‘त्या’ सेवकावर निलंबन कारवाईची श्यक्यता

0

नाशिक | प्रतिनिधी   जिल्हा परिषदेत कर्तव्यावर उशिरा आल्याचा जाब विचारणार्‍या अधिकार्‍याच्या श्रीमुखात भडकावणार्‍या ग्रामपंचायत विभागातील सेवकावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सामान्य प्रशासन विभागाने ग्रामपंचायत विभागाकडे घडलेल्या घटनेचा अहवाल मागविला असून आज (दि.२१) हा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर कारवाई केली होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत होणार्‍या आढावा बैठकीसाठी लागणारी माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत विभागात कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे कार्यालयात हजर झाले.

मात्र, त्यांच्या विभागातील कनिष्ठ सहायक गणेश सोनवणे उशिरा आल्याने थेटे यांनी त्यांना विचारणा केली. त्यावर संतप्त झालेल्या सोनवणे यांनी उलट उत्तर देत मला विचारायचे नाही, असा दमच दिला.

त्यामुळे थेटे यांनी त्यांच्या रोज उशिरा येण्याचे कारण विचारले, तसेच अहवाल सादर करीत नसल्याबद्दलही विचारणा केली.

यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. सोनवणे यांनी थेटे यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या श्रीमुखात भडकावली.

याप्रकरणी थेटे यांनी सोनवणे यांच्याविरोधात उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील व प्रदीप चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन सामान्य प्रशासन विभागाने ग्रामपंचायत विभागाला घडलेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार ग्रामपंचायतींकडून अहवाल तयार करण्यात आला असून आज  सादर केला जाणार आहे.

 

कालिदास कलामंदिराची भाडेवाढ रद्द करा अन्यथा आंदोलन

0

नाशिक | प्रतिनिधी शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराची भाडेवाढ करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या हालचाली सुरू आहेत. भाडेवाढीस शहरातील नाट्य कलावंतांनी विरोध केला आहे. याप्रकरणी कलावंतांच्या शिष्टमंडळाने महापालिकेकडे भाडेवाढ रद्द करावी, कलामंदिरातील त्रुटी व दुरुस्त्या लेखी स्वरुपात सुचविल्या आहेत. भाडेवाढ रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कलाकारांनी महापालिकेला दिला आहे.

कालिदास कलामंदिरात होणार्‍या कार्यक्रमांंसाठी मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ केल्याने सांस्कृतिक क्षेत्रास खीळ बसणार आहे. सांस्कृतिक चळवळ जोपासली जावी व भाडेवाढ रद्द व्हावी, यासाठी कलाकार, कलारसिकांची काल  (दि.२०) ‘कालिदास’मध्ये बैठक आयोजित केली होतीे. त्यावेळी उपस्थितांनी भाडेवाढीबाबत तीव्र स्वरुपात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामध्ये ज्येष्ठनाट्यकर्मी सदानंद जोशी, दिग्दर्शक सचिन शिंदे, दत्ता पाटील, विनोद राठोड, लक्ष्मण कोकणे, अभय ओझरकर आदीची उपस्थिती होती.

नाट्य कलावंतांच्या शिष्टमंडळाने नुकतीच आयुक्तांची भेट घेत, कालिदास कलामंदिराची भाडेवाढ रद्द करावी, यासंदर्भात त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

कलावंतांनी राज्यातील नाट्यगृहांचे भाडेदर याचही माहिती लेखी स्वरुपात दिली आहे. त्या तुलनेत कालिदास कलामंदिराची भाडेवाढ जास्त आहे. ती हौशी व प्रायोगिक नाट्य कलावंतांना परवडणारी नाही. संगीत, नृत्य क्षेत्रातील कलावंतांबद्दल हेच आहे. त्याप्रमाणे त्याचप्रमाणे मुंबई, पुण्यातून अथवा नाशिक बाहेरील कलकारांना येथे येऊन नाटक सादर करणार्‍या व्यावसायिक नाट्यकंपन्यांनाही भाडेवाढीची फटका बसणार आहे.

नाशिक सांस्कृतिक क्षेत्रात याचा विपरीत परिणाम होणार आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे. ‘कालिदास’ची भाडेवाढ रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे. कालिदास कलामंदिर नूतनीकरणानंतर दुरुस्तीसोबत सूचना कलावंतांनी सुचविल्या आहेत, त्याचाही मनपाने विचार करावा, असा सूर कलावंतांचा बैठकीत उमटला.

‘कालिदास’चे सौंदर्य कायम टिकावे, यासाठी काही कार्यक्रमांना कलामंदिर देण्याबाबतचे निकष कठोर करणे अपेक्षित आहे. शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ‘कालिदास’ दिल्याने खुर्च्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शाळांचे कार्यक्रम तसेच राजकीय पक्षांचे मेळावे, यांना कालिदास भाड्याने देतांना नियम, निकष ठरविणे महत्वाचे ठरणार आहे, असे कलावंतांनी सांगितले.

