येत्या शनिवारी पुन्हा ‘वॉक विथ कमिशनर’

0

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील गोंधळ संपतो न संपतो तोच विश्रांतीनर आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम पुन्हा सुरू होत आहे. शनिवारी (दि. २२) आनंदवली शिवारातील पाइपलाइन रोडवरील जॉगिंग ट्रॅक येथे आयुक्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वीच नगरसेवकांनी मुंढेंच्या या उपक्रमावर ताशेरे ओढले असताना नव्याने कार्यक्रम सुरू झाल्याने नगरसेवकांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून आहे.

महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर मुंढेंनी नवी मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांच्या अडचणी, तक्रारी जाणून त्यांचे तातडीने निराकरण करणारा हा उपक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला होता. अनंत कान्हेरे मैदानावरून सुरू झालेल्या या उपक्रमाला सुरुवातीला चांगला प्रतिसाद लाभला. नागरिकांना आपल्या तक्रारी थेट आयुक्तांसमोर मांडता येत असल्यामुळे त्याची प्रशंसा झाली.

शनिवारी सकाळी ६.३० वाजता नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात पालिका अधिकाऱ्यांकडे द्याव्यात. तक्रारी दिल्यानंतर टोकन क्रमांक देऊन त्याद्वारे समस्या मांडता येतील, असे प्रशासनाने कळविले आहे.

विक्रांत आणि ईशाच्या प्रेमाची एक नवी सुरुवात?

0

मुंबई : झी मराठी वरील नवीनच सुरु झालेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका सध्या तुफान गाजतेय. सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे.

विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होतं हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की एकीकडे ईशाला तिच्या मनात विक्रांतसाठी असलेल्या भावनांची जाणीव झाली आहे पण दुसरीकडे तिची आई तिचं लग्न बिपीन टिल्लूशी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती विक्रांतना ईशाला समजवायला सांगते पण विक्रांतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतात. ईशा विक्रांतसमोर तिच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते पण विक्रांत तिला नकार देतो आणि तिला बिपिनशी लग्न करायचा सल्ला देतो.

प्रेक्षक आगामी भागात पाहू शकणार आहेत की ईशाच्या वडिलांची नोकरी जाणार आहे आणि त्यामुळे निमकर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवणार आहे. त्यामुळे ईशाची आई तिला बिपिनला होकार देण्याची गळ घालते आणि ईशाकडे दुसरा काहीच पर्याय नसल्यामुळे ती त्याला होकार देणार आहे. त्यामुळे विक्रांत आणि ईशाच्या प्रेमकहाणीचं पुढे काय होणार? ईशा विक्रांतला विसरणार का? विक्रांतला ईशाबद्दलच्या त्याच्या मनात असलेल्या भावनांची जाणीव होणार का की त्याला जाणीव होई पर्यंत बिपीन आणि ईशाचं लग्न होणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

सॅरीडॉन वरील बंदी उठवली

0

मुंबई : सॅरीडॉन या औषधासह फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन्स च्या तीन औषधांना सुप्रीम कोर्टाने विक्रीची परवानगी दिली आहे. सॅरीडॉन हे लोकप्रिय वेदनाशामक औषध आहे.

औषधनिर्मात्या कंपन्यांच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्राला नोटीस जरी करून उत्तर मागविले आहे. तेव्हापर्यंत मात्र हि औषधे विकली जातील. दरम्यान आरोग्य मंत्रालयाने बंदी घातलेल्या ३२८ FDC औषधांच्या यादीत असलेल्या इतर औषदही मात्र विकल्या जाणार नाहीत.

केवीएन नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटरपोलो स्पर्धेत यश

0

नाशिक : विभागस्तरीय जलतरण शालेय स्पर्धेत १९ वर्षाखालील केवीएन नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा वाटरपोलो ४#१००मी. मोडले रिले , ४#१०० मी. फ्रीस्टाईल रिले संघाला सुवर्णपदक मिळून राज्यस्तरावर निवड झाली. तसेच वैयक्तिक अनुज किंतुरर याने २०० मी., ४०० मी, १५०० मी., फ्रीस्टाईल मध्ये सुवर्णपदक मिळवले. लौकिक खांडेकर ५० मी, १०० मी सुवर्णपदक तर ५० मी बटरफ्लाय मध्ये रौप्य मिळवले आहे.

