट गेल्या ७ वर्षापासून 2 ऑक्टोबर गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे अर्थात भारतीय सायकल दिवस म्हणून साजरा करत आहे. भारतीयांनी पूर्वीप्रमाणेच दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करावा ज्यामुळे वायु प्रदुषण व ध्वनी प्रदुषण कमी होऊन पर्यावरण संवर्धनास मदत होईल असा या उपक्रमाचा उद्देश आहे. या दिवशी रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरण आणि स्वच्छतेबाबतचे नागरी कर्तव्यांची जाणीव करून देण्यात येते.

संपूर्ण भारतात गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी इंडियन सायकल दिवस साजरा व्हावा अशी प्रमुख मागणी नाशिक सायकलीस्टची असून देशभरात सायकल चळवळ पोहचावी यासाठी 2016 पासून नाशिक ते मुंबई अशी १८६ किमीच्या रॅलीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी दिली आहे.

सोमवारी दि. 1 ऑक्टोबर रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथुन सकाळी 6 वाजता रॅली सुरु होणार असून पुढे घेाटी, इगतपूरी, शहापूर मार्गे पहिल्या दिवशी 124 किमीचे अंतर पूर्ण करण्यात येणार आहे. कल्याण फाटा येथील रिसोर्ट वर मुक्काम करुन मंगळवार दि. 02 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 6.00 वाजता प्रस्थान करून ठाणे, मुलुंड, घाटकोपर, दादर, मार्गे गेट वे ऑफ इंडीया येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

यानिमित्त नाशिक सायकलीस्ट 02 ऑक्टेबर गांधी जयंती हा दिवस भारताचे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने ‘इंडीयन सायकल डे’ म्हणून घोषत करावा अशा आशयाचे निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

रॅलीची नोंदणी करण्यासाठी सायकल अड्डा, रेणुका प्लाझा, जिपिओ रोड तसेच पावा ग्रुप कार्यालय, थत्ते नगर, कॉलेज रोड अथवा 7447778844 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देखावे पाहण्यासाठी लोटली गर्दी

0

नगर टाइम्स,

आज अखेरचा दिवस, सेल्फीसाठी उडतेय झुंबड, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची चंगळ

अहमदनगर (प्रतिनिधी) – गणरायाचे आगमन होऊन आठ दिवस झाल्यानंतर शहरातील ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेश मंडळांबाहेर आरास पाहण्यासाठी भाविकांची शुक्रवारी सायंकाळनंतर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. शहराच्या मध्यवर्ती भागातील सारे रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. गौरी विसर्जनानंतर शहरात गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी सातव्या दिवसांपासून शहरात गर्दी होऊ लागली आहे. नगरकरांनी सायंकाळपासूनच शहरातील चौकात मोठी गर्दी केली होती. नागरिकांच्या गर्दीने शहरातील मुख्य रस्ते फुलून गेले होते. गणेश विसर्जनापर्यंत गर्दीचा ओघ असाच सुरू राहील, अशी प्रतिक्रिया गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आली.

गेल्या आठवड्यात गुरुवारी गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर बहुतांश देखावे अपूर्ण असल्याने गर्दीचा ओघ सुरुवातीला कमी होता. बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, ऐनवेळी शहरात पावसाने जोर धरल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. गुरुवारी देखावे पाहण्यासाठी काहीशा प्रमाणात नागरिक घराबाहेर पडू लागले. शुक्रवारी मोहरम सवार्‍या असल्याने शहरातील मुख्य चौकात सकाळपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी साडेपाच नंतर मोहरम सवारी दिल्ली गेट वेशीच्या बाहेर पडल्यानंतर पोलीस बंदोबस्त देखील काहीशा प्रमाणात कमी झाला होता. तसेच मोहरमच्या पार्शवभूमीवर काही चौकातील रस्ते बंद करण्यात आले होते.

 

कांद्याला वाढीव हमीभाव देण्याची केंद्र सरकारकडे मागणी

0
लासलगाव (वार्ताहर) : कांद्यामुळे कधी ग्राहकाचे तर कधी सरकारचे वांदे झाल्याचे आपण बघितले आहे यंदा कांद्याने मात्र उत्पादकांचे वांदे करत डोळ्यात पाणी आणले आहे. मागणीच्या तुलनेत भारतासह इतर कांदा उत्पादक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने कांद्यासाठी येणारा खर्चही निघणार नसल्याने कांदा लागवडीसाठी प्रमुख असलेल्या नाशिक जिल्हयातील कांदा उत्पादक चांगलाच सणासुदीच्या काळात चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे .
 
