साश्रुनयनांनी शहिद केशवला निरोप

0

नाशिक : रविवारी (दि.11) दुपारी काश्मिरच्या नवशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात शहिद झालेले नायक केशव सोमगिर गोसावी यांचेवर त्यांच्या मुळगावी शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथे आज (दि.12) रात्री 10 वाजता दशनाम गोसावी समाजाच्या परंपरेनुसार समाधी देवून अत्यंसंस्कार करण्यात आले. शहिद केशव गोसावी अमर रहे, भारत माता की जय, या जय घोषासह पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत उपस्थित असलेल्या हजारोंच्या जनसमुदायाने या वीरपूत्राला अखेरचा निरोप दिला.

आज सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास हवाई दलाच्या विशेष विमानाने शहिद केशव यांचे पार्थिव ओझर विमानतळावर दाखल झाले. पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांचेसह नाशिकमध्ये कार्यरत लष्काराच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी मानवंदना दिली. त्यानंतर काळा झेंडा लावलेल्या विशेष वाहनातून हे पार्थिव रात्री 8 वाजेच्या सुमारास शिंदेवाडी येथे आणण्यात आले. लष्कराचा लवाजमा देखील यावेळी सोबत होता.

गोसावी यांच्या निवासस्थानी त्यांचे वडील सोमगिरी गोसावी व पत्नी यशोदा यांचेकडे लष्करी परंपरेनुसार पार्थिव सुपूर्द करण्यात आले. साश्रुनयनांनी सोमगिरी गोसावी यांनी वीरपूत्राला अलिंगन दिले. तर पत्नी यशोदा यांनी हंबरडा फोडत आश्रुनां मोकळी वाट करुन दिली. यावेळी उपस्थित जनसमुदाय देखील भावनाविवश झाला होता. पत्नी यशोदा हीला रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास केशवने फोनवरुन संपर्क साधला होता. 15 दिवसांनी बाळाला बघायला सुट्टी टाकून येतो असा निरोप त्यांनी पत्नीला दिला होता. पत्नी यशोदा या 9 महिन्यांच्या गरोदर असून आज सकाळी त्या बाळंतपणासाठी माहेरी जाणार होत्या. मात्र, काळाने त्यांचा पती व जन्माला येणार्‍या अपत्याचा बाप हिरावून घेतल्याचे दु:ख उपस्थितांच्या चेहर्‍यावर होते.

सजवलेल्या रथातून संपूर्ण गावातून शहीद केशव यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. प्राथमिक शाळेसमोरील पटांगणात असलेल्या मंदिराच्या शेजारी त्यांना समाधी देण्याचा कार्यक्रम शासकीय इतमामात पार पडला. लष्कराच्या देवळाली कॅम्प येथील अर्टिलरी सेंटरच्या जवानांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली. मात्र, रात्रीच्या वेळी बंदूकीच्या फैरी झाडून मानवंदना देणे अशक्य असल्याने बंदूकीच्या फैरी झाडण्यात आल्या नाहीत.

पालकमंत्री गिरीष महाजन, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, शिवसेना नेते उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी कोकाटे, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसिलदार नितीन गवळी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन उपस्थित जनसमुदायाच्यावतीने श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर तिरंग्यात लपेटलेल्या पार्थिवाला समाधीस्थळी नेण्यात आले.

पतीच्या खुनाचा बदला घ्या 
माझा पती देशाच्या कामी आला आहे. सरकारकडून मला काही नको, फक्त माझ्या पतीच्या खुनाचा बदला घ्या अशा शब्दांत शहीद केशव गोसावी यांच्या पत्नी यशोदा यांनी पाकच्या हल्ल्याचा निषेध केला. केशव यांचे पार्थिव घेऊन लष्कराची तुकडी घरासमोर आल्यावर यशोदा यांनी हंबरडा फोडत आपल्या भावनांना वाट करून दिली. मात्र लगेचच स्वतःला सावरत त्यांनी पतीने देशाच्या रक्षणासाठी रक्त सांडले आहे, त्याची किंमत पाकिस्तानकडून वसूल करावी अशी मागणी केली.
देशाच्या रक्षणासाठी रक्त सांडलेल्या शहीद केशव यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही . संपूर्ण देश गोसावी कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.
– पालकमंत्री महाजन 

