‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहे. मराठी सिनेमांच्या दिग्दर्शकांच्या यादीमध्ये महेश मांजरेकर यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. महेश मांजरेकर यांनी अभिनयाबरोबरच काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे. त्यामुळे लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

‘न्याय देवता आंधळी असते.. आम्ही डोळस होतो’, अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटामध्ये दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाचं दुसरं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. काही दिवसापूर्वी दिग्दर्शक, लेखक अभिराम भडकमकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं.

फेसबुक आता निवडणूकांपासून चार हात दूर राहणार

0
नवी दिल्ली : जगभरातील विविध देशात होणार्‍या निवडणूकांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवणार्‍या फेसबुकने आता दोन पावले मागे घेतली आहेत. यापुढेे कोणत्याही देशाच्या निवडणूकांचा प्रचार फेसबुकवरून न करण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला आहे.

अमेरिकेमध्ये २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणाऱ्या फेसबुकने यापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी २०१६ मध्ये त्यांच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते. मात्र आता कोणाच्याही निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येणार नसल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं आहे.

फेसबुकसह इतर ऑनलाइन कंपन्या गुगल आणि ट्विटरने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोफत सहकार्य करण्याचं ठरवलं होतं. अमेरिकेच्या निवडणुकीतील सहभाग आणि अॅनालिटिका प्रकरण यामुळे फेसबुकवर टीका झाल्याच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

व्यक्तिगतरित्या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून जागतिकस्तरावर उमेदवारांना सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करू, असं फेसबुकनं म्हटलं आहे. तसेच राजकीय संघटना आजही फेसबुकचा वापर करून मूलभूत प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा जाहिरात मंजूर करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून मदत घेऊ शकतात, असंही फेसबुकने स्पष्ट केलं आहे.

फेसबुक, ट्विटर आणि गुगलने २०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत ‘अर्ध-डिजिटल सल्लागार’ म्हणून काम केलं होतं, असं युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ क्रोनिला आणि युनिव्हर्सिटी ऑफ उटाहच्या प्रबंधातून आढळून आलं आहे.

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

0
मुंबई : सर्वात चर्चेत राहिलेली वेबसिरीज सेक्रेड गेम्सच्या पुढील भागांचा टीझर प्रदर्शित झाला आहे. याचा पहिला भाग इतका लोकप्रिय झाला आहे की याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता ही उत्सुकता वाढवण्यासाठी टीझरही येऊन झळकला आहे.

अनुराग कश्यप दिग्दर्शित सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी, सैफअली खान, राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. एक डॉन गणेश गायतोंडे, पोलीस सरताज सिंग आणि २५ दिवसांचा टाइमबॉम्ब लागलेलं मुंबई शहर या कथानकाभोवती फिरणारी ही वेबसिरीज तुफान लोकप्रिय झाली आहे. दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

हॉलिवूड चित्रपटात झळकणार हा’ बॉलिवूड अभिनेता

0

मुंबई : इरफान खान, अनिल कपूर, प्रियंका चोप्रा, दीपिका पदूकोण या कलाकरांसोबत आता आणखी बॉलिवूड अभिनेता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. बॉलिवूडमधला अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ याला एका हॉलिवूड चित्रपटाची ऑफर आली आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते लॉरेंस कासन ऑफ हे नुकतेच भारत भेटीवर आले होते. यावेळी ते टायगर श्रॉफला भेटले. या भेटीच्या वेळी त्यांनी एका बिग बजेट चित्रपटाची चर्चा केल्याचे समजते.

 

बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश झाला डॅडी

0
मुंबई : बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश हा डॅडी झाला असून त्याच्या घरी कन्यारत्न म्हणजेच एका गोंडस मुलीने जन्म घेतला आहे. गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारस नीलची पत्नी रूक्मिनी सहाय हिने मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. अर्थात अद्याप नीलने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

गत एप्रिल महिन्यात आपण बाबा बनणार असल्याची गोड बातमी नीलने चाहत्यांशी शेअर केली होती. ‘मी आणि रूक्मिनी आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू करणार आहोत. मी बाबा बनणार आहे. मुलगा असो वा मुलगा याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. आमच्या घरी नवा पाहुणा येणार हा आनंद खूप मोठा आहे,’असे नीलने म्हटले होते.

नील अखेरचा ‘वजीर’ या सिनेमात दिसला होता. याशिवाय ‘प्रेम रतन धन पायो’,‘आ देखें जरा’,‘शॉर्टकट रोमियो’,‘प्लेअर्स’,‘जॉनी गद्दार’ यासारख्या चित्रपटात तो अभिनय केला आहे.

रुपयाची घसरण : आता सीएनजीही महागणार

0
नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयांचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागला आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत असताना सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी गॅसच्या दराची किंमत ऑक्टोबर महिन्यात ठरवण्यात येणार आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे खर्चात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. सीएनजी आणि पीएनजी गॅस वितरकांसाठी गॅसची किंमत वाढली आहे. त्यामुळे आता दरवाढीचा फटका सीएनजी व पीएनजी ग्राहकांना बसणार आहे.

पेट्रोल १५ पैशांनी महाग
मुंबईत पेट्रोल १५ पैशांनी महाग झाले आहे.डिझेलचे दर मात्र जैसे थे आहेत. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली नव्हती. आता दोन दिवसांनी मात्र पेट्रोल १५ पैशांनी महाग झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

जय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात

0

मुंबई  दि. २१ प्रतिनिधी | पान खाणे हे एक व्यसन होते. कालांतराने खाणाऱ्यांची पान संख्या वाढली. पानाचे प्रकारदेखील वाढले. पानाचे दुकान म्हणजे टपरी… असं आपण मानतो. पण रात्री बेरात्री पान खायची लहर आली तर ही टपरी बंदच असते. मात्र गुजरातमधील सुरत येथे पानाची मोठमोठी आणि बहुतांश एअर कंडीशन्ड दुकाने आहेत.