उन्हाळ कांद्याची आवक महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून तसेच नवीन लाल कांद्याची आवक आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यात येत असल्याने देशाअंतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक होत आहे तर कांद्याची निर्यात होण्यासाठी एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी निर्यातमूल्य दर शून्य डॉलर केले असून निर्यातीसाठी 5% अनुदानही दिले आहे.  मात्र चीन, पाकिस्तान, इजिप्त सह निर्यातदार कांदा उत्पादक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात या वर्षी कांद्याची आवक झाल्याने हे देशही स्वस्त दरात कांदा निर्यातदार देशांना कांदा उपलब्ध करून देत असल्याने निर्यात मंदावल्याने कांदा भावात दररोज घसरण होत असल्याचे येथील कांदा निर्यातदार मनोज जैन सांगितले . 
दररोज कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने याचा परिणाम कांदा उत्पादकांसह मार्केट कमिटीच्या मजुरांच्या मजुरीवर होत असल्यामुळे केंद्र सरकारने विक्री झालेल्या कांद्याला किमान एक हजार रुपये अनुदान तर दोन हजार रुपये हमी भाव देण्याची मागणी लासलगाव बाजार समिती च्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले .

कायद्याचेच ढोल

0

नगर टाइम्स,

उद्या श्रींना निरोप डीजे, बंदी कायम, 14 मंडळ सहभागी, 113 सीसीटीव्ही

अहमदनगर (प्रतिनिधी) – बाप्पांना निर्विघ्न निरोप देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पण केला आहे. मात्र, विसर्जन मिरवणुकीत डीजे लावून मनमानी करण्याचा काही मंडळांनी विडा उचलला आहे. कोर्टाने डीजेबंदी कायम ठेवल्याने कायद्याचाच ढोल वाजविण्यास प्रशासनाला बळ मिळाले. काल झालेल्या मोहरमच्या मिरवणुकीत त्याचा प्रत्यय आला. ठरलेल्या वेळेत त्यांनी मिरवणूक दिल्लीगेटबाहेर नेली. त्यामुळे डीजेचा आवाज दाबला जाणार आहे, हे निश्‍चित. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यासोबत प्रशासन कायद्याचे ढोल बडवणार आहे. दरम्यान, उद्या (रविवारी) सकाळी दहा वाजता ग्रामदैवत विशाल गणपतीची मिरवणूक सुरू होईल. ती सहाच्या ठोक्याला दिल्लीगेट वेशीबाहेर पडेल.

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या गणेश मंडळांसाठी पोलीस प्रशासनाने कडक नियम लावले आहेत. एकाही मंडळाला डीजे वाजू दिला जाणार नाही. प्रत्येक मंडळांसोबत स्वतंत्र पोलीस बंदोबस्त असणार आहे. बंदोबस्ताचे मायक्रो प्लॅनिंग पोलीस प्रशासनाने केले आहे.
श्री विशाल गणेशाची उत्थापनाची पूजा उद्या (रविवारी) सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. सजविलेल्या रथातून श्रींची मिरवणूक पारंपरिक वाद्य, झांज, लेझिम, टिपर्‍या, तालयोगी हलगी (कडे), ढोल, टिपर्‍याच्या संघाचा या मिरवणूकीत सहभाग असणार आहे.

विशाल गणपतीचा विसर्नज रथ दहा वाजता रामचंद्र खुंट येथून मार्गस्थ होणार आहे. 11 वाजता दाळमंडई कोपरा,साडेअकरा वाजता युनियन बँक जवळ, 12 वजता तेलीखुंट चौक, पाऊण वाजता घासगल्ली चौक, दीड वाजता भिंगारवाला चौक, दोन वाजता अर्बन बँकेजवळ, पावणेतीन वाजता नवीपेठ कोपरा, पावणेचार वाजता नेताजी सुभाष चौक, सव्वाचार वाजता अहमदनगर वाचनालय, पावणेपाच वाजता चितळे रोड आणि बरोबर सहा वाजता दिल्लीगेट बाहेर निघणार आहे.