सिद्धांत भांबरे 200 मि बटरफ्लाय मध्ये सुवर्णपदक मिळवले, जीवक वाघमारे 200 मी, 400 मि इंडिव्हिजल मिडले मध्ये सुवर्ण पदक तर 50 मी फ्रिस्टाईल मध्ये सिल्व्हर पदक मिळाले, प्रसाद सावळे ५० मी,१०० मी ब्रेस्ट्रोक मध्ये सुवर्णपदक मिळाले तर १०० मी इंडिव्हिजल मिडले मध्ये रौप्य मिळवले

वाटरपोलो संघात वरील खेळाडूंसबोत अमन विभांडीक, अथर्व साळुंखे, संकेत उगलमुगले, राहुल उगले, आशिष कांबळे याची नागपूर येथे होणाऱ्या शालेय राजस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली या सर्व विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडासांचलक प्रा दिनकर गिते यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. आदरणीय कोंडाजीमामा आव्हाड व सरचिटणीस मा.आदरणीय हेमंत आप्पा धात्रक यांनी अभिनंदन करून पुढिल स्पर्धयेसाठी शुभेच्छा दिल्या.

कानिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य कैलास गिते, वरिष्ठ महाविद्यालययाचे क्रीडासंचालक डॉ.डी. डी. राजपूत , सर्व प्राध्यापक व प्राध्याकेतर कर्मचारी सर्वानी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार

0

नवी दिल्ली : दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रयॊगातून पर्यावरपूरक उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक म्हणजे हायड्रोजन ट्रेन लवकरच ट्रॅकवर येणार आहे. ट्रेनची डिझेल इंजिने खर्चिक असतात. तर व्हिलेजवर चालणाऱ्या इंजिनांना वीज खूप लागते. यावर पर्याय म्हणून संशोधक यावर संशोधन करीत होते. यात त्यांना यश आले असून जर्मनीने हायड्रोजन वर चालणारी पहिली ट्रेन बनवली आहे. या तरी कक्सहेवन व बुक्सटेहूड या १०० किमीच्या अंतरावरील प्रथम चाचणीही यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता डिझेलची व विजेची प्रचंड बचत होईल. तसेच प्रदूषणावर मात करणेही शक्य होईल.

हायड्रोजन ऊर्जेवर चालणारी ही ट्रेन संपूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे. या ट्रेनमधून कुठल्याही प्रदूषणकारी घटकांची निर्मिती होणार नाही. या ट्रेनमध्ये लिथियम-आयन बॅटरीजचा वापर करण्यात आला आहे. मोबाइल फोन आणि अन्य घरगुती उपकरणांमध्ये ज्या बॅटरी वापरल्या जातात त्याच बॅटरीचा वापर या ट्रेनमध्ये करण्यात आला आहे. अलस्टोममध्ये या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून हायड्रोजनच्या सिंगल टँकवर ही ट्रेन १ हजार किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते.

डिझेल ट्रेन प्रमाणेच या ट्रेनमध्ये इंधनाची रचना आहे. ट्रेनची अतिरिक्त ऊर्जा लिथियम आयन बॅटरीमध्ये साठवून ठेवण्याची सुविधा आहे. प्रवाशांसाठी जगातील या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची सेवा रविवारपासून जर्मनीमध्ये सुरु झाली आहे. नजीक भविष्यात आणखी अशा १४ ट्रेन चालवण्याची जर्मनीची योजना आहे. ब्रिटन, हॉलंड, डेन्मार्क, नॉर्वे, इटली आणि कॅनडा या देशांकडूनही हायड्रोजन ट्रेनची मागणी नोंदवण्यात आली आहे. डिझेल लोकोमोटीव्ह ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेनची किंमत जास्त आहे. दीर्घकाळाचा विचार केल्यास ही ट्रेन चालवण्यासाठी येणारा खर्च कमी आहे. या एका ट्रेनची किंमत ७० लाख डॉलर आहे. ताशी १४० किलोमीटर वेगाने पळण्यास या ट्रेन सक्षम आहेत.