त्यातच ‘जय श्री गणेश’नावाची अनेक पान दुकाने पाहायला मिळतील.पांडे कुटुंबीयांच्या मालकीची ही दुकाने या परिवारातील बॉसदेव, राजधर, गुलाबधर, लालमणी, शेषमणी,रामधर हे कित्येक पिढ्यांपासून चालवत आहेत.

पुना पाटिया येथील ‘जय श्री गणेश’ पान दुकानाचे मालक बंसीधर पांडे आहेत. त्यांची एकट्यांचीच सात ते आठ एसी दुकाने आहेत. त्यांच्या दुकानातील कर्मचारी सुनील सिंह यांनी सांगितले की, आम्ही आमच्या दुकानांत दोन नवी पाने सुरू केली आहेत. यातलं पहिलं आहे‘लड्डू मिठा पान’, जे दोन महिन्यांपर्यंत कधीही खाता येते.

ते लवकर खराब होत नाही. त्यात गुलाब, खसखस, केसर, कोकोनेट चॉकलेट, डॉयफ्रूट्स असे वेगवेगळे पदार्थ आम्ही घालतो. दुसरे पान आहे ‘फेस येणारे काथयुक्त पान’. हे पान खाल्ल्याने तोंडाला छान रंग येतोच, पण त्याच्या अप्रतिम चवीमुळे मनही खूष होते. तोंड धुतले की रंग निघूनही जातो. ही दोन्ही पानं लोकांमध्ये हळूहळू फेमस होऊ लागली आहेत.

‘जय श्री गणेश’दुकानाचे मालक बंसीधर पांडे यांनी मुंबईतील एका हॉटेलमधील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की,”सुरतमधील लोकांना पान खाणं खूप आवडतं.आमचं हे दुकान फॅमिली पान शॉप आहे. लोकांना जास्तीत जास्त चांगलं देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमचे‘लड्डू मिठा पान’ आणि ‘फेस येणारे काथयुक्त पान’ लोकांना खूपच आवडतंय. म्हणूनच लवकरच आम्ही मुंबईसह महाराष्ट्रात आमच्या शाखा उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मीर: दहशतवाद्यांकडून तीन पोलिसांची हत्या

0
श्रीनगर – गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जाते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री चार पोलिसांचं दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आले होते. यातील तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. शोपियान जिल्ह्यातून हे चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाले होते. यातील तीन पोलिसांची हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक शुक्रवारी सकाळी वृत्त समोर आले आहे. दरम्यान, एका पोलिसाची सुटका करण्यात आली आहे. ”राजीनामा द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील”, अशी धमकी काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.

‘हिजबुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेनं अलीकडंच जम्मू-काश्मीरमधील सर्व पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. ‘हिजबुल’चा दहशतवादी रियाज नाइकू याने काही दिवसांपूर्वी ही धमकी दिली होती. पोलिसांनी नोकरी सोडावी आणि तरुणांनी पोलिसांमध्ये भरती होऊ नये. तसेच पोलिसांनी त्यांच्या राजीनाम्याची एक प्रत इंटरनेटवर अपलोड करावी आणि सोशल मीडियावरही हा राजीनामा व्हायरल करावा, असं रियाझनं म्हटलं होतं. हिजबुलच्या या धमकीचे पोस्टर जम्मू-काश्मीरच्या अनेक गावांमध्ये लागले होते. तसंच, हे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आले होते. इतकंच नव्हे, धमकीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.

ऑक्टोबरमध्ये गॅससह सीएनजीत होणार दरवाढ

0
मुंबई : डॉलरच्या तुलनेत रूपयाचे होत असलेल्या अवमूल्यनामूळे देशात पेट्रोल डिझेलच्या दरात अभूतपूर्व वाढ होत आहे. येत्या काही दिवसात पेट्रोल डिझेल शंभरी गाठणार असल्याचे संकेत मिळत आहे. हे कमी की काय आता ऑक्टोबरमध्ये घरगुती गॅससह सीएनजी च्या दरातही वाढ होण्याचे संकेत देण्यात येत आहेत. यामुळे सामान्यजणाचे बजेंट साफ चुकणार आहे.

देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या गॅसच्या बेस प्राइजमध्ये प्रति युनिट १४ टक्के म्हणजे ३.५ डॉलरने (जवळपास २५२ रुपये) वाढ होण्याचा अंदाज आहे. मार्च २०१६मध्ये गॅसच्या किंमतीत सर्वाधिक ३.८२ डॉलरने वाढ झाली होती.

नैसर्गिक वायूची किंमत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि रशियातील सरासरी दराच्या आधारे दर सहा महिन्यांनी ठरवण्यात येते. मागील काही आठवड्यांपासून रुपयाची किंमत घसरली आहे. त्याचा फटका आता ग्राहकांना बसणार आहे. नैसर्गिक वायूची किंमत डॉलरमध्ये असते. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे खर्चात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

सीएनजी आणि पीएनजी गॅस वितरकांसाठी गॅसची किंमत वाढली आहे. त्यामुळे आता दरवाढीचा फटका सीएनजी व पीएनजी ग्राहकांना बसणार आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

0
जम्मू : जम्मू- काश्मीरमधील बंदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. गुरुवारपासून ही चकमक सुरु आहे. अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी बांदीपोरा परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

 

Social Media

26,083FansLike
5,154FollowersFollow
1,132SubscribersSubscribe
error: Content is protected !!