१८ रोजी असणाऱ्या मेगाब्लॉक मुळे ‘या’ पाच गाड्या रद्द

0

मनमाड (प्रतिनिधी) : कल्याण येथे हाजी मलंग पुलाचे (पत्री पुल) काम करण्यासाठी मध्य रेल्वे तर्फे रविवार १८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉक मुळे पाच गाड्या रद्द करण्यात येणार असून त्यात पंचवटी एक्सप्रेस,राज्यरणी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस व पॅसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. मेगाब्लॉकमुळे काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहे तर उत्तर भारतातून मुंबई कडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावतील अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच दसरा ते दिवाळी पर्यंत सणासुदीच्या काळात तब्बल १५ दिवस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आता पुन्हा या गाड्या रद्द करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

कल्याणच्या हाजी मलंग पुलाचे (पत्रीपूल) काम करण्यासाठी रविवारी सकाळी ९:३० ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत सहा तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मनमाड-मुंबई राज्यरणी एक्सप्रेस, मनमाड- मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मनमाड-लोकमान्य टर्मिनल गोदावरी एक्सप्रेस, जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस व मुंबई भुसावळ पॅसेंजर या पाच गाड्या रद्द करण्यात येणार आहे. मेगाब्लॉक मुळे काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार असून उत्तर भारतातून मुंबई कडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावतील असेही रेल्वे सूत्रांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी दसरा ते दिवाळी दरम्यान एन सणासुदीच्या काळात इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ काम करण्यासाठी तब्बल १५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळी देखील काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अपडाऊन करणारे चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले होते. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी पॅसेंजर ही एकमेव गाडी असताना ती वारंवार रद्द करण्यात येत असल्याने आमचे अतोनात हाल होतात, याचा रेल्वे प्रशासन विचार करणार आहे की नाही अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागातील प्रवाशांनी व्यक्त केल्या.

येत्या रविवार पासून चांदवडला ‘सीपीएल-२’ चा थरार

0

चांदवड (हर्षल गांगुर्डे) : मागील वर्षी झालेल्या मोहल्ला शांतता कमिटी कौमी एकता मित्र मंडळ तथा तालुका क्रिकेट असो.यांच्या माध्यमातून चांदवड प्रीमिअर लीग च्या यशस्वी आयोजनानंतर ह्या वर्षीही चांदवडकरांना या लीगचा थरार बघण्यास व अनुभवण्यास मिळणार आहे.

येत्या रविवार पासून या क्रिकेट थराराला सुरवात होणार आहे. तालुका क्रीडा संकुलात या स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. संपूर्ण चांदवड तालुक्यातून या लीग साठी निवडचाचणी घेण्यात येऊन त्यातून सुमारे 180 सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडून ते सोडतीद्वारे 12 संघमालकांना विभागून देण्यात आले. ह्या स्पर्धेसाठी विविध संघातील खेळाडूंना क्रीडा गणवेशासह सर्व किट पुरविण्यात आले आहे.

ह्या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील गुणी खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यांना याद्वारे मोठे क्रीडा व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्पर्धेसाठी पहिले बक्षीस सुमारे 71 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 51 हजार रुपये, तृतीय बक्षीस 31 हजार रुपये व चतुर्थ बक्षीस 21 हजार रुपये ठेवण्यात आले आहे . स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, बेस्ट कॅच, उत्कृष्ट खेळाडू असे अनेक पुरस्कार ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी चांदवडकरांची उत्कंठा शिगेला पोहचली असून संपूर्ण चांदवड शहरात क्रिकेटमय वातावरण तयार झाले आहे. ह्या प्रीमिअर लीग साठी चांदवड तालुक्याचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या संकल्पनेतून ह्या स्पर्धेला सुरवात झाली. त्याच बरोबर तालुका क्रिकेट असो चे अध्यक्ष डॉ उमेश काळे, चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय संजयजी पाटील व त्यांचे सहकारी यांच्यासमवेत एकता क्रिकेटचे संतोष बडोदे, प्रा. सचिन निकम , स्वप्नील जाधव, मोरेदादा,सादिक शेख, मझर खान, विशाल ललवाणी, अभिजित पवार ,रजत शर्मा, कन्हैय्या बडोदे सचिन राऊत, उमेश जाधव, सुहास कापडणी यांच्यासह सर्व खेळाडू व आयोजन समिती यांचेही सहकार्य लाभले असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चांदवडकर व आयोजन समिती परिश्रम घेत आहे.