काय आहे हायड्रोजन ट्रेनचे तंत्रज्ञान
हायड्रोजन ट्रेनमध्ये इंधन सेल असून त्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या वापरातून वीज तयार केली जाते. वाफ व पाण्यापासून हि वीज बनते. जास्त बनलेली वीज बॅटऱ्यांमध्ये साठवली जाते. ही ट्रेन एकदा हायड्रोजन भरला कि, १००० किमीचे अंतर पार करू शकते.

साडेपाच लाखांची चोरी करणार्‍यास अटक

0

सातपूर |प्रतिनिधी तपारिया कंपनीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इनोव्हा कारची काच फोडून गाडीत ठेवलेली सुमारे साडेपाच लाखांची बॅग चोरल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात ठाणे येथील एका संशयिताला अटक करण्यात आली असून, याप्रकरणी आणखी ३ गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.

सातपूर औद्योगिक परिसरातील जय एन्टरप्रायजेसचे कपिल मेहता हे कंपनीच्या कामासाठी इनोव्हा कारने तपारिया टूल्स या कंपनीत आले होते. गाडीत येताना कामगारांचे पगार करण्यासाठी बँकेतून सुमारे पाच लाख ६० हजार रुपये काढून एका बॅगेत ठेवले हाते.गाडी तपारिया कंपनीच्या पार्किंगमध्ये लावून ते व्यवस्थापनाबरोबर बैठकीसाठी कंपनीत गेले असता चोरांनी कारची काच फोडून साडेपाच लाखांची बॅग लांबवली.

घटनेचा तपास करताना सातपूरचे वपोनि राजेंद्र कुटे यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास यंत्रणा राबवित तसेच गुन्हे शाखा युनिट १ च्या मदतीने ठाणे येथून या गुन्हातील संशयित मंगेश गुंजेला अटक केली. त्याच्याकडून ४० हजारांचा मालही जप्त केला, त्याचे तीन साथीदार श्यामल परेरा, विनय राणा, राकेश जाधव फरार असून या तिघा आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याचे वपोनि राजेंद्र कुटे यांनी सांगितले.

 

जिल्हा अॅथलेटीक असो.तर्फे निवड चाचणी स्पर्धा

0

सातपूर |प्रतिनिधी नाशिक जिल्हा अॅथलेटीक असोसिएशनतर्फे येत्या रविवारी मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे कनिष्ठ गटातील (वय १८ ते २० वर्षे) खेळाडू मुले व मुलींकरिता जिल्हा कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतून निवड झालेले १८ वर्षे वयाखालील खेळाडू हे विभागीय स्पर्धासाठी पात्र ठरतील. तसेच २० वर्षे वयाखालील खेळाडू हे राज्य कनिष्ठ गट मैदानी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
विभागीय स्पर्धेतून १८ वर्षे वयाखालील निवड झालेले खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील व २० वर्षे वयाखालील निवड झालेले खेळाडू कनिष्ठ गट राज्य मैदानी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी नाशिक जिल्हयाचे  प्रतिनिधित्व करतील.

या चाचणी स्पर्धेसाठी १८ वर्षांखालील खेळाडू हे ७ ऑक्टोबर २००० ते ६ऑक्टोबर २००२ या कालावधीत जन्मलेले असावे, तसेच २० वर्षांखालील खेळाडू हे ७ ऑक्टोबर १९९८ ते ६ऑक्टोबर २००० या कालावधीत जन्मलेले असावेत.

या संधीचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंनी मोठ्या संख्यने सहभाग नोंदवावा. खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना सोबत जन्म दाखल्याच्या पुराव्यासाठी इयत्ता १० वी पासचे मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

स्पर्धेत भाग घेण्यास इच्छूक खेळाडूंनी राजीव जोशी, दत्ता जाधव, वैजनाथ काळे यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन नाशिक जिल्हा अॅथलेटीक असोसिएशनतर्फे करण्यात आले.

 

‘समृध्दी’ मार्गावर वन्यजीवांचा मुक्त संचार

0

नाशिक । महाराष्ट्र समृद्धी महामार्गादरम्यान येणार्‍या वन्यजीव स्थळांचा अभ्यास करुन तेथील वन्यजीवांचे संरक्षण कसे करता येईल, महामार्ग उभारणीनंतर त्यांचा विनाअडथळा संचार कसा होईल. अशी सर्वच काळजी एमएसआरडीसीकडून घेण्यात आली आहे. त्यासाठी महामार्गालगत अभायरण्य विकसित करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. याकरीता डेहराडून येथील वन्यजीव संस्थेसोबत करारही झाला आहे.

महामार्गाची आखणी करताना वन्यजीवांना अभय मिळावे, त्यांचा स्वच्छंदपणा जपला जावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठोस पावले उचलली आहेत. एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत भारतीय वन्यजीव संस्थेशी यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार महामार्गादरम्यान येणा-या वन्यजीव स्थळांचा अभ्यास करून तेथील वन्यजीवांचे संरक्षण कसे करता येईल, महामार्गाच्या उभारणीनंतर त्यांचा विनाअडथळा संचार कसा होईल, वन्यजीवांचे संगोपन कसे करता येऊ शकेल याचा सखोल अभ्यास करून त्यानुसार संबंधित संस्था एमएसआरडीसीकडे शिफारस अहवाल सादर करणार आहे.

यासंदर्भात काय उपाययोजना आखता येतील, याचेही मार्गदर्शन भारतीय वन्यजीव संस्था करणार आहे. त्यामुळे महामार्गाचे बांधकाम सुरू असताना आणि तो पूर्ण झाल्यानंतरही वन्यजीवांच्या जिवाला काही धोका निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांबरोबरच 26 तालुके आणि 390 गावांना जोडणार्‍या समृद्धी महामार्गादरम्यान दोन ठिकाणी अभयारण्ये येतात.

या अभयारण्यांत अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात असताना आणि उभारणीनंतरही या अभयारण्यांतील वन्यजीवांना महामार्गावरील वाहनांचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने महामार्गाच्या रचनेमध्ये तरतूद करण्यात येईल. त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेची (वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मदत घेतली जाणार आहे.

वन्यजीव संस्था प्रथमच भागीदार
केंद्रीय वने व पर्यावरण खात्याच्या अंतर्गत येणारी वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पूर्ततेपर्यंत एमएसआरडीसीची भागीदार व्हावयास तयार झाली आहे. कोणत्याही पायाभूत विकास प्रकल्पात अशा प्रकारे वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेचा सहभाग होणे देशात प्रथमच घडत आहे.

पथदर्शी प्रकल्प ठरेल
समृद्धी महामार्गामुळे वन्यजीवांच्या दैनंदिन जीवनात तसेच त्यांच्या विहारात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे वन्यजीवांच्या रक्षणाबाबत हा महामार्ग भविष्यात पथदर्शी प्रकल्प ठरेल. डेहराडून येथील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेशी महामंडळाने सामंजस्य करार केला आहे.
राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

परतीच्या पावसाला जोरदार सुरूवात

0

नाशिक । गेल्या महिनाभरापासून दडी मारल्यानंतर मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सायंकाळी शहरात जोरदार पाऊस झाला. जिल्हयाच्या पश्चिम पटटयात अनेक ठिकाणी पावसाने मध्यम ते जोरदार हजेरी लावली. शहरात सुमारे तासभर झालेल्या पावसाने रस्त्यांवरून पाणी वाहत होते. यामुळे गणेश मंडळांची देखावे झाकण्यासाठी धावपळ उडाली.

गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. त्यामुळे परतीच्या पावसाकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागून होत्या. परंतु सप्टेंबर महिन्यातील काही दिवस कोरडे गेल्याने चिंता वाढली होती. मात्र आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण झाल्याने पावसाची आस लागून होती. अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोसाटयाच्या वारयासह जोरदार पावसाने हजेरी लावली.जिल्हयातही अनेक भागांत चांगला पाउस झाल्याने शेतांमधून पाणी वाहू लागले होते.

मालेगाव,येवला, नांदगाव, सिन्नरच्या पूर्व भागाकडे मात्र वरूणराजाने पाठच फिरवल्याचे दिसून आले. सोमवारी सांयकाळनंतर नाशिक शहरात एक तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचून पाणी वाहत होते. यंदा जून, जुलै, ऑॅगस्ट या तीन महिन्यात जिल्ह्यात सरासरी 86 टक्केच पाऊस झालेला आहे. असे असले तरी अद्यापही जिल्हयातील मालेगाव, येवला, नांदगाव, सिन्नर, निफाड, नांदगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच भिस्त आहे.येत्या महिन्याभरात चांगला पाऊस होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. यंदा जिल्हयातील धरणांत सुमारे 79 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

पुढील चार दिवस पावसाचे
बेपत्ता झालेल्या पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली. पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने 21 सप्टेंबरपर्यंत परतीचा पाउस जोरदार हजेरी लावेल अशी सुखवार्ता हवामान विभागाने दिली आहे. जूनपासून सप्टेंबरच्या पंधरवडयापर्यंत पावसाने सातत्याने लहरीपणाचे दर्शन घडवले. प्रत्येक महीन्याच्या अखेरीस त्या त्या महीन्याच्या सरासरीपर्यंत पाउस पोहचल्याचे यंदा पहावयास मिळाले. मात्र आता गेल्या तीन चार दिवसांपासून किमान तापमान कमी होत असल्याने पावसाचे आगमन होणार की नाही अशी शंका उपस्थित करण्यात येत होती परंतू आता आजच्या पावसाने पुन्हा एकदा सुखद धक्का दिला आहे.

मंडळांची धावपळ
शहरात सध्या गणेशोत्सवाची धुम आहे. रविवारपासून सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे पूर्ण करत नागरीकांसाठी खुले केले आहे. पुढील चार दिवसांत गणेशभक्तीला उधाण येणार आहे. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने हजेरी लावल्याने भाविकांच्या उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच आज सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाचे आगमन झाल्याने पावसाच्या पाण्यामुळे देखाव्यांचे नुकसान होउ नये म्हणून गणेश मंडळ पदाधिकारयांची धांदल उडाली.

विजेचा लंपडाव
सोसाटयाच्या वारयासह झालेल्या पावसाने शहर परिसरातील वीजपुरवठा काही वेळ खंडीत झाला होता. तर काही भागात वीजेचा लपंडाव सुरू होता. गेल्या महीनाभरापासून प्रचंड कडाका होता त्यातच आज झालेल्या पावसाने इन्स्युलेटर पंक्चर होण्याच्या प्रकारांमुळे वीज येत जात असल्याचे वीज मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. तर काही भागात झाडांच्या फांद्या वीज वाहीन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र वीज कर्मचारयांनी तातडीने काम हाती घेत वीज पुरवठा सुरळित केला.

पाउस लांबणार
कमी दाबाचा पटटा जस जसा विस्तारत जाईल तस तसा पावसाचा कालावधीही वाढत जाईल. मान्सूनचा पॅटर्न बदलल्याने ऑक्टोबरपर्यंत पावसाची हजेरी राहणार आहे. त्यामुळे थंडीचे दिवस कमी होतील. सध्याचा पाउस हा परतीचा पाउस आहे. पुढील आठवडाभर मध्यम ते तुरळक स्वरूपात पाउस सुरू राहणार आहे.
किरणकुमार जोहरे, हवामान अभ्यासक

Social Media

26,070FansLike
5,154FollowersFollow
1,125SubscribersSubscribe
error: Content is protected !!