मिरवणुकीच्या प्रारंभी बैलगाडी, सनई चौघडा, नगारा वाद्य, त्यामागे पारंपारिक वाद्य, श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रम शाळा (टाकळी काझी, ता.नगर) यांचे झांज पथक, लेझिम, बुर्‍हाणनगर तालयोगी हलगी(कडे)पथक, रुद्रनाथ व रिदम् यांचे ढोल पथक तसेच सावता माळी महिला मंडळ आणि माळीवाडा कपिलेश्वर महिला यांचे टिपर्‍या पथक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. शहरातील गणेश मंडळं बाळाजीबुवा बारवेत तर सावेडीतील यशोदानगर, सनी हॉटेल जवळील विहीर, भिंगार येथील शुकलेश्‍वर जवळील विहीर आदी ठिकाणी गणेशाचे विसर्जन होणार आहे. केडगांव, सावेडी येथील विसर्जन मिरवणूक निघाणार आहे. सावेडी, उपनगरात विविध गणेश मंडळानी विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी घेण्यासाठी अर्ज दिले आहेत.

विसर्जन मिरवणुकीतील मंडळं
संगम तरूण मंडळ, माळीवाडा तरूण मंडळ, आदिनाथ तरूण मंडळ, दोस्ती तरूण मंडळ, नवजवान तरूण मंडळ, महालक्ष्मी तरूण मंडळ, कपिलेश्‍वर तरूण मंडळ, नवरत्न तरूण मंडळ, समझोता तरूण मंडळ, शिवशंकर तरूण मंडळ, आनंद तरूण मंडळ, शिवसेना मंडळ अशी 13 मंडळे विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणार आहे.

चौकीतून नियोजन
विसर्जन मार्गवर पोलिस प्रशासाने 113 सीसीटिव्ही बसविले आहे. तसेच विसर्जनाची पहाणी करण्यासाठी 3 ड्रेन कॅमेरे देखील ठेवण्यात आले होते. सीसीटिव्हीचे सर्व फुटेज चितळे रोड येथील पोलिस चौकी व एसपी ऑफिसच्या कन्ट्रोल रूमला लिंक असणार आहे. तेथे बसल्या जागी मिरवणुकीची हालचाल टिपली जाणार आहेे. विसर्जन मिरवणूक मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे.

आव्वाजासाठी मंडळांनी केली तयारी
डीजे वाजविण्याला कोर्टाने बंदी घातली आहे. पोलिसांनी अगोदरच मंडळांना नोटीस बजावत डीजे न लावण्याचे बजावले आहे. मात्र तरीही काही मंडळ डीजे लावणार असल्याचे समजते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मिरवणुकीत शक्तीप्रदर्शन करण्याचा बेतही काही मंडळांनी आखला आहे. त्यामुळं पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे. शुक्रवारी निघालेल्या मोहरम विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी आपली झलक दाखवून दिली आहे. तीच झलक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतही दिसणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 22 सप्टेंबर 2018

0

ओरिसातील वादळ थंडावले; मात्र ८ राज्यांवर संकट कायम

0

भुवनेश्वर : ओरिसातील डेई चक्रीवादळ आता थंडावले असून आता ते वादळ इतर राज्यात पुढे सरकत आहे. ओरिसात थैमान घातलेल्या वादळामुळे देशातील वातावरणात बदल होत असून आठ राज्यांना अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

ओरिसासह  तेलंगणा, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीच्या भागात अजूनही वादळी वारे वाहत असून जोरदार पाऊस पडत आहे. या वादळामुळे महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, मध्ये प्रदेशच्या काही भागात पाऊस पडत आहे.

या चक्रीवादळाने ओरिसात मोठा फटका बसला असून अजूनही या ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत. यादरम्यान मुसळधार पावसाबरोबरच भूस्खलनाच्या घटना घडल्या असून मलकानगिरी जिल्ह्याला वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील काही भागात पाणी साचले आहे.

विविध ठिकाणी अडकलेल्या 150 लोकांनी सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशाच्या कोरापूटमध्ये 100 मिमी तर बालासोरमध्ये 141 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

वादळामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणही बदलले आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह देशातील अनेक भागात वादळामुळे पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह आठ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

लष्करी ताफ्यावर झालेल्या गोळीबारात २४ ठार

0

इराण : अहवाज या शहरात लष्करी संचालन सुरु असताना काही हल्लेखोरांनी गोळीबार करत २४ जणांचा जीव घेतला. तसेच या घटनेत ५० जण जखमी झाल्याचे माहिती मिळाली आहे.