शेतकऱ्यांनी तृणधान्य उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा- जिल्हाधिकारी

0

नाशिक, दि.16 :  बदलत्या जीवनशैलीनुसार तृणधान्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून ते आरोग्यासाठी सकस आणि पौष्टीक आहे. आरोग्याच्या पौष्टीकतेसाठी त्याचे महत्व लक्षात घेता शेतकऱ्यांनी तृणधान्य पीक उत्पादन वाढविण्यासाठी त्याकडे दृर्लक्ष न करता उत्पादन कसे वाढविता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.

कृषि विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे कृषि विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पौष्टिक तृणधान्य दिनाच्या चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा कृषि अधिक्षक संजीव पडवळ, उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

श्री. राधाकृष्णन म्हणाले, नाशिकच्या वातावरणात उत्तम प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेता येते. तृणधान्याच्या शेतीस प्रोत्साहन उत्पादनाकडे लक्ष दिल्यास त्यात वाढ शक्य आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने तृणधान्य पिकांबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. द्राक्ष, कांदा, डाळींब उत्पादनाबरोबर नागली, ज्वारी सारख्या तृणधान्य पिकांचे उत्पादन घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच पौष्टीक तृणधान्य दिवस ही एक दिवसाची चळवळ न राहता याबाबत कायमस्वरुपी जागृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

श्री. देवरे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची माहिती दिली. ते म्हणाले, तृणधान्य हे कमी पाण्यात आणि वातावरणाचा ताण सहन करुन हि पिके चांगल्या प्रकारे येत असतात. ज्वारी, बाजरी आणि रागी या पिकांमध्ये नाशिक जिल्हा उत्पादनात अग्रेसर आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तृणधान्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यादृष्टीने माहिती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी कृषी विभागाच्या वतीने जनजागृती साठी मोटार सायकल रॅली काढण्यात आली यावेळी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भुजबळांनी इशारा दिल्यानंतर पालखेड डाव्या कालव्यातून सोमवारी पाणी सोडणार

0
file photo

विखरणी : आवर्तन न सोडल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांसोबत धरणावर जाऊन धरणाचे दरवाजे खुले करण्यात येतील इशारा दिला होता. त्यांनी इशारा देताच यंत्रणा हलली असून सोमवार १९ पासून पालखेड कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पालखेड पाटबंधारे विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

पत्रकात म्हंटले आहे की पालखेड धरण समूहातील सिंचन व बिगरसिंचन आवर्तन सोमवार पासून सोडण्यात येत आहे याची लाभक्षेत्रातील शेतकरी बिगर सिंचन संस्था यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आवर्तना दरम्यान अनाधिकृत पाणी उपसा करणे, डोंगळ्याद्वारे पाणी उपसा करणे, तसेच कर्मचारी अधिकारी यांच्या कामकाजात अडथळे निर्माण करणे सरकारी कामात अडथळा आणणे,सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आदी कृत्य केल्यास पाटबंधारे अधिनियमानव्ये गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही विभागाच्या पत्रकात देण्यात आला आहे.

पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर दिंडोरी, निफाड व येवला या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम केलेला आहे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब यासह इतर रब्बीची पिके घेतलेली आहे. येवला व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. कांदा हे नगदी पिक असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची अपरिमित होते यासाठी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे ठरवले होते.

दरम्यान येवला, निफाड तालुक्यासह मनमाड येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. दि. १५ नोव्हेंबरपासून आवर्तन द्यावे अशी भुजबळांची मागणी होती. मात्र कालवा सल्लागार समितीची बैठकच न घेतल्यामुळे आवर्तनाबाबत संभ्रम निर्माण होवून शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झालेले होते.

त्यामुळे पालखेड डाव्या कालव्यातून तात्काळ पाणी सोडण्यात यावे यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे जिल्हाधिकारी यांची भेट घेणार होते. येत्या दोन दिवसात पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांसोबत धरणावर जाऊन धरणाचे दरवाजे खुले करण्यात येतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला होता त्यामुळे यंत्रणेने तात्काळ निर्णय घेतला.

नगर टाइम्स ई-पेपर : शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

0

# Breaking # विकिपिडीयावरही राष्ट्रीय महामार्ग 6 चे नामकरण झाले ‘नरभक्षक’ महामार्ग

0

 जळगाव । दि. 16 । जळगाव शहरातूल गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग 146 अर्थात 6 चे विकिपीडीया या संंकेतस्थळावर ‘नरभक्षक’ असे नामकरण करण्यात आले आहे.

शहरातून समातंर रस्ते होण्यासाठी जळगाव समांतर रस्ते कृती समितीतर्फे काल दि. 15 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरवात करण्यात आली आहे.

आंदेालनाच्या दुसर्‍या दिवशी कृती समितीतर्फे या महामार्गाचे नामकरण राष्ट्रीय नरभक्षक महामार्ग क्रमांक 6 असे करण्यात आले. अर्धा तास हा नामकरण सोहळा चालला.

