नॅशनल युथ फेस्टिवलमध्ये नाशिकच्या दुर्वाक्षी पाटीलची निवड

0

नाशिक : बंगळूर येथे 25 नोव्हेंबरला संपन्न होत असलेल्या तरंग आयोजित नॅशनल युथ फेस्टिवल मधे नाशिकच्या कीर्ती कला मंदीरची विद्यार्थीनी दुर्वाक्षी ज्ञानेश्वर पाटील हिची निवड झाली आहे. तिने वयाच्या ७ व्या वर्षापासून कथ्थकच्या शिक्षणाला सुरूवात केली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून कला मंदीरच्या संचालिका आदिती नाडगौडा पानसे यांच्याकडे कथ्थक शिकत आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून विशारद झाली आहे. दुर्वाक्षी सध्या कथ्थक मध्ये एम. ए. करत आहे.

अखिल भारतीय स्तरावर विविध कलांमधील फक्त ६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, त्यात कथ्थक नृत्यासाठी दुर्वाक्षीची निवड होणं हे नाशिककरांसाठी खरोखर कौतुकास्पद असून यामागे गुरूंचा पाठिंबा व माझी मेहनत असल्याचे दुर्वाक्षी सांगते.

‘या’ फीचरमुळे तुमचा हरवलेला मोबाईल शोधण्यास मदत होणार

0

मुंबई : आपल्या वेगवेगळ्या फुचर्समुळे गुगल नेहमीच. आपल्या ग्राहकांना योग्य सेवा मिळावी यासाठी नेमीचं तत्पर असायचे दिसून येते. आता गुगलने ग्राहकांसाठी नवे फिचर आणले आहे. ते म्हणजे आपला स्मार्टफोन ठरविल्यास शोधण्यास हे फिचर मदत करणार आहे.

गुगलने ‘माय फाईंड डिवाईस’च्या (Find My Device) सेवेमध्ये अजून एक फिचर आणले आहे. Indoor Map असे या नव्या फिचरचे नाव आहे. या नव्या फीचरमुळे आता हरवेला स्मार्टफोन शोधण्यास मदत होणार आहे. तर घराबाहेरील दृश्ये दाखविणारी ठिकाणे या फिचरच्या माध्यमातून दाखविली जाणार आहेत. या फिचरमुळे आपला मोबाईल कुठे हरविला आहे याची माहिती ग्राहकाला मिळणार आहे.

ग्राहकांना याद्वारे आपल्या हरविलेल्या फोनचे लोकेशन, अलर्ट मॅसेज आणि मोबाईल स्क्रिन लॉक असताना मोबाईल नंबर पाहता येईल अशी सुविधा यामध्ये उपलब्ध करुन दिली आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भूखंड मिळू नये हे दुर्दैव-राज ठाकरे

0

मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी भूखंड मिळू नये यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. कोणतीही शासकीय जागा ही स्मारकासाठी दिली जाऊ नये हा सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना महापौर बंगल्यात स्मारक बांधण्याचा घाट घातला जातोय आणि महापौर या पदाची चेष्टा केली जाते आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

एवढंच नाही तर महापौर बंगला जिमखान्याजवळ होऊ देणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. जिमखाना हा खेळण्यासाठी आहे महापौर बंगल्यासाठी नाही असेही ते म्हटले आहेत. आज त्यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर महापालिकेवर आणि शिवसेनेवर टीका केली आहे. फेरीवाले वैगरे सगळे ठीक आहे पण बाळा साहेबांच्या स्मारका साठी तुम्ही कोहिनूर मिलची जागा दिली तरी चालेले.

राज ठाकरे यांनी मुंबईतील अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज दुपारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची महापालिकेत जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार, शिवसेनेवर हल्लाबोल केला.

बाळासाहेबांच्या नावाचा वापर स्वार्थासाठी केला जात आहे. पण त्यांच्या स्मारकासाठी सरकारला भूखंड मिळत नाही हे दुर्दैव आहे. महापौरांचा बंगला स्वार्थासाठी काढून घेतला जात आहे. मुंबईचा महापौर इकडेतिकडे फिरताना दिसतोय. ही महापौर आणि या पदाची थट्टा आहे, असंही ते म्हणाले.

