अ‍ॅक्वामॅनचा ट्रेलर रिलीज

0
मुंबई – भारतीय प्रेक्षकांच्या भेटीसाठी अ‍ॅक्वामॅन हा चित्रपट सज्ज झाला असून 21 डिसेंबरला वॉर्नर ब्रदर्सच्या नाव लौकिकाला शोभणारा हा भव्य चित्रपट जगभर प्रदर्शित होत आहे. पण हा चित्रपट भारतात एक आठवडा अगोदरच म्हणजे 14 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडचे दोन बिग बजेट चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता यश याचा केजीएफ आणि शाहरुख खानचा झिरो या दोन चित्रपटांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यामुळे अ‍ॅक्वामॅनला बॉक्स ऑफिसवर होणारी लढाई टाळण्यात यश आले आहे. जेम्स वॅन यांनी अ‍ॅक्वामॅन चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अ‍ॅक्वामॅन या सुपरहिरोची भूमिका यात जेसन मॅमोआ साकारत आहे. अ‍ॅम्बर हेअर्ड, विल्यम डॅफोए, पॅट्रीक विल्सन, डॉल्फलुन्डग्रेन, याह्या अद्लुल- मॅटीन 2 आणि निकोल किडमॅन यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट भारतात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

दीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा

0
मुंबई – बॉलीवूड मधील हिट जोडी रणवीर आणि दीपिका 14-15 नोव्हेंबर रोजी इटलीतील विलाडेल बाल्बियानोलो येथे विवाहबद्ध होत आहेत. पिंकव्हिलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बी-टाऊनच्या या लोकप्रिय जोडीने त्यांच्या लग्नाचा विमा उतरवला आहे. 12 नोव्हेंबर ते 16 नोव्बेंबर या दिवसांसाठीची विमा त्यांनी उतरवला आहे. ओरिएंटल इन्श्युरन्स या कंपनीतर्फे हा विमा उतरवण्यात आल्याचं कळत आहे. ऑल रिस्क पॉलिसी अंतर्गत हा विमा घेण्यात आला असून, त्या माध्यमातून विवाहसोहळ्याला संरक्षण देण्यात आलं आहे. विमानप्रवास, भूकंप, चोरी, पूर, वादळ, आग यामुळे लग्नात कोणताही अडथळा आल्यास या विम्याचं संरक्षण मिळणार असल्याचं कळत आहे.

बालदिन विशेष : आयुष्याच्या चक्रात बालक ‘दीन’च…

0

बालदिन हा खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा जागतिक बालदिन अनेक देशांत साजरा होतो.

आज बाल दिन देशभरात शाळा, महाविद्यालयात, शहरात, गावात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पण शाळाच्या बाहेर, शहराच्या बाहेर, गावाच्या बाहेर झोपडीत अन दुसरीकडे सगळेच दिवस एकसारखी म्हणून फिरणारी लहान मुलं आपल्याला रस्त्यावर दिसून येतात.

आज राज्यात “Right to education मुळे प्रत्येक मुलं सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षण घेत आहे. पण आजही याच वयातील ‘त्या’ मुलांना आपल्या या हक्काबद्दल माहिती नाही. एकीकडं नवीन युनिफॉर्म -नवीन बेल्ट- नवीन कंपास घेऊन मुले शाळेला जात आहेत. उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरी करीत आहेत, परंतु दुसरीकड तोच शर्ट तीच पॅन्ट अन तेच पोटासाठी फिरणं अजूनही थांबलेल दिसून येत नाही. इंग्रजी , मराठी शाळा मधील अनेक मुलं आलिशान कारमधून उतरून शाळेत पळत जाताना दिसतात तर त्याच शाळेसमोर मधल्या सुट्टीत काही तरी विकत बसणारी लहान मुलं आपल्याला केविलवाणी वाटतात. खर तर आपले विचार बालककेंद्री होणं गरजेचे आहे

शहरात रस्त्यावर अनेक मुलं सिग्नल थांबल्यावर पैसे मागताना दिसतात. काहीजण त्यांना पैसेही देत असतात. परंतु पैशाने त्येवळची भूक भागणार आहे. त्यांचा जगण्याचा प्रश्न तसाच अनुत्तरित राहणार आहे. पण त्यावेळी मुलांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघितल्यावर लक्षात येत भुकेची किंमत काय आहे ते. या मुलाच्या वाट्याला शालेय शिक्षण कधीच येत नसते. यासाठी काही ठिकाणी सिग्नल शाळेचा प्रयोग देखील करण्यात आला आहे. परंतु या बालकांच्या जीवनात कुठलाही बालक दिन साजरा झाला नाही.