मालेगाव, सिन्नरसह 8 तालुक्यांत चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

0

नाशिक: जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. खरीप हंगाम कसाबसा जेमतेम निघाला. बुडत्याला काडीचा आधार तशी परतीच्या पावसाकडून थोडी अपेक्षा होती. मात्र त्यानेही पाठ फिरवली. खरीप हंगामात जो काही चारा उपलब्ध झाला आहे तेवढ्यावरच आता येते संपूर्ण वर्ष काढावे लागेल. जिवाचे मैतर असलेल्या सर्जा-राजाला, गाई म्हशींना जगवायचे कसे, असा प्रश्न बळीराजाला सतावत आहे.

जिल्ह्यात 8 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. 4 तालुक्यांंतील परिस्थिती फारच गंभीर बनली आहे. मालेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. येथे लगेचच चाराटंचाईचा सामना करण्याची वेळ ओढववणार आहे सिन्नर तालुक्यातही फेब्रुवारीपर्यंतच चारा पुरेल. स्वत:च्या खाण्यापिण्याचा प्रश्न आ-वासून उभा असताना जनावरांची वेगळी चिंता शेतकर्‍यांना लागली आहे.

यंदाच्या मोसमातील खरीप हंगामात (सन2018-19) झालेल्या पेरणीनुसार दुष्काळग्रस्त आठ तालुक्यांमध्ये 8 लाख 62 हजार 327 मेट्रिक टन इतका चारा उपलब्ध होणार आहे.

दुष्काळग्रस्त पशुधन
आठ तालुक्यातील पशुधन संख्या
गाई व म्हशी- सात लाख 12 हजार 857
शेळ्या/मेंढ्या- सहा लाख 30 हजार 676
एकूण पशुधन- 13 लाख 43 हजार 533

दरमहा चार्‍याची गरज
आठ तालुक्यांतील मोठ्या जनावरांना प्रतिदिन 4277.142 मेट्रिक टन, तर प्रतिमहिना 1 लाख 28,314.3 मेट्रिक टन इतक्या चार्‍याची आवश्यकता आहे. छोट्या जनावरांना प्रतिदिन 1892.028 मेट्रिक टन तर प्रतिमहा 56 हजार 760.84 मेट्रिक टन इतक्या चार्‍याची आवश्यकता आहे. एकूण सर्व जनावरांना मिळून दरमहा चारा 1 लाख 85 हजार 075.1 मेट्रिक टन इतक्या चार्‍याची आवश्यकता आहे.

तालुकानिहाय चारास्थिती
(मेट्रिक टन)
सटाणा- 70 हजार 393
मालेगाव- 90 हजार834
सिन्नर- एक लाख 23 हजार 291
देवळा- 89 हजार 262
चांदवड- एक लाख तीन हजार 430
इगतपुरी- दोन लाख 18 हजार 517
नाशिक- 77 हजार 140

तालुका चारा पुरेल

मालेगाव डिसेंबर 2018 पर्यंत
सिन्नर फेब्रुवारी 2019 पर्यंत
सटाणा जुन 2019 पर्यंत
नांदगाव मार्च 2019 पर्यंत
देवळा मे 2019 पर्यंत
चांदवड मे 2019 पर्यंत
इगतपुरी ऑक्टोबर 2019 पर्यंत
नाशिक मे 2019 पर्यंत.

वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन

0

नाशिक । दि. 11 प्रतिनिधी
शासकीय आदिवासी वसतीगृहात प्रवेश देण्यासंदर्भात आयुक्तालयास देण्यात आलेली मुदत संपूनही कार्यवाही न झाल्याने आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यामातून वसतीगृहात प्रवेश मिळविण्यासाठी आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर आज (दि.12)ठिय्या आंदोलन करत आयुक्तालयाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महाविद्यालयात प्रवेश होवून चार महिने उलटूनही वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्याने विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी सहआयुक्त दशरथ पानमंद यांनी मध्यरात्री विद्यार्थ्यांसमवेत चर्चा करत 12 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले . त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले होते. मात्र 12 नोव्हेंबर उजाडूनही कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांनी आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले.