सांस्कृतिक नुकसान
कालिदास कलामंदिराची भाडेवाढ झाल्यास शहरात सांस्कृतिक कार्यक्रम अल्प प्रमाणात होतील. भाडेवाढीमुळे कलावंतांचा व प्रयोगाचा खर्चही निघणार नाही. हीच भाडेवाढ राहिल्यास राज्यातील कलावंत शहरात प्रयोगासाठी येणारच नाहीत. महानगरपालिकेने ‘कालिदास’ची भाडेवाढ रद्द करावी.
-सचिन शिंदे (दिग्दर्शक ), विनोद राठोड (प्रकाश योजनाकार)

त्रुटी व दुरुस्ती
‘कालिदास’मध्ये लावण्यात आलेले स्पॉट लाईट तांत्रिकदृष्ट्या योग्य नाहीत. नाटकांसाठी आवश्यक असलेले व सर्वत्र वापरले जाणारे कॅनरा कंपनीचे (१ हजार वॅट) किमान २५ स्पॉटलाईट लावावेत. विंगेत आलेले पॉवर पॅकचे युनीट मागे घेणे-जेणे करून त्याच्या आवाजाचा त्रास होणार नाही. नाट्यगृहातील एलईडीसाठी स्वंतत्र डिमर बोर्ड उपलब्ध करुन द्यावा. विंगा व मागचा पडदा काळ्या रंगाचा व त्याची फ्रेम लाकडी असावी, अशी दुरुस्ती कलावंतांनी सुचविली आहे.

कार्यक्रमाची वर्गवारी
नाटक प्रायोगिक ४ तास, नाटक व्यावसायिक ४ तास, बालनाट्य ४ तास, सेमिनार, बैठक, चर्चासत्र, परिसंवाद ४ तास, पुस्तक प्रकाशन ३ तास, गॅदरिंग किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ३ तास, हौशी नाट्य संस्थांसाठी ३ तास, तालमीसाठी ३ तास, रंगीत तालीम ३ तास, एस. सी. डी. प्रोजेक्टर, स्पॉट लाईट १ हजार वॅट बालनाट्य ५० रुपये, स्पॉट लाईट १ हजार वॅट एकांकिका ७५ रुपये, व्यावसायिक नाटकांसाठी १०० रुपये, बाहेरील आणलेले लाईट ५०० वॅट २५ रुपये व १ हजार वॅट ५० रुपये, नाटकांसाठी लेव्हल्स-एका लेव्हल्सचे भाडे १० रुपये अशी कलावंतांनी वर्गवारी सुचविली आहे.

राज्यातील नाट्यगृहांचे भाडे
दीनानाथ नाट्यमंदिर, मुंबई -६५ हजार
गडकरी रंगायतन, ठाणे -५१ हजार
बालगंधर्व रंगमंदिर,पुणे- ४ हजार ५००
यशवंत नाट्यमंदिर,पुणे -४ हजार ५००
अण्णाभाऊ साठे स्मारक,पुणे- ४ हजार ५००
भीमसेन जोशी नाट्यगृह,पुणे- ४ हजार ५००
म.फुले सांस्कृतिक भवन,पुणे -४ हजार ५००
विष्णुदास भावे नाट्यमंदिर,वाशी- ३ ते ८ हजार
भोसले नाट्यगृह,कोल्हापूर -७ हजार
हुतात्मा स्मृती मंदिर,सोलापूर -६ हजार

 

मोबाईल चोरट्यास शिताफीने अटक

0

नाशिकरोड | प्रतिनिधी  येथील दत्तमंदिर चौकात गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्याने मोबाईल दुकानाच्या मजल्यावरील खिडकीचे गज तोडून सुमारे चार लाखाचे मोबाईल चोरले होते. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी सापळा रचून एका चोरट्यास शिताफीने अटक केली असून त्याच्याकडून ४ लाख ९ हजार रुपये किमतीचे महागड्या कंपनीचे २८ मोबाईल जप्त केले.

चोरट्याला न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गेल्या आठवड्यात बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्यानंतर सकाळी दुकानाचा सेवक शटर उघडून आत गेला तेव्हा हा प्रकार लक्षात आला.

त्यानंतर दुकान मालक सौरभ जानराव यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेबाबत उपनगर पोलिसांनी आठ दिवसांत छडा लावला असून सीसीटीव्हीच्या आधारे वपोनि प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउनि गणेश जाधव, कॉन्स्टेबल प्रदीप ठाकूर यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांचे सहकारी सतीश जगदाळे, सुनील कोकाटे, काशिनाथ गोडसे, अनिल शिंदे, किरण देशमुख, विलास गिते, समीर चंद्रमोरे, भावले, महेंद्र जाधव, अमोल टिळेकर यांनी संशयित शुभम रवी नकवाल यास सापळा रचून अटक केली.

त्याचे विचारपूस केली असता त्याने दत्तमंदिर चौकातील दुकानातून ४ लाख ९ हजारांचे २८ मोबाईल चोरल्याचे कबुली दिली. यात नोकीया, सॅमसंग, लावा, ओपो आदी कंपन्यांच्या मोबाईचा समावेश आहे. हे सर्व मोबाईल पोलिसांनी जप्त केले. याबाबत पुढील तपास वपोनि रायते यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश जाधव हे करीत आहेत.