शालेय शिक्षणापासून दूर राहिलेली मुले शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेतरी काम करताना दिसतात. यातील बहुतांशी मुलांवर केवळ परिस्थितीमुळेच काम करण्याची वेळ येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिक्षणापासून वंचित, इतर सुख सुविधांचा अभाव यामुळे या गोष्टी निर्माण होतात. बालकामगार संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेने आवश्यक तो आराखडा करणे गरजेचे आहे. परिणामी बाल दिन कुणासाठी साजरा करायचा हा यक्ष प्रश्न पुढे उभा राहतो.

एकूणच समाजातील प्रत्येक मुलं हे देशाचे उद्याच भविष्य आहे. शहरातील , ग्रामीण भागातील, रस्त्यावरील, बालकामगार प्रत्येकाचे स्वप्न असतं. गरज आहे ती स्वप्नांना उभारी देण्याची , ती आपण कोणत्याही सम्यक मार्गाने पूर्ण करणे गरजेचे आहे.

  • गोकुळ पवार

देवळा येथे राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

0

भऊर (बाबा पवार): देवळा येथे संपन्न झालेल्या ६४ वी राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धेत पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघाला पराभूत करून विजेतेपद मिळवले तर ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.

कर्मवीर आ.डॉ. दौलतराव सोनुजी आहेर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ६४ वी सिनियर महाराष्ट्र राज्य बॉल – बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धा देवळा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. तीन दिवस चाललेल्या ह्या स्पर्धत रंगतदार व चुरशीचे सामने प्रेक्षकांना बघावयास मिळाले. २५ संघ सहभागी झालेल्या ह्या स्पर्धत चंद्रपूर, नाशिक ग्रामीण, वर्धा, पुणे, रायगड, ठाणे, लातूर, पिंपरी चिंचवड ह्या आठ संघांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीचे सामने ठाणे विरूद्ध चंद्रपूर व पिंपरी चिंचवड विरूद्ध लातूर ह्या संघात खेळला गेला. पिंपरी चिंचवड व ठाणे ह्या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघावर मात करत विजेतेपद संपादन केले.

यावेळी बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन ईश्वर वाघ यांनी केले.महाराष्ट्र राज्य बॉल बॅटमिंटन असो. सचिव सुरेश बोंगाडे, मुंबई असो. अध्यक्ष पी. हनुमंतराव, नासिक ग्रामीण असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संभाजी आहेर, अशोक आहेर, नगरसेवक प्रदिप आहेर, प्रा.सतिश बच्छाव, संजय देवरे, सुनिल भामरे आदी यावेळी उपस्थित होते. विजेत्या पिंपरी चिंचवड संघाला कर्मवीर आ.डॉ दौलतराव सोनुजी आहेर चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धचे आयोजन नाशिक ग्रामीण बॉल बॅटमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. संभाजी आहेर यांनी आभार मानले.

यावेळी नाशिक ग्रामीण असो.सचिव तुषार देवरे, पवन देवरे, नितिन देवरे, इश्वर वाघ, सुनिल देवरे, प्रदिप अहेर, दिलीप गुंजाळ, सौगत दत्ता, मनिष हिंगोले,प्रा. नितिन गुंजाळ, आदी सह नागरीक उपस्थित होते.