वंचित विद्यार्थ्यांना तातडीने वसतीगृहात प्रवेश द्यावा, पेठ रोडवरील 150 मुले व 100 मुलींचे वाढीव वसतीगृह बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, प्रकल्प अधिकारी आशिर्वाद यांची बदली करावी. अभ्यासू अधिकार्‍याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव, जिल्हाध्यक्ष गणेश गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी आंदोलनता सहभागा घेतला.

डीबीटी विरोधात आंदोलन
आहाराची डिबीटी बंद करण्यात या मागणीसाठी संघटनेमार्फेत पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे.वसतीगृहातील विद्यार्थ्यांना भोजनासाठी सुरू करण्यात आलेली डीबीटी पद्धत बंद करावी. ही योजना बंद झाली नाही तर 19 डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

किशोर सूर्यवंशी स्मृती चषक अंतर तालुका क्रिकेट स्पर्धा

0

नाशिक । दि. 12 प्रतिनिधी
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित व किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल प्रायोजित किशोर सूर्यवंशी मेमोरियल अंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमध्ये मालेगाव, निफाड, नांदगाव, कळवण व नाशिक ग्रामीण या संघांनी आपले दोन्ही सामने जिंकत आपल्या गटात प्रथम स्थान मिळविले आहे, यामुळे या संघांचा पुढील बाद फेरी मध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

आज झालेल्या सामन्यांमध्ये नाशिक ग्रामीण संघाने निर्धारीत षटकात 3 बाद 265 धावांचा डोंगर उभा करत सिन्नर तालुका क्रिकेट संघाला मोठे आव्हान उभे केले, उत्तरादाखल सिन्नर 19.2 षटकात 102 धावात गारद झाला. बेजे, कळवण येथे झालेल्या सामन्यांमध्ये दिंडोरी संघाने 18 षटकात सर्व बाद 72 धावा केल्या उत्तरादाखल कळवण संघाने 7 गडी राखून विजय मिळविला. येथील दुपार सत्रात झालेल्या सामन्यात दिंडोरी संघाने चांदवड संघाचा 18 धावांनी पराभव केला, दिंडोरी 4 गडी बाद 173 धावा केल्या, उत्तरादाखल चांदवड 155 धावा करू शकला.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये पेठ तालुक्याने सिन्नर संघाचा 3 गडी राखत पराभव केला,सिन्नर संघाने षटकात 5 गडी बाद 130 धावा केल्या , उत्तरादाखल पेठ संघाने 14 षटकात 139 धावा करत विजय संपादन केला, सिन्नरच्या तेजस कातकडे यांनी 56 चेंडूत 72 धावा केल्या. दुसर्‍या सामन्यात त्रंंबक संघाने इगतपुरी संघाचा 3 गड्यांनी पराभव केला, ईगतपुरी संघाने षटकात 9 बाद 115 धावा केल्या, तर त्रंबक संघाने 18 षटकांत 7 गडी बाद 118 धावा करत विजय संपादन केला.

महात्मानगर मैदानावर झालेल्या सामन्यात येवला संघाने सुरगाणा संघावर 4 गडी राखून विजय मिळवला, सुरगाणा संघाने 20 षटकात 7 गडी बाद 109 धावा केल्या.येवला संघाने 110 धावा करत विजय संपादन केला. दुपार सत्रातील सामन्यात नांदगाव संघाने सुरगाणा संघाचा 5 गडी राखून पराभव केला, सुरगाणा संघाने सर्व गडी बाद 130 धावा केला तर नांदगाव संघाने 5 गडी बाद 131 धावा करत विजय संपादन केला.

दुसर्‍या फेरीत नाशिक ग्रामीण संघाने पेठ संघाचा 29 धावांनी पराभव केला , 20 षटकात नाशिक ग्रामीण संघाने 7 गडी बाद 154 धावा केल्या, उत्तरादाखल पेठ तालुका सर्व गडी बाद 125 धावा करू शकला निफाड संघाने इगतपुरी संघावर 7 गडी राखून विजय संपादन केला, इगतपुरी संघाने 14 षटकांत सर्व गडी बाद 61 धावा केल्या, उत्तरादाखल निफाड संघाने 8 षटकात 3 गडी बाद 63 धावा करत विजय संपादन केला, निफाडच्या भरत जाधव यांनी 4 षटकात 17 धावा देत 5 गडी बाद केले. नांदगाव संघाने येवला संघाचा 30 धावांनी पराभव केला, नांदगाव संघाने 15 षटकात सर्वबाद 109 धावा केल्या, उत्तरादाखल येवला संघ 17 षटकात सर्वगडी बाद 79 धावा करू शकला.