 

संतप्त पालकांनी प्रकल्प अधिकार्‍यास कोंडले

0
प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांच्याशी चर्चा करताना रमेश थोरात, विजय कानडे, चंदर वाघमारे आदी. (छाया-वाजीद शेख, सुरगाणा )
सुरगाणा |प्रतिनिधी  आदिवासी विकास प्रकल्प मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सप्टेंबर महिना निम्मा उलटला तरी अजून प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांना शासकीय वसतीगृहात सुमारे अर्धा तास कोंडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांची सुटका झाली. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आदिवासी विकास प्रकल्प मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सप्टेंबर महिना निम्मा उलटला तरी अजून मुलांना प्रवेश देण्यात आला नाही. तालुक्यातील ४८१ मुला-मुलींचे अर्ज प्रवेशाकरीता मागविण्यात आले होते.

कळवण प्रकल्पाकडुन अद्यापही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली नाही. अर्जाची छाननी करून तालुक्यातील चाळीस मुली व तीस मुले असे सत्तर मुलांची निवड पालकांची मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया राबविण्या करीता कळवण प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.एस. पैठणकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. एस. महाजन यांनी शासकीय वसतिगृहात सुरुवात केली.

यावेळी तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील पालक मुलांना घेऊन उपस्थित होते. निवड करीता पालकांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. चारशे एक्याऐंशी पैकी फक्त सत्तर मुलांनाच प्रवेश मिळणार असल्याने बाकीचे मुलांना प्रवेशापासुन वंचित रहावे लागणार असून त्यांनी अद्यापही कुठेही प्रवेश न घेतल्याने पालक संतप्त झाले.

पालकांनी वसतिगृहात मुलाखती सुरू असलेल्या खोलीस कुलूप लावून प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यानांच कार्यालयात कोंडून निवड प्रक्रिया बंद पाडली. आम्ही मुलांचे प्रवेश कुठे ही घेतलेले नाहीत त्यामुळे सर्वच मुलांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी करीत पालकांनी घोषणा बाजी सुरु केली.

प्रकल्प कार्यालयाने आमची फसवणूक केली आहे. असा आरोप करण्यात आला. अर्धा पाऊण तासाने पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने पोलिसांनी कुलूप उघडून चर्चा केली. सर्वानाच प्रवेश देण्यात यावा अशी लेखी हमी दिल्याशिवाय पालक माघार घेण्यास तयार नाहीत असे सांगत चार तास आरोप प्रत्यारोप सुरू होते.

यावेळी रमेश थोरात, विजय कानडे, चंदर वाघमारे,भास्कर जाधव, देविदास हाडळ, देवराम वाघमारे, गंगाराम धुळे, दानियल गांगुर्डे, रेणुका बागुल, लक्ष्मी म्हसे, तुषार चव्हाण,पार्वती चौधरी आदी पालक उपस्थित होते.प्रवेशा करीता मुलांना दिवसभर उपाशी पोटी रहावे लागले. त्यामुळे पालकांनी अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले.

ही तर फसवणूक
प्रकल्प कार्यालयाने पालकांची फसवणूक केली असून मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.कारण त्यांचे कुठेही प्रवेश घेतलेले नाहीत. जागा वाढवून सर्व मुलांना प्रवेश देण्यात यावा.
-देवीदास हाडळ – पालक 

 

निमात ‘टोटल मॅनेजमेंट फ्रेमवर्क’ द्वारे कार्यशाळा

0

सातपूर |प्रतिनिधी  निमाच्या वतीने व  ‘ टोटल मॅनेजमेंट फ्रेमवर्क द्वारे ‘ व्यावसायिक कार्यपध्दतीत सुधारणा  या विषयावर परिचयात्मक कार्यशाळेचे आयोजनकरण्यात आले आहे.

निमा हाऊस, सातपूर येथे आज (दि.२१) दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत आयोजित कार्यशाळेत मिलींंद कोतवाल हे मार्गदर्शन करणार आहेत.

श्री. कोतवाल हे ‘टोटल मॅनेजमेंट फ्रेमवर्क’ या पुस्तकाचे लेखक असून अभियंता, व्यवस्थापन शास्त्रातील तज्ञ, व्यावसायिक आहेत.

सदरची कार्यशाळा उद्योजक, व्यावसायिक, व्यवस्थापन शास्त्रातील अभ्यासक, विद्यार्थी यांसाठी अतिशय उपयुक्त असून गुणवत्ता, मूल्य व व्यवसायातील अन्य बाबी संदर्भात श्री. कोतवाल यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.

उद्योेजकांनी कार्यशाळेस मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण,शशिकांत जाधव व नितीन वागस्कर, कैलास आहेर, किरण पाटील व सुधाकर देशमुख यांनी केले आहे.

 

21 September 2018

0

शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

0

Social Media

26,081FansLike
5,154FollowersFollow
1,130SubscribersSubscribe
error: Content is protected !!