Video : जीएसटीनंतर ब्रँडेड दागिन्यांकडे वाढला कल

0

नाशिक दि.१४ प्रतिनिधी | जीएसटीमुळे बिल न देणारे किंवा किरकोळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना फटका बसला आहे. मात्र, मोठे कार्यक्षेत्र आणि व्यवहारात पारदर्शकता असलेल्या व्यावसायिकांना चालना मिळाल्याचे मत तनिष्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. व्यंकटरमण यांनी देशदूत डिजिटलशी बोलताना व्यक्त केले.

यावेळी त्यांनी तनिष्कच्या ग्राहकांशी थेट संवाद साधला. नाशिकमधील मध्यमवर्गीयांपासून उच्चभ्रूपर्यंत ग्राहकांची या सोहळ्यासाठी उपस्थिती होती. देशातील बड्या शहरांमध्ये नाशिकची गणना होऊ लागली आहे. त्यामुळे तनिष्कने काळानुसार बदल करत नाशिकमधील ग्राहकांसाठी सेवा सुरु केली असल्याचे व्यंकटरमण म्हणाले.

नाशिकमध्ये अजून ‘व्हरायटी’ आल्या पाहिजे. ग्राहकाने मागणी केलेले दागदागिने कमीत कमी वेळेत दाखल व्हायला हवेत अशी प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली. बऱ्याच ठिकाणी वस्तू विक्री केली की, दुकानदार दुरुस्तीला आलेल्या वस्तूंना प्रचंड विलंब करतात. नुसत्या वस्तू विकून चालणार नाही तर ग्राहक परत आपल्याकडे आल्यावर त्याचे समाधान झाले पाहिजे असेही एका गृहिणीने सांगितले.

१ ग्रॅम पासून दागिने उपलब्ध झाली तर मध्यमवर्गीय ग्राहक जोडला जाईल. उलट परिस्थितीनुसार कमी कमी सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तनिष्कने हे पाउल उचलले तर मोठा ग्राहकवर्ग मिळू शकतो असे एका ग्राहकाने सांगितले. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही विचार करणार असल्याचे ते म्हणाले.

पावसाची प्रमाण कमी असल्यामुळे यंदा दसरा आणि दिवाळीत मात्र दागदागिने खरेदीला कमी प्रतिसाद मिळाला असल्याचा अंदाज काही व्यावसायिकांनी काढला होता. उलट अंदाज बड्या व्यावसायिकांनी दिवाळी दागदागिने खरेदी, नव्या ट्रेंड्सचा बोलबाला असल्याचे सांगितले.

 

ग्रामसेवक, अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शहीद केशवच्या कुटुंबाला ७७ हजारांची मदत