 

ञ्यंबकेश्वर शहरात गोवर,रूबेला लसीकरण मोहिम जनजागृती फेरी

0

त्र्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी : ञ्यंबकेश्वर शहरात गोवर, रूबेला लसीकरण मोहिम जनजागृती फेरी काढण्यात आली होती. यासाठी ञ्यंबकेश्वर उपजिल्हा रूग्णालयाचे मार्फत शहरात जनजागृती करून गोवर, रूबेला लसीकरण माहिमे विषयी माहिती पत्रक वाटप करण्यात आले.

या जनजागृती फेरीत गट विकास अधिकारी एम.के.मुरकुटे, तहसीलदार महेंद्र पवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ.मंदाकिनी बर्वे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.योगेश मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजया पवार, डॉ.दिनेश पवार, डॉ संदिप आडके, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.पंकज निकम,डॉ.अश्विनी पाटी, माजी सभापती देवराम भस्मे, वाघेरा गावचे सरपंच जयराम मोंढे,  तुषार को-हाळे, समीर मनियार आणि सर्व अधिकारी कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, आशा वर्कर व शिक्षक उपस्थित होते. ञ्यंबक पंचायत समिती कार्यालयापासून या फेरीस प्रारंभ करण्यात आला.

शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर जनजागृती केल्या नंतर ञ्यंबक पंचायत समिती कार्यालयात उपस्थित अधिकारी कर्मचारी यांची बैठक झाली. या बैठकीत लसीकरणाचा आढावा घेत झालेली प्रगती आणि यापुढील नियाजन यावर मागर्दशन करण्यात आले.गोवरच्या आजाराचे निर्मूलन आणि रूबेला या रोगावर नियंत्रणासाठी दिनांक 17 नोव्हेंबर पासून आरोग्य विभाग उप जिल्हारूग्णालय ञ्यंबक मार्फत लसीकरण मोहिम ञ्यंबकेश्वर शहरात राबवली जाणार आहे.

गोवर व रूबेला या आजारामुळे बालकावर अंधत्व, पंगुत्व, डायरिया, नमोनिया असे परिणाम होऊ शकतात. गर्भवती मातेस रूबेलाचा संसर्ग झाला तर होणारे अर्भक मृत्यू पावते किंवा जन्माला येणा-या बालकात जन्मजात दोष उत्पन्न होतात. ञ्यंबक नगर पालिका क्षेत्रात 9 महिने ते 15 वर्ष वयोगट असणा-या मुलांची संख्या 5593 असून तालुक्यात 59 हजार 500 बालक आहेत. शहरासह संपुर्ण तालुक्यात 100 टक्के लसीकरण करण्याचे उदिष्ट आहे.

दूध व अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप

0
मुंबई : दूध व अन्नपदार्थांमध्ये दूध भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना यापुढं जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असून तसं विधेयक लवकरच सभागृहात मांडलं जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज विधानपरिषदेत केली.

याआधी हा गुन्हा अदखलपात्र होता. तसंच, गुन्ह्याची शिक्षा फक्त सहा महिन्यांपर्यंत होती. मात्र, यापुढं हा गुन्हा दखलपात्र नसेल. या संदर्भातील कायदा आणखी कठोर केला जाईल. गुन्ह्याची तीव्रता पाहून सहा महिन्यांपासून ते जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावण्यात येईल, असंही बापट यांनी स्पष्ट केलं.

 

पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार…

0

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने भारतात प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ कमकुवत होण्याची भीती आणि खनिज तेलाच्या पुरवठ्यात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घटत आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळाला असून, रुपयाचे मूल्यही हळुहळू सावरत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते.

क्रूड तेलाच्या किंमती 63 डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी आल्याने देशातील तेलाच्या किंमतीत आणखी घट होऊ शकते. क्रूड तेल ऑक्टोबरमध्ये 86  डॉलर प्रति बॅरलनंतर 4 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर गेलं होतं. क्रूड सप्लाय वाढल्याने तसेच ग्लोबल इकोनॉमिक ग्रोथ कमजोर झाल्याने या दरात कपात झाल्याचे म्हटलं जातंय.

