मका आधारभूत किंमतीला व्यापाऱ्यानी लावला चुना

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांनी मका लागवड केली आणि ही मका आता बाजरात विक्रीसाठी येत आहे. मात्र मकाची क्विंटल ची शासनाचा आधारभूत किंमत  १७००  रुपये प्रति क्विंटल असताना श्रीगोंद्यात मात्र ही मका बाराशे  ते तेराशे रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे.

मागील वर्षी भाव घसरल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आधारभूत किंमत देऊन मका खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र यंदा असे केंद्र सुरु नाहीत. सरकारने मक्याची आधारभूत किंमत 1700 रुपये जाहीर केली मात्र या किमतीत मका व्यापारी खरेदी करत नाहीत. आणि शासन मका खरेदी केंद्र सुरु करीत नाही.

 

यावल तालुक्यातील डांभूर्णी गावाजवळ रुग्णवाहिका व दुचाकीची धडक : दोन जागीच ठार

0
उंटावद। ता. यावल : तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ जळगाव मार्गावर दुचाकी व रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. शुक्रवारी दुपारी 3 वाजता हा अपघात झाला. समाधान भावलाल कोळी व अंकुश शाम कोळी (दोघे रा. चांदसर, बुद्रुक ता. धरणगाव) असे मृत तरुणांची नावे आहेत. रूग्णवाहिका गरोदर महिलेला घेऊन जळगावकडे जात होती. 

, तालुक्यातील विदगाव- जळगाव रस्त्यावर डांभुर्णी–कोळन्हावी गावाच्या दरम्यान पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपाच्या पुढील वळणावर शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच. ३९ बी. २२९३) जळगावहून डांभुर्णीकडे तर रूग्णवाहिका (एम. एच. १९ एम.९२९५) जळगावकडे जात होती.

वळणावर दुचाकी व रूग्णवाहीका समोरासमोर धडकल्या. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर रूग्णवाहिकाचे चालक गाडी सोडून पसार झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच कोळन्हावीचे गोटू सोळुंके, पोलिस पाटील कैलास पाटील, साकळीचे जगदिश मराठे, डांभुर्णीचे उपसरपंच समाधान सोळुंके यांनी अपघात स्थळी मदत कार्य केले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी  दाखल झाले आहेत.

चोर्‍यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक भयभीत

0

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

शहरटाकळी प्रतिनिधी – शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने, भविनिमगाव व परिसरात मागील वर्षभरापासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात असून यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. या सर्व गोष्टींकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज असून येथील नागरिकांना दिलासा मिळेल असे कार्य पोलीस प्रशासनाकडून जनतेला अपेक्षित आहे.

घटना घडल्यावर नेहमीप्रमाणे पोलीस येऊन पंचनामा करतात मात्र पुढे तपासाचे काय होते याचे उत्तर मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनावरील सर्वसामान्यांचा विश्वास कमी झाला आहे. अनेकजणांनी चोरी झाली तरीही फिर्याद देण्याचे टाळले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारांना आळा बसून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.

सराईत गुंड शामू नागू पवार दीड वर्षांसाठी नाशिक जिल्ह्यातून तडीपार

0

नाशिक | जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी कारवाई केली जात आहे. सुरगाणा तालुक्यातील
सराईत गुंड शामू नागू पवार (रा. दवाखाना पाडा, सुरगाणा) याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

पवार याच्याविरोधात दंगा, मारामारी, गंभीर दुखापत, खुन, दरोडा, घरफोडी, चोरी, मटका-जुगार असे गुन्हे दाखल आहेत. नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात खुन व अंबड पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी यासारखे गुन्हे दाखल आहेत.