0
सिन्नर । दि.१४ वार्ताहर 
पाकिस्तानी सैनिकांनी जम्मूतील नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या शिंदेवाडी ( श्रीरामपूर) येथील शहीद जवान नायक संदिप सोमगिरी गोसावी यांच्या कुटुंबियांना सिन्नर पंचायत समितीत कार्यरत अधिकारी सेवकांसह तालुका ग्रामसेवक संघटना व जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या वतीने एकत्रितरित्या ७७ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन लष्करात नोकरीला सुरुवात झाली.गोसावी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती केशवच्या नोकरीमुळे बदलत होती परंतु देश दिवाळीचा सण  साजरा करत असतांना केशव धारातीर्थी पडल्याचे वृत्त गावात पोहोचले. रविवारी  दि. ११ दुपारी शहीद झालेल्या केशवला  सोमवारी दि.१२ रात्री १० वाजेच्या सुमारास लष्करी इतमामात गोसावी समाजाच्या धार्मिक रिवाजानुसार दफनविधी करून समाधी देण्यात आली.
अशा परिस्थिती या कुटुंबाला धीर देण्यासाठी पंचायत समितीत कार्यरत अधिकारी व सेवकांनी आपले एक दिवसाचे मानधन मदत स्वरूपात देऊ केले. हि रक्कम ३१ हजार एवढी जमा झाली. त्यांना ग्रामसेवकांनी सक्रिय साथ देत तालुका ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून २५ हजार रुपये व जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या माध्यमातून २१ हजार रुपये उपलब्ध करून दिले. ही  एकत्रित ७७  हजार रुपये मदत आज दि.१४ शिंदेवाडी येथील शहीद केशव गोसावी यांचे वडील सोमगिरी यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. त्यात जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या वतीने शहीद जवानांच्या  कुटुंबियांस देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या धनादेशाचा समावेश होता. हा धनादेश  वीरपत्नी यशोदा यांचे नावाने  देण्यात आला.
शहीद गोसावी यांचे घरी जाऊन प्रथम त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गोसावी कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करून पंचायत समितीतील अधिकारी , सेवक, लोकप्रतिनिधी व तालुक्यातील जनता या दुःखात सोबत असल्याची ग्वाही उपसभापती जगन भाबड यांनी दिली. यावेळी  सभापती भगवान पथवे,  शिवसेना गटनेते संग्राम कातकाडे , विरोधीपक्ष नेते विजय गडाख, गटविकास आधिकारी डॉ. गायकवाड,  सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ,  बालविकास प्रकल्प अधिकारी गोरख शेवाळे,  ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे,  तालुकाध्यक्ष  संजय गिरी, कृषि अधिकारी कैलास भदाणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलींद भणगे,  लेखाधिकारी विजय आघाव, ग्रामसेवक संघटनेचे तालुका सचिव जालींदर वाडगे, पदाधिकारी प्रमोद शिरोळे, संदीप देवरे, विस्तार अधिकारी संजय मोरे,  शिंदेवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई हांडोरे,  उपसरपंच दत्तु खाडे यांचेसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
 देशासाठी शिंदेवाडी गावाने व गोसावी कुटुंबाने सुपुत्र गमावला आहे. शत्रूशी झुंजत देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या शहीद केशव यांचा सर्वानाच याचा आभिमान आहे. गोसावी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असून त्यांना सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्य भावनेतून ही मदत देण्यात आली आहे
– डॉ. लता गायकवाड, गटविकास अधिकारी 

नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या

0

इगतपुरी तालुक्यातील १२०० विद्यार्थ्याना मिळणार मोफत मासिक बस पास

0

घोटी प्रतिनिधी : राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी तालुक्यातील नियमित पासधारक विद्यार्थ्याना शैक्षणिक सत्र संपेपर्यंत मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे पालकांचाही पाल्यांच्या शिक्षणावर होणारा खर्चाचा भार काहीसा हलका होणार आहे. शासनाच्या या दिलासादायक निर्णयाचा इगतपुरी तालुक्यातील जवळपास १२०० विद्यार्थ्याना लाभ होणार आहे.

२०१८-१९ च्या उर्वरित शैक्षणिक सत्राकरीता शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मोफत पास सवलत मिळणार आहे. १५ नोव्हेबरपासून शून्य रकमेचे मोफत प्रवास योजनेचे पास विद्यार्थ्याना तालुक्यातील आगारांकडून देण्यात येणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील जवळपास १२०० विद्यार्थी हे नियमित पासधारक आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत राज्य परिवहन महामंडळाकड़ून विद्यार्थ्यांना शैक्षणिक पासात ६६.६७ टक्के सवलत देऊन उर्वरित ३३.३३ टक्के रक्कम विद्यार्थकड़ून वसूल केली जात आहे. मात्र यंदा राज्यात दुष्काळी परिस्थितिच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या उर्वरित शैक्षणिक सत्राकरीता विद्यार्थ्याना आता ही रक्कम न भरता मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
१५ नोव्हेबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीसाठी या सवलतीचा लाभ मिळणार आहे. दुष्काळ, नापिकीमुळे, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक पासासाठी महिन्याला लागनारी रक्कम देणे हे शेतकऱ्यांना जिकिरीचे झाले होते. त्यामुळे या निर्णयामुळे पाल्याच्या पासाला लागणारी रक्कम बचत होऊन शेतकरी व कष्टकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळणार आहे.