17 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती होण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर पेट्रोल 6.45 रुपये आणि डिझेल 4.42 रुपये प्रति लीटर स्वस्त झालं. गुरुवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिेझेलचे दर 71.27 रुपये प्रति लीटर झालं. तर आज मुंबईत पेट्रोल 81.50 रुपयांनी तर डिझेल 74.34 रुपयांनी मिळतंय.

अभिनेत्री उदिता गोस्वामीने दिली गोड बातमी

0
मुंबई : नुकतेच नेहा धुपियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तसेच फिल्म इंडस्ट्रीमधून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नेहा धुपियापाठोपाठ अभिनेत्री उदिता गोस्वामीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

इमरान हाशमीसोबत अभिनय केलेल्या या अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला आहे. उदिताचं हे दुसरं बाळ आहे. या आधी तिला एक मुलगी आहे. आता तिने मुलाला जन्म दिला आहे. उदिताचं फिल्मी करिअर काही खास राहिलेलं नाही. बॉलिवूडमधील हँडसम हंक जॉन अब्राहमसोबत ‘पाप’ या सिनेमात लीड रोल उदिताने केला होता. हा सिनेमा पूजा भट्टने दिग्दर्शित केला होता.

 

मुंढेंचा बदली आदेश येताच महापौरांच्या रामायण बंगल्याजवळ फोडले फटाके

0

नाशिक,  (प्रतिनिधी) ता. २२ : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आज दुपारी आदेश येताच काही उत्साही कार्यकर्त्यांनी महापौरांच्या रामायण बंगल्याजवळ फटाके फोडल्याची घटना घडली.

दुपारी साडेबाराच्या सुमारास सात ते आठ युवकांनी महापौरांच्या रामायण बंगल्याजवळ फटाके फोडले. तुकाराम मुंढें यांच्या शिस्तींच्या कारभारामुळे आर्थिक कोंडी झालेले काही राजकारणी त्यांच्यावर नाराज होती.

त्यामुळे मुंढेंच्या बदलीनंतर शहरातील काही राजकारणी, ठेकेदार आणि काही कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेकांनी काल रात्रीच हा जल्लोष साजरा केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

 

‘हाऊसफुल ४’ चं शूटिंग पूर्ण ; सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई : अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला हाऊसफुल 4 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे शुटींग नुकतेच पूर्ण झाले असल्याची माहिती अभिनेता अक्षय कुमारने सोशल मिडीयावर दिली आहे. तसेच अक्षयने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

‘चित्रीकरण संपलं, पण मजा कायम राहणार आहे ती अजून संपली नाही. लवकरच भेटी २०१९ मध्ये’, असं कॅप्शन अक्षयने शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये अक्षयसोबत क्रिती सेनन, रितेश देशमुख, बॉबी देओल,पुजा हेगडे,चंकी पांडे,जॉनी लिव्हर,बोमण इराणी,क्रिती खारबांडा आणि दाक्षिणात्य सुपरस्टार राणा डग्गुबती ही स्टार मंडळी दिसून येत आहेत.

मनपा आयुक्त मुंढेंची मंत्रालयात सहसचिवपदी नियुक्ती

0

प्रतिनिधी

नाशिक, ता. २२ : नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे पत्र आज सकाळी उशिरा मनपात प्राप्त झाले असून मुंबईला मंत्रालयातील नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

कालपासूनच मुंढे यांच्या बदलीची चर्चा होती. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हतां. आज अखेर यासंदर्भातील मुख्य अपर सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांचे पत्र प्राप्त झाले असून बदलीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

पत्रावर आजची २२ नोव्हेंबरची तारीख असून आपला कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून तत्काळ नवीन जागी रुजू होण्याचेही त्यात नमूद केले आहे.

त्यानंतर तुकाराम मुंढे आपला कार्य्‍भार सोपविण्यासाठी दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्याचे समजते.

दरम्यान महापालिका भवनाच्या मुख्य भागात काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

Social Media

26,942FansLike
5,154FollowersFollow
1,368SubscribersSubscribe
error: Content is protected !!