बुधवार, 26 सप्टेंबर 2018

0

रांजणगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
चाळीसगाव । तालुक्यातील रांजणगाव येथे शौचाहून परतणार्‍या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शेतात नेवून अत्याचार केल्याची घटना दि.23 रोजी घडली आहे.

याप्ररकणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव येथील अल्पवयीन मुलगी शौचाहून येत असताना तिला भूषण नवगीरे याने अडवून तिचे तोंड दाबून तिला बाजुला असलेल्या बाणगाव रस्त्यावरील शेतात ओढत नेले व त्याठिकाणी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस ग्रामीण स्टेशनला भूषण नवगीरे यांच्या विरोधात भा.दं.वी.कलम 376, पोक्सो 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मुनगीर करीत आहे.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला फैजपूरपासून प्रारंभ – अ‍ॅड.पाटील

0
जळगाव । देशात व राज्यात भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला अनेक भुलथापा देऊन सत्ता मिळविली. मात्र गेल्या चार वर्षात देशात विदारक स्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल, डिझेलची दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून सरकारच्या या कारभारावर जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून प्रहार करण्यात येणार असून दुसर्‍या टप्प्यात या यात्रेला फैजपूर येथून सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशात महागाई आणि राफेल सारखे घोटाळे उघडकीस आले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला मात्र त्यांनी यावर मौन धारण केले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात कोल्हापूर येथून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली.

आत दुसर्‍या टप्प्यात ऐतिहासिक भुमि असलेल्या फैजपूर शहरातून दि. 4 ऑक्टोबरला शुभारंभ करण्यात येणार आहे. या यात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे यांसह काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार असल्याचे अ‍ॅड. संदीप पाटील यांनी सागितले. तर काँग्रेसला जेव्हा जेव्हा मरगळ आली. त्यावेळेस फैजपूरकडे मोर्चा वळवून काँग्रेस पक्षाला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे.

त्यामुळे फैजपूर येथून सुरु होणार्‍या जनसंघर्ष मोर्चातून प्रचंड उत्साह आणि ताकदीने उभारी मिळणार असल्याचे चित्र असल्याचे माजी आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले. तसेच यात्रेत 10 ते 15 हजार कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रदेश सचिव डी.जी. पाटील, शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील उपस्थित होते.

कन्हेरे येथील दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू

0
अमळनेर । तालुक्यातील कन्हेरे येथील दोन तरुणांचा फापोरे बु.॥ येथील नदी काठावरिल गाव विहिरीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज दि 25 रोजी दुपारी 2.30 ते 3.00 वाजे दरम्यान घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोद करण्याचे काम सुरु होते.

याबाबत असे की समाधान जगन्नाथ पाटील (वय 30, रा. कन्हेरे), सतीश विश्वास पाटील (वय 24, रा.गंगापुरी ह.मु.कन्हेरे) हे दोघे फापोरे बु.॥ येथील गावाजवळील गाव विहिरीत दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान पडून दोघांचा मृत्यू झाला.

त्यांना अथक परिश्रमानंतर दोघानाही संध्याकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान बाहेर काढण्यात आले व त्यांचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी आनले व रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती.

पाचोरा प्रांताधिकारी कचरे यांना धक्काबुक्की

0
पाचोरा । पाचोरा उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, पाचोरा भाग पाचोरा राजेंद्र दिलीप कचरे यांना वाळू चोरट्याने हुज्जत व धक्काबुक्की केल्याची घटना दि.25 रोजी सकाळी 8 वाजता घडली.सरकारी कामात अडथळा केला म्हणून वाळू चोरट्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून सहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही महिन्यांपूर्वी श्री.कचरे यांचे निवासस्थानी वाळू चोरटयांनी दगडफेक करून मुजोरी दाखविली होती.

प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना सकाळी 8 वाजता बांबरूड महादेवाचे ठिकाणी गिरणा नदीच्या पात्रातून अवैध पध्दतीने वाळू चोर होत असल्याची गोपनीय माहीती मिळाल्याने श्री.कचरे हे त्या ठिकाणी गेले असता त्यांना महादेव रस्त्यावर 6 बैलगाड्या दिसून आल्या.त्याची चौकशी करत असतांना प्रशांत नगराज पाटील रा.बांबरूड हा मोटारसायकलवर घटनास्थळी येवून श्री.कचरे यांच्याशी हुज्जत व धक्काबुक्की करून 6 बैलगाडी यांना पळून जाण्यास मदत केली.

शासकीय कामात अडथळा केला म्हणून प्रशांत पाटील याच्यासह घटनास्थळावरून पळून गेलेले सहाही बैलगाडी चालक यांच्या विरूध्द पाचोरा पोलीसात गु.र.न. 114/18 भादवी कलम 353,379,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारात आणखी सहा अज्ञातांचा समावेश आहे.पाचोरा तालुक्यातील गिरणा नदि पात्रात मोठ्या स्वरूपात अवैध वाळू वाहतूक होत असल्याने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी कठोर दंडात्मक कार्यवाह्या सुरू केल्याने वाळू चोरट्यांचे धाबे दणाणून ह्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याबाबत त्यांचे पित्त खवळले आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी श्री.कचरे यांचे निवासस्थानी वाळू चोरटयांनी दगडफेक करून मुजोरी दाखविली होती.एकीकडे प्रातांधिकारी पर्यावरण रक्षणासाठी कर्तव्य करीत असतांना त्यांच्याच महसूल विभागातील काही? अधिकारी व कर्मचार्‍यांचे वाळू चोरट्यांशी आर्थिक लागेबांधे असल्याच्या चर्चा आहे.