मालेगाव संघाने सटाणा संघावर 64 धावांनी विजय मिळवला, मालेगाव संघाने षटकात 4 बाद 130 धावा केला, तर सटाणा संघ 16 षटकात सर्वबाद 79 धावा करू शकला. निफाड संघाने त्रंबकेश्वर संघावर 13 धावांनी विजय संपादन केला,निफाड ने सर्व गडी बाद 129 धावा केल्या, उत्तरादाखल त्रंबकेश्वर संघ सर्व गडी बाद 116 धावा करू शकला. कळवण संघाने चांदवड संघाचा दोन गडी राखून पराभव केला, चांदवड संघाने 20 षटकात 9 गडी बाद 115 धावा केल्या, उत्तरादाखल कळवण संघाने 8 गडी बाद 117 धावा करत विजय संपादन केला. दुसर्‍या सामन्यात मालेगाव संघाने देवळा संघाचा 8 गडी राखून पराभव केला, संघाने 12 षटकात सर्वबाद 49 धावा केल्या, उत्तरादाखल मालेगाव संघाने 8 षटकात 2 गडी बाद 54 धावा करत विजय संपादन केला, मालेगावचे हेमंत सदांशिव याने 2 षटकात 4 धावात 4 गडी बाद केले.

भावली येथील माजी सरपंचाचा घातपात झाल्याचा संशय

0

इगतपुरी । इगतपुरी तालुक्यातील भावली खुर्द येथील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले माजी सरपंच एकनाथ उमा आगीवले वय ५२ यांचा मृतदेह नगर जिल्ह्यातील अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणवाडी जवळील जंगलात मिळून आला आहे. या मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेला असल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

माजी सरपंच एकनाथ आगीवले हे ७ तारखेला घरातून बाहेर पडले होते. कुटुंबीयांनी २ दिवस शोध घेऊनही ते मिळून न आल्याने ९ तारखेला इगतपुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, पाच दिवसांनंतर सोमवारी त्यांचा मृतदेह नगर जिल्ह्यातील अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणवाडी जंगलात मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळ त्यांचे पॅन कार्ड मिळून आले असून, त्यांचा चेहरा लिक्विडने जाळण्यात येऊन त्यांचा घातपात केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

देवळा येथे राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ

0

देवळा : कर्मवीर आ.डॉ. दौलतराव सोनुजी आहेर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ६४ वी सिनियर महाराष्ट्र राज्य बॉल – बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा देवळा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बॉल बॅडमिंटन राज्य सचिव सुरेश बोंगाडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त एन.डि.पखाले, मुंबई असो. अध्यक्ष पी. हनुमंतराव, जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्र नाईक, सचिव हरीश सतपती, सहाय्यक निबंधक संजय गीते, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता योगेश मराठे, सहाअभियंता कैलासनाथ शिवदे, नायब तहसिलदार अनिल चव्हाण, प्रा.प्रमोद ठाकरे, प्रा.बी. डि. खैरणार, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नाशिक ग्रामीण बॉल – बॅडमिंटन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संभाजी आहेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धत राज्यातून मुंबई, लातूर, अहमदनगर, वर्धा, पुणे, नाशिक ग्रामीण, गडचिरोली, औरंगाबाद, ठाणे, वाशिम, बुलढाणा, पिंपरी चिंचवड, भंडारा आदी २७ संघ सहभागी झाले आहे. पुणे विरूद्ध भंडारा हया संघांदरम्यानच्या सामन्याने स्पर्धचा शुभारंभ करण्यात आला.