गुंड शामू पवार याचा अलीकडेच नाशिकमधील काही गुन्ह्यांत संबंध आला होता. तो गुन्हेगारांना आश्रय देऊ लागला होता. शहरातील पोलीस ठाण्यात १२ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परंतु त्याची वाढती गुंडगिरी व दहशत यामुळे सामान्य नागरिकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी पवार याच्याविरोधात तडीपारीचा प्रस्ताव दिला होता.  त्यानुसार कळवण उपविभागाचे सहाय्यक  दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (ब) अन्वये नाशिक जिल्ह्यातून दीड वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

तडीपारीच्या कालावधीत तो जर कुणाला आढळून आला तर नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

इफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड

0

सांगली : ४९ वा आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव गोवा येथे रंगणार आहे. जगभरातील १६ नामांकित महोत्सवापैकी हा अतिशय महत्वाचा मानला जातो. या महोत्सवात शेखर रणखांबे यांच्या पॅम्प्लेट या लघुपटाची निवड झाली आहे. हा लघुपट २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

याआधी शेखर यांनी धोंडा, मूक व पंजाबी ड्रेस या सारख्या लघुपटाचे लेखन तसेच दिग्दर्शन केले आहे. यावर्षी महोत्सवात महाराष्ट्रातून २ पूर्ण चित्रपट व आठ लघुचित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

बंधाऱ्यातील पाणी सोडल्यास सामुहिक जलसमाधी घेऊ

0

हजारो शेतकऱ्याचे बंधाऱ्यावर भजन व किर्तन
नाऊर/मातुलठाण ( वार्ताहर ): श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्यातुन कोणी पाणी सोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सहपरिवार सामुहिक जलसमाधी घेऊ असा इशारा येथे जमलेल्या हजारो शेतकऱ्यांनी बंधाऱ्यावर आयोजित भजन – किर्तन जागर प्रसंगी दिला.

या वेळी मातुलठाण, जाफराबाद, नायगाव, बाबतरा, लाख गंगा, पुरणगाव,नवे नायगाव, जुने नायगांव, बाभुळगाव गंगा, आदी सह गावातील हजारो सख्येने शेतकरी सकाळ पासुन बंधात्यावर उपस्थित होते . या वेळी ह.भ.प. शिंदे महाराज यांनी भजन व किर्तन करून पाण्यासंबधी निषेध नोंदवण्यात आला या वेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, सचिन गुजर , नगरसेवक संतोष काबळे, बाबासाहेब दिघे , जि.प. सदस्य शरदराव नवले, शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले, आदी नेत्यानी भेट घेऊन आंदोलनाचा पाठिंबा दिला.

Video : तोपखान्याच्या ध्येयानुसार देशसेवा करावी

0

नाशिकरोड (संजय लोळगे) | भारतीय तोपखान्याच्या जवानांनी आजपर्यंत झालेल्या सर्व लढायांमध्ये आपल्या प्राणाची चिंता न करता तोपखाना विभागाचे सर्वत्र, इज्जत व इकबाल हे ध्येयवाक्य असलेले कायम ठेवले आहे. आपण देखील देशसेवेत सहभागी होतांना जगात भारतीय सैन्याची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण देखील आपल्याला प्रशिक्षणादरम्यान, मिळालेली शिस्त कायम ठेवत भविष्यात आणखी उंच शिखर गाठाल, असा आत्मविश्वास शपथविधी सोहळ्यादरम्यान स्कुल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट ब्रिगेडियर जेएस बिंद्रा यांनी केले.

वेगवेगळ्या राज्यातून निवड झालेल्या या प्रक्षिक्षणार्थींना ४४ आठवड्यांच्या भारतातील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या नाशिकरोड येथील तोफखाना विभागातील २१२ प्रशिक्षणार्थींना यादरम्यान फिजिकल, ड्रिल, वेपन ट्रेनिंगसह असाल्ट व ट्रेडमधील अत्याधुनिक असे प्रशिक्षण देण्यात आले.

212 gunners passing out pared 2018

Deshdoot Times यांनी वर पोस्ट केले गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

प्रशिक्षणानंतर आता हे नवसैनिक सैन्य दलाच्या वेगवेगळ्या युनिटमध्ये दाखल होणार असल्याने त्यांना यावेळी देशसेवेची शपथ देण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान साहिल कुमार (बेस्ट इन ड्रिल), गौरव कुमार (बेस्ट इन फिजिकल ट्रेनिंग),अनिकेत यादव (बेस्ट इन वेपन ट्रेनिंग), आनंदराव वांगेकर (बेस्ट इन गनर्स),राहुल (बेस्ट इन टीए), दासीया श्रीनू (बेस्ट इन ऑपरेशन), सोनू (बेस्ट इन ड्राइवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट),याकूब ओरान ( बेस्ट इन स्टीवर्ड),तर अनिकेत यादव यांस ओव्हर ऑल बेस्ट परफॉर्मर म्हणून सन्मान करण्यात आला.