शासन निर्णयानुसार राज्य मार्गपरिवहन महामंडळाने सर्व आगारप्रमुखाना पत्र पाठवून विद्यार्थकड़ून सवलतीच्या अनुषंगाने वसूल करण्यात येणारी ३३ टक्के रक्कम वसूल करण्यात येऊ नये असे कळविले आहे. त्यानुसार नव्याने मोफत प्रवास सवलत योजनेच्या पासचे नमूने छापण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शासनाने घोषित केलेल्या इगतपुरीसह सर्व दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

दरमहा पास नुतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेची सवलत लागू राहील. नव्याने पासधारक होउ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्याना 00 रकमेचे मूल्यांकित असणारे पास दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील आगारातून देण्यात येणार आहे

शासनाने काही महिन्यापूर्वीच अहिल्याबाई होळकर पास योजना जाहिर केल्याने ग्रामीण भागातील बारावी पर्यंत विद्यार्थिनीना (मुलींना) १०० टक्के मोफत पास सुविधा, सवलत जाहिर झाली होती. त्यातही इगतपुरी तालुक्यातील जवळपास ११६२ विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेत आहे. आता शैक्षणिक,महाविद्यालयीन, व्यावसायिक, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या जवळपास १२०० सर्व विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ होणार आहे. शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत मोफत प्रवास पास सवलत शासन व राज्य परिवहन मंडळाने जाहिर केल्याने प्रवासी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे तालुक्यातील जवळपास २४oo विद्यार्थी मोफत शैक्षणिक पास योजनेचे लाभार्थी ठरणार आहे.

‘युईए’ येथील नागरिकांच्या सहकार्याने चापापाडा येथे ‘पाणीच पाणी’

0

बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील अति दुर्गम असलेल्या चापापाडा (सु) कायमस्वरुपी असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या सत्यसाई सेवा ट्रस्ट नवसारी(गुजरात) यांनी गावाबाहेर असलेल्या विहीरीमध्ये मोटर कनेक्शन करून दूर केली. गावातील तरूण मंडळीनी गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या ट्रस्टचे पदाधिकारी हसमुखभाई पांचाळ यांना सांगितली. गावात सर्वेक्षण करूण थेट गावात पाणीच आणले.

तीन हजार लिटर पाण्याची टाकी, पाईपलाईन, मोटरकनेक्शन इत्यादी तसेच गावातील सर्व महिलांना साडीची भेट, पुरूषांना टाॅवेल भेट, टिशर्ट वाटप, शालेय दप्तर व पेन, गावातील मुलींना कटलेरीचे साहित्य, खेळाचे साहित्याचे तसेच एक वेळचे मिष्टान्न भोजन देऊन ज्यांना दिवाळी गोड करता आली नाही त्यांच्यासाठी खरोखरच सामाजिक भावनांचे दृश्य पाहायला चापापाडा गावात मिळाले. हिरामण वाडेकर व बलराम माचरेकर, शांताराम थविल यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

यावेळी नवसारी येथे राहणारे सध्या युईए मध्ये स्थायिक झालेले रमेशभाई पटेल, रंजनबेन पटेल, राधाबेन पटेल, रिकेश पटेल, रिना पटेल यांनी देणगी देऊन गावातील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी समस्या दूर केली. सत्यसाई सेवेचे पदाधिकारी हसतमुखभाई पांचाळ, हंसाबेन पांचाळ, जितूभाई, हेमलभाई तसेच नाशिक सत्यसाई समिती प्रल्हाद कुलकर्णी, विजय भालेराव , रमेश,पवनकुमार यांनी उपस्थित राहून भजनांचा कार्यक्रम सादर केला.

गावातील सर्व पुरूष, महिला, तरूण मंडळीनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आनंद व्यक्त केले. पंडित गावित (शिक्षक), कृष्णा बोरसे, चंदर गावित, प्रकाश बोरसे ,भागवत बोरसे, चिंतामण बोरसे, मिरा वाघमारे, मनिषा गावित ग्रामस्थ उपस्थित होते.

सुवर्णकन्येला जिंकायचंय तोफखान्याचं मैदान

0
दारूबंदी अभियानासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून मार्गदर्शन घेताना अंजली वल्लाकटी.