स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन संलग्न नाशिक ग्रामीण बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख निकम यांनी केले. प्रसंगी महंमद गजाली, डॉ. दिपक कौशर,तुषार देवरे, पवन आहीरराव, नितिन देवरे, ईश्वर वाघ, सुनिल देवरे, उमेश आहेर, प्रदिप आहेर, दिलीप गुंजाळ, प्रा. नितिन गुंजाळ, असद शेख, आदी सह नागरिक उपस्थित होते.

केदारनाथच्या महाप्रलयाची कहानीचा ट्रेलर प्रदर्शित

0

मुंबई : २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले. नुकताच केदारनाथ महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या केदारनाथ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लीम तरूणाची प्रेमकथा यात चित्रित करण्यात आली आहे.

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूतची निसर्गाच्या क्रोधाच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. केदारनाथमधील मनोहारी दृश्ये, विनाशकारी महाप्रलय सगळे काही चित्तथरारक आहेत. या चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पण ट्रेलरमध्ये तिचा वावर अगदी कसलेल्या अभिनेत्रीसारखा आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या अभिनयाचीही अतिशय दमदार खेळी या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि अभिषेक कपूर यांचे दिग्दर्शन चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवण्यात यशस्वी झाले आहे. हा चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिलायन्स जगातील सर्वात मोठे ऑनलाइन-टू-ऑफलाईन प्लॅटफॉर्म तयार करणार – मुकेश अंबानी

0

भुवनेश्वर (यूएनआय): रिलायन्स जगातील सर्वात मोठी ऑनलाइन-टू-ऑफलाईन कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे. देशातील तीन कोटी व्यापारी व लहान दुकानदारांना या द्वारे काम मिळणार आहे.

आम्ही सर्वात मोठ्या उद्योगांना तसेच उद्योजकांना सक्षम करण्याचे काम याद्वारे करण्यात येणार आहे असे प्रतिपादन अंबानी यांनी आज येथे ओडिशा कॉन्क्लेव या कार्यक्रमात केले. रिलायन्स आणि जिओ एकत्र आल्यानंतर भारतातील प्रत्येक नागरिकांच्या जीवनात सुधारणा व्हायला सुरवात होईल. ओडिशाच्या लहान आणि मध्यम उद्योगांसाठी व्यवसायातही सुधारणा करतील, असेही ते म्हणाले.

भारतात जिओ आल्यापासून भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली. २ वर्षांपासून भारतीय ग्राहकांची वाढत्या संख्येमुळे जागतिक बाजारात भारत १५५ व्या स्थानावर पोहचला आहे. पुढील तीन वर्षात या यादीतील भारताचे स्थान उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले

ते पुढे म्हणाले कि, डिजिटल व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याला एक मोठे कारण आहे. ते म्हणजे जग डिजिटल क्रांतीचा केंद्रबिंदू आहे. जगातील प्रत्येक गोष्ट डिजिटल होत चालली आहे. संगीत, चित्रपट, वाणिज्य, बँकिंग, कार, घरे, आरोग्यसेवा, शिक्षण या सर्व गोष्टी आपणास डिजिटल रूपात प्राप्त होताना दिसून येत आहे. अर्थव्यवस्थेचे प्रत्येक कक्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान पूर्णपणे सामावलेले असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचे डिजिटलायझेशन झाले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व सध्या करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उघड्यावर शौचाला बसल्यास 500 रुपये दंड

0

श्रीगोंदा ( प्रतिनिधी )- श्रीगोंदा नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानात भाग घेतला होता. आता पालिका घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत येणारी नियमावली पालिकेने जाहीर केली. रस्ते मार्गावर घाण केल्यास 150 रूपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 100रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास 100 रुपये तर उघड्यावर शौचाला बसल्यास तब्बल 500 रुपयांच्या दंडाची तरतूद पालिकेने प्रसिध्द केलेल्या नोटीसात केली आहे.

शहरात स्वच्छता फलक लावण्यात आली आहेत. प्रत्येक प्रभागात कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी फिरवण्यात येत आहे. ओला कचरा आणि सुका कचरा याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांनी ओला आणि सुका कचरा व्यवस्थीत नेमून दिलेल्या व्यक्ती कडील वाहनात जमा करण्याचे बंधन करण्यात आले आहे .

Social Media

26,751FansLike
5,154FollowersFollow
1,339SubscribersSubscribe
error: Content is protected !!