यावेळी त्यांच्या पालकांना देखील निमंत्रित करण्यात आले होते.शपथविधी सोहळ्यानंतर आपला मुलगा देशसेवेसाठी पाठविल्याबद्दल त्यांच्या माता पित्यांच्या देखील पदक देऊन सन्मान करण्यात आला.

जात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.

0

नवापूर :  नगरपालिकेमधील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार आली आहे.  दोघांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. काँग्रेस मागील वर्षी झालेल्या नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा ‘अ’ मधून ओबीसी महिला पदासाठी काँग्रेसच्या उमदेवार सारिका मनोहर पाटील या निवडून आल्या होत्या. तर दुसरे नगरसेवक प्रभाग क्रमांक सात ‘अ’ मध्ये ओबीसी पुरूष म्हणून दर्शन प्रताप पाटील हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

खोटे जातप्रमाणप‍त्र दाखवून लढवली निवडणूक

दोन्ही नगरसेवकांनी ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवली होती. परंतु नगरसेविका सारिका पाटील यांच्यावर भाजपच्या पराभूत उमेदवार नैन्सी राकेश मिस्त्री व नगरसेवक दर्शन प्रताप पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पराभूत उमेदवार अतुल तांबोळी यांनी खोटे जातप्रमाण पत्र दाखवून ओबीसी आरक्षणात निवडणूक लढवली असल्याने हरकत घेतली होती.

त्यानुसार दोन्ही पराभूत उमेदवार यांनी दाद मागण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नंदुरबार विभागात तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नंदुरबार विभागाने सारिका पाटील व दर्शन पाटील यांच्या माळी इतर मागासवर्ग जातीय दावा अवैध ठरविण्यात आला. दोन्ही माळी व इतर मागास प्रवर्गात येत नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. या निकालानंतर दोन्ही उमेदवार व काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भाजप व राष्ट्रवादीचा जल्लोष

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नंदुरबार विभागाचे आदेश प्राप्त झाल्याने भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर योग्य न्याय मिळाल्याने आतिशबाजी करून जल्लोष करण्यात आला.

शेवगाव गेवराई राजमार्ग बनला मृत्यूचा सापळा

0

चापडगाव वार्ताहर – शेवगाव गेवराई हा राज्यमार्ग मृत्यूचा सापळा बनू पाहतोय या राजमार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होत आहेत. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खड्डे बुजवण्याचे काम केले जात नाही. दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून आपले वाहन चालवताना अनेकदा मोठी कसरत करावी लागते आहे. या राजमार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत तसेच अरुण पूलही आहेत.

या धोकादायक वळणावर कोणतेही सूचना फलक सार्वजनिक बांधकाम खात्याने लावलेले नाही. अनेक ठिकाणी या सूचना फलकाच्या अभावामुळे वाहन चालकांना रस्त्याचा नीटसा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात या मार्गावर होत आहेत. अनेक पुलावरील संरक्षक कठडे नाहीत तसेच संरक्षक कुंडही मोडून पडलेले आहेत या रस्त्याची फुलांची अनेक दिवसापासून दुर्दशा आहे. या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

“काव्यप्रेमी” पहिल्या दिवाळी अंकाचे मोठ्या थाटात प्रकाशन

0

नवापूर | यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील एस.पी.एम.गिलाणी महाविद्यालयाच्या सभागृहा मध्ये शासनमान्य नोंदणीकृत “काव्यप्रेमी शिक्षक मंच” तर्फे  पाचवा राज्यस्तरीय काव्य महोत्सव उत्साहात पार पडला.

काव्य महोत्सवाचे उद्घाटन सदृद्दीनभाई गिलाणी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करुन व फीत कापुन रीतसर पार पडले तर सम्मेलनाध्यक्ष म्हणून छत्तीसगढ़ येथील अखिल भारतीय किसान महासंघाचे अध्यक्ष तथा भारत सरकार राष्ट्रीय आयुर्वेद विश्व परिषदचे अध्यक्ष राजारामजी त्रिपाठी विराजमान होते.