याच विभागातील काही खबरे वाळू चोरट्यांना प्रांताधिकार्‍यांच्या रोजच्या लोकेशनची माहीती पूरवितात? तसेच वाळू चोरट्यांसोबत हितसंबध जोपासून महसूल विभागाच्या कार्यवाह्यांना सुरूंग लावण्याच्या प्रयत्नात असतात.या सोबतच पोलीस विभागातील काही कर्मचारी देखील ह्या प्रकारात सामिल असल्याने शहराच्या भडगाव रोड व नदिपात्रालगत वाळू चोरट्यांचा रात्रभर गोंधळ सुरू असतो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कोंबीग ऑपरेशन राबविण्याची गरज आहे.

‘जलयुक्त’ची गेल्यावर्षीची कामे तात्काळ पूर्ण करा

0

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य शासनाचा पथदर्शी उपक्रम असणार्‍या जलयुक्त शिवार अभियानातील 2017-18 मधील उर्वरीत कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियान तसेच मागेल त्याला शेततळे योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे-कोकाटे आदींची बैठकीला उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी तालुकानिहाय जलयुक्त शिवार अभियानातील विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. काही ठिकाणी कामे पूर्ण होऊनही जिओ टॅगिंग झाले नसल्याने राज्य पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही. ज्या यंत्रणांनी संबंधित कामे केली असतील, त्या यंत्रणांचीच जिओ टॅगिंगची जबाबदारी आहे. त्यामुळे ही कामे गांभीर्याने घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. घ्या अन्यथा ती कामांसंदर्भातील अनियमितता मानण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 2017-18 मध्ये सात हजार 941 कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सात हजार 152 कामे पूर्ण झाली आहेत. या अभियानाची 704 कामे प्रगतिपथावर असून उर्वरित कामेही पूर्ण करण्याची सूचना श्री. द्विवेदी यांनी केली. सध्या या कामांवर 57 कोटी 22 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या अभियानातील कृषी विभागासह वन, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण, लघुसिंचन-जलसंधारण, लघुसिंचन (जिल्हा परिषद), गटविकास अधिकारी आदी यंत्रणांनी त्यांच्या कामांचा आढावा घेऊन ती कामे मार्गी लावाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग झालेच पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय, सन 2018-19 मध्ये निवडण्यात आलेल्या 249 गावांत सहा हजार 887 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त करून संबंधित यंत्रणांनी कामास सुरुवात करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रशासकीय या बैठकीस उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.

अर्बन घेणार गुजरातची बँक

0

चेअरमन दिलीप गांधी यांची माहिती : 15 टक्के लाभांश, शाखांचा विस्तार

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर अर्बन बँकेने मल्टिस्टेट शेड्यूल्डचा दर्जा मिळविला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये शाखा सुरू केल्या आहेत. आता तेथील एक बँकच अर्बन टेकओव्हर करणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात शाखाविस्तार केला जाईल. यंदा सभासदांना 15 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. तसेच त्यांना 50 हजारांचा आरोग्य विमा मिळणार आहे, अशी घोषणा सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला अर्बनचे चेअरमन तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन नवनीत सुरपुरिया यांच्यासह संचालक उपस्थित होते. चेअरमन गांधी बँकेच्या प्रगतीबद्दल माहिती सांगताना म्हणाले, की अर्बनने सर्वच क्षेत्रांत प्रगती केली आहे. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे एटीएम बसविण्यात आले आहे. श्रीरामपूर, संगमनेर, पुण्यातील सदाशिवपेठ आणि चंदननगर परिसरातही एटीएम लावले जाणार आहेत. केडगाव, सोनगाव, राहाता येथे शाखा स्व मालकीच्या जागेत सुरू केल्या जातील. सर्व शाखा या स्वतःच्या जागेत असाव्यात असा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे.

बँकेचे एक लाख 11 हजार 279 सभासद आहेत. त्यांना बँकेतर्फे 50 हजार रुपयांच्या विम्याचे कवच दिले जाणार आहे. यासाठी 18 ते 80 वर्षे वयाची अट घालण्यात आली आहे. अर्बन अशी सेवा देणारी पहिलीच बँक आहे. रिझर्व्ह बँकेकडे 15 टक्के लाभांश देण्याची परवानगी मागितली आहे. आगामी वर्षात 1750 कोटी रुपयांच्या ठेवी तर 850 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे, असेही ते म्हणाले.

ए. आर. ची भूमिका संशयास्पद
अर्बन गुजरातमधील बँक विकत घेणार आहे. नगर जिल्ह्यातीलही 4 ते 5 संस्थांचे प्रस्ताव अर्बनकडे आले होते. मात्र, तत्कालीन ए. आर.ची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळे अर्बनला त्या शाखा टेकओव्हर करता आल्या नाहीत, असा खुलासाही खा. गांधी यांनी केला.

दुकानात, घरपोहोच सेवा
अर्बन ग्राहकांसाठी नेहमीच पुढे असते. सभासदांच्या थेट दुकानात आणि घरपोहोच सेवा देणार आहे. डाटा सेंटर सुरू केल्याने बँकेचे उत्पन्न वाढणार आहे. सर्व प्रकारचे वीज बिल भरणा केंद्र, तसेच मोबाईल बँक सेवा सुरू करणार आहे. बँकेची प्रगती सुरू असली तरी या वर्षी बँक अ वर्गातून ब वर्गात गेली आहे. एन.पी.ए. 21 टक्क्यांवर गेला आहे. यावर मात केली जाईल, असे गांधी यांनी सांगितले.

Social Media

26,185FansLike
5,154FollowersFollow
1,156SubscribersSubscribe
error: Content is protected !!