दरम्यान याची दखल विकिपिडीया या संकेत स्थळावरही करण्यात येवून राष्ट्रीय महामार्ग 6 इंडिया नरभक्षक हायवे असे करण्यात आले आहे.

कृती समितीच्या आंदोलनाचेच एक यश म्हणावे लागेल.

मका आधारभूत किंमतीला व्यापाऱ्यानी लावला चुना

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांनी मका लागवड केली आणि ही मका आता बाजरात विक्रीसाठी येत आहे. मात्र मकाची क्विंटल ची शासनाचा आधारभूत किंमत  १७००  रुपये प्रति क्विंटल असताना श्रीगोंद्यात मात्र ही मका बाराशे  ते तेराशे रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे.

मागील वर्षी भाव घसरल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आधारभूत किंमत देऊन मका खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र यंदा असे केंद्र सुरु नाहीत. सरकारने मक्याची आधारभूत किंमत 1700 रुपये जाहीर केली मात्र या किमतीत मका व्यापारी खरेदी करत नाहीत. आणि शासन मका खरेदी केंद्र सुरु करीत नाही.

 

यावल तालुक्यातील डांभूर्णी गावाजवळ रुग्णवाहिका व दुचाकीची धडक : दोन जागीच ठार

0
उंटावद। ता. यावल : तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ जळगाव मार्गावर दुचाकी व रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. शुक्रवारी दुपारी 3 वाजता हा अपघात झाला. समाधान भावलाल कोळी व अंकुश शाम कोळी (दोघे रा. चांदसर, बुद्रुक ता. धरणगाव) असे मृत तरुणांची नावे आहेत. रूग्णवाहिका गरोदर महिलेला घेऊन जळगावकडे जात होती. 

, तालुक्यातील विदगाव- जळगाव रस्त्यावर डांभुर्णी–कोळन्हावी गावाच्या दरम्यान पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपाच्या पुढील वळणावर शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच. ३९ बी. २२९३) जळगावहून डांभुर्णीकडे तर रूग्णवाहिका (एम. एच. १९ एम.९२९५) जळगावकडे जात होती.

वळणावर दुचाकी व रूग्णवाहीका समोरासमोर धडकल्या. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर रूग्णवाहिकाचे चालक गाडी सोडून पसार झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच कोळन्हावीचे गोटू सोळुंके, पोलिस पाटील कैलास पाटील, साकळीचे जगदिश मराठे, डांभुर्णीचे उपसरपंच समाधान सोळुंके यांनी अपघात स्थळी मदत कार्य केले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी  दाखल झाले आहेत.

चोर्‍यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक भयभीत

0

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

शहरटाकळी प्रतिनिधी – शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने, भविनिमगाव व परिसरात मागील वर्षभरापासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात असून यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. या सर्व गोष्टींकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज असून येथील नागरिकांना दिलासा मिळेल असे कार्य पोलीस प्रशासनाकडून जनतेला अपेक्षित आहे.

घटना घडल्यावर नेहमीप्रमाणे पोलीस येऊन पंचनामा करतात मात्र पुढे तपासाचे काय होते याचे उत्तर मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनावरील सर्वसामान्यांचा विश्वास कमी झाला आहे. अनेकजणांनी चोरी झाली तरीही फिर्याद देण्याचे टाळले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारांना आळा बसून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.

सराईत गुंड शामू नागू पवार दीड वर्षांसाठी नाशिक जिल्ह्यातून तडीपार

0

नाशिक | जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी कारवाई केली जात आहे. सुरगाणा तालुक्यातील
सराईत गुंड शामू नागू पवार (रा. दवाखाना पाडा, सुरगाणा) याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

पवार याच्याविरोधात दंगा, मारामारी, गंभीर दुखापत, खुन, दरोडा, घरफोडी, चोरी, मटका-जुगार असे गुन्हे दाखल आहेत. नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात खुन व अंबड पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी यासारखे गुन्हे दाखल आहेत.

गुंड शामू पवार याचा अलीकडेच नाशिकमधील काही गुन्ह्यांत संबंध आला होता. तो गुन्हेगारांना आश्रय देऊ लागला होता. शहरातील पोलीस ठाण्यात १२ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परंतु त्याची वाढती गुंडगिरी व दहशत यामुळे सामान्य नागरिकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी पवार याच्याविरोधात तडीपारीचा प्रस्ताव दिला होता.  त्यानुसार कळवण उपविभागाचे सहाय्यक  दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (ब) अन्वये नाशिक जिल्ह्यातून दीड वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

तडीपारीच्या कालावधीत तो जर कुणाला आढळून आला तर नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Social Media

26,856FansLike
5,154FollowersFollow
1,349SubscribersSubscribe
error: Content is protected !!