प्रमुख अतिथि म्हणून अड. अनिरुद्धजी लोणकर, शिप्रा त्रिपाठी, प्रा.डॉ एम.ए.शहजाद, असलमभाई गिलाणी, देवीदास टोंगे, संगीता मुनेश्वर, संजय ताजणे तसेच काव्यप्रेमी राज्य समितीचे अध्यक्ष आनंद घोडके, सचिव कालिदास चवडेकर कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे आदि उपस्थित होते.

सम्मेलनाध्यक्ष राजारामजी त्रिपाठी यांनी प्राचीन युगापासून तर आज पर्यंत कवितेच्या प्रवासाचे वर्णन आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हाटसपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या शिक्षक कवींच्या काव्यप्रेमी संस्थेच्या पहिल्या “काव्यप्रेमी” दिवाळी अंकाचे तसेच “अष्टाक्षरी” या प्रा. सत्येंद्र राऊत संपादीत प्रातिनिधीक कवितासंग्रहाचे,श्री. व्यंकटेश काटकर लिखित “विचारवेध” व कवी क.वि. नगराळे यांच्या “मिसय” व राजारामजी त्रिपाठी यांच्या “ककसाड” या पुस्तकांचे थाटामाटात प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी समाजातील विविध समस्यांना वाचा फोडणारे व सामाजिक बांधिलकी बाळगणार्या विविध वृत्तपत्रांचे वार्ताहर /पत्रकार प्रतिनिधी अनंत नखाते, कैलाश कोरवते, पांडुरंगजी निवल, मुकेश चिव्हाणे व आकाश बुर्रेवार व घाटंजी तालुका पत्रकार संघटनेचे सचिव दिनेश गाऊत्रे तसेच यवतमाळ आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक प्रमोद बाविस्कार व मंगला माळवे यांचा काव्यप्रेमी संस्थे तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.

सौ.जया नेरे-राज्य समिती सदस्या यांना सोपवलेले पालकत्व जिल्हा नंदुरबार व धुळे पैकी उपक्रमशिल काव्यप्रेमी शिक्षकमंच म्हणून नंदुरबार जिल्ह्याला मान मिळाला व त्या बद्दल नंदुरबार जिल्हाध्यक्ष-सौ.सरला साळूंखे यांचा मा.शिप्राजी त्रिवेदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या महोत्सवात काव्यप्रेमी राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष आनंद घोडके,उपाध्यक्ष पी.नंदकिशोर, सचिव कालिदास चवडेकर, सहसचिव दीपक सपकाळ, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, सदस्य -प्रमोद बाविस्कर, भाऊसाहेब सोनवणे, जया नेरे, प्रा.सत्येंद्र राऊत,रामदास देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत राज्यभरातून 200 हून अधिक जेष्ठ ,श्रेष्ठ व नवोदित कवी कवयित्रींनी विविध विषयांवर ज्यामध्ये आई,बाप,शेतकऱ्यांच्या व्यथा, सामाजिक अवस्था यासारख्या विविध विषयांवर रचना सादर केल्या. या प्रसंगी सर्व कवींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले.

संपूर्ण महोत्सवासाठी निवास, भोजन व उत्कृष्ट सभागृह व्यवस्था व संपूर्ण उत्कृष्ट नियोजना बद्दल महोत्सवाचे मुख्य संयोजक व राज्य समितीचे सहसचिव दीपक सपकाळ, काव्यप्रेमी यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय बिंदोड, सचिव गजानन कावडे, फिरोज पठाण व अमरावती जिल्हाध्यक्षा वर्षा भांदर्गे यांचाही सत्कार करण्यात आला.

या काव्य महोत्सवाच्या यशस्वीते करिता काव्यप्रेमी राज्य कार्यकारिणी तसेच अमरावती व यवतमाळ जिल्हा शाखा यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी सम्मेलनाचे मुख्य संयोजक दीपक सपकाळ यांच्या परिवारा तर्फे राज्यभरातून आलेल्या महिला कवयित्रींना दिवाळीची साडी भेट देण्यात आली.

मुख्य समारंभाचे सुत्र संचलन भाऊसाहेब सोनवणे यांनी तर संपूर्ण कवी सम्मेलनाचे सुत्र संचलन वर्षा भांदर्गे यांनी केेले तर आभार दीपक सपकाळ यांनी मानले.

Social Media

26,855FansLike
5,154FollowersFollow
1,349SubscribersSubscribe
error: Content is protected !!