अंजली वल्लाकटी यांना छत्रपतींचा सन्मान म्हणून बिनविरोध निवडून द्या.. समर्थकांची अपेक्षा

नगरच्या मातीत लहानची मोठी होऊन नगरचं नाव जागतिक पातळीवर रोशन करणारी पहिलवान अंजलीताई आता महापालिकेचं मैदान मारण्यासाठी सज्ज झालीय. नगरचं नाव जसं देशात पोहचविलं अगदी तसंच काम वार्डात करून वार्डाचा नावलौकिक करण्याचा मानस मनी बाळगत ही कन्या महापालिकेच्या आखाड्यात उतरते आहे. वार्ड नंबर 9 ची त्यासाठी तिने निवड केलीय. मतदारांना रत्नपारखी संबोधत अंजलीने आपली निवडणूक मतदारांच्या हाती सोपविली आहे. ‘राजकारणाच्या आखाड्यात उतरत असले तरी राजकारण हा आपला पिंड नाही. त्या माध्यमातून मला समाजसेवा करायची’ असं सांगतानाच अंजलीने प्रभागात मुलभूत, नागरी सुविधा पुरविण्यासाठी कटिबध्द असल्याचं वचन मतदारांना दिलंय.

नगर शहर स्वच्छ, हरित अन् पर्यावरणयुक्त बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार असल्याचे ती सांगते. सामान्य कुटुंबातील या मुलीने नगर शहराचं नाव जसं देशाच्या नकाशावर झळकवलं तसंच शहराचा सर्वागीण विकास करून नगरचं नाव पुन्हा देशात रोशन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून ती करणार आहे. त्यासाठीच ‘एक संधी’ तिला हवीय. अंजलीताईंचा प्रवासच मुळात गरिबीतून सुरू झाला. काबाडकष्ट करून यशाच्या शिखरावर पोहचलेल्या अंजलीताई महिला सबलीकरणासाठी अहोरात्र झटत आहेत. मुलींनी स्वसंरक्षणासाठी कणखर बनले पाहिजे या ध्येयाने झपाटलेल्या अंजलीने जिल्ह्यातील खेड्यापाड्यात अन् आदिवासी पाड्यातील लाखो मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिलेत. त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण केला. दारूबंदीसाठी महिलांमध्ये जनजागृती केली. बेटी बचाओ, बेटी पढाओ यासाठी प्रचार, प्रसार केला. गणेशोत्सवात स्वच्छता दूत मोहीम राबवून नगर सिटी क्लिन केली. नगर शहराच्या सर्वागिण विकासासाठी आता पहिलवान अंजली महापालिकेच्या आखाड्यात उतरत आहे.

..तर होईल छत्रपतींचा सन्मान
श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अंजलीला महापालिकेत बिनविरोध निवडून द्यावे अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून पुढं आलीय. नगरचं नाव देशाच्या नकाशावर कोरणारी अंजली बिनविरोध महापालिकेत पोहचली तर तो छत्रपतींचा सन्मान असेल अशी भावना त्यांच्या चाहत्यांतून व्यक्त होत आहे. एका राजकीय पक्षानेही तशी तयारी दाखविल्याचा दावा केला जातोय. नगरची शान असलेली अंजलीच्या विरोधात उमेदवार न देता तिची बिनविरोध निवड करणे हाच छत्रपतींचा सन्मान असेल अशी भावना हितचिंतक व्यक्त करतात.

जितूभाईंचं पाठबळ मोलाचं..
एका यशस्वी पुरूषामागे महिला असते असं म्हणतात, पण इथं मात्र एका यशस्वी महिलेमागं पुरूष असल्याचे स्पष्ट झाले. या पुरूषाचं नाव आहे जितेंद्र वल्लाकट्टी. उद्योजक असलेले जितेंद्र हे अंजलीचे पती. त्यांच्या पाठबळामुळंच अंजली इथंपर्यंत पोहचली. आता महापालिकेचं मैदान मारण्यास निघालेल्या अंजलीसाठी जितूशेठची धावपळ सुरू आहे.

Social Media

26,836FansLike
5,154FollowersFollow
1,345SubscribersSubscribe
error: Content is protected !!