संचलन सुरू असताना शेजारच्या उद्यानातून हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोर लष्करी गणवेशात होते, अशी माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी हा हल्ला परकीय शत्रूकडून आल्याचे बोलले जात आहे. तर, सरकारी माध्यमांनी आणि अधिकाऱ्यांनी या हल्ल्यास सुन्नी कट्टरवादी किंवा अरब राष्ट्रवादी यांना जबाबदार धरलं आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.00 वाजता हा हल्ला झाला. चार हल्लेखोरांचा त्यात समावेश होता. हल्लेखोरांनी नागरिक आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला. लष्करानं दिलेल्या प्रत्युत्तरात दोन हल्लेखोर जागीच ठार झाले तर दोघांना अटक करण्यात आली.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वावी विद्यालय अजिंक्य; तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0

सिन्नर । रयत शिक्षण संस्थेच्या सिन्नर तालुक्यातील वावी येथील नूतन विद्यालय व अ‍ॅड. रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यलयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या कब्बडी संघाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवत बाजी मारली असून तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचे नेतृत्व करणाऱ्या संघात निवड झाली आहे.

वावी विद्यालयाच्या कबड्डी संघाने सिन्नर येथे झालेल्या तालुका, नाशिक येथील जिल्हा तर धुळे येथे पार पडलेल्या विभागीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाना चीत करत अव्वल स्थान कायम ठेवले होते. परभणी येथे राज्यस्तरावरील स्पर्धेत अंतिम सामन्यात अमरावती संघाविरुद्ध नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करताना या संघाने ३० गुणांनी विजय मिळवला.

या स्पर्धेत गौरव तपकीर, सूरज पाटील, श्रेयस उंबरदंड, मुस्ताफा शेख, रोशन आव्हाड, मनीष जोशी, पवन भोर, निखिल भोर, सत्यजीत पानसरे, ओंकार गाडे, ओंकार लाळगे, ओंकार चांदगुडे यांनी दमदार कामगिरी करत राज्य अजिंक्यपदावर वावी विद्यालयाच्या नावाची मोहोर उमटवली. संघातील गौरव तपकीर, सूरज पाटील व श्रेयस उंबरदंड या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मध्यप्रदेश राज्यात देवास येथे ही कबड्डी स्पर्धा होणार आहे. संघातील खेळाडूंना क्रीडाशिक्षक महेश कोल्हे, भाऊसाहेब गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्य स्तरावर संघाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या व राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. भगीरथ शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष कन्हैयालाल भुतडा, रामनाथ कर्पे, विठ्ठलराजे भोसले, उपसरपंच विजय काटे, ईलाहीबक्ष शेख, प्राचार्य अनिल वसावे, पर्यवेक्षक सुधीर वाघमारे यांच्यासह शालेय समिती सदस्य व ग्रामस्थांनी कौतूक केले आहे.

एसबीआय बँक सोलर पॅनलचा वापर करीत वीजनिर्मिती करणार

0

मुंबई : पर्यावरणाची वाढती हानी लक्षात घेता एसबीआय ने याबाबत महत्वाचे पाऊल उचलले आहे. देशात वाढणाऱ्या कार्बनचे उत्सर्जन घटविण्यास आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यास भारतीय स्टेट बँकेने पुढाकार घेतला आहे. एसबीआयने पुढील दोन वर्षांत देशातील 10 हजार एटीएममध्ये सोलार पॅनेलचा वापर करत वीज निर्मिती करण्याचे ठरविले आहे.

सध्यापर्यंत देशातील 1,200 एटीएममध्ये सोलार पॅनेल लावण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त देशातील 150 इमारतींवर सोलार पॅनेल लावण्यात येणार असून 2020 पर्यंत ही संख्या 250 वर नेण्यात येईल.

2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन घटविण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. देशातील 12 शहरांमध्ये ग्रीन मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे असे एसबीआयचे प्रमुख वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले. एसबीआय 2008 पासून सोलारवर चालणाऱया एटीएमचा वापर करत आहे.

देशात पहिल्यांदा सोलारवर चालणारे एटीएम दाखल करणारी ती पहिली बँक ठरली आहे. 2014 मध्ये 2.63 गिगावॅट असणारी सौर ऊर्जा निर्मिती आता 22 गिगावॅटवर पोहोचली आहे. पवन ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती गेल्या चार वर्षात 21 वरून 34 गिगावॅटवर पोहोचली आहे.

Social Media

26,095FansLike
5,154FollowersFollow
1,138SubscribersSubscribe
error: Content is protected !!